आज कामातून जानू ला वेळच मिळाला नव्हता की अभय शी थोडा बोलावं ..ती आज ऑफिस मध्ये खूपच बिझी होती आज..तेवढयात अभय चा च फोन तिला आला..स्क्रीन वर अभय च नाव वाचून तिने वेळ नसताना फोन उचलला.
जानू :हॅलो..कसा आहेस ? बर वाटत आहे का ?
अभय: कधी येणार आहेस ?
जानू : कुठे ?
अभय: तू म्हणाली होतीस ..की मला डिस्चार्ज मिळाला की तू मला पाहायला घरी येशील.
जानू : हो..पणं तुझी तब्येत तर ठीक होवू दे..आणि डिस्चार्ज तर मिळू दे.
अभय: मी आलो आहे घरी..
जानू : डिस्चार्ज मिळाला?
अभय: मी घेतला..सकाळीच आलो घरी.
जानू आपल हातातलं काम सोडून एका हाताने स्वतः च्या कपाळावर हात मारते..अवघड आहे बाबा या पोराचं ..ती स्वतः शी च बोलते.
जानू : तू वेडा आहेस का ? अरे तू लवकर बरा होवू दे म्हणून मी म्हटलं होत आणि तू तब्येत खराब असताना कसा काय डिस्चार्ज घेतलास ? कसले हॉस्पिटल होते ते जे असच सोडलं तुला ?
अभय: ते सर्व सोड तू येतो बोलली ना कधी येणार सांग ?
जानू : मी नाही येत..तू ठीक झाला की मग येईन बोलले होते..पणं तू तर आजारी असतानाच डिस्चार्ज घेऊन घर गाठल?
अभय: माणसं किती खोटं बोलतात हे आज कळलं मला.
जानू : हो आहे मी खोटारडी..आणि तू ..ठीक न होता च घरी आलास त्याचं काय ?
अभय: तू ये ना बघ मी लगेच ठीक होईन.
जानू: अभय काय वेड लागलं आहे का ? जरा तर काळजी घे स्वतः ची..मला अजिबात बोलायचं नाही तुझ्या सोबत.
अभय: हो हो तूच नको बोलू स..एक तर येतो म्हणून सांगून यायचं नाही आणि वरून बोलत नाही ही म्हणायचं.?
जानू: तू जा हॉस्पिटल मध्ये आधी मग बोलू.
अस म्हणून जानू फोन ठेऊन देते अभय ची तब्येत पुन्हा खराब होते ..तो घरीच डॉक्टर्स ना बोलावून ट्रीटमेंट घेतो..चार दिवसात अभय ठीक होतो ..जानू ला ही बरं वाटत.. अभय ठीक झालेलं पाहून .. अभय च रूटीन पुन्हा चालू होत...पणं तो आता जानू ला सारखं फोर्स करू लागतो एकदा भेट म्हणून ..जानू ही मग भेटायचं ठरवते.
जानू : ठीक आहे भेटू ..
अभय: खरंच ?
जानू : हो..
अभय: कधी उद्या ना ? मग सांग कधी येणार ?
जानू: नाही उद्या नाही..पुढच्या आठवड्यात भेटू ..या आठवड्यात खूप काम आहे ऑफिस मधे ..बिझी आहे शेड्युल..आणि मी नाही येणार तूच ये नाशिक ला..
अभय: पुढच्या आठवड्यात काय यार जानू ? बर ठीक आहे मी येतो नाशिक ला तू मला पत्ता सेंड कर ..आणि सुट्टी घे त्या दिवशी..
जानू : मी सुट्टी वगेरे घेणार नाही हाफ डे घेईन ..तू ये ..मग थोडा वेळ गप्पा मारू ..आणि तुझ्या मनाला ही शांती भेटेल एकदाचं भेटले की आणि माझ्या मागची किर किर ही कमी होईल सारखं भेट भेट ची..
अभय: किती वेळ भेटणार तू मग मला ?
जानू: किती वेळ भेटणार हे महत्त्वाचं आहे की भेटत आहे हे महत्त्वाचं आहे ते सांग आधी ?
अभय: काय यार जानू इतक्या वर्षांनी भेटत आहे तरी
तू एक दिवस ही काढू शकत नाहीस ? बर ठीक आहे ..तू म्हणशील तस..
जानू : ह्म्..गूड
अभय: बर सांग ना तुला काय काय आवडत ?
जानू : आता अचानक हे का विचारत आहेस ?
अभय: सांग ना ..काही तरी गिफ्ट घेईन ना तुझ्या साठी जे तुला आवडेल ..
जानू: अजिबात नको..मला काही नको..मला नाही आवड त गिफ्ट घ्यायला कोणा कडून.
अभय: तुला गिफ्ट दे बोललं नाही ..मी घे बोललं..आणि तुला आवडत नसेल तरी मला आवडत तुला द्यायला..आणि मी देणार तुला घ्यायचं असेल तर घे नाही तर फेकून दे तुझ्या हातात ते आता..
जानू : अभय नको ना मला पणं ..तू भेट फक्त बस इतकंच..
अभय: ये जानू साडी घेऊ का तुझ्या साठी ?
जानू : अजिबात नको ..घरी काय सांगेन मी ? ऑफिस ला गेले होते की शॉपिंग ला मी ?
अभय: त्यात काय होत आवडली तर घेतली म्हणून सांग ना..
जानू : नको साडी अजिबात नको..आणि मला साडी आवडत ही नाही.
अभय: मग काय आवडत ते तर सांग ..
जानू: मला काहीच नाही आवडत ..
अभय: ह...आता शोधायला हवं हे काहीच नाही कोणत्या शॉप मध्ये भेटत..
जानू : नको बोललं ना काही..
अभय: बर राहू दे नको सांगुस मीच आणेन मला आवडेल ते..
जानू : तुला काय करायचं ते कर तू कधी ऐकतोस माझं ?
अभय: ये मी कधी तुझं ऐकलं नाही अस झाल आहे का ?
मग बराच वेळ दोघे वाद घालत बसतात.. अभय खूपच खुश होता..जानू ला भेटणार म्हणून काय करू आणि काय नको असं झालं होत त्याला..कधी एकदा तो दिवस येतो अस झालं होत त्याला.. सात ..आठ वर्ष तर निघाली पणं हा एक आठवडा त्याला दशका सारखं वाटू लागला होता.... अभय ने आकाश ला ही सांगितलं होतं की तो जानू ला भेटायला जात आहे आकाश ने ही त्याला बजावलं होतं की भेटलास की मनातल परत एकदा तिला सांग .. आणि तिचा होकार घेऊन च परत ये..पणं फक्त प्रेमाची कबुली च नाही तर अजून हि अभय ने मनात काही तरी ठरवल होत...जे त्याने आकाश ला ही सांगितलं नव्हत.
जानू ही खुश होती .. अभय ला इतक्या वर्षांनी भेटणार म्हणून..पणं तिच्या मनाचं आणि आतल्या आवा जाच पुन्हा भांडण चालू झालं होत.. मन म्हणत होत नको भेटू ..आवाज म्हणत होता भेट ..शेवटी एकदा ठरवलं आहे भेटायचं तर आता माघार नाही घ्यायचं असं तिने ही ठरवल आणि पहिल्यांदा आतल्या आवाजाच ऐकलं .
आणि तो दिवस आला होता ज्या दिवशी ते दोघे भेटणार होते.. अभय तर सारखं एकच गाणं गुणगुणत होता..
आज उन से.. मिलना
हैं हमे..
के आज उन से मिलना हैं हमे..
क्रमशः