Na Ulagadnare code in Marathi Science-Fiction by Hari alhat books and stories PDF | ना उलगडणारे कोडे

Featured Books
  • You Are My Choice - 40

    आकाश श्रेया के बेड के पास एक डेस्क पे बैठा। "यू शुड रेस्ट। ह...

  • True Love

    Hello everyone this is a short story so, please give me rati...

  • मुक्त - भाग 3

    --------मुक्त -----(3)        खुशक हवा का चलना शुरू था... आज...

  • Krick और Nakchadi - 1

    ये एक ऐसी प्रेम कहानी है जो साथ, समर्पण और त्याग की मसाल काय...

  • आई कैन सी यू - 51

    कहानी में अब तक हम ने देखा के रोवन लूसी को अस्पताल ले गया था...

Categories
Share

ना उलगडणारे कोडे

भाग १ )


( रात्रीची वेळ आहे रामराव जेवण करून झोपण्याच्या तयारीत आहेत रामराव पलंगावर झोपत असताना देवाचे नामस्मरण करतात ) विठ्ठला.. पांडुरंगा...( म्हणून डोळे मिटतात थोड्या वेळात त्यांना गाढ झोप लागते
आणि ते झोपी जातात) ...........................................................................( मध्यरात्र झाली आहे रामराव दरवाजा उघडून बाहेर येतात मध्यरात्री घराबाहेर आरडाओरड ऐकू येतो रामराव घरा बाहेर येतं असलेल्या आवाजाच्या दिशेने चालत राहतात पुढे लोक जमलेली आहेत आणि जातात बाहेर भरपूर लोक जमलेले असतात त्या ठिकाणी येऊन थांबतात आणि समोर चे दृश्य पाहून अचानक घाबरतात समोर एक महिला व पुरुष जमिनीवर पडलेला आहे एक मुलगा पुरुषांच्या डोक्यात दगड टाकत आहे पुरुषाच्या बाजूला एक महिला निश्चित मृत अवस्थेत पडलेली आहे वस्तीतील लोक गर्दी करून पहात आहेत परंतु कोणी काही बोलत नाही दुसरी दोन मुले मोठमोठ्याने ओरडत आहेत ) मारून टाक याला जिवंत सोडू नको ( त्यांचे ऐकून दगड मारणारा मुलगा आणखी मोठमोठे दगड उचलून त्या इसमाच्या डोक्यात टाकून त्याचे डोके ठेचत आहे ओरडत असलेल्या मुलांना रामराव विचारतात ) अरे पोरांनो हे काय करताय तुम्ही आई वडील आहेत ते तुमचे ...( मुले रामराव यांना धमकावून उत्तर देतात ) .. हा माणूस वडील म्हणण्याच्या लायकीचा नाही काका आमच्या घरच्या भानगडीत पडू नका नाहीतर याद राखा ( गर्दी केलेल्या लोकांकडे पाहून ) चला निघा यिथून सगळे ( लोकं गर्दी कमी करू लागतात ) ओ काका तुम्ही पण निघा ..( रामराव समजावण्याचा प्रयत्न करतात मुले रामराव यांना सुद्धा बोलू देत नाहीत तेच उलट उतर देतात. ) आम्हाला काही सांगू नका . आयुष्यभर याने ( वडीला कडे हात दाखवून ) पैसा साठविला आम्हाला काही दिलेलं नाही याची गत अशीच झाली पाहिजे ( मुले रामरावांचं ना ऐकता स्वतः च्या बापाला मारून टाकतात तेवढ्यात पोलीस येतात आणि मुलांना ताब्यात घेतात हे सर्व पाहून रामराव पुढे निघून जातात ) .................................................................................... रामराव पुन्हा दुखी अंतकरणाने घराकडे निघतात घरा कडे येत असताना समोर दोन गटात भांडण सुरू असत तेथे थांबून भांडण पाहत राहतात भांडखोरा पैकी एक जण शिव्या देत दगडफेक करतात व दोन गटात समोरासमोर दगडफेक होते दगडफेकीमुळे सर्वांची पळापळ होते रामराव सुद्धा आपल्या घराकडे जातात..................................................................................... पुढे रामराव रस्त्याने जात असताना मातीचे ढिगारे पडलेली आहेत त्यासमोर काही मातीच्या ढिगार्‍यावर दहा रुपयांचे डॉलर पडलेले आहेत रामराव पैसे पाहून पैसे उचलतात पैसे उचलत असताना समोरून एक व्यक्ती ओरडतो अरे कशाला उचलतो ते पैसे मातीच्या ढिगारा वरचे आहेत रामराव त्या माणसाकडे आश्चर्याने पाहून पुढे निघतो पुढे जात असताना गल्लीतून एक मुलगा त्याच्या मागे येतो आणि रामरावांना विचारतो काका तुम्ही रामराव आहेत ना. रामराव मुलाकडे पाहून हो म्हणतो. मुलगा रामरावांचा मोबाईल नंबर मागतो रामराव आश्चर्याने मुलाकडे पाहतो त्याला विचारतो माझा नंबर तुला का पाहिजे. मुलगा म्हणतो काका तुमचं नाव खूप ऐकले आहे मला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचा आहे तेव्हा गरज पडेल तर मी तुम्हाला कॉल करेन तुम्ही खूप जणांना मदत केली आहे असे मी ऐकले आहे...रामराव मुलाकडे पाहून हसत ...ठीक आहे म्हणून रामराव खिशा मधून पेन घेऊन त्या मुलाला नंबर देतात आणि पुढे चालत राहतात...................................................................................... पुढे जात असताना ओसाड रस्ता लागतो रामराव पुढे चालत राहतात समोर पाहतात समोर एक मुलगा मोटर सायकल घेऊन येतो आणि रामरावांना पाहू थोड्याशा अंतरावर थांबतो मोटरसायकल थांबल्याचा आवाज ऐकून रामराव मागे वळून पाहतात तर तो मुलगा ओरडतो तुम्ही रामराव आहेत ना ? रामरावं आश्चर्याने मागे वळून पाहत ..हो म्हणतात तेवढ्यात तो मुलगा रिवाल्वर काढतो आणि मोठ्याने ओरडतो आता कुठे पळणार आणि गोळ्या झाडू लागतो रामराव स्वतःचा बचाव करत पळत असतात मुलगा मोटरसायकलने पाठलाग करतो गोळ्या झाडत राहतो एक गोळी रामरावाच्या मांडीला स्पर्श करून जाते रामराव झाडीमध्ये कोसळतात एका ठिकाणी झुडपात दडून बसतात हल्लेखोर मुलगा रामरावना शोधत असताना त्यांना रामराव सापडत नाही व तो निघून जातो जाताना ओरडतो रामराव पुन्हा दिसलात ना तर् गोळ्यां घालून ठार मारीन असे ओरडुन निघून जातो रामराव विचार करतात याने माझ्यावर हल्ला का केला ? मग त्यांना आठवते ..( ज्या मुलांनी मोबाईल नंबर मागितला तो मुलगा व त्याचे शब्द आठवतात ..( काका तुम्ही खूप जणांना मदत केली आहे असे मी ऐकले आहे ) ( लगेच रामराव यांना दुसरे चित्र दिसते एक व्यक्ती त्यांना शिव्या देत आहे त्यांच्या सोबत तो मुलगा ही आहे मुलगा ही आहे ..... तो व्यक्ती रामराव यांना भांडत असतो तुम्ही लोकांची तोंड पाहून काम करता माझे काम झाले नाही रामराव त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत.. हे बघा शहाजी तुमची पेपर ची पूर्ण फाईल तपासली आहे. त्यात काही पेपर मध्ये बऱ्याच चुका आहेत त्या सुधारणा करा नंतर होईल तुमचे काम ( समोर चा व्यक्ती चिडून ) काय सुधारणा करायची अहो टेबल खालून पैसे देऊन सगळे काम होत. ( रामराव चिडून ) शहाजी साहेब ....तुमच्या सारख्या लोकांनी आपल्या देशात भ्रष्टाचार उदयास आणला आहे. मला आमिष दाखवून खोटं काम करून घेणार तर हे विचार डोक्यातून काढून टाका.. समजलं..( रामराव पुन्हा विचारातून बाहेर येतात आणि इकडे तिकडे पाहून पुढे चालू लागतात ................................................................................