Janu - 26 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | जानू - 26

Featured Books
  • इंटरनेट वाला लव - 88

    आह में कहा हु. और टाई क्या हो रहा है. हितेश सर आप क्या बोल र...

  • सपनों की राख

    सपनों की राख एक ऐसी मार्मिक कहानी है, जो अंजलि की टूटे सपनों...

  • बदलाव

    ज़िन्दगी एक अनन्य हस्ती है, कभी लोगों के लिए खुशियों का सृजन...

  • तेरी मेरी यारी - 8

             (8)अगले दिन कबीर इंस्पेक्टर आकाश से मिलने पुलिस स्ट...

  • Mayor साब का प्लान

    "इस शहर मे कुत्तों को कौन सी सहूलियत चाहिए कौन सी नही, इस पर...

Categories
Share

जानू - 26

समिधा समीर ला फोन लावते पणं तो काम आहे नंतर बोलतो म्हणून फोन ठेवून देतो... इकडे जानू समिधा ला फोन करून समीर काय बोलला विचारते पणं त्याला काम होत म्हणून तो बोलला नाही म्हणून समिधा तिला सांगते ..जानू पुन्हा उदास होते..समिधा जानू ला मी पुन्हा त्याला फोन करून तुला सांगेन तू टेन्शन घेऊ नकोस म्हणून समजावते..समिधा पुन्हा संध्याकाळी समीर ला फोन करते.

समिधा : हाय ,समीर मी समिधा जानू ची मैत्रीण,मी दुपारी फोन केला होता.

समीर : हो ,माहित आहे मला..बोल नंबर कोणी दिला ?

समिधा : जानू नी ..

समीर : बर बोल काय काम होत ?

समिधा : काय झालं तू जानू सोबत बोलत नाहीस ? अरे खूप प्रेम करते ती तुझ्यावर plz तिला थोड समजून घे.

समीर : हे बघ समिधा ..मी कधीच तिच्या वर प्रेम केलं नाही..मी फक्त तिला फ्रेन्ड मानतो..पणं आता ते ही नाही..खूप सायको आहे ति मुलगी ..मी कधी बोलली ही नाही मी तिच्यावर प्रेम असतो अस पणं ती खूप वेड्या सारख नुसता प्रेम प्रेम करते..मला नाही पटत हे सर्व..ती ऐकुन ही घेत नाही..स्वतःच करीयर वर लक्ष द्यायचं सोडून प्रेमाच्या मागे लागली आहे...आणि उगाच मला त्रास देत आहे ..माझं प्रेम नाही तिच्या वर.

समिधा विचार करते काय नालायक माणूस आहे ..सरळ खोटं बोलतो ..साध याला तिच्या भावनांची कदर ही नाही आणि ती मूर्ख मुलगी याला सर्वस्व मानून बसलीय .. यार समोर असता ना चार वाजवल्या असत्या याच्या कानाच्या खाली ..परत कोणत्या मुलीच्या भावनांशी तर खेळला नसता.

समीर : हॅलो ऐकती आहेस ना ?

समिधा : हो बरोबर आहे तुझं पणं निदान थोडा वेळ तरी दे तिला सावरायला ..अस अचानक बोलणं बंद केलंस तर ती तुटून जाईल ..plz

समीर : मी बोललो तरी काय फायदा ? ती पुन्हा प्रेमाचं रडगाण सुरू करेल आणि मला नकोय ते..

समिधा : नाही ..मी समजावें न तिला तू फक्त मित्र म्हणून तर बोल तिच्या सोबत निदान ती यातून सावरू पर्यंत तरी.

समीर : ठीक आहे मी बोलेन तिच्या सोबत पणं तिने जर पुन्हा प्रेमाचं नाव जरी काढलं तरी ..मी पुन्हा बोलणार नाही .

समिधा : ok ठिक आहे.

समीर : ok

समीर ला तर समजावलं बोल म्हणून पण आता जानू ला सांगणं फार महा कठीण ..निदान तो थोड बोलला तर ती थोड सावरेल तरी..

समिधा जानू ला समीर सोबत बोलले म्हणून सांगते ...जानू खूप खुश होते ..काय बोलला म्हणून विचारू लागते ..पणं समिधा ला विचार पडतो की कस सांगावं हिला तो तर प्रेम केलाच नाही बोलतो ..पणं त्या साठीच समिधा ने ..समीर सोबतच बोलणं रेकॉर्ड केलेलं असत ..कारण तिने सांगून जानू ला पटलं नसत ..समिधा तिला सांगते मी बोलणं रेकॉर्ड केलं आहे ..तू ऐक .आता मी जास्त काही बोलत बसत नाही आपण उद्या बोलू .मग समिधा जानू ला रेकॉर्ड सेंड करते ..जानू हेड फोन लावून ऐकत असते ..समीर चा एक एक शब्द तिचं काळिज चिरत असतो..मी कधी प्रेमच केलं नाही तिच्या वर...मी कधी बोललोच नाही तिला प्रेम आहे म्हणून...सायको आहे ती..जानू चे डोळे सतत वाहत होते..समीर इतकं खोटं बोलला ? त्याने कधीच बोललं नाही का माझ्यावर प्रेम आहे ? खरच मी सायको झाली आहे का ? रेकॉर्ड संपत तरी जानू ते ४.५ वेळा पुन्हा पुन्हा ऐकते ..रडल्या मुळे तिचं डोकं जड झाल होत ..ती तशीच बेड वर झोपी गेली होती ..थोडाच वेळ झाला होता ..अचानक फोन ची रिंग वाजली आणि ती जागी झाली ..स्क्रीन वर समीर च नाव पाहून तिचे हात थरथ रु लागले ..थोड्या वेळा साठी ती समीर जे बोलला ते विसरली आणि तिने फोन उचलला.

समीर : हाय .

जानू : हम्म..

समीर : कशी आहेस ?

जानू : ठीक .तू ?

समीर : मी एकदम मजेत ..काय करत होतीस ?

जानू : झोपले होते..

समीर : डिस्टर्ब झालं नाही ना माझ्यामुळे ?

जानू : नाही ..

समीर : स्टडी कशी चालू आहे ?

जानू : ठीक ..

समीर : ok ..बरं चल बाय.

जानू : bye

समीर ने फोन ठेवला जानू पुन्हा खुश झाली होती समीर आज खूप दिवसांनी बोल ला होता ..पणं त्या आनंदात ही समीर चे शब्द तिला काट्या सारखे टोचत होते .

समिधा ला जानू ने कॉलेज ला गेल्यावर थँक्यु बोललं ..काल तुझ्या मुळे समीर बोलला माझ्या सोबत ..

समिधा : जानू तुझ्या थँक्यु साठी मी तुला रेकॉर्ड पाठवल नव्हत.. ऐकलेस ना त्याचे तुझ्या बद्दल चे विचार ? plz जानू यातून बाहेर पड ..नको तो समीर ..नाही त्याची लायकी ग तुझ्या सारख्या अशा हळव्या मुलीचं प्रेम मिळायची.

जानू : मी प्रयत्न करेन .

समिधा : that's like a good girl.

पण प्रेम विसरता येत का इतक्या लवकर ? नाही ..जानू समीर बोलावा म्हणून एक एक दिवस वाट पाहू लागली ..आता पहिल्या सारखं ती त्याला सारखे फोन मॅसेज करत नव्हती पणं ४.५ दिवसातून एकदा तरी त्याच्या सोबत बोलत असे..तो हो मोजकच बोलायचा जणु उपकारच करत आहे अस..जानू च मन खूप हाळव होत ..तिला त्याच्या अस तुटक बोलण्याचा त्रास होत असे पणं पणं करणार तरी काय ? तो बोलतो यातच तिचं समाधान होत.
आठवडा झाला होता ..जानू समीर सोबत बोलली नव्हती ..खूप अस्वस्थ होवून तिने समीर ला फोन लावला..

समीर : हा बोल ..

जानू : काय करत आहेस ?

समीर : काम .

जानू : इतका वेळ ? आता पर्यंत तर ऑफिस टाईम ही संपलं होत .

समीर : हो मग तू सांगत असशील तर जावू का काम सोडून घरी ? तू एक बिनकामाची ..मी ही सोडून देवू का जॉब ?

जानू ने तर सहज विचारलं होत पणं त्याचं बोलणं ऐकून जानू च्या कंठ दाटून येतो ती रडू लागते व फोन बंद करते ..पणं समीर पुन्हा तिला फोन करतो.

समीर : आता रडायला काय झालं ? मी काय अस वाईट बोललो ? तुला रडण्या शिवाय दुसरं काही येत की नाही ? कुठून बुद्धी सुचली आहे तुझ्या सोबत मैत्री केली देव जाणे ? माझ्या लाईफ मधली सर्वात मोठी चूक आहेस तु ? प्रत्येक गोष्टीत ईमोशन .. शीट यार ..जग प्रॅक्टिकल आहे ..तुझ्या सारखं इमोशनल होण जमत नाही मला..मला अक्कल नव्हती म्हणून तुझ्या नादी लागलो .

जानू तर एक एक शब्द ऐकून थंडगार पडली होती ..मी त्याच्या साठी त्याच्या लाईफ मधली सर्वात मोठी चूक आहे ? इतका त्रास होतो समीर ला माझा ? माझं प्रेम च त्याच्या त्रासच कारण असेल तर कशाला जगायचं ?

जानू : समीर मी सुसाइड करतेय ..

बस इतकं च बोलली जानू आणि फोन ठेवला..आता मात्र समीर ला दरदरून घाम फुटला ...घामाने बसल्या जागी त्याचा शर्ट भिजून चिंब झाला होता...तो सारखा सारखा जानू ला फोन ट्राय करत होता पणं जानू फोन उचलत नव्हती..पणं शेवटी तिने फोन उचलला..

समीर : ऐक तू सांगतेस ते मी करतो पणं plzz हे जीव वगेरे द्यायचं विचार सोड ..plzz ऐकतेस ना ? मी तू जे सांगशील ते करतो ..बोलतो तुझ्या सोबत ..नाही जाणार तुला सोडून..बोल ना प्लीज.

जानू : खरंच ? तू पुन्हा माझा जुना समीर होशील ?

समीर : हो ..जस तू बोलशील तसा..

जानू ला आपण काय करतोय ते ही सुचत नव्हते..ती फक्त समीर तिला सोडून जाणार नाही हे ऐकुन खुश झाली होती..प्रेमात आंधळी झाली होती ना..

तेरे नाम से जी लू तेरे नाम से मर
तेरी जान के सद के मे कुछ येसा कर जावू
तू ने क्या कर डाला मर गई मे मिट गई मे
हो जी ,आ हा जी हो गई मे
तेरी दिवानी ,तेरी दिवानी ,तेरी दिवानी..

इश्क जुनु जब हद से बढ जाये
हसते हसते आशिक सुली चढ जाये
जब इश्क का जादू सर चढकर बोले
खूब लगा लो पेहरे रस्ते रब खोले
यही इश्क की मर्जी हैं यही रब दि मर्जी हैं
तेरे बिन जीना कैसा बेखुद गर्जी हैं
तुने क्या कर डाला मर गई मे मिट ग ई मे
हो जी आ हा जी हो गई मे तेरी दिवानी
तेरी दिवानी , तेरी दिवानी तेरी दिवानी
मैं अलबेली ,मस्तानी दिवानी
तेरे नाम से जी लू तेरे नाम से मर जाऊ

क्रमशः