आज पुन्हा उशीर झाला जानू स्वतः वरच चिडत होती..आणि गडबडीत आवरत होती.. नाश्ता न करताच..ऑफिस ला जायला निघाली होती.. आई मागून ओरडत होती..अग हळू ..किती गडबड करत आहेस...पडशील..कुठे तरी?.काही खाल्ल ही नाहीस..
आई बोलली आणि देवाने वरून तथास्तु म्हटलं की काय ? देव जाणे..पणं जानू मॅडम घरा बाहेर पाय ठेवा त च ..होत्या की उंबरठ्यावर अडकून धाडकन पडल्या ..आधीच नाजूक त्यात पडल्या म्हणजे तर चांगलच लागलं..हाताला खरचटलं होत..गुढग्यावर थोडा ड्रेस फाटून तिथे ही खरचटलं होत..डोळ्यातून पाणी वाहू लागलं होत..वरून आई ओरडत होती..सांगितलं होतं ना इतकी गडबड नको..तरी तुझं चालूच होते..पडलीस ना ? आई ने तिला उठवलं बेड वर बसवून पाणी दिलं...राहू दे आज ऑफिस म्हणून तिला सुट्टी घ्यायला लावलं...तिने ही येत नसल्याचं ऑफिस मध्ये कळवल...आई ने जखमेवर हळद गरम करून लावली...आणि तिला आराम करायला सांगून स्वयंपाक घरात गेली..बाबा ही काळजी घे सांगून बँकेत निघून गेले... बेड वर आडवी होऊन जानू ने मोबाईल हातात घेतला.. अभय चा सकाळीच गूड मॉर्निंग मॅसेज येऊन गेला होता..तिने गडबडीत त्याला रिप्लाय दिला च नव्हता ..आता बोलावं म्हणून तिने मॅसेज सेंड केला.
जानू : कशाची मॉर्निंग गूड ? ब्या ड... मॉर्निंग आहे...
अभय राजे तर जानू च्या मॅसेज ची वाट च पाहत होते कारण तिने सकाळच्या गूड मॉर्निंग चा रिप्लाय दिला नव्हता..जानू चा मॅसेज पाहून त्याने लगेच वाचून रिप्लाय दिला..
अभय: का ? काय झालं?
जानू : सकाळी सकाळी पडले..त्यामुळे आज ऑफिस ला ही दांडी दिली..
मॅसेज वाचल्या वाचल्या अभय राजे टेन्शन मध्ये आले...त्याने लगेच जानू ला फोन लावला..पणं जानू ने फोन कट केला..आज पहिल्यांदा अभय नी जानू ला फोन लावला होता..रोज ते बोलत होते पणं ते फक्त व्हॉट्स ऍप मॅसेज नी..
जानू : अरे फोन नको करू मी घरी आहे..
अभय: मग काय झालं ? उचल ना फोन..
जानू : आई आहे घरी हजार प्रश्न विचारेल..कोणाचा फोन ..कोणा सोबत बोलत होतीस..जावू दे तुला नाही कळणार..
अभय: पणं कशी पडलीस तू ? खूप लागलं आहे का ? डॉक्टर कडे गेली होतीस का ? मेडीसिंन घेतलीस का ?
जानू : अभय शांत शांत ..इतकं काही लागलं नाही मला फक्त थोड खरचटलं आहे..किती काळजी करतोस रे?
अभय: मला फोटो पाठव पाहू दे किती लागलं आहे..मी उद्याच येतो नाशिक ला..मला पहायचं आहे तुला..
जानू : अभय शांत बसतो का आता ? मला थोड खरचटलं आहे मी काही सिरीयस नाही हॉस्पिटल मध्ये नाहीये जो तू मला पाहायला नाशिक ला यायला निघालास? आणि मी काही फोटो वगेरे पाठवत नाही..अरे फक्त थोड लागलं आहे .. इतकं टेन्शन कशाला घेत आहेस ?
अभय ही तिच्या बोलण्याने थोडा शांत होतो.
अभय: बर ठीक आहे..आणि तू हॉस्पिटल मध्ये असतीस तर मी इथे तुझ्या सोबत बोलत नसतो केव्हाच तुझ्या कडे आलो असतो..आणि जो पर्यंत तू बरी होत नाहीस तो पर्यंत तिथेच थांबलो असतो..निदान मला तुला भेटता पाहता तरी आ ल असत..
जानू : अरे वा ..म्हणजे तुला मी भेटाव या साठी मला हॉस्पिटल मध्ये जावं लागेल? हो हो मी हॉस्पिटल मध्ये असल्यावर तू कशाला जाशील ...आणि रस्त्यात तून परत यावं लागेल ना तुला..मी वर गेले तर ? त्यामुळे तू मी वर गेल्याची खात्री करूनच जावं लागेल ना तुला..
अभय: वेडी आहेस का तू ? काही पणं काय बोलतेस तू ? तुला काही होणार नाही कधीच...आणि मी होवू ही देणार नाही..हे असल वर बीर काही बोलू नकोस..खूप जगायचं आहे तुला...
जानू : अरे चेष्टा करत होते..
अभय: प्लीज असली चेष्टा करत जावू नकोस..जीवघेणी चेष्टा असते का जानू ? आणि स्वतः ची थोडी काळजी घेत जा..
जानू : आता तू आहेस ना काळजी घ्यायला मग मला काय टेन्शन..
अभय:जानू मी सिरीयसली बोलतोय ..मी आहे काळजी घ्यायला पणं मी इथे आहे ..तिथे असतो तर घेतलीच असती..त्यामुळे तुझी तुलाच काळजी घ्यावी लागणार..
जानू : बर बाबा ठीक आहे...मी घेते माझी काळजी..तू कर काम बोलू नंतर..
अभय: हो..आणि आराम कर थोडा.. पेन किलर घे थोडा वेळ झोप..
जानू : बर अजून काही आज्ञा?
अभय: नाही आज साठी इतक्याच..आता कर आराम..
मग जानू ही थोडंसं खाऊन पेन किलर घेऊन आराम करते..पडल्यामुळे अंग दुखत होत ना ...पणं आजारी असल की वेळ च कसा जात नाही काय माहित असा विचार जानू करत असते.. गोळी मुळे तिला थोडी झोप लागते..झोपून उठल्यावर जानू पुन्हा मोबाईल पहाते.. अभय च स्टेटस पाहणं तिचा आवडता छंद ..आज..ही त्याने स्टेटस ठेवलं होतं..
कुछ ना काहो चूप ही रहो
देखो तो धडकन केहती हैं
लौट आया है मीत मेरा
आखियो से आसू बेहते हैं
कैसे गुजरे ये दि न.. पूछो ना तेरे बिन..
तुम दिलं की धडक न..मे रेहती हो..
रेहती हो..
गाण पाहून जानू च्या चेहर्यावर हलक स..हसू येत.. अभय ही नुकताच ऑफिस मधून येऊन जानू चा विचार करत बसला होता..खूप लागलं असेल का तिला ? नाशिक ला जायचं म्हटलं तर ती येऊ ही देत नाही..का अशी वागते?
तो पर्यंत जानू चा मॅ सेज येतो..
जानू : हॅलो..
अभय: हा बोल .. कशी आहेस? बर वाटत आहे ना आता थोड तरी ?
जानू : हो ठीक आहे..गोळी घेतली होती आता बर वाटत आहे.. बर ती कोण तुझी गरलफ्रेंड आहे का ?
अभय ला काही समजत नाही ही कोणा बद्दल बोलते आहे?
अभय: कोण गर्ल फ्रेंड?
जानू : ती तुझ्या स्टेटस मधली हिरोईन..
अभय ला आता कळत आणि त्याला हसू येत..ही स्टेटस बद्दल बोलते आहे..
अभय:माझं कुठे येवढ नशीब गर्ल फ्रेंड असायला?
जानू : का रे अस बोलतो असतील तर बऱ्याच जण..पणं बोलतो तर अस ..?
अभय: हो तशी गर्ल फ्रेंड आहे दाखवू का फोटो तुला ?
जानू:हा आता कस खर सांगितलंस ..पाठव पाठव बघू..
अभय जानू ला तिचाच फोटो पाठवतो..
जानू : ही तुझी गर्ल फ्रेंड? ही काय छान नाही ती स्टेटस वाली छान होती..
अभय:ये शांत बस ..माझी गर्ल फ्रेंड छान आहे..दुसरं कोणी छान नाही..कशी वाटली माझी गर्ल फ्रेंड ?
जानू : ही काही छान नाही ..ती स्टेटस वाली छान होती.
अभय: तिचं छान आहे असू दे माझी मला ..
जानू : बर बाबा ..हो तुझं ही बरोबर आहे .. तस तर तू ही माझा बॉय फ्रेंड आहेस..
अभय: कसं?
जानू : मी गर्ल आहे आणि तुझी फ्रेन्ड ही आहे ..म्हणजे झाली तुझी गर्ल फ्रेंड..आणि तू बॉय आहेस आणि माझा फ्रेन्ड ही आहे.म्हणजे तू झाला माझा बॉय फ्रेंड..
अभय: वा काय लॉजिक आहे तुझं ?
जानू : हो तशी मी आहे हुशा र च..
अभय: होय त्यात काही शंकाच नाही..
मग थोड्या अशाच गप्पा मारून दोघे ही जेवण करून झोपी जातात..
क्रमशः