Janu - 23 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | जानू - 23

Featured Books
Categories
Share

जानू - 23

दृष्ट लागण्या जोगे सारे
गालबोट ही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की
स्वर्ग त्यापुढे फिका पडे..

जानू च आवडत गाणं ..गाण्यात ती स्वतःला व समीर ला त्या हीरो हिरोइनच्या जागी समजून स्वतःशीच हसत होती..पणं तिला कुठे माहित होत ..तिच्या या स्वर्गा सारख्या वाटणाऱ्या आयुष्याला कधीच दृष्ट लागली होती.
समीर च वागणं पूर्ण पने बदलून गेल होत..तो आता ना जानू सोबत नीट बोलत होता ना लवकर तिच्या मॅसेज ,फोनचा रिप्लाय देत होता...जानू काही विचारलं तर कामात होतो,वेळ नाही,खूप बिझी आहे म्हणून तो तिला टाळू लागला होता..

जानू : काल लवकर झोपलास ? बोलला नाहीस ?

समीर : हो ..झोप लागली.

जानू : अरे गूड नाईट तर बोलायचं ना.

समीर : हो का आता काय तुला विचारून झोपत जावू का ?तुला तर काम नसत पणं मला काम असत ना..कंटाळा येतो मग झोपतो ..त्यात येवढं काय मोठा डोंगर कोसळला?

जानू ला त्याचं बोलणं खूप मनाला लागलं पणं आता आपण च शांत राहू म्हणून तिने समझदारी ने घ्यायचं ठरवलं..

जानू : ठीक आहे ..झोप आली की झोपत जा..मी नाही विचारणार परत..

आता प्रत्येक गोष्टीत जानू ला जाणीव होवू लागली होती की समीर टाळत आहे आपल्याला पणं तिचं प्रेम त्याच्या अशा वागण्याने खूपच वाढू लागलं होत ..समीर ला गमावण्याची भीती मनात घर करून गेली होती..ती जमेल तितकं समीर सोबत वाद होवू नये याचा प्रयत्न करत होती ..पणं सार उलट च होत होत..काय करावं हे तिला ही कळेना झालं होत..आपल कुठे चुकत आहे का याचाच विचार ती दिवस रात्र करू लागली होती.
समीर ही लहर आल्यासारखं कधी तिच्याशी छान बोलायचा तर कधी रागा शिवाय आणि वादा शिवाय काही नसायचं त्यांच्या बोलण्यात .
जानू बोलली नाही की ..विसरलीस का म्हणायचा ? आणि बोलायला लागली की ..तुला काही काम नाही का पाहत तेव्हा बोलूच वाटत का तुला ? बोलावं की नाही बोलावं हे ही जानू समजू शकत नव्हती.

जानू : समीर ,माझं काही चुकत आहे का ? असेल तर सांग मी मी नाही वागणार अस ज्याने तुला राग येईल.

समीर : तुझं नाही चुकत ग..माझंच चुकलं..?

जानू : काय ?

समीर : काही नाही..बर सेमीस्टर ची तयारी कशी चालू आहे ?

जानू : ठीक ..

समीर : फक्त ठीक ? हो ठीकच असणार ..लक्षच कुठे असत पहावं तेव्हा बोलत असतेस..

जानू : अरे अस का बोलतोस ? मी करतेय ना अभ्यास ..आणि प्रेम आहेस तू माझं ..तुझ्या सोबत नाही बोलणार तर कोणा सोबत बोलू ?

समीर : झालं का सुरू ? प्रेम ,प्रेम ,प्रेम ..या शिवाय काही नाही का तुझ्या आयुष्यात ?

जानू : आहे ना पणं सर्वात आधी तू नंतर सर्व काही.

समीर : काय हे पागल पणं ? स्वतःच अस काही आहे की नाही ..की फक्त मीच ? अग तू तुझ्या भविष्याच्या काही विचार केला आहेस की नाही ? स्वतःच्या पायावर उभा राहायचं करीयर करायचं ?

जानू : हो ..त्या साठीच चालू आहे ना स्टडी आणि माझं ही स्वप्नं आहे स्वतःची ओळख निर्माण करायची..पणं त्यात मला तुझी साथ हवी.

समीर : पाहिलं तर प्रत्येक गोष्टीत मला गृहीत धरून चाल न बंद कर..आणि स्वतःच्या करीयर कडे लक्ष दे..
मला हे इमोशन ,प्रेम प्रेम करणं अजिबात आवडत नाही.चीड येते मला तुझी अशाने ?

जानू : काय ? माझ्या प्रेमाची चीड येते तुला ?

समीर : हो ..नुसता प्रेम प्रेम मला तर वाटतं त्याशिवाय तुला काही येतच नसेल..

जानू तर समीर च बोलणं ऐकून तुटुन च गेली ..आपण ज्याला सर्वस्व मानतो त्याला आपल्या प्रेमाची च चीड येते ? खूप रडू कोसळत होते तिला..

जानू : ठीक आहे समीर मी जास्त लक्ष देईन स्टडी कडे ..पणं तुझ्यावर प्रेम करणं सोडण मला जमणार नाही.

समीर : बर आहे ..तुझी मर्जी तुझी लाईफ..

त्याचं बोलणं ऐकून आता मात्र जानू चे अश्रू आनावर झाले ..तुझी लाईफ ? माझी लाईफ माझी एकटीची कधी पासून झाली ..? समीर शिवाय काय आहे लाईफ ?मी तर कधीच समीर शिवाय माझ्या लाईफ ची कल्पनाच केली नाही..आणि तो इतक्या सहज कसं बोलला ..तुझी लाईफ..
जानू समीर ला फोन लावते..

समीर : काय झालं आता तर बोलत होतो ना मॅसेज ने लगेच फोन का ?

जानू : समीर तू काय बोललास ? तुझी लाईफ तुझी मर्जी ?

समीर : हो मग

यावर जानू फोन वर रडू लागते..

समीर : झालं का चालू तुझं रड गाणं ?तू रडणार असशील तर मी फोन ठेवतो ..मला असल अजिबात आवडत नाही .

जानू : नको फोन नको ठेवू म्हणत जानू शांत होते..पणं समीर तू अस का बोललास? तुझी लाईफ ? अरे तुझ्या पेक्षा वेगळी आहे का माझी लाईफ ? आपली लाईफ आहे ही..

समीर : तू इतक्या पुढचा विचार का करत आहेस ? ते पुढच्या पुढे पाहता येईल .. आता स्वतःच्या स्टडी कडे लक्ष दे.

जानू : हम्म..

जानू आपल्या परीने सर्व सावराय चा प्रयत्न करत असते पणं सर्व जस हातातून निसटून चाललं आहे अस तिला वाटू लागलं होत ..इतकी काळजी घेणारा समीर अचानक असा का वागू लागला ? खरंच जग असच असत का ? आणि मुल ही सगळी समीर सारखी च असतात का ? आज आपण रडलो तरी त्याला त्याचं काही वाटत नाही ..हीच होती का त्याची काळजी ? काय करावं मी म्हणजे समीर पहिल्याच समीर होईल ? एक ना हजार प्रश्न आणि विचारांचं थैमान जानू च्या डोक्यात सुरू होत.

क्रमशः