अपूर्वाच्या लग्ना दिवशी.. अभय सकाळ पासून तयारी करत होता..लग्न १ ला होते..पणं त्याने आकाश ला सकाळी लवकरच आपल्या घरी बोलावलं होत..आकाश तर कधीचा तयार होऊन येऊन बसला होता..पणं अभय ची तयारी काही केला संपत नव्हती..एव्हाना त्याचे ४ ड्रेस बदलून झाले होते..हा कसा आहे रे ? यात चांगला तर दिसतो ना मी ?आकाश मात्र वैतागला होता आणि हसत ही होता..
आकाश: अभ्या लग्न अपुर्वाच आहे रे? हे तर अस झालं आहे बेगानी शादी में अब्दुल्ला दि वाना...
अभय: माहित आहे तिचं च आहे ..मी कुठे म्हटलो माझं आहे ?
आकाश : पणं मला तर वाटतं आहे ..तुझं आहे की काय ? ती अपूर्वा पणं तयार हॉयला इतका वेळ लावणार नाही...आणि तू गेली दीड तास नुसता आवारातच आहेस..
अभय: अरे गप रे तुला..तुला काय कळणार ? जानू येणार आहे माझी..मग मला जरा तरी चांगलं दिसायला पाहिजे ना ? ये लहानपणी किती छान दिसायची ती ..आता ही तशीच दिसत असेल का ? आणि तिचं ते हसणं ..बापरे..किती मिस केलंय मी त्या हसण्याला.. ये अक्या पणं मला ओळखेल ना रे ती?
आकाश : अजिबात ओळखणार नाही..
अभय: काय यार अक्षा ..असला कसला दोस्त तू ?
आकाश : अरे ओळखायला तिने तुला पाहायला तर पाहिजे ना ? आणि जस तुझं आवरण चालू आहे ना मला वाटत आपण लग्नाला नाही पणं ..अपूर्वाच्या मुलाच्या बारशाला जरूर पोहचू..
अस म्हणून आकाश हसू लागतो..मग शेवटी एक ब्ल्यू कलर चा शर्ट आणि तशीच ब्ल्यू जीन्स घालून अभय राजे तयार होतात..भारी दिसत असतात ते या ड्रेस मध्ये..आकाश ही त्याला चल छान दिसत आहेस म्हणून. घेऊन जातो.
लग्न एक ला असत एका मोठ्या हॉल मध्ये..हॉल छान सजवला होता..फुलांनी आणि पणाणी सुंदर डे कोरेशन ..केलेलं होत..समोर दोन्ही बाजूला चेअर्स ठेवल्या होत्या ..सर्व एकदम सुंदर ..छान वाटत होत पण लग्नाला अजून वेळ होता.. अभय आल्या आल्या पहिलं जानू ला शोधू लागला होता..पणं अजून कोणी जास्त आलेच नव्हते..आपण च लवकर आलो आहोत ..येईल ती थोड्या वेळात अस सांगून आकाश ने त्याला समजावलं होत..वेळ होता म्हणून ते स्टेज सजवण्या साठी तिथेच मदत करू लागले..पणं अभय ची नजर मात्र सारखी गेट कडे होती..कधी जानू त्या गेट मधून आत प्रवेश करेल आणि आपल्या नजरेला ती दिसेल अस झाल होत त्याला..तिथलं काम पूर्ण झालं आता माणसांची गर्दी वाढू लागली होती.. अभ य तर आता वैतागून गेट जवळचं जावून थांबला होता..येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो पाहत होता..पणं त्याच्या नजरेला जो चेहरा हवा होता तो मात्र त्याला कुठेच दिसत नव्हता....वेळ जाईल तसा त्याच मन उदास होवू लागलं होत ...शेवटी लग्नाचा मुहूर्त जवळ आला तसा आकाश ने त्याला खेचत हॉल मध्ये नेल..
अभय : ये अकया चल ना ..अपूर्वा ला विचारू जानू कधी येणार आहे ? अरे बघ ना झाली ना मुहूर्त ची वेळ पणं अजून ती आली नाही रे..
आकाश : ये आभ्या तुला वेड लागलं आहे का ?अपूर्वा आता इतक्यात स्टेज वर येईल आणि आपल्याला कसं जावू देतील तिच्या कडे?आता तिच्या सोबत बोलायचं आहे म्हंटल्यावर तुला तर सोड मला ही मार खावा लागेल..
अभय: देवू देत मार ..पणं चल ना विचारू..मला नाही आता वाट पहायची?
आकाश: तुझ्या पाया पडतो अभ्या ..जरा शांत बस ..लग्न होवू दे आपण विचारू ..आता आपल्याला कोणी सुद्धा तिच्या कडे जावू देणार नाहीत.
अभय चा चेहरा पडतो व तो ही शांत होतो..पणं अजून हि नजर गेट वर होती त्याची कदाचित उशीर झाला असेल ..येईल ती ..अस तो स्वतः ला च समजावत होता .
शेवटी एकदाचं लग्न छान पार पडलं..सर्वजण नवरा नवरीच्या जोड्याला आशीर्वाद आणि शुभेच्या द्यायला गर्दी करू लागले..गिफ्ट देऊन फोटो काढण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता.. अभय लग्ना साठी गिफ्ट जयपूर मधूनच घेऊन आला होता..एक सुंदर स शो पीस होत....चल आता गिफ्ट देताना तर विचारू ..अस म्हणून अभय नी आकाश ला स्टेज वर नेल..पणं काही विचारायच्या आधीच..त्यांच्या मित्रांचा घोळका स्टेज वर आला ..गिफ्ट देऊन झालं ..फोटो ही काढले .. पणं त्या गर्दीत अभय ला मात्र विचारायचं होत ते राहून गेलं..तो तसचं स्टेज खाली उतरला..लग्न पार पडलं ... अभय खूप दुखी मनाने परत आला..आकाश ला ही फार वाईट वाटलं... अभय ची निराशा झाली होती ..दुसऱ्या दिवशी च तो जयपूर ला निघून गेला.
जानू लग्नाला येणार तरी कशी ? कोणा सोबतच तर तिचा कॉन्टॅक्ट नव्हता ना ?
क्रमशः