समीर जानू ला पाहून हसत असतो..आणि त्या हसण्याने जानू चे कान फटातात की काय असं तिला होत..ती आपल्या कानावर हात ठेवते..आणि घाबरून सप्नातून जागी होते..हो तिला समीर च स्वप्न पडलं होत..ती आजू बाजूला पाहते तर ऑफिस ..समीर काहीच नसत..मग तिच्या लक्षात येत स्वप्न होत ते..मोबाईल मध्ये वेळ पाहिलं तर पहाटे पाच..पहाटेच स्वप्न खरं होतात म्हणतात..खरंच जर समीर परत आला तर..स्वतःच्याच विचाराने तिचं अंग कापत ..घाम फुटतो..खरंच जर समीर परत आला तर..तर..माफ करू शकेन का मी त्याला ? काय चुकी होती माझी ? वेड्या सारख प्रेम च तर केलं होत मी त्याच्या वर पणं त्याची शिक्षा त्याने मला heartless जानू बनवून दिली...त्याला विसरायचं ठरवुन जगत आहे ना मी मग का ? का ? त्याची स्वप्न त्रास देतात मला ? तो परत येईल ? हे..तो का परत येईल ? त्याला खरंच काळजी असती तर एकदा तरी त्याने आपला विचार केला असता..जेव्हा त्याची सर्वात जास्त गरज होती आपल्याला तेव्हा च त्याने आपली साथ सोडली ...मग पुन्हा आला तर काय विश्वास की तो पुन्हा आपल मन तोडून निघून जाणार नाही..समीर चे शब्द पुन्हा जानू च्या कानात घुमत होते..सायको आहेस तू..मी चूक केली तुझ्या सोबत बोलून ..तुला मला मिळवायचं आहे..जानू ने आपले कान दोन्ही हातांनी घट्ट झाकून घेतले..आणि आणि रडून ती स्वतः सोबतच बोलू लागली..नको कोणी मला ..नको तो समीर ही ..आणि दुसरं ही कोणी..सर्व जण सारखे असतात..पाहिलं सवय लावतात ..आणि नंतर प्रेमाचा अपमान करून मनाचे तुकडे करून सोडतात..मी एकटीच बरी आहे..नको कोणाचं प्रेम मला..या जगात..प्रेम बिम काहीच नसत.. असल तरी ..जर प्रेम समीर सारखं असेल तर मला ते मुळीच नको..सावरलेली जानू ..पणं एका स्वप्ना मुळे..पुन्हा जानू ढासळली होती..प्रेमाचं नाव ही नको होत तिला आता तिच्या आयुष्यात...तिने स्वतः वरच राग काढायला चालू केलं होत ..काहीच न खाता पिता ऑफिस मध्ये गेली होती ..कुठेच लक्ष लागत नव्हतं...एक स्वप्न ..ही पुरेस होऊन गेलं होत तिची जखम पुन्हा ताजी व्हायला..जेव्हा कधी ती टेन्शन मध्ये असायची ..तेव्हा ती स्वतः ला च त्रास करून घ्यायची .. ना जेवायची ना कोणा सोबत बोलायची..सवयच होती तिला.. अभय चे किती तरी फोन आणि मॅसेज येऊन गेले होते पणं तिने त्या कडे पूर्ण पने दुर्लक्ष केलं होत.
अभय ला ना जानू ने गूड मॉर्निंग चा रिप्लाय दिला होता ना त्याचे फोन उचलले होते..दोन दिवस उलटून गेले होते पणं जानू चा काहीच पत्ता नव्हता ती ऑनलाईन ही येत नव्हती ..काळजीने अभय चा जीव कासावीस झाला होता..जानू पुन्हा आपल्या आयुष्यातून दूर गेली की काय या विचाराने त्याचं मन घाबरून गेलं होत....अजून थोडी वाट पाहून नाशिक ला जावून तिला भेटायचं त्याने ठरवलं होतं..त्याचं ही मन कुठेच लागत नव्हत ..किती तरी वेळ तो मोबाईल पाहत बसत होता..जानू चा मॅसेज येईल या आशेने..दोन दिवस झाले जानू थोडी शांत झाली होती..मोबाईल हातात घेऊन तिने अभय च स्टेटस पाहिलं..
खैरियत पूछो ,
कभी तो कैफियत पूछो,
तुम्हारे बिन दिवाणे का क्या हाल हैं,
दिलं मेरा देखो ,
ना मेरी हैसिय त पूछो,
तेरे बिन एक दि न जैसे
सौ साल हैं,
अंजा म ..हैं ..की ये..मेरा... होना.. तुम्हे..हैं..मेरा..
जितनी भी हो दुरीया .. फिल्हाल हैं..
अभय ला जानू ऑनलाईन दिसते तसा तो लगेच मॅसेज करतो ..
अभय: हॅलो..
जानू : ह म्म..
अभय: कुठे आहेस ? काय झालं ? बोलली का नाहीस दोन दिवस झाले?
जानू: ह.. म्..
अभय: ह.. ह..काय बोल ना काय विचारतोय ?
जानू : काय ?
अभय: काय झालंय?
जानू : काही नाही..
अभय: सांग ना काय झालंय ?मला अंतर देत आहेस तू ..?
जानू : काही नाही झालं..कशाला इतकं हायपर होत आहेस ?
अभय: कोणी काही बोललं का ? बाबा काही बोलले का ? आजारी आहेस का ? काय झालं सांग ना प्लीज..?मी येऊ का नाशिक ला ?
जानू : तू का इतक टेन्शन घेत आहेस ..काही नाही झालं..कोणी काही नाही बोललं...आणि ठीक आहे मी..नाही बोलले दोन दिवस तर काय त्यात ..इतकं टेन्शन घेण्या सारखं? आणि उठ सुठ तू काय नाशिक नाशिक करत असतोस ?
अभय: दोन दिवस नाही बोललीस ? मी किती टेन्शन मध्ये होतो..आणि तू म्हणतेस काय झालं दोन दिवस नाही बोलले तर?
जानू : मग काय होत नाही बोललं तर ..आणि मी काय नेहमीच तुझ्या सोबत बोलत राहणार आहे का ? कधी ना कधी बंद होईलच ना बोलणं..आताच सवय लावून घे..
अभय ला तर तिचं ऐकूनच खूप कस तरी होत..काय झालं आहे हिला ने मक ..अस का बोलत आहे ही ?तो स्वतः च्या भावनेवर ताबा ठेऊ शकत नाही ..आणि तो आपल्या मनातलं जानू ला सांगतो..
अभय: का नाही बोलणार तू माझ्या सोबत आयुष्यभर ? सात वर्षां नंतर जानू तू पुन्हा माझ्या लाईफ मध्ये आली आहेस..आणि आता काही केल्या मला तुला गमवायच नाही..जानू माझं तुझ्या वर खूप प्रेम आहे...पहिल्या पासूनच..पणं मला तुला सांगता आलं नाही..जेव्हा सांगायचं होत तेव्हा तू दूर गेली होतीस ..आता इतक्या वर्षांनी तू मला भेटली आहेस ..मी तुला दूर जावू देणार नाही..मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय..वेडा म्हण नाही तर काही ही म्हण पणं मला तुझं वेड आहे .. माझा जीव आहेस जानू तू..i love you jaanu...
अभय च बोलणं ऐकून तर जानू च डोकं च हालत..प्रेम ? हा शब्द ही नकोय मला आणि हा. काय बोलतोय ? मी तर नेहमी फक्त त्याला फ्रेन्ड मानल..आहे..
जानू : प्रेम बिम काही नसत अभय या जगात..आणि असले विचार ही करू नकोस .मी कधीच तुझ्या वर प्रेम केलं नाही..तू फक्त माझा फ्रेन्ड होतास आणि कायम फ्रेन्ड च राहशील..प्रेम बिम या भावनेला माझ्या लाईफ मध्ये जागा नाही..
जानू चे विचार ऐकुन अ भय ला काय वाटलं असेल आता हे तुम्ही समजून चला..
अभय: का ? प्रेम करणं गुन्हा आहे का ?
जानू : हो गुन्हा आहे ..खूप मोठा गुन्हा आहे..प्रेम आयुष्य बरबाद करत .. अभय तू ही या प्रेमा पासून दूर राहा..
अभय: तू नाही भेटलीस तर मी बरबाद होईन जानू..
जानू : अभय प्रेमा च नाव ही नकोय मला माझ्या लाईफ मध्ये प्लीज...आताच काय मी कधीच तुझ्या वर प्रेम करणार नाही..तुझ्या वर तर काय कोणत्याच मुला वर करणार नाही..
अभय ला तिचं बोलणं काही समजत नाही अस का बोलते ही ..तो तिला खूप फोर्स करून तिला कारण विचारतो..तेव्हा ती समीर बद्दल सर्व काही अभय ला सांगते.. अ भय ला तर सर्व ऐकुन च धक्का बसतो..जानू च सोबत कोणी अस करू शकत यावर त्याचा विश्वास बसत नव्हता..त्याचं ही मन तुटलं होत पणं तरी ही त्या ही परस्थिती त त्याने स्वतः ला सावरलं..
अभय: जानू समीर वर तुझं अजून ही प्रेम आहे का ? अजून ही तुझी इच्छा आहे का त्याच्या सोबत लग्न करण्याची?
जानू : सोड ना तो विषय नको..बोलू..
अभय: खर सांग जानू .. जर अजून ही तुझ्या मनात असेल तर फक्त एकदा त्याचा पत्ता दे मला ..मी त्याला समजावं तो..मी त्याला तयार करेन लग्ना साठी..आणि तो हो बोलेल माझ्या वर विश्वास ठेव ..मी परत आणेन त्याला तुझ्या कडे..
जानू ने जर हो बोललं तर अभय ला या गोष्टी ची खर तर खूप भीती वाटतं होती ..पणं जर ती समीर सोबत खुश राहणार असेल .. तर आपण दूर राहू तिच्या पासून ..ती खुश तर मी ही खुश अस त्याने स्वतः च्या मनाला समजावलं होत..काळजावर दगड ठेवला होता त्याने..
जानू : नाही ..तो माझ्या नजरेतून उतरला आहे आता..आणि आता नजरेतून उतऱ्यल्यावर कसल प्रेम ? त्याच्या वरच प्रेम तर कधीच डोळ्यातील अश्रू सोबत वाहून गेल..नकोय मला तो पुन्हा माझ्या लाईफ मध्ये..आणि प्लीज तू ही पुन्हा त्याचं नाव आणि त्याचा विषय काढू नको..
अभय ला जानू च बोलणं ऐकून थोड बर वाटल होत ..नाही तर ती हो बोलली असती तर जानू कायम साठी आपल्या पासून दूर होईल या विचाराने त्याला घाम फुटला होता..
अभय: नाही ना तो तुझ्या मनात आता..मग सोड ना ..कशाला इतकं टेन्शन घेतेस ..आणि सर्व जण सारखे नसतात ..समीर तसा होता म्हणून काय सर्व मुल तशी असतील का जानू ?
जानू : अभय प्लीज ..कशी का असेनात मुल मला काही घेण देण नाही..तू माझा फ्रेन्ड आहेस..त्यामुळे तुला जर बोलायचं असेल तर फ्रेन्ड या नात्याने च बोल..नाही तर जर तुला त्रास होणार असेल तर ..मी बोलणं ही सोडते.
अभय: मी कधी म्हटलं मला तुझा त्रास होतो ? काही पणं काय ? आणि माझ्या सोबत अस काही असेल नाते बोल मन हलक वाटेल..मनात राहील ना तेच तेच विचार डिस्टर्ब करतात.. प्लीज आपलं समजून सांगत जा..मी विचारतोय तू काही नाही बोलतेय कसं कळणार मला ? परक समजतेस का मला ?
जानू : नाही.. बर मी झोपू का ? माझं डोकं दुखत आहे.
अभय: बर कर आराम काळजी घे..
अभय ला तर जानू चा नकार मिळाला..त्याला ही खूप दुःख झाल होत पणं जानू चे विचार बदलायला हवेत हे ही त्याच्या मनाने जनाल होत त्यामुळे च त्याने आपल्या प्रेमा चा विषय बाजूला ठेवून तिला थोडा वेळ द्यायचा ठरवल होत..त्याला त्याच्या प्रेमावर विश्वास होता..की एक ना एक दिवस जानू ला त्याचं प्रेम कळेल पणं सध्या ती योग्य वेळ नाही हे त्याने स्वतः ला समजावलं होत..
क्रमशः
.