अभय च मन तर कशात लागेना जानू बोलत नाही म्हणून त्याने सकाळी सकाळी तिला गूड मॉर्निंग चा मॅसेज केला... पणं तिचा रिप्लाय ऐकुन तर त्याला काय करावं कळेना.
अभय: गूड मॉर्निंग..
जानू:जा ना बोल जा ना ..तुझ्या भाऊ सोबत..
अभय:अग सॉरी बोललो ना ..आता परत नाही करणार अस..बोल ना..
पणं जानू मॅडम बोलतात कुठे ? तिला तर आज अभय ला थोडा त्रास देऊ वाटत होता..ती हसत होती.. अभय चा स्टेटस पाहिला तर साहेबाने मूड ऑफ म्हणून ठेवलेलं..अरे रे ..पणं तुला तसचं पाहिजे ..काल किती वाट पाहिली मी तुझी तर तू बिझी होतास ..अस स्वतः सोबत च म्हणून ती कामाला लागली ..दुपारी ऑफिस मध्ये थोडा वेळ मिळाला तर तिने मोबाईल पाहिला तर अभय चे बरेच मॅसेज होते..तिने पुन्हा रिप्लाय दिला..
जानू : भाऊ प्रेमी तू माझ्या सोबत कशाला बोलतो..
अभय: अग झाली चूक ..बस की आता किती तो भाऊ भाऊ ..नाव नको काढू आता..
जानू चा पुन्हा काही रिप्लाय नाही आता अभय ने पुन्हा एक स्टेटस ठेवलं..
राधा राधा राधा
राधा राधा राधा
राधा माझी राधा कुठे गेली बघा
चंद्रा वानी मुकडा तिचा जीव झालाय
आधा आधा
राधा राधा राधा
राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा
कुणी तरी सांगा तिला
अशी रुसू नको बाई
किसना ला या तिच्या विना कुणी सुधा नाही..
गोपिकांचा नाद सोडून कान्हा झालाय सिधा साधा
राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा..
जानू ऑनलाईन च होती तिने लगेच स्टेटस पाहिलं आणि तिला हसू आल..बस झाल बिचारा किती सिरीयस झाला आहे म्हणून तिने ही मग बोलायला चालू केलं..
जानू : होय सर्व जगाला ओरडून सांग ह..राधा राधा म्हणून पणं मला नको सॉरी म्हणू..
अभय: अग किती वेळा सॉरी बोललो ना ? बर परत एकदा सॉरी बाई..
जानू : बर बर ठीक आहे ..बोल .
अभय: काय ग ? किती रागावते? किती चिडते स?
जानू : मी अशीच आहे रागीट आणि चिडकी तुला नाही आवडत तर तुझा प्रश्न तो..
अभय: मी कधी म्हटलो नाही आवडत ? असू दे राग ही तुझा चालेल मला..पणं प्लीज अस रुसत जावू नकोस .
जानू : बर ..बोल अजून काय चाललय?
अभय: आहे चालू काम.. ये पणं तू अपुर्वाच्या लग्नाला का आली नाहीस ?
जानू : अरे मला माहीतच नव्हत तर मी कसं येणार ? मला समजलं तिचं लग्न झालं म्हणून..पणं मी कॉन्टॅक्ट मध्ये च नव्हते तर कसं येणार?
अभय: पणं मी तुझी किती वाट पाहिली? तू येणार आहेस समजलं म्हणून तर मी ही आलो होतो पणं तू आलीच नाहीस..
जानू : अरे पण मला माहित च नव्हत तर मी कसं येणार आणि तस ही माहित असत तरी ही आले नसते..बाबा नी पाठवल नसत..
अभय: काय तुझ्या घरचे पणं..आपल्या फ्रेन्ड स ग्रुप मधले सर्व जण आले होते.फक्त तू नव्हतीस..
जानू : जावू दे..तो होतास ना मग झालं..बर चल इथे आपल्या दोघांना ही काम सोडावं लागेल अस बोलत बसलो तर ..कर काम बोलू संध्याकाळी..
अभय: हो बर ..
मग दोघे ही आप आपल्या कामाला लागले.. अभय ही आता थोडा शांत झाला एकदाची बोलली तरी म्हणून...संध्या काळी सर्व आवरून पुन्हा त्याचं बोलणं सुरु झालं..
अभय: आवराल का ?
जानू : हो ..
अभय: जेवलीस का ?
जानू : हो आताच ..तू ?
अभय: अजून नाही वेळ आहे मला.
जानू : किती लेट जेवतोस रे ? मला तर भूक नसली तरीही गप्प जेवाव लागत बाबा असतात म्हणून..त्यांचा नियमच आहे सर्वांनी सोबतच जेवायचं..मग काय गप्प बसून खायला लागत .
अभय: भारी आहे तुझं .. बर तुझ्या मोबाईल मध्ये तुझे किती फोटो आहेत ग?
जानू : असतील २०० भर ..
अभय: फक्त इतकेच ? माझ्या कडे तर १०००० पेक्षा जास्त फोटो आहेत..
जानू : अरे बापरे इतके ? काय फक्त फोटोच काढतोस की काय ? माझे ही होते जास्त पणं मेमरी कार्ड खराब झालं ना झाले सर्व डी ली ट..
अभय: बर २०० आहेत ना मग पाठव तेवढेच
जानू : काय ?
अभय: अग तुझे फोटो पाठव..असतील तेवढे..
जानू :वेडा आहेस का ? तू काय करणार माझ्या फोटो च ?काय अल्बम बनवतो का ?
अभय मनातच म्हणतो किती वर्ष मी तुला पाहिलं नाही..फक्त बंद डोळ्यांनीच तर तुला पहायचो..मला ही तर पाहायचं आहे इतक्या वर्षात माझी जानू दिसत कशी होती ? किती तरस लो तुला पाहण्या..साठी..तुझं प्रत्येक रू प..मला माझ्या मनात साठवायच आहे..पणं आता तो तिला हे सर्व कसं सांगणार ?
अभय: हो अल्बम च बनवणार आहे..आणि तुझ्या वाढदिवसा ला तुला देणार आहे..तू पाठव तर..
जानू : भारी आहे तुझं ..तू तर सांगून च गिफ्ट देतोस..पणं तरीही मी फोटो देणार नाही..
अभय: अग काय ? विश्वास नाही का माझ्या वर ? पाठव ना..किती तडपवतेस ..
जानू : बर ठीक आहे पण सगळे एकदम नाही रोज दोन पाठवेन..
अभय: बर ठीक आहे .. दोन तर दोन .. कालचे दोन आणि आजचे दोन अस मिळून चार पाठव..
जानू : हे काय फोटो च आज ठरलं ना ..मग चार कुठून आले ? नाही दोनच..
अस म्हणून जानू अभय ला फोटो पाठवते.. अभय ते पाहून हरवून जातो..
अभय: तुला माहित आहे मला तुझ्यात काय आवडतं ?
जानू च डोकं एकदम चक्राव त..हा च प्रश्न तर ..समीर ने ही केला होता..शी..हा समीर पणं काही डोक्यातून जात नाही..जावू दे नको तो समीर चा विषय..
जानू : माहित आहे..माझे डोळे ना ?ती एकदम तोंड वाकड करूनच रिप्लाय देते.
अभय:डोळे ते तर आहेतच छान ..पणं मला तुझं हसणं आवडतं..अगदी मी तुला पहिल्यांदा पाहिलं होत ना तेव्हा पासून ..तुझं हसणं पाहिलं ना वाटत जग किती सुंदर आहे..माझं तर सर्व टेन्शन फक्त तुझं हसणं पाहिलं की पळून जात..जगात काहीच दुःख नाही अस वाटत मला..तुझं हसणं मी खूप मिस केलं ग या सात वर्षात..तू नेहमी हसत रहाविस आणि मी तुला पाहत रहावं अस मला वाटतं..
जानू तर त्याचं ऐकूनच चकित होते माझं हसणं याला इतकं आवडत ? पणं त स ..ही मी अलीकडे हसते कुठे ? हा अभय आल्यापासून थोड तरी हसणं सुरू झालं आहे नाही तर मला च माहित नाही कुठे हरवलं होतं माझं हसणं..
जानू : तू वेडा आहेस रे..लहान पणी किती शांत होतास ..आता किती बडबड करतोस रे..
अभय: ये मी कोणा सोबत इतकं बडबड करत नाही..पणं तुझ्या शी मात्र खूप बोलू वाटत ..आणि मी आताच इतकी बडबड करू लागलो आहे..
जानू : बर जा जेवण कर ..आणि झोपू दे मला तू तर रात कोंबडा आहेस ..रात्री ही लवकर झोपत नाहीस आणि सकाळी ही इतक्या लवकर उठतो.
अभय ला तिचं त्याला रात कोंबडा बोलणं ऐकून हसू येतो ..आता तुला काय सांगू तूच तर माझी झोप उडवतेस..तुझेच विचार असतात दिवस रात्र डोक्यात मग सांग झोप तर कशी येणार ?
अभय: मला सवय आहे सकाळी लवकर उठायची..रात्री किती ही लेट झोपलो तरी ही सकाळी पाच ला उठून बसतो..
जानू : अरे वा छान ..पणं मी नाही तुझ्या सारखी..मी ही पहिलं उठायचे पाच ला कॉलेज ला होते तेव्हा अभ्यास करण्या साठी पणं आता सवय गेली.
अभय: ह.. बर मी जेवतो मग बोलू .
जानू : नको मी झोपते आता..तू ही जेव आणि झोप ..मला नाही होत जागण..
अभय : बर झोप
जानू तर झोपी जाते.. अभय ही जेवण करून जानू ने पाठवलेले ..फोटो पाहत त्या फोटोन सोबत बोलत ..कधी झोपतो ..त्याला ही कळत नाही.
क्रमशः