Love..? in Marathi Love Stories by Pari Pari books and stories PDF | प्रेमाचे बलिदान..

Featured Books
Categories
Share

प्रेमाचे बलिदान..

💗प्रेमाचे बलिदान💗


नुकतेच काॅलेज सुरू होऊन दोन आठवडे झाले होतेे...

नुकतेच काॅलेज सुरू होऊन दोन आठवडे झाले होतेे...अमितसाठी अजुनही सर्वकाही अनोळखीचं होत...नवीन शहर, नवीन काॅलेज, नवीन चेहरे...नुकताच बारावीचा निकाल लागला होता व प्रत्येक जण आप-आपल्या करीअर च्या दिशेने वाटचाल करू लागला होता...अमितने पण जेव्हापासुन ते राजेश पाटील लिखित " ताई मी कलेक्टर व्हयनु " हे पुस्तक वाचले तेव्हापासुनच IAS चे ध्येय डोळ्यांत साठवल होतं, म्हणुन त्याने एका नामांकीत काॅलेज मध्ये पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला.एक दिवस हाॅस्टेलवर येत असता, मोबाइलची बेल वाजली... तो समिरचा फोन होता.

अमित : बोला साहेब खुप दिवसांनी आठवण आली.. कसा आहेस...

समिर : मी ठिक आहे, तु कसा आहेस...अमित : मी पण मस्त आहे... ( थोड थांबुन ) ती क़शी आहे रे... कितीतरी दिवस झालेत रे बोलनं झाल नाही, खुप आठवण येते तीची...( समीर काहीचं बोलतं नाही )

अमित : काय झाल रे असा शांत का, तु ठिक आहेस ना...

समिर : ( हुंदके देत ) मी ठीक आहे रे पण... ( वाक्य काटुन )

अमित : पण काय... ( थोडा भयभीत होऊन )समिर : तुला कसं सांगु यार... ( समिरचा कंठ दाटुन येतो ) कवीता नाही राहीली रे... ती आपल्याला सोडुन गेली रे...

हे ऐकुन त्याच्या पायाखालील जशी जमीनचं सरकली... भरल्या नभासाऱखे डोळे भरून आले... श्वासाची गती हळु झाली... त्या क्षणांत त्याला वा़टल की जणु सार जगचं हे थांबल आहे... फक्त तीचेच चित्र त्याच्या डोळ्यात होते...

समिर : हे कसं अचानक झाल कळलंच नाही रे, रात्री तीला खुप वेदना होत होत्या, अगोदर तीला ज़ळगावला हलवलं... पण तेथील डाॅक्टरांनी असमर्थता दाखवत तीला त्वरीत मुंबईला हलवायचे सांगीतले... पण देवाला ते मान्य नव्हतं रे व रस्त्यातच तीची प्राण ज्योत मावली.

अमितला असे जाणवतं होते की त्याचं हृदयचं कोणी काढुन घेतलयं... कसा- बसा तो रुममध्ये आला व दरवाजा बंद करुन त्याने स्वतःला कोंडुन घेतले... व आपली कवीतांची डायरी काढुन त्याच्या कवीताच्या आठवणीत बुडाला...

दहावीचे निकाल आले होते, त्याच्या वडीलांनी त्याला पुढील शिक्षणासाठी गावापासुन सुमारे नव्वद किलोमिटर दुर हाॅस्टेलला पाठवंल. तो काॅलेजचा पहीला दिवस होता... सर्वकाही नवीन ़असल्या कारणाने त्याला करमत नव्हते, शेवटी त्याला मन रमवायचा उपाय समजला... व तो थेट ग्रंथालयाकडे वळला...

( ग्रंथालयातील ग्रंथपाल दिसायला तर तापट दिसतं होते, पण स्वभावाने खुप शांत होते... लहान असो किंवा मोठा प्रत्येकाशी ते आदराने वागतं..)

ग्रंथपाल : welcome आपल्याला या ठिकाणी कधी ब़घीतलं नाही... नवीन प्रवेश आहे का?

अमित : हो सर माझा काॅलेजचा पहीलाचं दिवस आहे., सर काय मी या ठिकाणी बसुन पुस्तक वाचु शकतो?...

ग्रंथपाल. : हो का नाही हे ग्रंथालय आपल्या सारख्या उत्स्फुर्त तरुणांसाठीचं तर आहे...तो वर्गात नेहमी शेवटच्या बॅंचवर बसत असे, व त्याच्या बरोबर हाॅस्टेलमधील टवाळखोर मुलं जे आता त्याचे मित्र झाले होते... असाचं एकदिवस वर्गात बसले असता... शिक्षक वर्गात शिकवत होते व तो मन लावुन तीकडे लक्ष देत होता... प़ण मध्येच अमोल त्याला म्हणाला...

अमोल : ए अमित ऐक ना..

अमित : काय रे काय म्हणतोस... आपण नंतर बोलु ना ( त्याच्या गोष्टीला टाळत तो म्हणाला )

अमोल : यार बघं तर खरी ना...

अमित : पण काय?अमोल : ( मुलींकडे बोट दाखवत ) यारं ती शेवटुन तीसर् या नंबरवरील मुलगी ब़घं ना... सारखी तुलाचं बघंतेय...

अमित : काय? शांत बस काही पण बडबडु नकोस...

अमोल : खरचं यार आईची शपथ, एकवेळा बघं तर...( अमित disturb झाल्यासारखां भाव करतं )अमित : कोण रे

अमोल : शेवटुन तीसरा बॅंच...अमितने तीकडे बधीतले व खरचं एक मुलगी, बॅंचवरती डोके ठेऊन व मुलांकडे चेहरा करुन त्याच्याकडे एकटक बघतं होती...

अमोल : बघं यार ती मुलगी तुला काय लाईन देतेय, तुझ तर जमलं यार...

अमित : ए काहीपण बडबडु नकोस, ती मला नाही तुला बघंत असेल... ( असे बोलुन त्याने त्या गोष्टीला टाळले )एक दिवस असाच वर्गात आपल्या शेवटच्या बॅंचवर बसला होता, व इंग्रजी चा तास होता... शिक्षकांनी काही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारलेत व त्याने पटापट उत्तर देऊन शिक्षकांच मनच जिंकुन घेतलं...

तो दिवस त्याच्यासाठी जणु Golden day च होता., कारण आज शिक्षकांनी त्याला शाबासकी तर दिलीचं पण शेवटच्या बॅंचवरुन थेट पहील्या बॅंचवर बसायची संधी मिळाली... त्याचा तो आत्मविश्वास, चेहर् यावरील तेज, बोलण्याची पध्दत बघुन सर्व विद्यार्थी एकटक त्याच्याकडे बघतं होते...

जणु तो एका दिवसात Star च झाला होता...२६ जानेवारीचा तो दिवसं होता. काॅलेज मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते... त्यातीलच एका प्रश्न मंजुषेमध्ये त्याची पण निवड झाली. स्टेजवर जाण्याची ती पहीलीचं वेळ होती, तो पुर्णपणे अस्वस्थ झाला होता, प्रश्न विचारले जात होते पण तो स्तब्ध होउन केवळ ऐकतच होता.

घाबरलेलाअसल्या कारणाने तो तीथे काहीचं बोलु शकला नाही... व शेवटी त्याला पराभव पत्करावा लागला. पण या पराभवाची तोड करणारा व त्याच्यात नवीन आत्मविश्वास निर्माण करणारा क्षण त्याच्या जवळचं येत होता...आज काॅलेज चा वर्धापण दिन होता प्रत्येकजण काहीतरी नवीन करुन दाखवत होता, त्याने पण विशेष करायचे ठरवले. व त्याने त्याच्याकडील ए.पी.जे. अब्दुल कलाम लिखित " अग्निपंख " हे पुस्तक ग्रंथालयास आपले नाव लिहुन ग्रंथपालांच्या स्वाधीन केले...

काही दिवसांनी शिक्षकांनी निबंध लिहुुन आणायचे सांगीतले. व त्याने ए.पी.जे.अब्दुल कलामांवरती निबंध लिहायचे ठरवले., त्यासाठी ग्रंथालयात " अग्निपंख " हे पुस्तक घेण्यासाठी गेला...अमित : सर मी आत येऊ शकतो..

ग्रंथपाल : हो या ना ... आज कोणते पुस्तक हवयं..

अमित : सर मला " अग्निपंख " पुस्तक हवयं...ग्रंथपाल : ( थोडा विचार करुन ) " अग्निपंख " माफ करा पण कालचं ते पुस्तक एक मुलगी घेऊन गेलीय...व कमीत- कमी चार- पाच दिवस ते मिळणारं नाही.

अमित : ठिक आहे सर काही हरकत नाही...( असे बोलुन बाहेर निघतं असतो तोच ...)

ग्रंथपाल : आपल्याला जर जास्तच गरज असेल तर आपण त्या मुलीला विचारु शकता...( त्याला ही कल्पना तर आवडली पण प्रश्न पडला त्या मुलीशी बोलायचां., ग्रंथपालांनी रजिस्टर काढलं..

ग्रंथपाल : ती मुलगी तुमची Classmate च आहे व तीचं नावं आहे कविता बोबडे...

अमित : OK sir thank you...तो खुप confused होता, की बोलायचं तर बोलायचं कसं, आणि त्यात कोण ही कविता आपण कधी तीला बघीतले पण नाही, शेवटी आज त्याला त्याच्या टवाळखोर मित्रांची आठवण आली...

अमित : ए अमोल...

अमोल : हा बोल..

अमित : यार तुझ्याकडे ना आज एक काम होतं...

अमोल : तुला ़आज ' ढ ' शी काय काम रे...

अमित : एका मुलीशी बोलायचयं... ( मध्येच वाक्य काटत )

अमोल : काय बोलतोस तु तर खुप चालू निघलास रे

अमित : नाही यार ... ( त्याने त्याला घडलेलं सर्वकाही सांगीतलं )

अमोल : मला वाटलं की काय तुही कूणाच्या प्रेमात पडलास...चल तुला lunch time मध्ये दाखवतो तीला...

समिर : काय नाव बोललास तु तीचं..अमित. : कविता...

सचिन : अरे ती मुलगी तर माझ्या घराजवळचं राहते..

अमोल : तुला माहीत आहे, ती नेहमी मुलीं मधुन पहीली येते...

सचिन : चल ठिक आहे... असे म्हणुन तो त्याला Garden कडे घेऊन गेला... व त्याने तीच्याकडे बोट दाखवत म्हटले... ती बघं कवीता( त्याने तिकडे बघीतले, फुलांनी बहरलेल्या बकुळीच्या झाडाखाली, तीच्या मैत्रीणिबरोबर ती बसली होती...

बारीक-बारीक डोळे, गुलाब पाकळिसम ओठ, लांब काळेभोर केस, चंद्रप्रतिबिंबासम चेहरा., सुर्याची किरणे जशी सकाळी शरीरावर पडली की शरीर कसं रंग बदलते... तसंच त्या पानांना सारत किरणे तीच्या चेहर् यावर पडत होती.., व ती जणु एका ताज्या तवान्या फुलाप्रमाने भासत होती... तीची ती हळुवारपणे होणारी ओठांची हालचाल... कळी उमलुन फुल बनावं तसं हसणं... पाहुण तो तर मंत्रमुग़्धच झाला... ती जशी तीच्या नावाप्रमानेच एक खरी कविताचं भासत होती...

समिर : अरे आता विचार काय करतोस, जा आणि बोल तीला...

अमित : अरे तीला बोलु तर काय? काही कळत नाहीय...( शेवटी तो कसा बसा धाडस करून तीथं गेला, सोबत समिर पण होताच )

अमित : Sorry to disturb you... पण मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं...( तो पहील्यांदाचं कुण्या मुलीशी असं बोलत होता... जणु ती त्याच्या कोवळ्या प्रेमाची सुरूवात होती...)

शितल : ( तीची मैत्रीण ) काय?समिर : Actually याला कविताशी थोडं काम होतं

कविता : माझ्याशी... ( आश्चर्याने ) माझ्याशी काय काम...

अमित : तुम्ही ग्रंथालयातुन जे पुस्तक काढलं आहे ना, मला त्याचं थोडस काम होतं... तुमच्या कडुन ते कधी फ्रि होणारं सांगु शकता...

कविता : मी माझं काम संपवुन तुम्हाला ते उद्या देते...

अमित : Thanks...(तीला बघीतल्या पासुन तीचाच चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता, व त्याच्या आयुष्यात नवे रंग भरणार् या काव्याने त्याच्या ओठी जन्म घेतला... व कविता वरूनचं कवितासाठीचं त्याने पहीली कविता लिहीली...)


" पहील्यांदा तुला बघीतलं...व तुलाचं बघत राहीलो...सर्वस्व तुलाचं मी समजुन...डोळ्यांच्या विशाल सागरात...मी बुडून गेलो"


कविता मुळे तो केवळ कवी नाही राहीला, तर एका लेखकाची उपमा पण त्याला मिळाली...दुसर् या दिवशी सकाळपासुनच त्याची नजर तीला शोधतं होती, तो ग्रंथालयाजवळ उभा असता... अचानक ती ग्रंथालयातुन बाहेर आली व...

कविता : ( त्याला पुस्तक देत ) तुमचं अक्षर खुप छान आहे...

अमित : पण तुम्ही माझं अक्षर कुठे बघीतलंत...

कविता : पुस्तकावर तुमचे नाव तुम्हीच लिहीले आहे ना...

अमित : ओ... (दोघं स्मित हास्य करतं) Thank you...

कविता : OK by...त्याने तीने स्पर्श केलेल्या पुस्तकाचा सुगंध घेतला व त्याने उघडले असता... त्याला त्यात एक सुंदरस पिंपळाचं पान आढळलं... त्या पानावरील सर्व अच्छादन जाऊन ते केवळ जाळ्यासमान भासत होतं... त्यावरील ते रंगकाम त्याला अजुनचं शुभोषित करतं होतं...अतिशय सुंदर असं ते कलेचं प्रदर्शन होतं...दोन - तीन दिवसांनी त्याने ते पुस्तक ग्रंथालयात जमा केले सोबत ते पानही ठेवले होते, पण ग्रंथपालांनी जेव्हा ते बघीतले व त्यांनी ते परत केले व पुन्हा असे न करण्याची ताकीद दिली...

त्याने ते पान तीच्यासाठीच ठेवले होते, ज्यावर त्याच्या कवितेचे काही शब्द लिहीले होते...काॅलेजमध्ये एक शिक्षक भावी कवी म्हणुन ओळखले जायचे, एका कार्यक्रमात त्यांनी आपली कविता सादर केली... व त्याला पण वाटले की आपण पण आपली कला सादर करावी, व त्याने त्यांच्याकडे कविता बोलायची विनंती केली, व त्याला त्या ठिकाणी संधी मिळाली, स्टेज डेरींग नसल्याने त्याने ती कविता पेपर वरूनच वाचली..

" चालतांना कधी मागे वळून ...बघायचे नसते...बदलत्या काळाबरोबर बदलायचे असते...येणार् या वेळेचे स्वागत...करायचे असते...असेच आयुष्याचे स्वरूप असते "

( मोठ्यांच्या शाबासकीच्या थापेने त्याला साहीत्यासाठी अजुनचं उत्स्फुर्त केले... व हा सगळा बदल कवितामुळेच होता )

आता तो पण अधून- मधून Garden मध्ये कविता करण्यासाठी बसायचां... व ती पण त्या ठिकाणी यायची... असेच एक दिवस

कविता : आपण खुप छान कविता लिहीता...

अमित : Thank you...

शितल : तुम्ही स्वतः या कविता बनवता का?

अमित. : नाही...

कविता : नाही ( आश्चर्यचकीत होउन )

अमित : माझ्या कवितांची सुरूवात एका सुंदर व्यक्तिमुळे झाली होती... तीचं ते सौंदर्य पाहुनचं मी कविता लिहायला लागलो, म्हणुन माझ्या कवितांच Credit त्या व्यक्तिला जातं...

कविताला पण तो खुप आवडायचां, व ही गोष्ट शितलला माहीत होते, म्हणुन ती नेहमी त्यांचा संवाद घडवुन आणायचां प्रयत्न करायची.. आता त्यांच्यात चांगलीच मैत्री झाली होती, आता त्यांना एकमेकांशीवाय करमायचचं नाही, काही ना काही कारणाने ते नेहमी भेटायचां प्रयत्न करायचे... व हीच त्यांच्या प्रेमाची सुरूवात होती... कळीचं फुल व्हायचचं होतं, तोचं त्या कठोर देवाने नजर लावली...

अमित. : शितलं आज कविता नाही दिसतं...

शितल : अरे तीला बरं नाहीयं...

अमित : (काळजी करत) बरं नाही म्हणजे काय झालं नेमकं...

शितल : ( त्याची थट्टा करत ). काय आहे मिस्टर कविताची खुप काळजी करायला लागलात...

अमित : काही नाही यारं सहज विचारलं...

शितल : दिसतयं ते...( शेवटी त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिलीचं )

अमित : तीला सांगु नकोस यार... पण ती मला खुप आवडते, तु तर तीची चांगली मैत्रीण आहेस ना... तुला तर माहीतचं असेल ना तीचा कोणी Boyfriend आहे का... Please कोणी असेल तरं सांग ना...

शितल. : Sorry यार पण तीला पण कोणी आवडतो...

अमित : ( नाराज होऊन ) जाऊदे यार ती माझ्या नशिबातचं नव्हती... पण तो खुप नशिबवान आहे यार ज्याच्यावर ती प्रेम करते.. ( असे बोलुन पूढे निघतो )

शितल : अरे वेड्या तीला तुचं आवडतोस... ती पण तुझ्यावर खुप प्रेम करते... ( हे ऐकुण खुप खुश होतो, जसं त्याने सारं जगचं जिंकल आहे )आणि आता त्याने तीला बोलुन टाकायचेच म्हणुन ठरवलेचं, व तो दिवसही उजळलाचं ज्याची दोघांना उत्सुकता होती...

तेथील पहाडावरती दरवर्षी प्रमाने रेणुका माता चा यात्रा सोहळा श्रावणात साजरा केला जायचां व दोघांनी आज आपल्या प्रेमाची कबुली देण्याचे ठरवले होते...

आज आभाळही भरुन आलं होतं, अप्रतीम असं ते वातावरण भासतं होत, सगळीकडे शांतता पसरलेली... व दोघेही मंदीराच्या पाठीमागील भागात आलेत... आज त्यांनी मागे न हटायचं ठरवलं होतं...

व एवढ्यात वरुणाने ही आपली हजेरी लावलीच... श्रावणाच्या सरींवर सरी कोसळु लागल्यात... दोघेही त्या ठिकाणी ओलेचिंब झालेत... मंजुळ - मंजुळ वारे अंगाला झोंबत होते... ती आज जशी त्याला Newborn baby समान भासत होती...

तीचे ते गालावर आलेले काळेभोर केस, थरथरणारे ओठ... जशी ती एखाद्या चित्रकाराची कलाकृतीचं होती... दोघपणं एकमेकांच्या डोळ्यात एवढे मग्न झाले होते की, बाहेर च्या जगाचा त्यांना जसा विसरचं पडला होता... व अचानक जोराचा विजांचा कडकडाट झाला... व तीने त्याला मिठीचे आलिंगन दिले... व जे अपेक्षीत होते तेच घडले... त्यांना शब्दांच्या परीभाषेची गरजच नाही पडली...

त्या श्रावणात जसा वरूण धरतीला स्पर्श करत होता, त्यासमान ती दोघंही एकमेकांत सामावली गेली... तीचा तो स्पर्श त्याला हवाहवासा वाटतं होता... त्यांना कशासचं भान राहील नव्हतं... ते एकमेकांवर चुंबनांचा वर्षाव करत होते... तीच्या शरीराचा तो मखमली स्पर्श त्याला तीच्याकडे अजुनचं उत्तेजित करत होता... व तीचा तो सुगंध त्याला जगातील सर्व सुगंधांत श्रेष्ठ वाटत होता...आज बोर्डाच्या पेपरचं वेळापत्रक आलं होतं. परीक्षा अवघ्या तीन महीन्यांवर येऊन टेकली होती...

कविता : Result नंतर तु़झा काय Plane आहे...

अमित : माझं ध्येय मी IAS चं ठेवलयं...

कविता : खरंच...

अमित : हो मी काॅलेज चालु असतांनाच UPSC ची तयारी करणारं आहे... आणि तु

कविता : मला पण प्रशासकीय सेवेत जायचंय...

अमित : Oh really too good yaar...( आज कविता काॅलेज ला आली नव्हती व त्याची नजर तीला शेधत होती... शितलला विचारल असता माहीत पडलं की तीला बरं नाही म्हणुन... असेच दोन- तीन दिवस निघुन गेलेत...

तरी कविता काॅलेज ला येत नव्हती व शेवटी त्याला माहीत पडले की तीला खुप त्रास होत होता म्हणुन तीला मुंबईला मोठ्या हाॅस्पिटलला दाखल केले आहे ... तीच्याकडे मोबाईल नसल्या कारणाने तो तीला संपर्क पण करू शकत नव्हता... आता त्याच चित्त फक्त तिच्यातचं अडकलेल राहायचं... अभ्यासाकडे पण दुर्लक्ष होत होत... पंधरवटाही निघुन गेला... शेवटी एक दिवस इंग्रजीच्या शिक्षकांनी जे सांगीतलं ते ऐकुन तर तो शाॅकच झाला...

शिक्षक : आपणाला सांगतांना खुप दूःख वाटत आहे कि, आपल्या वर्गातील कविता ही आज मुंबईला हाॅस्पिटलात मृत्युशी लढत आहे... (वाक्य मध्येच काटत, त्याला राहावलं नाही )

अमित : सर काय बोलतायं तुम्ही हे... काय झालंय कविताला...

शिक्षक : कविताला Brain cancer आहे, व तीच्यावरती मुंबईला शस्त्रक्रिया चालु आहे... असा शंभरा मधुन एक व्यक्ति असतो, जो यावर मात करून जिवंत राहतो...हे ऐकल्यावर काय करावे व काय नाही त्याला काहीच कळत नव्हतं...

आजपर्यंत त्याने कधी देवळाचां दरवाजाही बघीतला नव्हता, पण तो आज त्या मुर्तीपुढे तीच्या आयुष्याची भिक मागतं होता... शेवटी देवाने तर नाहीचं पण तीच्या दैवानेचं तीची शस्त्रक्रिया यशस्विरीत्या पार पाडली... व तो त्या दगडाला देव मानायला लागला ...

परीक्षेचे दिवस जवळ येत होते... व परीक्षेच्या तयारीसाठी सुट्यांसाठी अवघे दहा दिवस राहीले होते...व अचानक एक मुलगी डोक्याला रूमालं गुंडाळुन काॅलेजला आली... शरीर सर्व बारीक झालेले... हाता- पायाच्या सहज मोजता येतील अशा नसा दिसत होत्या... पुर्ण चेहरा पिव़ळा पडलेला... चेहर् यावरील तेज नष्ट झालेले... जणु ती मुलगी एक वयस्कर व्यक्ति जाणवत होती...

सर्व काॅलेजमधील विद्यार्थी त्या मुलीला बघुन हसत होते, तीची थट्टा करत होते... त्याची नजर पण तीकडे गेली... अगोदर तर त्याने पण तीला ओळखले नाही, कारण तीची अवस्थाच तशी झाली होती... ़शस्त्रक्रियेमुळे तीच्या सर्व केसांचे वपन केले होते... कारण ती त्याची कविताचं होती, तो पळतचं तीच्याकडे गेला...

अमित : तु कशी आहेस...

कविता : मी ठिक आहे... ( व पुढे निघुन जाते, अमित तिला बघतं विचारमग्न अवस्थेत... हीच का माझी ती नेहमी प्रसन्न राहणारी कविता...)नुकतीच Cancer सारख्या भयंकर आजारातुन सुटका झालेली,

तरीपण कोण काय म्हणते याचा विचार ना करत ती अशा परीस्थितीतही काॅलेजला यायची... तीच्या त्या अवस्थेला पाहुन विद्यार्थी तीची थट्टा करायचे हसायचे, पण तरी ती काॅलेजला यायची... पण त्याच्या मनात मात्र तीच्याबद्दल अजुन आ़दर वाढला होता...

तीला वाटायचं की अमित आता तिला विसरला असेल, कारण ती आता पहील्या सारखी नाही दिसतं... पण अमित ने तसला विचार कधीच केला नाही...तो निरोप समारंभाचा कार्यक्रम होता, त्याने अगदी सुंदर पध्दतीने अापल्या कवितां समवेत सुत्र संचालन केले...

सर्व जण त्याच्या त्या अभिनयाने प्रसन्न झालेत... कार्यक्रमाच्या शेवटी अचानक एक मुलगी त्याला गुलाबाचे फुल द्यायला आली, त्याने त्या मुलीला कधी बघीतलेपण नव्हते, ती त्याच्या खालच्या वर्गातील होती व नकळत ती त्याच्यावर प्रेम करत होती...

तिने सर्वांसमोर त्याला गुलाबाचे फुल दिले व गोंधळच उडाला., कविताच्या डोळ्यांतुन अश्रुंचा पुर वाहु लागला.. व ती तेथुन निघून गेली... त्याला पण हा प्रकार आवडला नाही, व त्याने तीच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण परीक्षा पण झाल्यात पण ती त्याला भेटलीच नाही...

आज निकाल येणार होता, व त्याला माहीत होते ती आज नक्की कॉलेजला येणारं... तो चांगल्या मार्क्स ने पास झाला पण तीला खुप कमी मार्क्स आले होते... तो ग्रंथपालांची भेट घ्यायला गेला असता, ती अचानक त्याच्या समोर आली ...

अमित : तु माझ्याशी बोलत का नाही आहेस... ( त्याला Ignore करत पुढे निघते ) मला तुझ्याशी बोलायचयं...

कविता : ( डोळ्यांत अश्रू आलेले ) अजुन बोलायला काय शिल्लक राहीलयं...

अमित : कविता ती माझ्यावर प्रेम करते, पण मी तुझ्यावरचं प्रेम करतो...( तीला माहीत असते की तो अजुनही तीच्यावरचं प्रेम करतो, तरी ती त्याच्याशी भांडते व इथेच सर्व संपले म्हणून सांगते... ़खरतरं तीला तीचा तो जवळ आलेला काळ समजतो व ती त्याच्या सुखासाठी आपल्या प्रेमाचं बलिदान देते...

पण तो मात्र तरी तीची आशा सोडत नाही. कारण त्याला विश्वास असतो कि आज ना उद्या देव आम्हाला मिळवनारचं...

पण त्याला काय माहीत असते कि ही त्यांची भेट शेवटची भेट होणारं म्हणून....." ती आज हयात नाहीयं पण त्याला कधी असं जाणवलचं नाही कि ती त्याला सोडुन गेलीय म्हणून,... तो आजही त्याच्यातील प्रत्येक विचारात,... निसर्गातील प्रत्येक सुंदरतेत,... व त्याच्या प्रत्येक कवितेत " कविताला " शोधत असतो"........ " म्हणुन ती नसुनही आहे " असं त्याला नेहमी वाटतं ...


परी..👰🏻


💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙