Premacha chaha naslela cup aani ti - 60 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ६०. (अंतिम)

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ६०. (अंतिम)



रात्री शौर्य सुकन्याला ड्रॉप करून निघून जातो..... इकडे ती कोणाशीही न बोलताच तिच्या रूम मध्ये निघून येते..... शौर्यचे शब्द तिच्या डोक्यात असतात..... ती त्यावर खूप विचार करते..... पण, तिला आज पर्यंत कोणी आवडल्याचं समजत नाही..... ती बेडवर आडवी पडून विचार करत असता..... दारावर थाप पडते.....

ती उठून डोअर ओपन करते.....

सुकन्या : "सल्लू दादू.... ये ना....."

सल्लू : "बच्चा तू कब से बिना बात कीये सोने लगी?"

सुकन्या : "सॉरी वो...."

सल्लू : "अरे टेन्शन नक्को रे..... अगर तू कंफर्टेबल नहीं होगी कोई बात नहीं..... सो जा... गूड नाईट...."

तो जायला डोअर ओपन करतो...... तोच सुकन्या त्याचा हात पकडते आणि त्याला मिठी मारत रडते..... सल्लू घाबरतो....

सल्लू : "बच्चा क्या हुआ....? तू रो क्यूँ रही हैं....? सलमा देख..... इधर..... शौर्यने कुछ..... रुक अभी उसको कॉल कर के....."

सुकन्या : "दादू यार..... स्टॉप इट ना..... किती घाबरतोस..... आय थिंक, मला कोणी आवडायला लागलं आहे....."

सल्लुला स्वतःच्या कानावर विश्वास बसत नाही....

सल्लू : "सलमा.... तू ये क्या बोल रही हैं..... तुझे......... मतलब.....???? कौन हैं वो खुश नसिब इंसान????"

सुकन्या : "शौर्य...."

सल्लू : "तू मजाक तो नहीं कर रही ना.... इधर देख.... सलमा तू चक्क शरमाई..... रुक अभी मैं सब को खुश खबर सूना कर आता हू...."

ती सल्लूचा हात पकडत.....

सुकन्या : "वेट.... सर्वांना सरप्राइज असेल हे...... इथे बस..... आज काय झालं ते सांगते....."

...........................
...........................
...........................

ती त्याला आज घडलेलं सर्व काही सांगून टाकते.....

सल्लू : "व्हॉट... तो इंडिया सोडून जातोय....."

सुकन्या : "हो ना दादू....."

तो तिला कवटाळत.....

सल्लू : "थांबेल तो..... तू त्याला तुझ्या मनातलं सांगून बघ....."

सुकन्या : "पण, जर मला त्याला गमवावं लागलं.....?? म्हणजे, तरी तो इंडिया सोडून गेला....."

सल्लू : "हे बघ त्याला ही इन् सिक्युरिटी आहे की, तो तुला गमावणार..... का? कारण, जर तू त्याचं प्रेम एक्सेप्ट केलं नाही.... पण, जर तू स्वतः त्याला हे सांगितलं की, तुझं ही तितकंच.... इन्फॅक्ट, जास्तच प्रेम आहे..... तर, नक्कीच थांबेल तो..... मला पूर्ण खात्री आहे....."

सुकन्या : "ह्मममममम...."

सल्लू : "बच्चा बट तुला हे कधी समजलं..... तुझं प्रेम आहे त्याच्यावर???"

सुकन्या : "हे बघ..... मला आज त्याने एक टास्क दिला की, मी स्वतः विचार करावं.... मला आज पर्यंत कोण आवडलं.... मी खूप विचार केला.... बट, शौर्य येत पर्यंत असा कोणीही नव्हता.... शौर्य आल्या पासून मी प्रेमा बद्दल खूप विचार करू लागले होते.... अँड जेव्हा आज त्याने, तो इंडिया सोडून जाणार असल्याचं सांगितलं.... मी मनातून तुटले रे दादू.... तो जाऊच नये असं वाटत होतं मला.... आणि जेव्हा त्याने मला सांगितलं ना की, तो माझ्यावर प्रेम करतो पण, मला गमवायच्या भीतीने तो इंडिया सोडून जातोय..... तेव्हा त्याच वेळी त्याला जाऊन घट्ट मिठीत घेऊन थांबवावं वाटत होतं आणि सांगून टाकावं की, माझं ही त्याच्यावर किती प्रेम आहे..... पण, मी थांबले.... कारण, मला माझी सो कॉल्ड टॅग लाईन आडवी आली....."

सल्लू : "लव्ह इज नॉट यूअर् कप ऑफ टी..... राईट...."

सुकन्या : "हमममम...."

सल्लू : "बच्चा..... तू खरंच लकी आहेस ग...... तुला शौर्य एक फ्रेंड म्हणून भेटला ज्याने तुझे सगळे डाऊट्स क्लिअर केले..... यू नो व्हॉट, मी उर्विला बोललो होतो..... एक दिवस कोणी तरी तुझ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन नक्की येईल..... अँड त्या दिवशी तू बोलणार, लव्ह इज माय कप ऑफ कॉफी..... कारण, तो चहा पेक्षा जास्त असेल.... स्वीट असेल...... अँड सी... शौर्य तुला भेटणार आहे.... फक्त तू धाडस कर आता....."

सुकन्या : "दादू म्हणजे तुम्ही माझ्या विषयी इतकं डिस्कस करत होता?"

सल्लू : "हो.... इतकंच नाही तर, उर्वीला वाटत होतं की, तुझी आणि शौर्यची ऑफिसियल एंगेजमेंट अंनौन्समेंट करावी.... जेणेकरून, तुमच्यात प्रेम होईल..... कारण, त्याच्याविषयी असणारं तुझं प्रेम तिला, तुझ्या डोळ्यात आधीच दिसलं होतं...."

सुकन्या : "पण, दादू ते सॅक्रिफाईज झालं असतं ना रे...."

सल्लू : "मी पण तेच म्हणालो....."

सुकन्या : "दादू.... तू किती विचार करतोस ना माझा....."

सल्लू : "यू नो व्हॉट सलमा...... जेव्हा मी तू लहान असताना..... तुला माझ्या ह्या दोन हातात पडकलं होतं ना.... तेव्हाच ठरवलं..... तुझ्या पाठीशी मी नेहमी असेल.... घरच्यांनी मला जरी एक्सेप्ट नसतं केलं.... तरी मी परमिशन घेतली असती त्यांच्याकडून..... तुला आठवड्यातून एक दिवस भेटू देण्यासाठीची....."

सुकन्या : "इतका आपलेपणा.... दादू अरे सख्ख्या भावा - बहिणीत दिसत नाही रे..... तू मला इतकं प्रेम दिलंस, नेहमी माझा विचार केलास...... प्रेम म्हटलं की, बहिणीवर संशय घेणारे भाऊ बघितले...... पण, तू मला माझं डिसिजन घ्यायला मोकळं केलं..... तू आज खरंच भाऊ म्हणून जिंकलास रे....."

सुकन्या रडतच सल्लूच्या मिठीत शिरते.... निव्वळ प्रेम....

सल्लू : "सलमा..... बच्चा, बस बोलने के लिये भाई - बहन रहने का क्या मतलब? अरे अगर सच में कोई किसी से प्यार करता हो ना...... तो, अपने बर्ताव से दिखना चाहिए.... तभी हम इन्सान कहलाने लायक बनेगे... भाई - बहन तो बस एक जिम्मेदारी होती हैं..... जिसने इसमें बाजी मार ली...... समझ लो वो इन्सानियत के इमतेहान में पास हो गया......"

सुकन्या डोळे पुसत......

सुकन्या : "सल्लू दादू तू इतकं छान आणि इतकं सॉर्टेड कसं काय बोलतो अरे....?"

सल्लू : "छोटा था बच्चा, तब से मैने इतनी गरिबी, भुकमरी देखा..... तबसे मेहनत करना सिखा..... मेरे अब्बा, अम्मी को मारते थे..... तब हर किसी को बिना जलील हुये जिने का हक हैं ये सिखा..... मेरे घर के बाजू जो सलमा अपाहिज थी..... उसके लिये कुछ न कर सका ये बात मन में चुभ रही थी.... तुझे पहली बार हात में उठाते ही मुझे तुझमें मेरी सलमा दिखी... तभी ठान लिया बस अब तुझे मैं दूनिया की सब खुशिया दुगा.... हर एक जिम्मेदारी निभाऊगा..... आज तक वही किया..... आगे भी करुगा...."

सुकन्या, साल्लुला परत जोरात मिठी मारते.....

सुकन्या : "दादू माझ्याकडे शब्द नाहीत रे..... का तू इतका प्यूअर् सोल आहेस..... लव्ह यू दादू....."

सल्लू : "बच्चा कोई प्यूअर् सोल नहीं रहता.... मुझे जो लोग मिले वो थे..... प्यूअर् सोल..... जिनके कारण आज मैं यहाँ खडा हू..... लव्ह यू रे बच्चा....."

दोघेही खूप वेळ गप्पा मारतात......

सल्लू : "तू अब प्रॅक्टिस कर कैसे प्रपोज करना हैं..... प्यार में थोडा कमजोर था ना मेरा बच्चा...... मैं कोई हेल्प नहीं करने वाला.... तू खुद करेगी ये अब..... बाय...."

ती काही बोलायच्या आतच तो रूम बाहेर पळून जातो.....

सुकन्या : "हे देवा कसं करेल मी प्रपोज...."

विचार करता - करता तिला कधी झोप लागते समजत नाही.....

असेच दिवसामागून - दिवस जातात...... शौर्य फक्त आश्रम मध्ये आजोबांना भेटायला जात असतो.... सुकन्याला तो डायरेक्ट पार्टी मध्येच भेटणार असतो....... कारण, तिला भेटून आणखी ओढ नको लागायला..... म्हणून, तो घरी ही येत नाही......

पाचही अनाथ आश्रमातून मुलांच्या नोंदी मिळवून त्यावर काम पूर्ण करण्यात येतं...... जागे अभावी आणखी बांधकाम करून दोन नवीन बिल्डिंग उभारण्यात येतात.... त्याच सोबत लहान मुलांच्या गैरप्रकार करणाऱ्या टोळ्या शोधून बेधडक कारवाई करण्यात येते...... विधिमंडळात प्रश्न ठेवण्यात आल्या पासून आजोबांना वेगळाच मान मिळतो आणि त्यांना विशेष सामाजिक कार्यकर्ता म्हणून विधिमंडळात नामनिर्देशित करण्यात येतं......

कामाची दखल घेत, राज्य शासनातर्फे एक विशेष गट स्थापित करण्यात येतो..... ज्याचं नाव जिजिविषा गट असं ठेवण्यात येतं..... हा बहुमान इतका सर्वोच्च असतो की, जिकडे - तिकडे त्याचीच चर्चा असते.....

शौर्यने प्रॉमिस केलं असतं की, पार्टी होई पर्यंत तो इंडिया सोडून जाणार नाही.... म्हणून, सल्लूने ठरवल्या प्रमाणे सगळी कामं आटोपल्यावर पार्टी करायची असं ठरतं.... कारण, तितके दिवस सुकन्याचा पुर्ण गोंधळ नाहीसा होऊ शकेल.....

तब्बल तीन महिने ही सगळी भानगड चालते..... आजोबा आणि बाकीचे लोकं अगदी प्रभावीपणे ही कामं बघत असल्याने एक दबाव गट निर्माण होऊन लवकरात - लवकर शासन निर्णय घेण्यात येतात.....

तीन महिन्यांनी आज.....

जिकडे - तिकडे सगळ्यांची धावपड सुरू असते...... जो - तो आज आपल्याच तालात..... सुकन्या वेगळ्या टेन्शन मध्ये.....

@आजी - आजोबांच्या रूम मध्ये......

आजी : "रवी, अरे..... नको सुधरू तू..... सोड मला रेडी होऊ दे....."

आजोबा : "सुधरायला बिघडलो कधी आम्ही.....? बिघडवलं तुम्हीच..... मग आता सुधारण्याचा प्रयत्न का करता......?"

आजी : "तुला कोण सुधर म्हटलं..... ते तर मी सहज बोलले..... लगेच मनावर घ्यायचं काय कारण?"

आजोबा : "ये हुई ना बात......"

दोघांची मस्ती सुरूच......

@सल्लू अँड उर्वीची रूम........

सल्लू : "ऊर्वू...... तुझी विश् आज पूर्ण होणार आहे.... कसं वाटतंय.....?"

ऊर्वी : "खूप भारी..... ती प्रपोज कशी करेल ही खरी मज्जा आहे..... बिचारी...... जसं मी केलं होतं तसं कर म्हटलं..... तर ती बोलली वहिनी मी बघते कसं करायचं ते आणि लाजली..... कसली गोड लाजते राव..... लाजून दाखवलं तरी शौर्य समजून जाईल....."

सल्लू : "बस हा आता..... माझी बहिण बघ बेस्ट प्रपोज करेल की नाही....."

ऊर्वी : "बरं..... चल अर्ध्या तासात आश्रमसाठी निघायचं आहे.... रात्री मग पार्टी..... इतक्या दिवसांनी घरी पार्टी अँड ते ही सरप्राइज....."

सल्लू : "म्हणून मी सर्वांना इंव्हाईट केलंय....."

ऊर्वी : "कोण...??"

सल्लू : "मामा अँड उसकी फॅमिली.... वैभव जिजू अँड नंदिनी दिदी...... कलिका अँड सचिन तो रहेगे ही......"

ऊर्वी : "बरं झालं..... तसंही खूप दिवसांतून भेटू सगळे त्यात सुकन्याचा हा डिसिजन...... सगळे खुश होतील....."

सल्लू : "म्हणून बोलावलं ना...... आणि आपलं ही सरप्राइज आहे की......"

ऊर्वी : "हो......"

@सुकन्याची रूम.....

सुकन्या खूप टेन्शन घेत असते....... गॅलरी मधल्या झोपाळ्यावर बसून ती प्रपोज कसा करायचा ह्याच विचारात असते....... तिचं लक्ष कुठेच नसतं..... ती रेडी होऊन बसून असते.....

थोड्या वेळात तिला शौर्यचा कॉल येतो..... सुकन्या भानावर येते..... त्याचे नाव बघताच तिच्या हृदयात धडधडू लागतं....

सुकन्या : "हा कशाला कॉल करतोय.....?"

ती थोडा वेळ त्याचा फोनच उचलत नाही..... तिसऱ्यांदा फोन आल्यावर ती त्याचा कॉल रिसिव्ह करते.....

सुकन्या : "हॅलो......"

शौर्य न थांबता......

शौर्य : "कुठे आहेस..... आर यू ओके...... काय झालंय..... कोणी काही बोललं?"

सुकन्या : "आता पर्यंत काही नव्हतं झालेलं...... तुझी इतकी मोठी प्रश्नांची लिस्ट ऐकून नक्की चक्कर येऊन पडेल......"

शौर्य : "काय राव तू...... कसली ड्रामा क्वीन आहेस..... बरं कधी येतेस इथे..... मी आलोय...."

सुकन्या : "बस.... काहीच तासात......"

शौर्य : "सांग ना...... जेव्हा बघितलं जोक्स...... किती वेळ आहे सांग....."

सुकन्या : "बघ आवाज दिला निंनिने..... निघतोय जस्ट......"

शौर्य : "काय विअर् केलंय तू आज......."

सुकन्या : "आल्यावर बघ ना......"

शौर्य : "ओके कम फास्ट......."

ती फोन कट करते....... बेडवर ठेवलेला पर्स घेते...... सँडल घालते आणि हिल्सचा आवाज करत खाली उतरते...... तिला बघून आजी जाम खूश...... कारण ती दिसतेच इतकी क्यूट आज......






आजी : "सल्लू......"

सल्लू : "देख लीया मैने...."

सगळे खळखळून हसतात.......

थोड्याच वेळात जायला निघतात....... अर्ध्या तासाने आश्रम गाठतात..... शौर्य तर सुकन्यात पुर्ण हरवून जातो...... सगळे जाऊन बसतात..... सुकन्या त्याच्याकडे मुद्दाम बघत नाही...... तो मात्र तिच्याशी कधी एकदाचं बोलतो असा करत असतो..... सुकन्याचा आज सत्कार होणार असतो....

संचालक : "तर, मंडळी आज हा क्षण किती आनंदाचा हे सांगायला खूप अभिमान वाटतोय.... आज आपल्या येथील कर्तव्यदक्ष आपल्या माणसांनी जी कामगिरी बजावली.... तो विचार मनात आणायला सुद्धा मोठं काळीज लागतं...... असा विचार मनात आणणारे आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व, ज्यांच्या कामाची दाखल विधिमंडळात देखील घेतली गेली आणि ज्यांनी किती तरी निष्पाप जिवाला संरक्षण देऊन त्यांना जगण्याची नवीन प्रेरणा दिली..... असे ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके बाबा.... नाव घेण्याइतपत माझं मोठेपण मी मानत नाही..... तर, अशाच प्रेरणादायी आश्रमाचं तितकंच प्रेरणादायी नाव सुचवणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या..... सुकन्या ताई यांना मी मंचावर आमंत्रित करतो.... त्यांनी येऊन मोलाचे मार्गदर्शन करावे.... ताई....."

सुकन्या तिचा फ्लोर टच गाऊन पकडत स्टेज वर जाते.....

सुकन्या : "नमस्कार...... मी सुकन्या..... आज इतक्या मोठ्या मंचावर मला आपण सर्वांच्या साक्षीने येण्याची संधी मिळतेय त्याबद्दल मी आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते.... आज मला या सन्माननीय मंचावर उभं राहून बोलण्याचा जो मान मिळतोय तो फक्त आणि फक्त आपल्या सर्वांमुळे..... मला खूप अभिमान वाटतो की, मी माझ्या आबांची नात आहे.... त्यांनी जे काही समाजासाठी केलं त्याचा किमान थोडा तरी वाटा मी सुद्धा पुढे उचलायला स्वतःला तयार करेल.... आबांनी जे केलं ते कौतुकास्पद आहेच त्यासाठी मी स्वतःला नशीबवान मानते..... पण, फक्त नशीबवान मानून माझं कर्तव्य संपत नाही...... तर, पुढे मी त्यात काय भर घालू शकते यावरून ठरेल की, खरंच मी आबांची नात म्हणवून घेण्या योग्य आहे किंवा नाही..... म्हणून, इथून पुढे मी सुकन्या.... माझं पुर्ण आयुष्य जीजिविषा साठी काम करण्याचा निर्णय घेत माझे शब्द संपवते..... आपण सर्वांनी मला इतक्या प्रेमाने ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानते..... धन्यवाद.... जय हिंद.... जय महाराष्ट्र....."

संचालक : "ताई..... एक, दोनच मिनिटं......"

सुकन्या : "बरं....."

संचालक : "मी आदरणीय बाबा आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबीयांना आदरपूर्वक, मंचावर येण्यासाठी आमंत्रित करतो.... त्यांनी येऊन आश्रमाच्या नावाचं उद्घाटन करावं..... टाळ्यांच्या गजरात सर्वांनी साथ द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो....."

टाळ्यांच्या गजरात नावाच्या बोर्ड समोरून पडदा बाजूला करण्यात येतो......


💝 जिजीविषा 💝


आजी : "खूप अर्थपूर्ण नाव ठेवलं बाळा सुकन्या तू...."

जया : "खरंच..... नावातून उद्देश दिसून येतो आहे...."

संजय : "बाळा तू तुझं भविष्य एका चांगल्या कामासाठी देत आहेस.... या निर्णयानेच तू तुझं भविष्य घडवलं.... कीप इट अप..... खूप मोठी हो...."

सचिन : "खरंच...... प्रशासनात येऊन सामाजिक कार्य करू ही इच्छा मनात असते..... पण, जर सदिच्छा मनात असली तर प्रशासनात न येता ही आपण काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण तू सर्वांपुढे ठेवलं आहेस प्रिन्सेस..... कली मला खूप अभिमान आहे तुझ्या लिट्ल प्रिन्सेस सुकू वर....."

कलिका : "मला नेहमी पासूनच होता....."

उर्वी : "खूप - खूप शिकायला मिळालं मला सुकन्याकडून.... "

सल्लू : "सलमा तू तो बेस्ट हैं.... मैं क्या ही बोलू अब....."

सुकन्या : "बापरे...... मला भूक लागणार ना आज.... इतकी स्तुती..... पार्टी आहे चला.... नाही तर इथेच उशीर व्हायचा...."

सगळे स्टेज खाली उतरतात.....

संचालक : "मंडळी आज रात्री आपल्या प्रकल्पाच्या यशाचा मोठा उत्सव बाबांच्या बंगल्यावर पार पाडण्यात येतोय.... तरी, सर्वांना आम्ही मनापासून तिकडे आमंत्रित करत आहोत..... नक्की, आपण सर्व आपली उपस्थिती त्या उत्सवात नोंदवून, त्याला वेगळीच चमक देणार या आत्मविश्वासाने आजचा नामकरण सोहळा इथेच संपल्याचे मी जाहीर करतो..... जय हिंद.... जय महाराष्ट्र...."

सगळे आता पार्टी साठी बंगल्यावर येऊन पोहोचतात.... सुकन्या सोबत बोलायला शौर्यची धडपड सुरू असते.... ती घरी पोहचताच आपल्या रूम मध्ये पार्टी साठी रेडी व्हायला निघून जाते.....

तीन तासांनी सगळे पार्टी हॉल मध्ये जमतात..... फक्त सुकन्या आलेली नसते...... शौर्य काळजीत असतो..... तिला बघायला त्याची नजर आतूर असते..... आता पर्यंत किती तरी वेळा त्याचं सुकन्या बद्दल विचारून झालेलं असतं....

दहा मिनिटांनी.......

सगळीकडे अंधार पडतो आणि फक्त शौर्य वर एक फोकस..... तो घाबरतो आता हे काय नवीन..... स्टेअर केसवर एक फोकस पडतो आणि त्यात सुकन्या हातात माईक घेऊन खाली उतरताना दिसते..... तिला बघून शौर्य हरवून जातो..... एकदम डॉल....





तो गोंधळात असतोच पण, आता तिच्यात पुर्ण हरवतो...... त्याला काही कळायच्या आत ती माईक घेत बोलायला सुरुवात करते......

सुकन्या : "डियर शौर्य..... हे फक्त तुझ्यासाठी......


इंडिया सोडून जाण्याची इतकी का रे केलीस घाई
कधी तरी विचारलं का मी तुझी होणार की नाही
झाले नसते तुझे तर, जगू शकला नसतास
तुझ्या जाण्याने मी जगले नसते मग, तू परत आला असतास?
निघून जाणं असतं सोपं म्हणून, तू ते निवडलं
पण, तुझं निघून जाणं मला कधीच नसतं आवडलं
प्लीज शौर्य नको ना जाऊस
इतका भाव नको ना खाऊस
आपल्या दोघांच्या प्रेम नसलेल्या खाली कपांना
आपणच मिळून भरू
चल ना आजच करू ही जर्नी सुरू
लव्ह इज नॉट ओन्ली माय कप ऑफ टी
तू आणि मी भरूया सोबत त्याला फिप्टी - फिप्टी

प्लीज शौर्य...... थांबशिल ना....."


तिला असं रडताना ते ही एखाद्या मुलासाठी हे बघून सगळ्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही..... पण, ते खुश असतात...... की, ती आता कोणाच्या तरी प्रेमात एक्स्प्रेस होणं शिकली आहे......

अँड फायनली प्रेमाचा चहा तिच्या खाली असलेल्या कपात शौर्यने ओतला....

शौर्य : "सुकन्या...... आय लव्ह यू...... विल यू बी माइन....."

सुकन्या : "येस...... पक्का नाही जाणार ना आता"

शौर्य : "कधीच नाही तू हाकलून दिलं तरी नाही..... मला भीती होती तू मला एक्सेप्ट करणार की नाही अँड म्हणून मी निघून जाणार होतो..... बट, सी.... "

सुकन्याला तो मिठीत घेतो........

सगळे : "वो...... वुई ऑल आर सो हॅप्पी...... फायनली...... लव्ह इज नॉट जस्ट कप ऑफ टी बट, जार ऑफ प्यूअर् वॉटर टू.... हुरै......"

सल्लू : "वेट..... वेट..... वेट...... वन मोअर सरप्राइज....."

आजी : "सांग पटकन......"

सल्लू : "आम्मिजी...... तू नानी बनने वाली हैं.... बोहत जल्द....."

आजी : "खरंच....."

सल्लू : "हां....."

सगळे : "वो....."

समाप्त....


💝 खुशी ढोके 💝



महत्त्वपूर्ण माहिती


सदर कथामालिकेत मी अनाथ मुलांना वयोमर्यादा ओलांडून बाहेर पडल्यानंतर ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्या मांडण्याचा प्रयत्न केलाय. त्या समस्या आपण मनात आणलं तर, त्यांना योग्य ती मदत पुरवून कमी देखील करू शकतो. केवळ ती सदिच्छा मनी असावी लागते.

गेल्या महिन्याभऱ्या पूर्वीच, आदरणीय महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला. ज्यात असं ठरवण्यात आलं की, आता अनाथांना वय वर्षे अठरा ऐवजी तेवीस पर्यंत आश्रमात आश्रय दिला जाईल.

अगदी कौतुकास्पद असा हा निर्णय म्हणावा लागेल. कारण, वय वर्षे अठरा मध्ये साधं पदवी शिक्षण सुद्धा पूर्ण झालेलं नसतं आणि बाहेर पडून त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं.

तेवीस वर्षा नंतर सुद्धा पाहिजे तितकं यश मिळत नाही आणि नैराश्याच्या गर्तेतून तरुण पिढी जात असते. यावर ही विचार व्हावा ही मनात इच्छा आहेच!

मी माझ्या कथेतून आपण त्यांच्या पुढच्या भविष्य घडणीत काय योगदान देऊ शकतो ते सांगितलं आहे. जेणेकरून, त्यांना योग्य ते मार्गदर्शन लाभेल आणि ते स्वतःचं भविष्य घडवू शकतील.

वर उल्लेखित बातमीची यूट्यूब लिंक आणि संपुर्ण बातमी मी इथे सामायिक करते आहे. संदर्भ म्हणून आपण ती पाहू आणि वाचू देखील शकता.



लिंक ओपन होत नसल्यास, आपण ए बी पी माझाच्या यूट्यूब चॅनल वर भेट देऊन, खाली दिसत असलेल्या थंब नेल इमेज वर क्लिक करुन तो व्हिडिओ बघू शकता.






अनाथ मुलांना आता 18 ऐवजी 23 वर्षे पूर्ण होईपर्यंत अनाथ आश्रमात राहता येणार, मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा

एबीपी माझा वेब टीम

Last Updated: 30 Apr 2021 11:05 PM (IST)


मुंबई : राज्यभरातील 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनाथाश्रमातून बाहेर पडणाऱ्या मुलांची व्यथा 'एबीपी माझा'ने दाखवल्यानंतर आता राज्यभरातून मदतीचा ओघ या मुलांसाठी सुरू झाला आहे. एबीपी माझाच्या बातमीची दखल घेऊन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील अनुरक्षण गृहांमध्ये पात्र मुलांना अनुरक्षण सेवा पुरविण्यासाठी वयाची अट दोन वर्षांनी शिथिल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या बालकांना अनुरक्षण गृहांमध्ये अधिकची दोन वर्षे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, प्रशिक्षण आदी सुविधा मिळणार आहेत.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 मधील तरतुदींनुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ, निराधार, संकटग्रस्त व अत्याचारित बालकांना पोलीस, स्वयंसेवी संस्था, पालक यांच्याकडून बाल कल्याण समितीमार्फत बालगृहात प्रवेश दिला जातो. या योजनेंतर्गत शून्य ते 18 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य सुविधा, शिक्षण, प्रशिक्षण आदी सुविधा पुरवल्या जातात. तसेच पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जातात. तर बालगृहातून बाहेर पडूनही ज्या अनाथ, निराधार मुलांना संस्थात्मक काळजीची आवश्यकता आहे अशा मुलांसाठी अनुरक्षणगृह योजना 18 ते 21 वर्षे वयोगटातील बालकांसाठी राबविण्यात येते. त्याअंतर्गत बालगृहातील मुदत संपण्यास एक वर्षाचा कालावधी असलेल्या निराधार निराश्रित बालकास अन्न, वस्त्र, निवारा आदी मूलभूत सोयीसुविधांसह त्याच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने शालेय व व्यावसायिक प्रशिक्षण या अनुरक्षण सुविधा दिल्या जातात. अपवादात्मक परिस्थितीमध्ये हा कालावधी दोन वर्षांनी वाढवण्याची तरतूद आहे.

तथापि, बालकांच्या काळजीसाठी कार्यरत संस्थांमधून बाहेर पडल्यानंतर शासनाच्या व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रोजगार मिळवून समाजात स्वःताच्या पायावर उभ्या राहिलेल्या बऱ्याचश्या मुलांचे रोजगार कोरोना आपत्ती काळात हीरावले गेले असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली होती. ज्यांचे पालकत्व अगदीच अल्प वयात शासनाने स्वीकारून त्यांना सक्षम बनवले होते, त्या मुलांना मात्र या आपत्तीने परत रस्त्यावर येण्याची वेळ आणली. सदर बाब ओळखून अशा मुलांना आधार देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने अशा बालकांना आपल्या अनुरक्षण गृहात दाखल करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच त्यांचे पालकत्व पुन्हा शासनाने घेतले आहे. यामुळे खऱ्या अर्थाने अनाथाना न्याय मिळणार आहे.

"कोरोनाचे संकट लक्षात घेऊन अनुरक्षण गृहांमधून 21 वर्षे पूर्ण झाल्यावर बाहेर पडावे लागणारी मुले आणि वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली बालकांच्या काळजीसाठी कार्यरत संस्थांमधून बाहेर पडलेली मुले; ज्यांनी अनुरक्षण सेवेचा लाभ घेतलेला असो अथवा नसो अशा सर्व मुलांना अनुरक्षण गृहातील अनुरक्षण सेवा देण्यासाठीची वयाची अट दोन वर्षांनी शिथिल करून अशा मुलांना वयाच्या 23 वर्ष पूर्ण होईपर्यंत अनुरक्षण सेवेचा लाभ उपलब्ध करण्यास मान्यता देण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. राज्य शासन बालकांच्या संरक्षणाची व जीविताची काळजी घेण्यास कटिबद्ध आहे. निरीक्षणगृहे, बालगृहे, अनुरक्षण गृहातील बालकांनी मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करत चिंतामुक्त होऊन अभ्यास, प्रशिक्षणावर भर देऊन स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे" अशी प्रतिक्रिया मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.