* धूम मेट *
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती...
तिथे मिळवा प्रेम जिव्हाळा... नकोत नुसती नाती...
आज सेंड ऑफ पार्टी ला ही कविता संचलन करताना अनुज ने म्हणली... अगदी भरून आल...
गेल्या सहा महिन्यांत एकदाही घरी गेली नव्हती... घरची ओढ लागली होती... हे रोशनी च मेडिकल च शेवटचं वर्ष होत... आणि आज शेवटच्या वर्षाचा शेवटचा दिवस...
त्यांच्या ज्युनिअर ने सगळ्यांनी मिळून फायनल इअर च्या मुलांना सेंड ऑफ पार्टी दिली होती... त्यांनतर तिच्या फ्रेंड्स ना सोडून ती घरी जाणार होती... अधून मधून दोन्ही काका तिला भेटायला यायचे... पण यवतमाळ ते पुणे खूप मोठा पल्ला होता... त्यामुळे सेमीस्टर चालू असताना येऊन जाणं खूप अवघड... आणि मुलगी... त्यातल्या त्यात लाडकी... त्यामुळं एकटीने प्रवास इतका लांब केलाच नाही...
" अनघा... कधी निघते तू... " स्मिता.
"उद्या सकाळी... दहा वाजता... स्टेशन हून अकरा वाजेच्य भुसावळ ने जाणार..." अनघा.
" म्हणजे नेहमीप्रमाणे रात्री नऊ वाजता पोहोचणार..." स्मिता.
" तू का इतकी सायलेंट... रोशू... कुठंय लक्ष तुझ..." अनघा.
" हा... मी पण निघणार उदयाला..." रोशनी.
" कोण कस आल नाही अजून घ्यायला तुला..." स्मिता.
" अरे... यावेळी तिने सक्त ताकीद दिली आजोबांना... की मी आता मोठी झालीय.. आणि मला घ्यायला कुणीही यायचं नाही..." अनघा.
" म्हणजे आता हे कुकुल बाळ एकट जाणार... ते ही इतकं दूर..." स्मिता
आणि दोघीही तिला चिडवून हसू लागल्या...
" हो..." आणि तीही त्यांच्या सोबत हसू लागली...
तिघी ही मेडिकल च्या पहिल्या वर्षापासून तिघीही सोबत...हॉस्टेल मध्ये रूम एकच...आणि सगळी कडे सोबत... तिघीही घरी जाणार म्हणून खूप खुश होत्या... पण एक मेकिंपासून दूर जाणार म्हणून थोड नाराज होत्या...
तस... अनघा आणि स्मिता जवळपासच्या.. अनघा भुसावळ ची... तर स्मिता मनमाड ची... पण मेडिकल प्रक्तिस सोबत करू यासाठी प्रयत्न मात्र चालू होता... स्मिता काही दिवस पुण्यात मावशीकडे थांबून मग घरी जाणार होती...
रोशनी दुपारी साडेबाराच्या ट्रेन ने निघणार होती... म्हणून आधीच अनघा सोबतच पॅकिंग करून निघाली... स्मिता त्यांना सोडवायला स्टेशन ला गेली...
अनघा ला ट्रेन मध्ये बसली... ती गेली.. आता रोशनी आणि स्मिता दोघीच होत्या... रोशनी पहिल्यांदा च ट्रेन ने एकटी जात होती... थोडी धाकधूक होती... पण ती दिसायला नाजूक असली तरी खंबीर होती... मनमिळावू... पण जरा हळवी...
" तू बॅग्स व्यवस्थित ठेउन देते मी... ट्रेन आली की.. हे बघ पॅनिक होऊ नको... सतरा तास लागतात यवतमाळ जायला... तू काळजी घे.. वेळेत खा...अलर्ट रहा..." स्मिता च्या एक ना अनेक सूचनांचा भडिमार तिच्यावर सुरू होता...
आणि ती ही मन लाऊन तीच ऐकत होती...
ट्रेन आली... आणि तिला स्मिता ने तिच्या समानासह व्यवस्थित सेटेल करून दिलं... तस दिगु काकाने फर्स्ट क्लास च रिझर्व्हेशन केलेलं तीच... त्यामुळे जास्त त्रास नव्हता ... गर्दी ... पळापळ... याचा...
" रो शू... कधी भेटणार आता...?" स्मिता.
आणि कडकडून मिठी मारत विचारल...
दोघींचे डोळे भरून आले...
" पो...."
" चल... मी उतरते... बाय काळजी घे... पोहोचली की कळव... कॉन्टॅक्ट मध्ये रहा..." स्मिता.
रोशनी तशी मितभाषी... पण जीव लावणारे सगळेच होते...
आणि तिची सफर सुरू झाली...
थ्रीलिंग होत पण जबाबदारीच पण होत...
ट्रेन जरा पुढे हलली... आणि ती तीच समान नीट लाऊन मोबाईल हातात घेऊन बसली...
तितक्यात समोर एक यंग... ड्याशिंग ...
डायनॅमिक पर्स नालिटी असलेला मुलगा आला त्याची बॅग लॉबी वर ठेवली त्यावर एक डायरी आदळली... येऊन रोशनीच्या समोर बसला...
आणि जोर जोरात फोनवर बोलत होता...
" यू इडियट... हॅव यू आऊट ऑफ युर् माईंड ... आता इतका वेळ मी एकटा कसा जाणार... फ्लयिट च बुकिंग का नाही केलं... आय हॅव टू रिच देर एरलियर... जस्ट शट युवर माऊथ... डोन्ट से सॉरी... आय हेत सॉरीज... " आणि तनफण करत कॉल कट केला... आणि डोळे मिटून बसला... त्याच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब स्पष्ट दिसत होते...
बरोबर रोशु च्या समोर बसलेला... ती जरा घाबरली... तिने समोरच्या कोचवर बसलेल्या काकूंकडे बघितलं... त्या एकदम शांत पेपर वाचत बसल्या होत्या... आजूबाजूचे लोक ही शांत डोळे मिटून घेतले होते...
मग तिने पुन्हा तीच लक्ष तिच्या मोबाईल मध्ये घातलं... प्रतीलीपी उघडून तीच आपलं काहीतरी वाचन चालू होत... पण न राहून तीच लक्ष त्याच्याकडे जात होत... तो डोळे मिटून शांत बसला तिला अगदी भाबडा भासला... अचानकच तिच्या सिक्स्थ सेन्स तिला सांगू लागला... तो जसा दिसतोय तसा नाहीये... त्याच्या चेहऱ्यावर उमटलेली एक एक रेष त्याचा स्वभाव उकलून काढत होती...
तितक्यात त्याचे डोळे उघडले... आणि तिचे आणि त्याचे डोळे एकमेकांत भिडले... आणि काही क्षण तो तिच्या डोळ्यांत हरवून गेला...तितक्यात तळेगाव स्टेशन वर ट्रेन थांबली आणि स्टेशन वर होणाऱ्या अनौन्स में ट ने तो भानावर आला... आणि थोडा सरळ होऊन बसला... तीही बावरली... आणि बाहेर बघू लागली...
आणि पुन्हा ट्रेन निघाली...
अशीच मधून मधून आख मीचोली चालू होती पण दोघे ही एक शब्द ही उच्चारला नाही... चोरटी नजर मात्र खूप काही सांगून जात होती...
पुन्हा त्याचा फोन वाजला... त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा आठ्या पडल्या... पण जरा शांतपणे बोलू लागला...
" हा आई...
हो आई...
अग पण ...
मी ...
तू...
तुला...
मला बोलू देशील... लिसन आई... मी नाही म्हणत नाही जायला... मला आवडेल त्यांना भेटायला... पण ते तुझ्याशी बोलत नाहीत... तुझ्याकडे ढुंकून ही पाहिलं नाही आयुष्यभर... आणि तू मात्र... हा... पण...
ती वेळ लवकरच येईल की ते स्वतः हुन तुला बोलवतील...
लव्ह यू आई... आता कॉल नको करू... आवाज ब्रेक होतो...
गॉड से आई... पंधरा तास... यू कान्ट इमॅजिन... किती लॉस आहे हा...
तिथे गेल्यावर आणखी किती दिवस लागेल माहीत नाही...
तू तरी हवी होती सोबत...
थॅन्क्स आऊ... बाय...
मी झोपतो आता..."
त्याने मोबाईल बंद केला...
पुन्हा एकदा रोशनी कडे बघून बाहेर बघू लागला...
तिने त्याच संभाषण ऐकलं तेव्हा कुठे तिला समाधान वाटले की हा चांगलं सुद्धा बोलू शकतो... तो डोळे मिटून शांत बसून होता...
पुन्हा एकदा त्याचा फोन वाजला...
हॅलो ....
खूप हायपर झाला...
" यू इडियट...गेट फास्टर अँड hospitalize him... immediate... didn't I told you at morning... it will be happened like this... why do you not using your brain...lazy ass.... it's wastage of time... money...& manpower too...who will be going to take care of him.... who will going to pay for him.... how could you get the courage to inform me... just go to ____...
धाडकन कॉल कट केला आणि फोन बाजूला सीटवर फेकून दिला... आणि दोन्ही हातांनी केस मागे करून टेंशन मधे उभा राहिला... आणि परत मोबाईल हातात घेऊन
" हा... आई इमिदियटली लेले हॉस्पिटल मध्ये जा.... हेमंत चा अॅसिडेंत झालाय... तू निघ आधी... तिथे गेलं की कळेल तुला... त्याच जवळ कुणीच नाहीय... त्याच्या आईला सांगू नकोस... बिचारी आधीच आजारी आहे... ऐकल तर अजून घबरेल... बाय...
आणि दरवाजाकडे जाऊ लागला ... तोच त्याला चक्कर येऊन खाली पडू लागला... त्याने बाजूच्या रॉड ला पकडलं... पण पकड ढीली होत होती... आणि तो जवळजवळ पडणारच तोच रोशनी ने आणि समोरच्या सीट वर बसलेल्या काकू ही तिला मदतीला आल्या...
तस फर्स्ट क्लास च्या डब्यात बसणारे इकडे तिकडे जास्त लक्ष देत नाहीत... पण एक वयस्कर गृहस्थ आणि त्यांच्या सोबत एक तरुण मुलगा... कदाचित त्यांचा मुलगा असावा.... ते दोघे ही आले... त्या मुलाने आणि रोशनी ने त्याला सीट वर बसवलं.... तो अल्मॉस्त अर्धा बेशुद्ध अवस्थेत होता... ती आधीच हळवी... त्यात ह्याला अशा अवस्थेत बघून अजूनच हळवी झाली... त्याला सीट वर आडव झोपवलं... बाजूच्या कंपार्टमेंट मधून त्याने एक उशी आणली... आणि त्याच्या डोक्याखाली ठेवली... तिने पटकन किट काढल... त्याला चेक केल... एक कॅपसुल फोडून चमचा मध्ये थोडस पाणी घेऊन ते त्याला पाजल... अगदी सराईत डॉक्टर प्रमाणे सगळं केलं...
" डॉक्टर आहेस का बेटा तू..." ते गृहस्थ.
" हो काका... आता ह्यावर्षी शेवटच्या वर्षाची एक्झाम दिली.... "
" झालीसच की डॉक्टर... रिझल्ट लागला की..." काका.
अशाच बराच वेळ त्यांच्या गप्पा चालू होत्या... चांगली ओळख झाली...
जरा वेळाने तो थोडा शुद्धीत आला... जरा अस्पष्ट च दिसत होत त्याला.. त्यासोबत तिच्याकडे डेरी मिल्क काढली... आणि त्याचा एक तुकडा त्याच्या तोंड उघडून त्यात टाकला...
जरा वेळाने तो शुद्धीत आला... आणि उठून बसू लागला... तिने लगेच त्याच्या खांद्या ना पकडुन डोकं उशीवर ठरवलं...
" अहो.. उठू नका सर... स्ट्रेस मुळे.... तुमची शुगर लो झाल्याने विकनेस आहे थोडा.... प्रवासात दगदग होते.... काळजीच काही कारण नाही... थोडा आराम केल की बर वाटेल... थोडा वेळाने इलेक्ट्रल वॉटर ह्या बॉटल मध्ये बनवून ठेवलंय उठल्या नंतर घ्या तुम्ही... यू विल बी फिलिंग फ्रेश... " तो तिचा आवाज ऐकू न मोहित झाला होता... एकटक भरावल्यागत तिच्याकडे च पाहत होता... तिला ते कळलं आणि ती नजर चोरून शांत बसली.. आणि बाहेर बघू लागली...
ती तिच्या पेशंट सोबत बोलते तसच बोलत होती... पण त्याला ते सगळं स्लो मोशन मध्ये होतंय अस वाटत होत...तिचे केस उडत होते...
" तिचा अचानक झालेला स्पर्श त्याला हवाहवासा वाटत होता...
" कसं वाटतंय बाळा आता...?"
" बरा आहे काका... थँक यु..." तो.
" थँक यू मला नाही ह्या मुलीला बोल... योग्य उपचार केलेत आणि लवकर शुद्धीवर आलास तू त्यामुळे..."
" हो... थॅन्क्स ..."
नाव विचारण्याच्या उद्देशाने सुर लावला...
" डॉक्टर आहे ती... तुझ नाव काय बेटा..."
" मी सूरज देसाई... ते अचानक जावं लागतंय गावी... त्यामुळे काहीच तयारी न करता आलोय... बॅग आणि स्टफ्फ उद्या सायंकाळी पोहचेल गावी..."
" बर... काळजी घे बाळा.... झोप जरावेळ.... "
" हो काका... थँक यू..." गोड अशी स्मयील दिली त्याने...
त्यांच्या मुलाने पण त्याला स्मायिल दिली आणि टेक केअर म्हणून त्याच्या बाबांसोबत गेला... पण जाताना वळून रोशनी कडे बघतच गेला...
आता सूरजला तिच्या सोबत बोलण्याचा बहानाच मिळाला होता...
" थॅन्क्स डॉक्टर...."
" रोशनी... डॉक्टर रोशनी..."
" इट्स ओके... इट्स माय ड्युटी..."
" अस आजकाल कोण समजत... बरेच डॉक्टर फक्त पैशाच्या पाठीमागे धावत असतात..."
" मला ते तंत्र अवगत नाही... तुम्ही थोड इलेक्ट्रल घ्या... आणि आराम करा... "
" तीच उत्तर. ऐकुन हसू आल... मनात म्हणाला..." सुंदर ... हुशार तर आहेच.... हजरजबाबी पण आहे... वाव..."
तो उठू लागला...
तिने त्याला उठायला मदत केली... क्षणा क्षणाला तो तिच्या प्रेमात पडत होता...
तिने ती बॉटल त्याला दिली...
" अजून थोड चोकोलेट मिळेल... I carry everything but... आज... जाऊ द्या... मला ते सगळ परत आठवयच नाहीये..." सूरज.
" हो... हे घ्या... ओठांवर पण गोडवा येतो ह्याने... " ती कडबरी पुढे करत म्हणाली...
तो खळखळून हसू लागला...
" टोमणे छान देता तुम्ही..."
" अहो.. नाही सर... टोमणा नाही काही... पण डोक्यावर बर्फ... जिभेवर साखर असली की आपल आणि समोरच्याच ... दोघांचं ही आरोग्य व्यवस्थित असतं..."
" हमम... प्रयत्न करेन जमवण्याचा..." तो चोकोलेट खात म्हणाला...
" तुम्हाला बहुतेक ... खूप आधीपासून लो शुगर आहे...?" रोशनी.
" हो... लहान असताना पासून... पण डॉक्टर जास्त गोड पण खाऊ देत नाहीत...पण मला आवडत.. ह्या साठी सुद्धा थंक यू..." हातातलं संपलेले चॉकलेट च रापर दाखवत म्हणाला...
" यूर वेलकम सर... " रोशनी.
" डोन्ट बी सो मच फॉर्मल... जस्ट से सूरज..." सूरज.
" ओके सर... सॉरी सूरज..." रोशनी.
तिने मोबाईल हातात घेऊन त्यात बघू लागली... अर्थात प्रतिलीपी अॅपं वर वाचतच होती....
तो मनातच बोलू लागला... सूरज की रोशनी... आणि हलकेच हसला... आणि तिच्यासोबत बोलायला बहाणा शोधू लागला...
क्रमशः