एवढ्यात छाया मॅडम आल्या . " अहो अमर सर , आले तुम्ही!!!! " खूप छान दिसतं आहात तुम्ही तर!!! छाया मॅडम लाजत म्हणाल्या.
छाया मॅडम सुद्धा आज इतर दिवसांपेक्षा अधिक उठावदार आणि मोहक दिसत होत्या . अंगावर निळ्या रंगाची साडी आणि त्यांवर कोरीव काम केले होते. गळ्यात मोत्यांची माळ घातलेली होती. आणि केसांची वेणी घालन्यापेक्षा ते सैल मागे सोडले होते. केस सुद्धा अगदी लांब होते त्यामुळे आज त्या कुणाच्याही नजरेत भरेल अश्याचं दिसत होत्या. त्यांनीही मी म्हणालो,
" तुम्ही पण खूप छान दिसत आहात मॅडम!!!
मॅडम ने धन्यवाद म्हणत,
" चला मी तुमची माझ्या घरच्यांशी ओळख करून देते. छाया मॅडम नी घरच्यांशी ओळख करून दिली. मी नमस्कार घेत पुढे चालू लागलो. नाईलाज असतांना हे सर्व करावं लागत होतं. "
तेवढ्यात मॅडम म्हणाल्या , " चला ना अमर सर!!!मी तुम्हांला माझं घर दाखवते!!!!"
" असू द्या ना मॅडम, उशीर होईल जायला मला!!!! मी टाळण्याचा प्रयत्न करत होतो. "म्हणून मी नाही म्हणालो.
" काळजी नको सर!!! मी सोडून देईल वेळ झाला तर!!! "
लगेच मॅडम उत्तरल्या.
आता टाळण्यासाठी काही शब्दचं उरले नव्हते, म्हणून मी म्हणालो,
" ठीक आहे!!! चला दाखवा तुमचं घर ! मी जाईल घरी सावकाश! तुम्ही एवढा त्रास काही घेऊ नका. सोडून देतो एवढं म्हटलं तरी ते माझ्यासाठी सोडल्या सारखेच आहे."
असं म्हणत छाया मॅडम लाजेने विरक्त झाल्या. त्यांना काय बोलावे म्हणून सुचत नव्हतें.मग मध्येच विषय त्यांनी बद्दलवला.
" खुपचं लाजाळू आहात अमर सर तुम्ही!!!
आंम्ही जिन्याने खाली उतरत , खालच्या घरांत आलो . घरांत कुणी एक नव्हते. सर्व कार्यक्रमात वरच्या मजल्यावर व्यस्त होते . खाली होते ते खेळणारी लहान मुले, आणि झोपी गेलेली लहान बाळ. घरांतील प्रत्येक खोली दाखवत त्यांनी स्वतःची खोली दाखवायला नेले. खोलीत अंधार पसरलेला होता. मी खोलीच्या दरवाजाच्या बाहेरचं उभा होतो. छाया मॅडम ने लाईट सुरु केला. मी तरी खोलीच्या बाहेरचं उभा होतो.असं कोणत्याही मुलीच्या खोलीमध्यें जाऊ नये, म्हणून मी नकार देत बाहेरचं उभा राहिलो. तेवढ्यात ,
अमर सर , " आंत या!!! काळजी नसावी!!! मी घरच्यांची परवानगी घेऊनचं तुम्हांला घर दाखवायला खाली आणलेले आहे बरं का सर!!!"
त्यांनी माझी चेष्टा करत म्हटले. माझा नाईलाज म्हणून मी मॅडम च्या खोलीत प्रवेश केला.
इतर खोलीपेक्षा ही खोली अधिकचं सुशोभित केली होती. काही पेपरची कात्रणे भिंतीवर चिकटवली होती. शेजारी आरश्या समोर मेकअप साहित्य ठेवलं होतं. सर्व वस्तू व्यवस्थित ठेवल्या होत्या. खोलीच्या मध्यभागात भिंतीला लागून एक टेबल व खुर्ची टेबलावर ठेवली होती. टेबलावर काही पुस्तके ठेवलेली होती . बहुतेक ती मॅडमची वाचायची असणार , किंव्हा कॉलेज मध्ये शिकवण्याच्या अभ्यासक्रमाची असणार.. भिंतीवर राधा कृष्ण यांचं पोस्टर लागलेले होते. खिडक्यांना पडदे लावण्यात आली होती. मॅडम ला झोपण्यासाठी एक बेड टाकलेला होता. अगदी नीटनेटकी अशी ती खोली होती. पाहून झाल्यावर मॅडम,
" आपण निघुयात का??? म्हणतं मी बाहेरचा रस्ता धरायला लागलो.
तेवढ्यात छाया मॅडमनी मला ओढत ओढत रूम मध्ये नेले. मी फसलो , माझं काही खरं नाही, म्हणून मी घामाघूम झालो. मी नाही ~~~नाही म्हणत होतो तरी त्यांनी जबरदस्तीने मला त्यांच्या बेडवर बसवले. मॅडम माझ्या समोरच खुर्ची घेऊन बसल्या . मी तर काय करावं सुचत नव्हते.
मी छाया मॅडम ला म्हणालो ,
" हे असं वागणं बरं नव्हे. चला मी निघतो. झालं आता घर पाहून!!! तेवढ्यात मॅडम ने माझा हात पकडला, आणि खाली बसायला लावले.
आणि माझ्याशी बोलायला सुरुवातकेली.
" अमर सर , तुम्ही मला खूप आवडता!! मी या अगोदर सुद्धा तुमच्याशी या विषयांवर बोलण्याचा प्रयत्न केला . तुम्ही मला प्रत्येकचं वेळी टाळत आला. पण आज मला तुमच्याकडून उत्तर हवे आहे ."
" माझ्यात काही कमी आहे का ???? की मी दिसायला सुंदर नाही का??? की तुमच्या मनात कुणी दुसरी आहे ???? मला तुमच्याशी लग्न करायचा आहे. त्यामुळे मला तुम्ही उत्तर द्या !!!!"
छाया मॅडम डोळ्यांत अश्रू आणत भावून होऊन म्हणाल्या. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागलो.
" तसं वैगरे काही नाही मॅडम. पण मला कुणाशीचं लग्न करायचं नाही. आणि सध्या ही वेळ, हा विषय बोलण्याची नाही. तुमच्या घरचे काय म्हणतील??? म्हणून मी विषय वळविण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि हो मॅडम मी तुम्हाला कधी त्या नजरेनेही पाहिलं नाही. त्यामुळे हा विषय आपण इथेचं थांबवलेला बरा. तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त केल्या, मी माझं उत्तर सांगितले, त्यामुळे कुणाला काही एक माहिती पडणार नाही!!! म्हणून हा विषय इथेच बंद करायला हवा!!!.
पण छाया मॅडम समजण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. काही केल्या त्या मला जाऊ देत नव्हत्या. मला लग्न का करणार नाही??? याचं उत्तर हवे म्हणून त्या अडून बसल्या. मी मात्र पूर्ण घाबरून गेलो होतो. धडधड वाढली होती. काय करावे समजत नव्हतं. वरून खोलीमध्ये बराचं वेळ झाला होता, दोघेचं होतो, त्यामुळे अधिकच भीती वाटू लागली. आता माझी सुटका केलीचं पाहिजे म्हणून मी म्हणालो, माझ्यापेक्षा लहानचं असल्याने,
" छाया तू अशी करू नकोस!!! तुझ्यासाठी माझ्यापेक्षा बरीच चांगली स्थळे येतील. माझ्याकडे ना गाडी, ना बंगला , ना राहायला चांगले घर, त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही !!!"
असा समजवण्याचा निष्पळ प्रयत्न मी करू लागलो. पण छाया जिद्दीला पेटली होती.
मी तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतांना , तिच्या खांद्यावर हात ठेऊन मी तिला या मानसिकतेतून जागे करण्याचा प्रयत्न करू लागलो तोच छाया च्या साडीचा पदर , खाली घसरला .वयात आलेले उभार, छातीचा भाग माझ्या नजरेस पडला. मला लाज आल्याने मी आपली नजर बाजूला वळविली, पण छाया ला याचं काहीचं वाटतं नव्हतं. उलट ती म्हणाली,
" तुम्हांला मी शारीरिक रूपाने हवी असेल तरी चालेल, पण तुम्ही माझ्याशी लग्न करा??? म्हणून ती विनवणी करू लागली.
झालं !!!! जे नव्हतं घडायचं तेच घडलं. ते म्हणतात न, चुकीचा वेळ असल्यावर आपलं खर ही खोटं वाटायला लागते, आणि खोट सुद्धा खरं म्हणून खपवल्या जाते. तेवढ्यात मी बेडवर बसून , छाया खुर्चीवर बसून, तिच्या डोळ्यांत आसवे, आणि तिचा छातीवरून खाली घसरलेला पदर , सोबतचं माझे तिच्या खांद्यावर हात, हा सर्व प्रकार तिच्या मोठ्या भावाने बघितला!!!! त्याला हे सर्व बघून चीड आली.
मी काही बोलायच्या आतचं, छाया म्हणाली , " दादा ~~~ दादा , अमर सर माझ्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करीत होते . मी त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होते, पण सर मला सोडायला तयार नव्हते!!!"
असं रडत रडत छाया सांगते .
आता मात्र गणित उलट फिरले होतें. वेगळाच चित्रपट आता सुरू झाला होता. या चित्रपटात मीच हिरो होतो आणि व्हिलन सुद्धा मीच झालो होतो. छायाच्या नजरेत आतापर्यंत मी हिरो होतो, म्हणून लग्नाची सारखी मागणी घालत होती. पण तिच्या भावाला हे दृश्य दिसताचं त्याच्या नजरेत मी व्हिलन ठरतो. मी आता फसलो होतो. कुणी ही माझी बाजू घेण्यासाठी कोणीही तयार नव्हते . वर असणारी सर्व मंडळी काय झालं ???? म्हणून खाली पहावयास आली होती. सर्व माझ्याकडे संशयित नजरेने बघत होते. ती छाया मात्र अजुनही रडत होती . नाटकी अश्रू आणून ती खरी असण्याचा प्रयत्न करू पाहत होती.
खाली आलेले सर्व नातेवाईक घरची छायाला विचारत होते की, काय घडलं??? तू का रडत आहेस??? सर्व बाजूलाच शांतता पसरली होती. मी खाली नजर घालून मनातल्या मनात विचार करत होतो की , छायाने तिच्या भावाला , घरच्यांना खोटं बोलून माझी बदनामी कशाला करायला हवी???तिने स्तर
छाया नें तिच्या प्रेमाचा , लग्नाचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला , मी फक्त तिला नकार दिला, आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करत होतो. प्रयत्न करत असतांना छायाच्या साडीचा पदर, जो खांद्यावर होता तो खाली पडला आणि इतक्यात भाऊ आला???? पण छायाला माहिती आहे, की चूक कुणाची आहे!!! तरीही तिने खोटं बोलावे, याचं विचारात होतो.
खरे - खोटे काय आहे ते सांगा लवकर ??? भाऊ तिच्यावर खेकसून म्हणाला , परत तिने आपला खोटा जवाब नोंदवला की, सर माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करीत होते, आणि त्यांच्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न करत होते."
घरच्यांच्या नजरेत दोषी होऊ नये म्हणून की , मग तिला सतत नकार देण्याचा प्रयत्न त्यामुळे तिचं मन दुखावलं गेलं त्याचा बदला म्हणून, की अजून म्हणजे मी तिच्या नंतर शिकवायला येऊन संस्था चालकांनी मला पूर्ण वेळ पगारी प्राध्यापक करण्याची शब्द दिल्यामुळें ते छायाला आवडलं नसावं म्हणून तिने सूड घेण्यासाठी सर्व आरोप माझ्यावर ढकलले असावे, किंव्हा अजून काही इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या विचारात मी होतो. एवढ्यात कुणीतरी पोलिसांना फोन केला . आणि म्हणाला,
" असल्या खालच्या जातीच्या लोकांची हीच लायकी असते . मोठ्या घरच्या पोरींवर यांची नजर असते .पोरी कुणी देत नाही या नालायकांना , म्हणून अजून तरी बिना लग्नाचे राहिलेले असतात . भाड्खाऊ कुठले!!!!! असा आवाज गर्दीतून आला.
पोलिसांना बोलवा म्हटल्यावर, माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली . कुणीतरी कानशिलात मारल्यावर अंगावर जश्या मुंग्या येतात तशाच साऱ्या अंगाला मुंग्या आल्या. सर्व चांगला दिसणारा भविष्यकाळ, पूर्णवेळ नोकरी मिळणार हे स्वप्न आता अंधुक दिसायला लागले. आता आपल्याला चांगले दिवस येतील , हे स्वप्न दूर दूर काळोखात नष्ट होताना दिसू लागले. मी मात्र आता विनवणी करू लागलो,
" मला माफ करा .पण पोलिसांना बोलवू नका. यात माझी काही एक चूक नाही . माझ्या मनात त्यांच्यावर बळजबरी करण्याचा विचारही येऊ शकत नाही. "
पण माझं कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते . सर्वां ना तर मीच दोषी वाटलो होतो. गर्दीतून त्यांचे नातेवाईक जवळ येऊन त्यांनी एक कानशिलात लगावली . आणि मोठ्या आवाजात म्हणाले,
" आमच्या मुली तुला चारित्रहीन वाटल्यात का ??? म्हणे माझा यांत काही दोष नाही !!! मग काय दोष आमच्या मुलीचा आहे??? तिने तुझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला का???? व त्यानेच मला फरफटत नेत पोलिसांच्या ताब्यात दिले. व घडलेल्या प्रकाराबद्दल छाया कडून जवाब नोंदवून घेतला . माझ्यावर बळजबरी , अतिप्रसंग करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आणि मला पोलिस ठाण्यात कोंडण्यात आले.....
क्रमशः....