Janu - 31 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | जानू - 31

Featured Books
Categories
Share

जानू - 31

अभय जयपूर ला निघून गेला पण जयपूर मध्ये त्याचं मन आता पहिल्या सारखं अजिबात रमत नव्हते..कसे बसे त्याने तिथे अजून चार महिने काढले आणि जयपूर ला राम राम करून तो पुन्हा आपल्या शहरात आला..एव्हाना त्याला कळून चुकलं होत की कुठे ही गेलं तरी जानू आणि तिच्या आठवणी काही त्याची पाठ सोडणार नाहीत..जयपूर मधील त्याच काम पाहून ..त्याच्या कंपनी ने त्याला रिकमंडेशन देऊन त्याच्याच शहरात त्याला एका कंपनी मध्ये जॉब दिला होता तो तिथे जॉईन झाला होता..रोज ऑफिस , फ्रेण्ड्स..घरी गेला की पुन्हा जानू च घर पाहणं तिथे तिला बंद डोळ्यांनी अनुभव न..सुट्टी दिवशी फ्रेण्ड्स सोबत बाईक राईड करणं ..सर्वांना मदत करायला नेहमी तयार राहणं ..अशीच चालू होती .. अभय ची लाईफ..

स्नेहा दीदी च्या लग्ना नंतर घरी खूप बदल झाला होता..जानू च्या बाबांनी त्यांच्या भावाशी म्हणजेच जानू चे काकां न सोबत सर्व संबंध तोडून टाकले होते..कोणा कडे जान नाही की येन नाही..जानू च जगणं जणू पिंजऱ्यात ठेवलेल्या पक्षा सारखं झालं होत...ऑफिस ला जायचं ..ते डायरेक्ट घरी यायचं..ना कोणा सोबत जास्त बोलणं ना कुठे बाहेर जाणं ..म्हणायला तेवढ ती ऑफिस साठी च काय ते घरा बाहेर असायची...त्यात ही तिला थोडा ही वेळ झाला तरी ..बाबा तिला फोन करून करून पिडून काढत..इतका वेळ का ? उशीर का ? पणं जानू ला ही या पिंजऱ्यात राहायची एवढी सवय जडली होती की तिला स्वतः ला ही तो सोडून कुठेच जावू वाटत नसे...फक्त यंत्रा सारखं ऑफिस मध्ये काम करायचं..घरी येवुन आई ला थोडी मदत करायची..थोडा वेळ मोबाईल वर घालवायचा ..गाणी ऐकायची ..हेच दररोज च रूटीन ..

पणं देवाच्या मनात असेल ना तर तो दोन विरुद्ध टोकांच्या ना ही एका ठिकाणी आणून जोडतो...

जिनको जिनको भी मिलना हैं लिखा इश्क मिला वायेगा
दूर दूर से धुंड धूंड के पास ले आयेगा,

कही भी जाके छुपो इश्क वही आएगा
कितना भी ना ना करो .. उठा के ले जायेगा..
मानो या ना मानो ये सारी ही दुनिया .. इसी के दम पे चले.
जिले जीले जी ले इश्क में..
मरणा हैं तो आ मर भी ले इश्क में...

जानू ऑफिस सुटून घरी जायच्या तयारीत होती बस ची वाट पाहत होती की ..तिथे असणारी एक मुलगी सारखी तिच्या कडे एक टक पाहत होती..जानू ला ही वाटत होत ..हिला आपण कुठे तरी पाहिलं आहे..ती ही विचारात होती ..की ती मुलगी तिच्या जवळ आली ..

मुलगी: तू जान्हवी प्रधान ना ?

जानू : हो..पणं तू ?

मुलगी : मला नाही ओळ खल ? मी उमा..आपण एकाच हायस्कूल मध्ये होतो..

जानू ला ही मग उमा आठवली ..ती जेव्हा चाळीत राहायची तेव्हा त्या दोघी एकाच हायस्कूल मध्ये शिकत होत्या..

जानू : हो आठवल ..अरे वा ..खूप वर्ष झाली ग त्यामुळे लवकर लक्षात आलं नाही सॉरी..

उमा : तू तर अजून हि तशीच आहेस म्हणून तर तुला मी लगेच ओळखलं..ये पणं तू अचानक कशी गायब झालीस ग ?

जानू : अचानक नाही ग..बाबा न ची बदली झाली आणि सुट्टी त बदली झाल्यामुळे कोणाला ही सांगता आलं नाही..मला ही माहित नव्हत ना..

उमा : एकदा तर कॉन्टॅक्ट करायचं ना यार..

जानू : कसा करायचा ? तेव्हा काय आता सारखा मोबाईल चा जमाना होता का ? माझ्या कडे फोन तरी होता का ?

उमा : हो ग..आता च या फोन ची एवढी क्रेझ आली आहे आपण लहान होतो तेव्हा तर ..तो छोटा डब्बा फोन सुद्धा किती विशेष वाटायचा..बर कशी आहेस ? काय करतेस सध्या ?

जानू : मी छान आहे ? सध्या जॉब करते एका कंपनी मध्ये ..तू कशी आहेस आणि इथे कशी ?

उमा : मी ही ठीक आहे..मी माझ्या मामाच्या गावी गेले होते ..आता परत घरी निघाले आहे ..बस ची वाट पाहताना सहज तुझ्या वर नजर गेली आणि वाटलं तू जान्हवी च असणार ...

जानू : छान वाटलं ग खूप वर्षांनी तुला भेटून ..बाकी कोणी आहे का कॉन्टॅक्ट मध्ये ?कसे आहेत सर्वजण ?

उमा : आहेत सर्व जण आहेत..अपूर्वा च लग्न झालं..सखी तर लग्न करून जे गेली त्या नंतर काही तिचा पत्ताच नाही..आपल्या क्लास मेंट स चा व्हॉट्स ऍप ग्रुप आहे ..मी करेन तुला add ..नंबर तर दे.

जानू : हो नक्की ..आवडेल मला जुन्या फ्रेण्ड्स सोबत बोलायला ..पणं जर सखी चा काही पत्ता लागला तर नक्की मला सांग ह...
जानू आपला नंबर उमा ला देते ..उमा एक मिस कॉल देते तिच्या नंबर वर जानू उमा चा नंबर सेव्ह करून घेते..
बऱ्याच वेळ त्यांच्या गप्पा चालू असतात..जानू ला ही आज खूप वर्षांनी अस गप्पा मारताना छान वाटत होत..चाळीचा विषय निघाला तसा ..जानू ला अभय ची खूप आठवण आली.

जानू : उमा , अभय आहे का कॉन्टॅक्ट मध्ये ?

उमा :हो ..आहे ना सर्व जण आहेत ग फक्त तू च नव्हतीस ..आणि तो आला होता .. अप्री च लग्न होत तेव्हा ..भेटला होता.

जानू : त्याचा नंबर तर दे..

उमा तिला अभय चा नंबर देते..यांच्या गप्पा काही संपायच्या नाव घेत नसतात आणि बस लागून ..फक्त हा ला य ची ..बाकी होती..मग दोघी ही एक मेकीना मिठी मारून निरोप घेतात..जानू ही पळत जावून बस मध्ये चढते..आज ती ही कधी नव्हे ते खुश असते.

घरी आल्या वर आज ती चाळीतले दिवस आठवू लागली होती..आणि तिला जास्त आठवत होता तो अभय ..पहिल्या सारखाच वेडा असेल का तो ? की बदलला असेल ? मी होते तेव्हा किती वेड्या सारख करायचा..ती आज त्याला आठवून हलकीशी हसली होती..मोबाईल घेऊन तिने अभय ला मॅसेज करावा असा विचार केला..पणं काय माहित नको...परत कोनात गुंतायला नको म्हणून तिने .. अभय ला मॅसेज करायचा ..विचार डोक्यातून काढून टाकला.

क्रमशः