रात्री शौर्य सुकन्याला ड्रॉप करून निघून जातो..... इकडे ती कोणाशीही न बोलताच तिच्या रूम मध्ये निघून येते..... शौर्यचे शब्द तिच्या डोक्यात असतात..... ती त्यावर खूप विचार करते..... पण, तिला आज पर्यंत कोणी आवडल्याचं समजत नाही..... ती बेडवर आडवी पडून विचार करत असता..... दारावर थाप पडते.....
ती उठून डोअर ओपन करते.....
सुकन्या : "सल्लू दादू.... ये ना....."
सल्लू : "बच्चा तू कब से बिना बात कीये सोने लगी?"
सुकन्या : "सॉरी वो...."
सल्लू : "अरे टेन्शन नक्को रे..... अगर तू कंफर्टेबल नहीं होगी कोई बात नहीं..... सो जा... गूड नाईट...."
तो जायला डोअर ओपन करतो...... तोच सुकन्या त्याचा हात पकडते आणि त्याला मिठी मारत रडते..... सल्लू घाबरतो....
सल्लू : "बच्चा क्या हुआ....? तू रो क्यूँ रही हैं....? सलमा देख..... इधर..... शौर्यने कुछ..... रुक अभी उसको कॉल कर के....."
सुकन्या : "दादू यार..... स्टॉप इट ना..... किती घाबरतोस..... आय थिंक, मला कोणी आवडायला लागलं आहे....."
सल्लुला स्वतःच्या कानावर विश्वास बसत नाही....
सल्लू : "सलमा.... तू ये क्या बोल रही हैं..... तुझे......... मतलब.....???? कौन हैं वो खुश नसिब इंसान????"
सुकन्या : "शौर्य...."
सल्लू : "तू मजाक तो नहीं कर रही ना.... इधर देख.... सलमा तू चक्क शरमाई..... रुक अभी मैं सब को खुश खबर सूना कर आता हू...."
ती सल्लूचा हात पकडत.....
सुकन्या : "वेट.... सर्वांना सरप्राइज असेल हे...... इथे बस..... आज काय झालं ते सांगते....."
...........................
...........................
...........................
ती त्याला आज घडलेलं सर्व काही सांगून टाकते.....
सल्लू : "व्हॉट... तो इंडिया सोडून जातोय....."
सुकन्या : "हो ना दादू....."
तो तिला कवटाळत.....
सल्लू : "थांबेल तो..... तू त्याला तुझ्या मनातलं सांगून बघ....."
सुकन्या : "पण, जर मला त्याला गमवावं लागलं.....?? म्हणजे, तरी तो इंडिया सोडून गेला....."
सल्लू : "हे बघ त्याला ही इन् सिक्युरिटी आहे की, तो तुला गमावणार..... का? कारण, जर तू त्याचं प्रेम एक्सेप्ट केलं नाही.... पण, जर तू स्वतः त्याला हे सांगितलं की, तुझं ही तितकंच.... इन्फॅक्ट, जास्तच प्रेम आहे..... तर, नक्कीच थांबेल तो..... मला पूर्ण खात्री आहे....."
सुकन्या : "ह्मममममम...."
सल्लू : "बच्चा बट तुला हे कधी समजलं..... तुझं प्रेम आहे त्याच्यावर???"
सुकन्या : "हे बघ..... मला आज त्याने एक टास्क दिला की, मी स्वतः विचार करावं.... मला आज पर्यंत कोण आवडलं.... मी खूप विचार केला.... बट, शौर्य येत पर्यंत असा कोणीही नव्हता.... शौर्य आल्या पासून मी प्रेमा बद्दल खूप विचार करू लागले होते.... अँड जेव्हा आज त्याने, तो इंडिया सोडून जाणार असल्याचं सांगितलं.... मी मनातून तुटले रे दादू.... तो जाऊच नये असं वाटत होतं मला.... आणि जेव्हा त्याने मला सांगितलं ना की, तो माझ्यावर प्रेम करतो पण, मला गमवायच्या भीतीने तो इंडिया सोडून जातोय..... तेव्हा त्याच वेळी त्याला जाऊन घट्ट मिठीत घेऊन थांबवावं वाटत होतं आणि सांगून टाकावं की, माझं ही त्याच्यावर किती प्रेम आहे..... पण, मी थांबले.... कारण, मला माझी सो कॉल्ड टॅग लाईन आडवी आली....."
सल्लू : "लव्ह इज नॉट यूअर् कप ऑफ टी..... राईट...."
सुकन्या : "हमममम...."
सल्लू : "बच्चा..... तू खरंच लकी आहेस ग...... तुला शौर्य एक फ्रेंड म्हणून भेटला ज्याने तुझे सगळे डाऊट्स क्लिअर केले..... यू नो व्हॉट, मी उर्विला बोललो होतो..... एक दिवस कोणी तरी तुझ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन नक्की येईल..... अँड त्या दिवशी तू बोलणार, लव्ह इज माय कप ऑफ कॉफी..... कारण, तो चहा पेक्षा जास्त असेल.... स्वीट असेल...... अँड सी... शौर्य तुला भेटणार आहे.... फक्त तू धाडस कर आता....."
सुकन्या : "दादू म्हणजे तुम्ही माझ्या विषयी इतकं डिस्कस करत होता?"
सल्लू : "हो.... इतकंच नाही तर, उर्वीला वाटत होतं की, तुझी आणि शौर्यची ऑफिसियल एंगेजमेंट अंनौन्समेंट करावी.... जेणेकरून, तुमच्यात प्रेम होईल..... कारण, त्याच्याविषयी असणारं तुझं प्रेम तिला, तुझ्या डोळ्यात आधीच दिसलं होतं...."
सुकन्या : "पण, दादू ते सॅक्रिफाईज झालं असतं ना रे...."
सल्लू : "मी पण तेच म्हणालो....."
सुकन्या : "दादू.... तू किती विचार करतोस ना माझा....."
सल्लू : "यू नो व्हॉट सलमा...... जेव्हा मी तू लहान असताना..... तुला माझ्या ह्या दोन हातात पडकलं होतं ना.... तेव्हाच ठरवलं..... तुझ्या पाठीशी मी नेहमी असेल.... घरच्यांनी मला जरी एक्सेप्ट नसतं केलं.... तरी मी परमिशन घेतली असती त्यांच्याकडून..... तुला आठवड्यातून एक दिवस भेटू देण्यासाठीची....."
सुकन्या : "इतका आपलेपणा.... दादू अरे सख्ख्या भावा - बहिणीत दिसत नाही रे..... तू मला इतकं प्रेम दिलंस, नेहमी माझा विचार केलास...... प्रेम म्हटलं की, बहिणीवर संशय घेणारे भाऊ बघितले...... पण, तू मला माझं डिसिजन घ्यायला मोकळं केलं..... तू आज खरंच भाऊ म्हणून जिंकलास रे....."
सुकन्या रडतच सल्लूच्या मिठीत शिरते.... निव्वळ प्रेम....
सल्लू : "सलमा..... बच्चा, बस बोलने के लिये भाई - बहन रहने का क्या मतलब? अरे अगर सच में कोई किसी से प्यार करता हो ना...... तो, अपने बर्ताव से दिखना चाहिए.... तभी हम इन्सान कहलाने लायक बनेगे... भाई - बहन तो बस एक जिम्मेदारी होती हैं..... जिसने इसमें बाजी मार ली...... समझ लो वो इन्सानियत के इमतेहान में पास हो गया......"
सुकन्या डोळे पुसत......
सुकन्या : "सल्लू दादू तू इतकं छान आणि इतकं सॉर्टेड कसं काय बोलतो अरे....?"
सल्लू : "छोटा था बच्चा, तब से मैने इतनी गरिबी, भुकमरी देखा..... तबसे मेहनत करना सिखा..... मेरे अब्बा, अम्मी को मारते थे..... तब हर किसी को बिना जलील हुये जिने का हक हैं ये सिखा..... मेरे घर के बाजू जो सलमा अपाहिज थी..... उसके लिये कुछ न कर सका ये बात मन में चुभ रही थी.... तुझे पहली बार हात में उठाते ही मुझे तुझमें मेरी सलमा दिखी... तभी ठान लिया बस अब तुझे मैं दूनिया की सब खुशिया दुगा.... हर एक जिम्मेदारी निभाऊगा..... आज तक वही किया..... आगे भी करुगा...."
सुकन्या, साल्लुला परत जोरात मिठी मारते.....
सुकन्या : "दादू माझ्याकडे शब्द नाहीत रे..... का तू इतका प्यूअर् सोल आहेस..... लव्ह यू दादू....."
सल्लू : "बच्चा कोई प्यूअर् सोल नहीं रहता.... मुझे जो लोग मिले वो थे..... प्यूअर् सोल..... जिनके कारण आज मैं यहाँ खडा हू..... लव्ह यू रे बच्चा....."
दोघेही खूप वेळ गप्पा मारतात......
सल्लू : "तू अब प्रॅक्टिस कर कैसे प्रपोज करना हैं..... प्यार में थोडा कमजोर था ना मेरा बच्चा...... मैं कोई हेल्प नहीं करने वाला.... तू खुद करेगी ये अब..... बाय...."
ती काही बोलायच्या आतच तो रूम बाहेर पळून जातो.....
सुकन्या : "हे देवा कसं करेल मी प्रपोज...."
विचार करता - करता तिला कधी झोप लागते समजत नाही.....
असेच दिवसामागून - दिवस जातात...... शौर्य फक्त आश्रम मध्ये आजोबांना भेटायला जात असतो.... सुकन्याला तो डायरेक्ट पार्टी मध्येच भेटणार असतो....... कारण, तिला भेटून आणखी ओढ नको लागायला..... म्हणून, तो घरी ही येत नाही......
पाचही अनाथ आश्रमातून मुलांच्या नोंदी मिळवून त्यावर काम पूर्ण करण्यात येतं...... जागे अभावी आणखी बांधकाम करून दोन नवीन बिल्डिंग उभारण्यात येतात.... त्याच सोबत लहान मुलांच्या गैरप्रकार करणाऱ्या टोळ्या शोधून बेधडक कारवाई करण्यात येते...... विधिमंडळात प्रश्न ठेवण्यात आल्या पासून आजोबांना वेगळाच मान मिळतो आणि त्यांना विशेष सामाजिक कार्यकर्ता म्हणून विधिमंडळात नामनिर्देशित करण्यात येतं......
कामाची दखल घेत, राज्य शासनातर्फे एक विशेष गट स्थापित करण्यात येतो..... ज्याचं नाव जिजिविषा गट असं ठेवण्यात येतं..... हा बहुमान इतका सर्वोच्च असतो की, जिकडे - तिकडे त्याचीच चर्चा असते.....
शौर्यने प्रॉमिस केलं असतं की, पार्टी होई पर्यंत तो इंडिया सोडून जाणार नाही.... म्हणून, सल्लूने ठरवल्या प्रमाणे सगळी कामं आटोपल्यावर पार्टी करायची असं ठरतं.... कारण, तितके दिवस सुकन्याचा पुर्ण गोंधळ नाहीसा होऊ शकेल.....
तब्बल तीन महिने ही सगळी भानगड चालते..... आजोबा आणि बाकीचे लोकं अगदी प्रभावीपणे ही कामं बघत असल्याने एक दबाव गट निर्माण होऊन लवकरात - लवकर शासन निर्णय घेण्यात येतात.....
तीन महिन्यांनी आज.....
जिकडे - तिकडे सगळ्यांची धावपड सुरू असते...... जो - तो आज आपल्याच तालात..... सुकन्या वेगळ्या टेन्शन मध्ये.....
@आजी - आजोबांच्या रूम मध्ये......
आजी : "रवी, अरे..... नको सुधरू तू..... सोड मला रेडी होऊ दे....."
आजोबा : "सुधरायला बिघडलो कधी आम्ही.....? बिघडवलं तुम्हीच..... मग आता सुधारण्याचा प्रयत्न का करता......?"
आजी : "तुला कोण सुधर म्हटलं..... ते तर मी सहज बोलले..... लगेच मनावर घ्यायचं काय कारण?"
आजोबा : "ये हुई ना बात......"
दोघांची मस्ती सुरूच......
@सल्लू अँड उर्वीची रूम........
सल्लू : "ऊर्वू...... तुझी विश् आज पूर्ण होणार आहे.... कसं वाटतंय.....?"
ऊर्वी : "खूप भारी..... ती प्रपोज कशी करेल ही खरी मज्जा आहे..... बिचारी...... जसं मी केलं होतं तसं कर म्हटलं..... तर ती बोलली वहिनी मी बघते कसं करायचं ते आणि लाजली..... कसली गोड लाजते राव..... लाजून दाखवलं तरी शौर्य समजून जाईल....."
सल्लू : "बस हा आता..... माझी बहिण बघ बेस्ट प्रपोज करेल की नाही....."
ऊर्वी : "बरं..... चल अर्ध्या तासात आश्रमसाठी निघायचं आहे.... रात्री मग पार्टी..... इतक्या दिवसांनी घरी पार्टी अँड ते ही सरप्राइज....."
सल्लू : "म्हणून मी सर्वांना इंव्हाईट केलंय....."
ऊर्वी : "कोण...??"
सल्लू : "मामा अँड उसकी फॅमिली.... वैभव जिजू अँड नंदिनी दिदी...... कलिका अँड सचिन तो रहेगे ही......"
ऊर्वी : "बरं झालं..... तसंही खूप दिवसांतून भेटू सगळे त्यात सुकन्याचा हा डिसिजन...... सगळे खुश होतील....."
सल्लू : "म्हणून बोलावलं ना...... आणि आपलं ही सरप्राइज आहे की......"
ऊर्वी : "हो......"
@सुकन्याची रूम.....
सुकन्या खूप टेन्शन घेत असते....... गॅलरी मधल्या झोपाळ्यावर बसून ती प्रपोज कसा करायचा ह्याच विचारात असते....... तिचं लक्ष कुठेच नसतं..... ती रेडी होऊन बसून असते.....
थोड्या वेळात तिला शौर्यचा कॉल येतो..... सुकन्या भानावर येते..... त्याचे नाव बघताच तिच्या हृदयात धडधडू लागतं....
सुकन्या : "हा कशाला कॉल करतोय.....?"
ती थोडा वेळ त्याचा फोनच उचलत नाही..... तिसऱ्यांदा फोन आल्यावर ती त्याचा कॉल रिसिव्ह करते.....
सुकन्या : "हॅलो......"
शौर्य न थांबता......
शौर्य : "कुठे आहेस..... आर यू ओके...... काय झालंय..... कोणी काही बोललं?"
सुकन्या : "आता पर्यंत काही नव्हतं झालेलं...... तुझी इतकी मोठी प्रश्नांची लिस्ट ऐकून नक्की चक्कर येऊन पडेल......"
शौर्य : "काय राव तू...... कसली ड्रामा क्वीन आहेस..... बरं कधी येतेस इथे..... मी आलोय...."
सुकन्या : "बस.... काहीच तासात......"
शौर्य : "सांग ना...... जेव्हा बघितलं जोक्स...... किती वेळ आहे सांग....."
सुकन्या : "बघ आवाज दिला निंनिने..... निघतोय जस्ट......"
शौर्य : "काय विअर् केलंय तू आज......."
सुकन्या : "आल्यावर बघ ना......"
शौर्य : "ओके कम फास्ट......."
ती फोन कट करते....... बेडवर ठेवलेला पर्स घेते...... सँडल घालते आणि हिल्सचा आवाज करत खाली उतरते...... तिला बघून आजी जाम खूश...... कारण ती दिसतेच इतकी क्यूट आज......