Janu - 40 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | जानू - 40

Featured Books
  • ફરે તે ફરફરે - 37

    "ડેડી  તમે મુંબઇમા ચાલવાનુ બિલકુલ બંધ કરી દીધેલુ છે.ઘરથ...

  • પ્રેમ સમાધિ - પ્રકરણ-122

    પ્રેમ સમાધિ પ્રકરણ-122 બધાં જમી પરવાર્યા.... પછી વિજયે કહ્યુ...

  • સિંઘમ અગેન

    સિંઘમ અગેન- રાકેશ ઠક્કર       જો ‘સિંઘમ અગેન’ 2024 ની દિવાળી...

  • સરખામણી

    સરખામણી એટલે તુલના , મુકાબલો..માનવી નો સ્વભાવ જ છે સરખામણી ક...

  • ભાગવત રહસ્ય - 109

    ભાગવત રહસ્ય-૧૦૯   જીવ હાય-હાય કરતો એકલો જ જાય છે. અંતકાળે યમ...

Categories
Share

जानू - 40

जानू आज सकाळी आवरत असते की अभय चा मॅसेज येतो..

अभय:गूड मॉर्निंग..

जानू : गूड मॉर्निंग..आज लेट ?

अभय: हो आज सुट्टी घेतली आहे ..घरी आहे ना ..म्हणून ..तुझं आवरलं का ?

जानू : का सुट्टी ? हो चाललं आहे आवरत आहे ..

अभय: अग घरी थोड काम होत म्हणून घेतली सुट्टी..किती वेळ आवरतेस ग ? लेट नाही का होत ऑफिस ला ?

जानू : अरे ऑफिस मध्ये एक कार्यक्रम आहे म्हणून जरा लेट चाललं आहे.

अभय: एक सेल्फी तर पाठव बघू..कशी तयार झाली आहेस?

जानू : झालं का तुझ सकाळी सकाळी चालू ..?

अभय: पाठव ना बघू तर दे ..

मग जानू अभय ला एक सेल्फी पाठवते .. व्हाईट रंगाचा ड्रेस घातलेला असतो तिने ...गळ्यात एक छोटी चैन .. व एक लांब शी माळ घातली होती.. अभय पाहून खुश झाला..

अभय: खूप छान दिसत आहेस..आज खरंच मॉर्निंग गूड झाली.. पणं एक सांगू ?

जानू: थँक्यु ..हा सांग..

अभय: ती गळ्यात तू माळ घातली आहेस ना ..ती काढ ..ती नाही सूट करत व्हाईट ड्रेस वर..

जानू: अरे पणं मला आवडली आहे..

अभय: हो छान आहे पणं या ड्रेस वर नाही ना सूट होत ..पुन्हा कधी तरी घाल.

जानू ची ईच्छा नसते माळ काढायची पणं काय माहित ती खरंच माळ काढून ठेवते..तिला स्वतः च च आश्चर्य वाटत होत ..की आपण अभय च इतकं ऐकतो?

जानू: काढली बाबा..खुश ?

अभय: हो..पणं तू ना ड्रेस पेक्षा साडी वर छान दिसतेस..

जानू: तू आणि कधी पाहिलंस?

अभय: काल तू फोटो पाठवले होते त्यात एक फोटो होता ना साडी वरचा..कधी काढला आहे तो ?

जानू: तो कॉलेज मध्ये असताना काढला होता साडी डे दिवशी..

अभय नी त्या फोटो चा एक व्हिडिओ तयार केलेला असतो तो व्हिडिओ तो जानू ला पाठवतो..

दिलं माग राहा हैं मोहल त..
तेरे साथ धडकने की..
तेरे नाम से जिने की..
तेरे नाम से मरणे की..
तेरे साथ चलू हर दम..
बनकर के परछाई..
एक बार इजाज त..दे..
मुझे तुझमे ढ लने की...

जानू : छान बनवला आहे व्हिडिओ...याच साठी फोटो मागत असतोस वाटत....कधी वेळ भेटतो तुला हे सर्व करत बसायला ?

अभय: थँक्यु ..वेळ भेटत नसतो..आपल्या माणसानं साठी काढावा लागतो..

जानू : बर बर ..चल बाय ..मला उशीर होत आहे..तू काय सुट्टी घेतली आहेस.

अभय: बर जा आलीस की बोल..परत

जानू: ठीक आहे..

जानू ऑफिस ला जाते कार्यक्रम छान होतो..आज जानू ला अभय ची आठवण येत असते..घरी गेले की बोलू म्हणून ती परत कामाला लागते...घरी गेल्यावर ती अभय ला मॅसेज करते .. तर तो मी बाहेर आहे थोड्या वेळाने बोलतो म्हणून रिप्लाय देतो..मग जानू ही आपली काम आवरून घेते.. जेवण वगेरे झाल्यावर अभय चा तिला परत मॅसेज येतो..

अभय:जेवलीस का?

जानू: हो ..तू ?

अभय: आता बसतोय..

अभय जेवायला बसतो आणि जानू ला पुन्हा मॅसेज करतो..ये जेवायला..

जानू : तू जेवत आहेस ? पणं मी तर जेवले नाही ना अजून..

अभय: आता तर बोलली होतीस की जेवले म्हणून..

जानू : असच बोलले.. बर जेव तू..

अभय जेवायचं सोडून मध्येच उठून त्याच्या रूम मध्ये जातो..

अभय: बोल..

जानू : तू जेव मग बोलू..

अभय: नको..तू नाही जेवलीस ना..

जानू: अरे मी जेव ली ..कधीच असच चेष्टा केली तुझी..

अभय: काय जानू ? आई ओरडली ना मला ..जेवायचं मधूनच उठलो म्हणून ..

जानू: सॉरी रे..पणं तू वेडा आहेस का ? का उठलास मग ? जेव जा.

अभय: हो आहे वेडाच..राहू दे..भूक नाही मला मी बाहेर गेलो होतो तेव्हा केला होतं नाश्ता बाहेर..

जानू: बर..काय करायला गेलता बाहेर ?

अभय: फ्रेण्ड्स सोबत गेलेलो..

जानू: का ?

अभय: त्याचं काम होत शोरुम ला गेलतो.

जानू: तुझं काय काम होत मग ?

अभय: सोबत गेलतो.

जानू: का ?

अभय: माहित नव्हते त्याला म्हणून.

जानू: तुला बर सर्व माहित असत?

अभय:आहे थोड फार..

जानू: अजून काय काय आहे माहित?

अभय: बऱ्यापैकी सर्व..तुला काय हवं?

जानू: तुला काय माहित?

अभय: सर्व माहित आहे..तुला काय हवं ते सांग..

जानू : तू सांग..

अभय: तू म्हणशील ते..

जानू:काहीच नाही माहिती य ..का?

आता अभय ला कळत जानू त्याची खेचत आहे ..तो खूप हसतो...आणि जानू ही हसत असते..

अभय: ये एक वेळ सांगतो मग..

जानू: नको...इथेच बर आहे नाशिक छान आहे.

अभय: यायचं नसेल आमच्या कडे..

जानू : हो आणि तू कुठे घरी असतोस ?

अभय: असतो ना..

जानू: पहावं तेव्हा तर बाहेरच फिरत असतोस..

अभय: हो..तू काही येत नाहीस..म्हण..असतात काम उगाच कशाला बाहेर जावू?पणं तुला कस माहीत मी बाहेर असतो ते ?

जानू : जेव्हा विचारावं तेव्हा बाहेर आहे च म्हणतोस..

अभय: म्हणजे आहे लक्ष आमच्यावर.. आता तिकडे पण येणार आहे..

जानू : कुठे ?

अभय: तुझ्याकडे

जानू : कशाला ? काय काम आहे ? तिथेच राहा.

अभय: नाही येऊन जावं लागेल..

जानू:का ?

अभय: आठवण येते तुझी सारखी म्हणून

जानू : मी तर बोलावलं नाही..नको नको येऊ ..जगू दे गरिबाला..

अभय: तू बोलावलं नाहीस तरीही..येणार..आम्ही कुठे गरिबाला मारायला लागलोय..

जानू: नको येवू ..

अभय पुढे बोलत राहतो आणि जानू मॅडम केव्हाच झोपी गेलेल्या असतात..मग अभय स्वतः शी च बोलत राहतो..झोपली वाटत.. जावंच लागेल नाशिक ला जानू काही बोलवणार नाही..माझं मी च जावं लागेल..तो ही त्या विचारात झोपी जातो..

क्रमशः