निळ्याभोर आकाशाखाली अथांग पसरलेला समुद्र त्यात येणारा लाटांचा आवाज , तो मंद वारा, पक्षांचा किलबिलाट, त्यात येणाऱ्या वाळूचा एक एक थर चढणारे सगळ कस मोहून टाकणारे होत ,पण त्यात एक भयाण शांतता ती कधी पण जीव घेणी असू शकते अशी, आणि त्यातच किनार्यावर एक मुलगी झोपलेल्या स्थितीत असते, हळू हळू ती स्वतचे डोळे उघडते, तेव्हा तीच डोक खूप जड झालेले असत , स्वताला सावरत ती उठ्ते आणि बघते तेव्हा ती एका अज्ञात ठिकाणी आहे अस तिला जाणवत , ती सावकाश उठते ,मनात धडधडत असते तेव्हा समोर बघते तर तिला अस वाटत हां तिच्या समोरचा समुद्र आता तिला गिळून टाकेल , तिला खूप अस्वथ वाटत हि भयाण शांताता तिला नकोशी वाटते, ति बघते तर तिच्या शेजारी एक शंख पडलेला असतो आणि तो ती शंख वाजवते पण तिला प्रतिसाद मिळत नाही मग, ती उठते , इकडे तिकडे बघते काय झालाय आपल्याला बघते , तिला आपण कुठे आलोय आणि का आलोय कळत नसत मग तिला आठवत अरे आपल अतिस्त्व पण तिला आठवत नसत काय कराव सुचत नाही, तिला पळून इतका दम लागतो कि, ती धापा टाकत असते , तेवढ्यात एक मुलगी तिच्या समोर येते , तिला बघून विचारते ,” तू कोण आहेस आणि काय करतेस..??” त्या दोघी एकमेकांसमोर येतात त्यांना त्यांची ओळख कळत नसते , कारण ती दुसरी मुलगीची अवस्था पहिल्या मुलीसारखी झालेली असते तिला हि तिची ओळख माहिती नसते, तिला काय कराव काही सुचत नाही , म्हणून दुसरी मुलगी तिच्या वर चाकू धरून असते , त्या मुलीला चाकू धरता येत नाही हे बघता पहिली मुलगी तो चाकू निट सावरायचा पर्यंत करते आणि बोलते,” मला हि नाही माहिती मी इथे कशी आले , आणि मला हि माझ नाव नाही आठवत आहे मी पण तुझ्या सारखी गोंधळलेली आहे ”(एका दमात ती हे सगळ बोलून टाकते) आणि तिच्या कडून चाकू घेते आणि निट आपल्याकडे ठेवते , तेव्हा बघतात तर थोड्या वेळाने तिथे कोणाचा तरी आवाज येतो आणि बघतात तर आपल्यासारखी आठ माणस स्वतची ओळख विसरून किनाराच्या वाळूवर झोपून उठलेले असतात, त्याचं पण डोक जड झालेलं असत, सगळे एकमेकांकडे बघतात आणि एका सावालीपाशी येऊन बसतात , १० जण एक ग्रुप करून बसतात आणि चर्चा करतात कि आपण कोण आहोत आणि आपण कुठून आलोत , पण कोणाला काही माहिती नसत सगळे शून्यात बघत असतात आणि म्हणूनच ते ह्यावर विचार करायला सुरुवात करतात, सगळे हां विचार करतात कि आपले तर कपडे एक सारखे आहेत मग आपण एका कंपनीत तर कामाला नाही ना, किंवा आपण सगळे पार्टीला आलेलो आणि इथेच कुठे तरी आपली बोट बुडाली असेल , असे खूप तर्क वितर्क लावतात. तेव्हा एक मुलगी दुसर्या मुलीच्या कॉलरवर बघते तर काहीतरी लिहिलेलं असत आणि त्यावर त्या व्यक्तीच नाव लिहलेल असत आणि मग सगळे जण आपापल नाव बघायला सुरुवात करतात काही जण तर स्वताच्या सहायाने आपला शर्ट काढून बघायला सुरुवात करतात त्यात सगळ्यांनी नाव एकमेनांना कळतात.
सारा , अमिता , प्रेमेय , प्रवीण , अस्मिता , ओंकार , राहुल , अर्चना , अरविंद , अक्षया हे सगळ जण भिन्न विचारसरणीची , विचारांची , बोलण्याची वेगळी ढंग , एकत्र आलेली असतात ते एका अज्ञात ठिकाणी कि स्वतची ओळख विसरलेली असतात आणि आपण कोण होतो , ह्या सगळ्या गोंधळात आपण आता एकमेकांना समजून घ्यायचं आणि विचार निट मांडण्याचा प्रयत्न करायचा हेच सगळ्यांच्या मनात चालू असत,
तेवढ्यात सारा बोलते,’ आता आपली एकमेनाच्या नावाने ओळख झाली असेल तर मग आपण आता आपल्यासाठी काहि तरी खायला आणायला हव , नाही तर आपण उपाशीच मरु , मग माझ्यासोबत कोण येतंय ..??” तिच्या ह्या प्रश्नावर कोणी पाहिलं तयार होत नाही. कारण पण तसच असत पटकन कोणी कोणावर विश्वास ठेवेल अस पण नात नसत आणि म्हणूनच कोणी पण पटकन तयार होत नाही सगळे जण तिच्याकडे बघतात तेव्हा प्रवीण, आणि राहुल दोघे तयार होतात आणि तिच्या सोबत निघतात , जास्त विचार करता ते तीघ जातात खूप अंतर चालून झाल्यावर राहुल ला जाणवत कि हे दोघ एकमेकांशी बोलत आहेत आणि ह्यात आपला काय संबध नाही , म्हणून तो त्यांना ‘”Bye” करून पुन्हा आहे त्या जागी येतो का तर त्याला त्याचं वागण विचित्र वाटत.
तो जेव्हा येतो तेव्हा त्याला विचारतात कि ते दोघे कुठे गेले तर तो बोलतो,” आता तर त्यांची प्रेंमाची कळी फुलेली असेल “ तीरसठ नजरेने उत्तर देतो आणि दुसर्या कामाला लागतो, तीकडे प्रवीण आणि सारा एका घनदाट जंगलात जातात , त्यांच्यात खूप बोलन होत, ते एकामेकांना जास्त ओळखायला लागले असतात , म्हणतात ना कि , “माणसाशी बोलाल कि कळत कि तो कसा आहे “ ते दोघ चालत चालत एका घनदाट जंगलात जातात तेव्हा ते समोर दुष्य बघून खूप भारी वाटत त्यांना कारण तिथे मस्त निळाशार धबधबा असतो , पिण्यासाठी लायक अस पाणी असत आणि राहण्यासाठी चांगल ठिकाण असत. सारा आणि प्रवीण दोघ एकमेनाकडे बघून हसतात आणि त्यांना बर वाटत ते दोघ एकमेनाच्या जवळ येतात आणि आपण इथे भविष्यात एक सुंदर घर बांधू अस वचन देतात. प्रवीण तिच्या हातात हात घालतो , इथे आपल्या जवळ कोणी तरी समजून घेणार आहे अस साराला वाटत आणि म्हणून ती सुध्धा त्याच्या जवळ जाते , ते दोघ एकामेनाकडे बघतात आणि सारा डोळे मिटून प्रवीण तिला कीस करतो, धबधबाचा आवाज , पक्षांचा आवाज , हळूच सूर्य झाडांसोबत खेळत असणारा लपंडाव , गार हवा ह्यामुळे सारा आणि प्रवीण इतके मग्न होतात कि ,” त्यांना कळत नाही आपण ह्या जवळ येऊन किती वेळ झाला ते दोघ एकमेकंच्या मिठीत असतात , सारा भानावर येते तेव्हा ती मिठी सोडायचं प्रयत्न करते पण प्रवीणने तिला खूप घट्ट पकडलेल असत. ती त्याला प्रेमाने सांगते,” प्रवीण सोड आता खूप वेळ झालाय आता आपल्यलाला लवकर जायला हवे “ तो तरी पण सोडायचं बघत नाही मग तिला काही तरी वेगळ जाणवत आणि ती त्यातून जोरात बाहेर पडायला बघते, त्यला धक्का देते आणि अचानक ती खाली पडते आणि तो तिच्या अंगावर जातो तिला पकडतो आणि म्हणतो ,” थांब ना जानेमन का अशी अर्थवट जातेस तू थांब तिला समजत ह्याला जे हवाय तो आपल्याकडून जबरदस्तीने मागतोय म्हणून ती त्याच्या तावडीतून सोडायचा प्रयत्न करते ,तीची आणि त्याची झटापट होते तेव्हा ती स्वतला सावरून त्याच्या कानाखाली वाजवते आणि बोलते ,” माझ्या पुन्हा मागे यायचं नाही “ तिला इतका राग आलेला असतो कि त्याचा विचार न करता एकटी उरलेली खाण शोधायला निघून जाते आणि पाठी मागे वळून सुध्ध्दा बघत नाही, तो पण तिच्या रागाच्या भरत आल्या पावली परत जातो.
एकीकडे सगळे जण लाकडांची जमवा जमाव करत असतात, आणि राहायची सोय करत असतात , तर अर्चना तिचे कपडे काढून...................................