भाग 2 पासून पुढे...
दोन महिन्यानंतर.......
तदेव लग्नं सुदिनं तदेव
ताराबलं चंद्रबलं तदेव ।
विदयाबलं दैवबलं तदेव
लक्ष्मीपते तेंsघ्रियुगं स्मरामी ।।
" चला वधूने नवर्या मुलाच्या गळ्यात हार घाला" भटजीकाका म्हणाले तसे भूविकाने अमिशच्या गळ्यात हार घातला...."आता वराने नवर्या मुलीच्या गळ्यात हार घाला "तसे अमीशनेही भूविकाच्या गळ्यात हार घातला.....लग्न संपन्न झाले असे कानी पडताच बाहेर ढोल ताशे वाजू लागले.... फायनली आज दोघे लग्न बंधनात अडकले....
"सुमती सदन"या भव्य मॅन्शनसमोर एक रॉयल ब्ल्यू सजवलेली मर्सिडीज येऊन थांबली. कारचा दरवाजा एका बाजूने उघडून त्यातून अमीश बाहेर आला व आत बसलेल्या भूविसमोर त्याने आपला एक हात पुढे केला..... भूविनेही आपला हात त्याच्या हातामध्ये दिला आणि हेवी वर्कचा मोरपंखी लेंहगा सावरत हळूच एक पाऊल बाहेर टाकले.....तीने समोर नजर टाकली तर घर अगदी सण असल्यासारखे सजवले होते.... वरून एक साईडहून लाईटच्या माळा सोडलेल्या.....समोरील भाग फुलांनी सुशोभित केलेला.....दरवाजावर मनमोहक असे गणपतीचे तोरण.....लाईट्स चे वेगवेगळे इफेक्ट दिलेले आणि मधोमध सुमती सदन हे नाव दिमाखात झळकत होते....."सुमती, माझ्या आजीचे नाव " भूविची तीथे स्थिरावलेली नजर पाहून अमीश म्हणाला.....तीने घरावरील नजर हटवून त्याच्याकडे पाहिले..... " चलायचं ?" त्याच्याकडे एकटक पाहणाऱ्या भूविचा हात हळूच दाबत त्याने विचारले....." अं?" तीने न कळून विचारले... "जायचं का? " त्याने समोर मॅन्शनकडे पाहत विचारले.... " हं " तीने ओशाळून हळूच मान वर खाली हलवली. ते चालत मुख्य दरवाजापर्यंत आले..... दोन्ही चौकटीवरून फुलांच्या माळा सोडलेल्या होत्या आणि उंबर्यात मध्यभागी धान्य भरून बाहेरील बाजूस मण्यांनी डेकोरेट केलेला कलश ठेवलेला .... आपला उजवा पाय पुढे करून भूविकाने माप ओलांडले....आणि ती पाऊल आत टाकणार तोवरच.....
" पहिले नाव घ्या वहिनीबाई.... त्याशिवाय तुम्हाला दोघांना काही मी आत येऊन देणार नाही " एक हात कमरेवर ठेऊन एका हाताने दरवाजा अडवत दक्षा खट्याळ हसत म्हणाली....
" ताई ते...मला येत नाही "भूविका गोंधळून दक्षाला म्हणाली.
" असं कसं.... बघं नाव तर घ्याव लागेल बाबा.....नाहीतर आज तुम्हाला बाहेरच बसून पहारा द्यावा लागेल " 😅😅
" घे गं बाळा नाव.... त्याशिवाय ती काही तुम्हाला आत येऊ द्यायची नाही "मायाताई भूविकाकडे पाहून हसत म्हणाल्या.
" बरं घेते "
" हं आता कसं.... घे लवकर लवकर "दक्षा आतुरतेने म्हणाली.
" मोगऱ्याचा सुगंध , पावसाळ्यातील मृदगंध
अमीशरावांशी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध "
" वाह वाह क्या बात है वहिनीसाहेब....मस्तच " भूविने हलकेच गालातल्या गालात हसत मान खाली घेतली.
"चला आता भूविकाचे तर झाले आता तूझी पाळी रे माझ्या लाडक्या वहिनीच्या नवरोबा "गालात हसत भूविकडे तिरप्या नजरेने पाहणाऱ्या अमीशला दक्षा ने टोकले .
"हे... काहिही काय....मला कुठे येत ते नाव वगैरे घेता "भानावर येत अमीश उजवीकडून डावीकडे नकारार्थी मान हलवत म्हणाला.
" नाही.....नाव तर घ्यवचं लागेल बरं "दक्षा आपल्या मतावर ठाम होती.
" बरं ठिक आहे.....भूविका "😊
" काय आहे हे? "🙄😒
" नाव तुझ्या लाडक्या वहिनीचं " लाडक्या शब्दावर जोर देत अमीश म्हणाला.
" ये असं नाही... this is not fair....माझ्या लाडक्या वहिनीने कसं घेतलं अगदी तस्संच घ्यायच समजलं भाऊराया "दक्षा फूल अॅटीट्यूड मध्ये म्हणाली. 😌😎😎आता काय बिचाऱ्या अमिशचा नाईलाज झाला...
" घेतो " थांब बघतोच पुन्हा तुझ्याकडे ताई असा लुक देत अमीश म्हणाला.
" झुळझुळ वाहे वारा,मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो भूवि-अमीशची जोडी "
भूविला अनिमीश नेत्रांनी पाहत अमिश म्हणाला....भूविने त्याच्याकडे पाहिले तसे त्याने लगेच नजर वळवली.
" सोबत स्वतःचे पण नाव हुश्शार आहेस अगदी " दक्षा नाक मुरडत म्हणाली.
" पण काही म्हण नाव मात्र अगदी भारी घेतले सालेसाहेबांनी...." मानस जोरत हसत क्या बात है असा इशारा करत म्हणाला.
" पुरे आता ....त्यांना आत येउद्या किती वेळ असं दारातच तात्कळत ठेवणार "मायाताई त्यांचा गोंधळ पाहून म्हणाल्या.
" बघं ना आई किती वेळ तसेच ठेवलेय या ताईने " अमीश तक्रार करत म्हणाला.
" अहम्....अहम्....एवढी घाई... सब्र का फल मीठा होता है भाईजान " दक्षा अमीशकडे पाहून खट्याळ हसत म्हणाली.
" काय ते...? " अमीश न कळून म्हणाला.
"अजून लग्न होऊन दोन तास नाही झाले आणि तुला धीर धरवत नाही का? " मानस मिश्किल हसत म्हणाला.
" जीजू तसं नव्हत म्हणायचं मला.... " अमीश लाजून म्हणाला.
" समजलो समजलं .....या आता आतमध्ये "दक्षा त्यांना म्हणाली. तसे ते दोघे आत आले......"चला खूप वेळ झाला सुनबाईंना जरा आराम करुद्या आता...."मायाताईंनी दक्षाला भूविकाला तीच्या रुममध्ये घेऊन जायला सांगितले.....
" तुला comfortable वाटत नसेल तर change केलेस तरी चालेल बाळा....तुला ज्या कपड्यांत ठिक वाटेल ते घाल बरं" मायाताई आपुलकीने भूविकाला म्हणाल्या. तीने ही हलकेच हसून मान हलवली आणि दक्षा सोबत तीच्या रुममध्ये गेली.... "तु अणि जावईबापू तुझ्या रुममध्ये जाऊन आराम करा.....उद्या लवकर उठून तुम्हाला कुलदेवीचे दर्शन घेण्यासाठी गावी जायचे आहे सोबतच संध्याकाळी पुजा घेतली आहे उद्याचा दिवस धावपळीतच जाईल....त्यामुळे लवकर झोपा आता... "अमीशकडे बोट करत मायाताई म्हणाल्या. तसे सगळे आपापल्या रूममध्ये जायला निघाले.
" चिरंजीव "विलासरांनी अमीशला आवाज देताच पायर्या चढत असलेला अमीश त्याच्याजवळ आला.
" काय बाबा?"
" या इथे बोलू जरा "बाहेर झोपाळ्यावर बसत बाबांनी अमीशला हात करून शेजारी बसण्यासाठी खुणावले.
"चिरंजीव....लग्न म्हणजे दोन व्यक्तींचचं नाही तर दोन कुटुंबांच मिलन असतं....सुनबाई सगळं सोडून इथे आल्या त्यांना आपल्यात अॅडजस्ट व्हायला थोडा वेळ लागणार.....अचानक सगळं बदल्यामुळं मुली सुरुवातीला भांबावून जातात.....गोंधळल्यामुळे चूकून कधीकधी चुका घडतात....घर म्हटलं की भांड्याला भांड लागतंच.आपल्या जशा नवीन सुनबाईंकडून अपेक्षा असतात.....तशाच त्यांच्याही असतात.....जास्त काही नाही फक्त सगळ्यांनी समजून घ्याव , मिळूनमिसळून वागाव......तुम्ही तेव्हा म्हणालातं माझ्या आईबाबांना तुमच्या आई वडीलांसारख सांभाळून घ्याल का? तसचं तुम्ही ही हा विचार करायला हवा त्याही एकुलत्या एक आहेत त्यांनाही विचारावस वाटलं असेल तुम्हाला तसाच प्रश्न पण आपली संस्कृती तुम्हाला माहीतच आहे..... मुलीनी काही प्रश्न विचारले तरी तीला नावं ठेवली जातात.... अशावेळेस त्यांनी न सांगता तुम्ही स्वतःहून ते समजून घेतले पाहिजे......आईची आणि तीची थोडीफार कुरबूर झालीच तर नेहमी एक पती म्हणून तसुनबाईंची बाजू घ्या.....कारण फक्त आपल्या पतीच्या जीवावर ती आपले घरदार सोडून आलेली असते.....कोणी नाही तर फक्त आपला नवरा आपल्या पाठिशी असेल तर ती कितीही संकटे आली तरी डगमगत नाही.....समजतयं ना??...... आणि तुम्ही जरा आता विचार करून निर्णय घेत जा म्हंटलं अविचारपणा करून रागात काही चुकिचे पाऊल उचलू नका......आता एकटे नाही तुम्ही सोबत सहचारिणी आहे आयुष्यभर सोबत.....त्यांची जबाबदारी आहे आता तुमच्यावर ......आणि कधी अशी वेळ आलीच जर तुम्ही अयोग्य वागलात आणि त्याचा सुनबाईंना त्रास झाला तर मी कायम त्यांच्या बाजूने असेल लक्षात असूद्या......तुमच्याबद्दल खडानखडा माहिती असते आम्हाला " विलासराव अमिशच्या खांद्यावर थोपटत म्हणाले. तसे आमीशने चमकून त्यांच्याकडे पाहिले.
" हो बाबा.....मी लक्षात ठेवीन कायम" तो मान डोलावून म्हणाला.
" चला आता .....झोपा लवकर खूप उशीर झाला.... उद्यापासून तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होईल आमचे आशीर्वाद कायमच तुमच्यासोबत असतील "विलासराव झोपाळ्यावरून उठत अमिशच्या डोक्यावर हाताने थोपटत म्हणाले.
" thank u बाबा .....गुडनाईट " अमीश म्हणाला.विलासरावांनाही हलकेच हसतं चला झोपायला असे खुणावले.
खिडकीतून येणार्या पक्ष्यांच्या गोड आवाजांनी सकाळी भूविची झोप चाळवली....ती उठून बसली शेजारी पाहते तर नवीन जागा नवीन बेड अचानक तीच्या लक्षात सद्यपरिस्थितीत आली.... गळ्यात लटकणार्या छोट्याशा मंगळसूत्रावर नजर जाताच तीला तीच्या कालपासून बदललेल्या जीवनशैलीची जाणीव झाली..... शेजारी झोपलेली दक्षा केव्हाच उठून बाहेर निघून गेलेली .....तीने समोर भिंतीवर लटकणार्या घड्याळावर नजर टाकली तर सकाळचे सहा वाजलेले....'उशीर झाला खूप' ती मनाशीच म्हणाली आणि बेडवरून खाली उतरून बेड व्यवस्थित करून कपडे घेऊन तिथेच अॅटॅच असणार्या बाथरूममध्ये अंघोळीला गेली.....पंधरा वीस मिनीटात ती तीचे आवरून बाहेर आली तर दक्षा रुममध्ये आली होती.... भूविला आलेले पाहताच ती म्हणाली.....
" अगं उठलीस पण झोपायचे ना अजून थोडावेळ ......काल खूप दगदग झाली आज पण दिवस गडबडीतच जाणार "
" नाही ताई.....मी ठिक आहे " भूवि हसून म्हणाली.
" बरं चलं मगं तुझं आवर तू मी तोपर्यंत बाहेर आईला जरा मदत करते "
" ताई झालेयंच माझे.... मी पण येऊ का ??.....मलाही सांगा काही करायचे असेल तर "
" अहंम..... आज फक्त आराम करा वहिनीसाहेब.... नंतर आहेच की रोज तेच "दक्षा मनमोकळे हसत म्हणाली.
" बरं "
" हा चल मी जाते.....तु ये आवरून मगं आपण खेळ खेळू आज तुमचे लग्नानंतरचे"मोठ्याने हसत दक्षा म्हणाली....तसे भूविने हलकेच गालात हसत मान डोलावली. नऊ ,साडेनऊ वाजेपर्यंत त्यांचे सर्व खेळ वगैरे आवरतात ......आणि ते कुलदेवीच्या दर्शनासाठी जायला निघतात.......मानस आणि दक्षा समोर बसलेले असतात.... तर अमीश आणि भूमिका पाठीमागील बाजूस बसलेले असतात......" अरे काय बोरींग प्रवास सुरू आहे..... मानस FM सुरु कर ना " दक्षा वैतागून मानसकडे पाहत म्हणते.... तसे मानस FM सुरू करतो....
छू कर मेरे मन को
किया तुने ये इशारा
बदला ये मौसम
लगे प्यारा जग सारा....छू कर मेरे....
तू जो कहे जीवनभर
तेरे लिए मैं गाऊं....तेरे लिए मैं गाऊं.....
गीत तेरे बोलों पे लिखता चला जाऊं...(२)
मेरे गीतो मैं तुझे ढुंढे जग सारा.....
छू कर मेरे मन को....
आजा तेरा आँचल ये
प्यार से मे भर दूँ......प्यार से मे भर दूँ.....
खुशियाँ जहा भर की
तुझको नजर कर दूँ....(२)
तू ही है मेरी जीवन
तू ही जीने का सहारा......
छू कर मेरे मन को
किया तुने ये इशारा
बदला ये मौसम
लगे प्यारा जग सारा......
गाणे सुरू झाले आणि आमिशची नजर भूविवर खिळली.....जणू तो तिला आपल्या भावना या गाण्याद्वारे मांडत होता.....असेच हसत खेळत songs ऐकत ते कुलदेवीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागले.....घरी पोहोचेपर्यंत चार वाजून गेले होते.....पुजेची सर्व तयारी झाली होती.....फ्रेश वगैरे होऊन पंधरा वीस मिनिटांत ते दोघे पूजेला बसले......पुजाही अगदी यथासांग पार पडली......पुजेची सांगता झाल्यावर त्या दोघांनी मोठ्यांचे आशीर्वाद घेतले तेच आवरेपर्यंत सात वाजत आले तसे मायाताईंनी त्यांना change करून जरा वेळ आराम करायला सांगून जेवणाच्या वेळी खाली यायला सांगितले......तसे आपले दोन कपल्स लगेच वर पळाले.....भूवि आणी दक्षा दक्षाच्या रुममध्ये आणी अमीश मानस अमिशच्या रूममध्ये.... मायाताईंनी आवाज दिला तसे अमीश आणि मानस खाली आले.....बाकिचे सर्वजण आधीच आले होते......ते दोघे आले तसे मायाताईंनी आणि दक्षा ने ताटे वाढायला घेतली.....भूविका मदत करत होती तर दक्षाने तीला दटावून खुर्चीवर बसायला सांगीतले तीच्या अगदी समोरच्या chair वर अमीश बसलेला......वाढूण झाले तसे दक्षा भूविशेजारी बसली.....सर्वांनी जेवायला सुरुवात केली.... पाच दहा मिनिटे झाली असतील तशी दक्षा चुळबूळ करायला लागली......
" काय गं काय झालं चिमणे .....शांत बसून जेव की अशी काय चुळबूळ करतेस " विलासराव दक्षाकडे पाहून म्हणाले.....
" काही नाही बाबा ते मच्छर होता " अमीश वर धारधार कटाक्ष टाकत दक्षा कसनुसं हसत म्हणाली.ही ताई काय माझ्याकडे डोळे वटारून बघतेय म्हणून त्याने तिच्याकडे गोंधळून पाहिले तर दक्षा ने त्याला रागातच खाली बघं असा इशारा केला.....त्याने खाली पाहिले आणि तो हडबडला......त्याच काय झालं त्याला वाटलं भूविच आहे म्हणून तो त्याच्या पाया हळूच तीच्या पायावर मारत होता.... पण बॅड लक तीथे दक्षा ताई होती आणी मघापासून हा तिच्याच पायावर मारत होता.....😅😅😂😂😂त्याला लक्षात आले तसे तो गप्पपणे मान खाली घालून जेवू लागला....जेवन झाले तेव्हाच महाशयांनी मान वर केली....तर दक्षा अजूनही त्याच्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने पाहत होती..... तसा तो झाले म्हणून पटकन उठून आपल्या रूमकडे पळाला😆😆😃😃सर्वांची जेवून झाली तशी सर्वजण आपापल्या रुममध्ये जायला निघाले.....छायाला आवरायला ( तीथे काम करणार्या काकू)सांगून मायाताईही निघून गेल्या......
" अगं इकडे कुठे भूवीका...... आजपासून तुमच्या रुममध्ये राहायचं मघाशीच छायाने तुझे सामान तुकडे शिफ्ट केले "भूविका दक्षाच्या रुमकडे निघाली तशी दक्षा म्हणाली .
" अं हो " ती गोंधळून म्हणाली.
" enjoy and goodnight "दक्षा मिश्कील हसत डोळे मिचकावून म्हणाली.....'माझा भाऊ तर फारचं उतावीळ झालाय बाई......पाय मोडला माझा मेल्यान ' मनातचं चरफडत दक्षा म्हणाली.
"Goodnight ताई"
हं हो हो .....ही बघं इथून सरळ डावीकडची पहिली रुम "दक्षा भानावर येत म्हणाली.भूविकानेही हसून प्रतीसाद दिला आणि ती तिकडे जायला वळली.....ती दरवाजा समोर जाऊन थांबली.... जाऊ की नको असे करतं शेवटी तीने दरवाजा नॉक केला.... तर तो openच होता फक्त हलकेच पुढे सारलेला....हलकेच दरवाजा ढकलून ती आता आली......तर अमीश पाठमोरा खिडकीजवळ ऊभा होता.....ती आत आली तीने रुमभर नजर फिरवली....किंग साईज बेड.....त्याला लागूनच एक कपबर्ड.....शेजारी छोटासा ट्री टेबल बुक.....त्यावर पुस्तके अगदी व्यवस्थित रचून ठेवलेली.....बेडच्या वरील बाजूस आमिशची एक मोठी फ्रेम.....गिटार हातात घेतलेली.... एका बाजूने कपाळावर आलेले सिल्की केस.... आणि चेहर्यावर एक इअर् टू इअर् स्माईल....कोणाच्यातरी येण्याची चाहूल लागताच पाठमोरा असलेला अमीश मागे वळला..... आणि क्षणभर तीला पाहतच राहीला अंगावर फेन्ट पिंक कलरची साडी तीला ब्लॅक कलरची किनार प्रिन्सेस ब्लाऊस् केस क्लीपमध्ये गुंतवून पाठीवर मोकळे सोडलेले....डोळ्यात हलकं काजळ आणि ओठांवर बेबी पिंक लिपस्टिक अगदी किंचीत फसलेली.....तशी गरज नव्हतीच तीला कशाची मुळातच ती सुंदर होती जास्त गोरी नाही गहूवर्णिय अशी.....
" भूवि " त्याने तीला हळूच आवाज दिला आणि तीच्या दिशेने चालत येऊ लागला....तशी एवढावेळ त्याच्या फोटोकडे एकटक पाहणारी ती भानावर आली.
" Thanks.....भूवि मला माफ केलेस त्यासाठी "तीच्याजवळ पोहोचताच त्याने हळूवार तिचा हात हातात घेतला....आणि तीच्या गालावर हलकेच हात ठेऊन खोलवर तीच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला. ती ही क्षणभर त्याच्या गहिऱ्या निळ्याशार सागराप्रमाणे भासणाऱ्या डोळ्यात हरवून गेली...... पण लगेच सावरून तीने त्याच्या हात झटकला.....आणि तीच्या डोळ्यांत अंगार फुलू लागला......
" दूर हो.....मी तुला कधीच माफ करणार नाही समजलं मिस्टर अमीश कामत " ती त्याच्यावर नजर रोखत म्हणाली.तो क्षणभर थबकलाच आणि दोन पावले मागे सरकला.
" भूवि अशी का म्हणतेस त्यादिवशी तर तुच.... " तो अविश्वासाने तिच्याकडे पाहत म्हणाला.
" त्यादिवशी काय मि. कामत?" त्याचे वाक्य मध्येच तोडत भूमी म्हणाली.
" आपण भेटलो... त... तेव्हाच तू मला माफ केलेस ना? "
" निट आठव जरा मी काय म्हणाले होते.....मी असे कुठेच म्हणाले नाही की मी तूला माफ केले " भूविका निर्विकारपणे म्हणाली..... तो पुन्हा संभ्रमावस्थेत पडला आणि त्यादिवशीचे बोलणे आठवू लागला.
दोन महिन्यांपूर्वी.....
Sunshine cafe :
At 11:00 Am
आतमद्ये एका टेबलवर एक मुलगा पाठमोरा बसलेला...... मनू चालत त्याच्या जवळ गेली.... आणि समोर जाऊन पाहिले तर......
"तू???? " ती आश्चर्यकारकरीत्या धक्का बसून ओरडली.
" Hii भूवी " तो तीला पाहून उभा राहीला.
" तू..... तू काय करतोयस इथे? " तर अत्यंत रागात त्याला म्हणाली.
" सांगतो....तू पहिले बसं इथे " तो तेथीलच एक chair पाठीमागे ओढून तिला म्हणाला.
" मी काय विचारतेय तूला?? " ती आवाज चढवूनच म्हणाली तसे कॅफेमधील सर्व लोक त्यांच्या टेबलकडे पाहायला लागले....
" प्लिज तू बसं ना पहिले.... मी सांगतो तुला सर्व आपण बसून बोलुयात "तो इकडेतिकडे पाहत कसाबसा चेहरा ओढूनताणून हसत म्हणाला. तसे तीने सभोवती पाहिले तर सगळे वळून वळून त्यांच्याकडेच पाहत होते.... तसे ती ओशाळून खाली बसली.
"काय घेणार त्याने तिच्याकडे मेन्यूकार्ड पास करत विचारले.
"For your kind information .... मी इथे काही खायला नाही आलेय....जे विचारलंय त्याचं आधी उत्तर दे " ती पुन्हा त्याच्याकडे रागात पाहत म्हणाली.
" काहीतरी खाऊन घे मगं आरामात बोलू "असे म्हणतं त्याने दोन कोल्ड कॉफी आणी चीझ सॅन्डवीच ची आॅर्डर दिली.
" अमीश stop this nonsense and tell me why are you here now ?? "ती वैतागत म्हणाली.
"मी जिथे असायला पाहिजे आणि जीच्यासोबत असायला पाहिजे तिथेच आहे भूवि..... " तो म्हणाला.
"मुद्दामहून करतोयस ना तू.... हे बघं थोड्याचवेळात मला भेटायला इथे कोणीतरी येणार आहे आणि त्यांच्यासमोर तुझ्यामुळे काही वाद व्हावेत असं मला अजीबात वाटत नाही..... so you may go from here as early as possible " ती त्याच्याकडे बोट दाखवून म्हणाली .
" कोणं स्पेशल येणार आहे का?..... Amm like your would be husband "तो भुवया उंचावत म्हणाला. तसे ती शॉक होऊन त्याला पाहु लागली.
"तू....तूला कसे माहित.... माझ्यावर पाळत ठेवतोयस का? " ती अविश्वासाने म्हणाली.
" नाही अजीबात नाही.....बरं नाव काय तुझ्या होणार्या नवर्याच ?"
" तुला काय करायचं...... तू जा इथून" ती त्वेषाने म्हणाली.
" सांग ना आधी....नाव सांगितलेस की जातो बघं लगेच" तो पुन्हा म्हणाला.
" नक्की ना.... " ती दबकत म्हणाली.
" हो... तू सांग तर "
" श्री.... श्री नाव आहे त्यांच " ती दबकत म्हणाली.
" ओह" 'तरीच' तो मनातल्या मनात म्हणाला.
" सांगितले नाव जा ना आता इथून " ती त्याच्याकडे पाहत म्हणाली.
" अगं असं कसं भूवि.... मलाच भेटायला आलीयेस आणि मलाच हाकलतेस "तो हलकेच हसत म्हणाला.
"म्हणजे??? मी समजले नाही "ती न कळून म्हणाली.
" मीच तो.....Your would be husband dear "तो शांतपणे म्हणाला.
क्रमशः
©️मनमंजिरी ❤
( I know थोडे confusion होत असेल.लवकरच सर्व confusion clear होईल. बाकी 😐😐 तुमचा response pahun.... )