आजच्या मध्यम वर्गीय तरुण किंवा शाळेत शिकणाऱ्या पिढीला प्रवास हा फारच सुखकर झाला आहे. बहुदा हवाई प्रवास असतो किंवा रेल्वे चा असला तरी एअर conditioned च reserveation असत.स्टेशनला ola/उबेर ने जायचं. हलकी फुलकी व्हील असलेली बॅग ढकलून प्लॅटफॉर्मवर न्यायची गाडी आली की शांत पणे गाडीत चढायचं आपला नंबर शोधायचं आणि बसायच दोन मिनिटांनंतर मोबाईल काढून त्यात गुंगून जायचं मग आजूबाजूला कोण आहेत कुठे जाणार आहेत कशाला चालले आहेत ह्याचा आणि त्यांचा काहीच संबंध नसतो. थोडक्यात तुमची फक्त जागा बदलते तुम्ही एक ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी पोहचता पण हा काय प्रवास झाला? ना तुम्हाला गर्दीचा अनुभव येतो, ना अडचणींचा सामना, ना अज्ञात प्रसंगाची भीती, ना लोकांच्या सामाजिक बांधिलकीचा अनुभव थोडक्यात काय तर थोडा वेगळा,safe, आरामदायी गेलेला वेळ पण अगदी निरस.आमच्या लहानपणी म्हणजे
1960-70 दरम्यान रेल्वेचा प्रवास एक साहस होत,एक दिव्य होत,एक लढाई होती,एक social इव्हेंट पण होता आणि एक life expirience होता.
माझे वडील सरकारी नोकरीत होते. क्लास 2 ऑफिसर होते म्हणजे social status तसा बराच वरचा, गरीब तर अजिबात नाही. दर तीन वर्षांनी बदली व्हायची. बदली झाली की प्रवासाची तयारी सुरु. पूर्ण शिफ्टिंग असायचं. बॅग पण आत्ता सारख्या हलक्या आणि व्हील वाल्या नव्हत्या. एक एक बॅग ज्याला तेंव्हा trunk म्हणायचे त्या लोखंडी असायच्या त्याच रिकामं वजन पण आजच्या भरलेल्या बॅग पेक्षाही जास्त असायचं वर त्याचे कोपरे अशे टोचायचे की जीव गेलाच वाटायचं.हे trunk उचलायला एक कडी असायची त्यांनी trunk उचलण अशक्यच वर हाताची बोट तुटायची पाळी.
दुसरा प्रकार त्याला होल्डऔल म्हणायचे. ते कापडी असायचं आणि त्यात चादरी, कपडे वगैरे सामान भरून त्याची गुंडाळी करायची आणि वरून दोरी बांधायची. हा प्रकार सोयीस्कर होता.
पिण्याच पाणी नेण्यासाठी पितळ्याचा फिरकीचा तांब्या, तो इतका वजनदार की त्याचच वजन 3-4 किलो आणि पाणी मावायचं 1 लिटर. एकंदर सामान म्हणजे 2-3 trunk, 2-3 होल्डओल,2-4 कापडी पिशव्या आणि पाण्यासाठी फिरकीचा तांब्या. एकंदरीत सामानाच्या वजना पेक्षा container च वजन जास्त.जोडीला आम्ही तीन चार मुलं(एक दोन गांवी गेलेले असायचे.
रेल्वेत तीन क्लास, first,second आणि third. फर्स्ट आणि सेकंड क्लास चा आणि मध्यम वर्गी्यांचा काही संबंधच नाही ते फार श्रीमंता साठी होते. बर रिसर्वेशन सिस्टिम अस्तित्वात आली नव्हती असं वाटतं कारण आम्ही तरी ऐकलं नव्हतं.
स्टेशन पोहचण्या पर्यंतचा प्रवास एकदम रॉयल असायचा टांगा (घोडा गाडी ) तुन आम्ही स्टेशन ला येत होतो. कार डिस्ट्रिक्ट सारख्या गावात सुद्धा 2-4च असायच्या, टॅक्सीचा जन्म व्हायचा होता.प्लॅटफॉर्म पर्यंत हमाल सामान न्यायचे. एकदा सामान जिथे डबा येईल तिथे ठेवला की ते गायब व्हायचे आणि गाडी स्टेशनात आली की उगवयाचे.
बोजड सामान, लहान मुलं, रिसर्वेशन नाही, बेसुमार गर्दी पण तरी बाबा एकदम गौतम बुद्धा सारखे शांत आई पण नॉर्मल दोघांच्या चेहऱ्यावर काही टेन्शन नाही कारण हमाला वर आणि समाजावार पूर्ण भरवासा की ना आपलं मुलं खाली राहील ना सामान.
गाडी आली की गाडीत आत शिरो पर्यंत आणि बसायला जागा मिळो पर्यंत, हे आरडा ओरड, ही बोंबा बोंब, ही चिल्लम चिल्ली, हे धक्का बुक्की हा गोंधळ.
गाडीला कितीही गर्दी असली तरी हमाल सामान आत खिडकीतून टाकायचे (तेव्हा खिडक्या ओपन असायाच्या त्यांना स्टीलचे rod नव्हते पुढे जेव्हा चोर आणि चोरी वाढली तसें तसें rod लागयाला लागले.)मुलांना पण आत टाकायचे,सामान लावायचे. हमाला समोर इतर प्रवाशांचे काही चालायचे नाही.
गाडी प्लॅटफॉर्मवर आल्यापासून ते 15 - 20 मिनिटे म्हणजे एक गदारोळ मग हळू हळू शांत आणि पुढील 5-10 मिनिटात प्रवाश्यांचा आपसात गप्पा चालू.कुठून आलात, कुठे चालला, काय करता अशा संभाषणात कॉमन ओळख निघणार आणि त्या गप्पात मग एकमेकाची इतकी घनिष्ठ मैत्री व्हायची आणि मग पुढल्या स्टेशनला ह्यांची आतली टीम बाहेरच्या टीमचा सामना करायला तयार.
संध्याकाळी जेवणाचे डबे उघडले की आग्रहाने एकमेकाला खायच्या पदार्थांची देवाण घेवाण व्हायची. एकदा एकमेकांचे डबे share झाली की समजा relations चा जोड एकदम पक्का.
मग प्रवास संपायची वेळ यायची. आता काही हमाल नसायचा सामान उतरवायला तेव्हा हेच लोक सर्व सामान खिडकीतून उतरून देणार,मुलांना पण उतरवणार आणि गाडी सुटतांना एकदम प्रेमाने टाटा करणार.
लांबचा प्रवास असला तर चेहऱ्यावर कोळसाच्या भूकटीचा थर जमायचा पण
असे प्रवास आणि भेटलेल्या लोकांना खूप दिवसापर्यन्त आम्ही विसरूच शकत नव्हतो.
आमच्या लहानपणी मोबाईल नव्हते त्या मुळे आम्हाला प्रवासात आवडता पिक्चर बघायला मिळाला नसेल पण हा प्रवासाने मिळालेला अनुभव पिक्चर पेक्षा कैक पटीनी जीवनाला आनंदी करणारा होता. आज सर्व काही सुखकर झालं आहे पण ह्या सुखात नवी पिढी खूप काही miss करत आहे.
सुख आणि आनंद हे like pole च्या मॅग्नेट सारखे आहेत.जसे like pole एकमेकाला दूर ढकलतात तसेच सुख जवळ आलं की जीवनाचा आनंद दूर जातो.जगाची प्रवृत्ती सुखकारक होत चालली आहे म्हणूनच जीवनातला आनंद मावळत चालला आहे. सुखापासून दूर रहा आणि आनंद जवळ करा.