Swash Aseparyat - 23 in Marathi Fiction Stories by Suraj Kamble books and stories PDF | श्वास असेपर्यंत - भाग २३

Featured Books
Categories
Share

श्वास असेपर्यंत - भाग २३


" उद्या तुम्हांला न्यायालयात हजर करणार आहे !!! गुन्हा सिद्ध झाल्यास उरलेले आयुष्य इथेचं काढावे लागेल. "
अशी पोलिस शिपायांनी तंबी दिली.

मी मात्र आता काय करावे ??? काय होईल उद्याला??? या विचारात बुडालो होतो . चुकी नसतांना , माझ्यावर हा आरोप का लावावा या विचारानेचं माझी झोप उडाली होती !!! समोर दिसणारा नोकरीचा भविष्यकाळ, पूर्णवेळ नोकरी , आईला सर्व सुख देणार , सर्व व्यवस्थित होईल , या आशेने मी जगत होतो. पण आता ते स्वप्नही धूसर झाल्यासारखं वाटत होतं. माझ्या आयुष्यांला तुरुंगात काढावे लागेल, याचं भीतीने मी लहान मुलांसारखा रडू लागलो. मी इकडे तुरुंगात असल्यावर माझ्या आईचं कसं होईल??? ती कशी जगेल??? आता कुठे फिरता फिरता स्थिरता प्रदान झाली होती.

सर्व व्यवस्थित चाललं होतं . घर जरी मोडकं - तोडकं असलं तरी त्या घराला आता घरपण आलं होतं आणि आता जर मी तुरुंगात फसलो तर तिला काय वाटेल ???? तिच्या आत्म्याला काय वाटेल ??? तिच्या मनाला काय वाटेल ???? आपला अमर असं करणार यांवर तिचा विश्वास बसणार नाही पण धक्का नक्कीचं पोहचेल. या जाणीवेने मी तरफडू लागलो . कोणत्या पापाची शिक्षा देव मला देता हे कळेनासं झालं होतं !!!! देवावर तर विश्वास फार पूर्वीचं उडाला , पण त्या विधात्याला म्हणण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरला नव्हता. छाया च्या घरी असणारी सर्व प्राध्यापक माझ्याकडे संशयित नजरेने बघत होते . गुन्हेगार नजरेने बघत होते . आणि त्यांच्यासमोर मी ही गुन्हेगार झालो होतो. ही बातमी वाऱ्यासारखी कॉलेजमध्ये पसरणार. सर्व विद्यार्थी माझ्यावर थुंकणार.
परमंनंट भरती होणार असा शब्द संस्था प्रमुखांनी दिला होता. पण झालेला प्रकार त्यांनाही कळेल. बदनामी ही बातमी संचालकांना कळल्यावर ते सुद्धा कॉलेजमधून काढून टाकतील, इत्यादी नाना तर्‍हेचे विचार डोळ्यांसमोर नाचत होते. उद्याला काय होईल ????? या विचारानेचं तुरूंगात मी रात्र काढू लागलो. स्वप्नांतही आपल्याला तुरूंगात जावं लागेल असं स्वप्नही येत नव्हतं, पण आज प्रत्यक्षात मी तुरुंगात दुसऱ्याच्या चुकीने आलो होतो. शेवटी एकदाची रात्र संपून दिवस उजाडला होता . रात्रभर झोप न लागल्याने , उशिरा डोळा लागला होता, म्हणून उशिराचं जाग आली . पोलीस मात्र चांगल्या स्वभावाचे होते. त्यांनी मला समजून घेण्याचा प्रयत्न केला व गुन्हेगार नसल्यासारखी वागणूक दिली .

मला कोर्टात हजर करण्यात येणार इतक्यात छाया आणि तिच्या घरचे भाऊ, आई-बाबा आले होते.
छायाच्या डोळ्यांत अजुनही अश्रू येत होते. पण आता त्या अश्रूंचा अर्थ कळेनासा झाला होता. यांपूर्वीचे डोळ्यांत आलेले अश्रू , हे प्रेमाला नकार दिला व त्या बदल्यात बदला म्हणून खोटारडे होते. छल,कपट अशेंच होते. आज मात्र त्या अश्रूंचा अर्थ काही कळत नव्हता. मला न्यायालयात नेण्यात येईलचं तेवढ्यात छाया चे सर्व नातेवाईक, सर्व पोलिस कर्मचारी माझ्याकडे आले . मला पाहून सर्वांच्या माना खाली गेल्या. सर्वांचे चेहरे एकदम उतरून दिसत होते.

" साहेब काल यांच्यावर घेतलेला अतिप्रसंगाचा आरोप हा पूर्णत: खोटा आहे!!!"
छाया रडत रडत पोलिसांना सांगत होती.

" काय !!!! पोलीस संतापले , डोकं बिकं जागेवर आहे की नाही तुझं ???? तूचं काल तक्रार घेऊन आली होती ना की , यांनी माझ्यावर बळजबरी , अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सोबत तुझे हेचं नातेवाईक सुद्धा होते . "

होय साहेब, " आंम्ही चुकलो!!! आता घरचे सर्व सदस्य बोलत होते . सांगत होते की , नालायकीचे यांच्यावर प्रेम आहे. घर दाखवण्याच्या बहाण्याने छाया ने स्वतःच्या खोलीमध्ये नेले.
आणि तुम्ही माझ्यावर प्रेम करा !!! माझ्याशी लग्न करा!!! असा अट्टाहास करुन त्यांना पकडून ठेवलं.

" सरांनी तिच्यापासून सुटका करण्यासाठीचं खांद्यावर हात ठेवले आणि अचानक तो साडीचा पदर खाली पिन सहित खाली आला . हे दृश्य मोठ्या भावाने पाहिले . आपण बदनाम होऊ, बदनामीच्या भीतीने तिचा गुन्हा सरांवर ढकलून दिला. तिला प्रेम मिळालं नाही म्हणून प्रेमाचा सूड म्हणून सरांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला ."

" आंम्ही छायाच्या वतीने तुमची माफी मागतो सर!!! तुम्ही निर्दोष आहे . त्यांची सुटका करा !!!

" काय जमाना आला देवा!!! एका चांगल्या माणसांना तुम्ही बदनाम केलं . आता त्यांच्या भावी भविष्याचं काय ???? तुम्ही तर सुखरूप जगाल, पण ही व्यक्ती शेवटी बदनाम तर झालीच ना !!! "

" पुन्हा असला घाणेरडा खेळ सरांशी खेळू नका किंवा इतरांशी सुद्धा !!!

बदनामी झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा जीव घेतला असता तर!!! पोलीस बोलत होते .

" सॉरी अमर सर!!! आमचं पोलिसांच ते काम असतं. तुम्हांला झालेल्या त्रासाबद्दल , आंम्ही दिलगिरी व्यक्त करतो!!! साहेब बोलून निघून गेले.

छाया रडत रडत माझ्या समोर आली . सर मला माफ करा !!! मी चुकले . मी तुम्हांला बदनाम केलं. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण माझं खरंच तुमच्यावर प्रेम आहे. मी तुम्हांला बदनाम करण्याच्या हेतूने खोलीमध्यें नेलेलं नव्हतं. फक्त तुमच्याकडून उत्तर हवे होतें म्हणून मी अडून बसले, आणि तेवढ्यात तो पदर खाली घसरला. हे सर्व मोठ्या भावाला दिसेल, मी बदनाम होईल, म्हणून मला त्या वेळेस काहीचं सुचलं नाही, म्हणून तो आरोप मी तुमच्या वर केला. पण रात्रभर मी अशी कशी करू शकते!!! या विचारानेचं मला झोप आली नाही, आणि हिंमत करून सर्व खरं घरच्यांना सांगितलं. अमर सर, मला खरंच माफ करा!!!

छाया च्या भावांनी ही माझी माफी मागितली. शेवटी मी काहीएक न बोलता , ठीक आहे म्हणत निघून गेलो. छाया ला तर कधीच माफ करून दिलं होतं . कारण तिला झालेला पश्चाताप हीच तिची शिक्षा होती . पण इथेही माझ्या नियतीने पाठपुरावा केलेला दिसला. चांगल आयुष्य जगत असतांना परत एकदा मला बदनामीच्या, भीतीच्या वातावरणात जगावं लागणार आहे. बघुयात अजून जीवनात काय लिहून ठेवले आहे...


क्रमशः.....