Mhatarapan - 4 in Marathi Short Stories by Kavi Sagar chavan books and stories PDF | म्हातारपण - 4 - विधवा

Featured Books
Categories
Share

म्हातारपण - 4 - विधवा

आठ वाजता उघडणार बिऊटीपार्लर आज साडेनऊ झाले तरी उघडत नाही. सुलभाची तळमळ रिया पाहत होती. कायग"" सुलभा आज बिऊटीपार्लर उघडत नाय.. बहुतेक जीजू नाराज होणार, आज काही तुझी जादू नाही चालणार ""!

ए "!गप्प बस तू '!

ओके ओके माझ्यावर राग काढून काही होणार नाहीये. म्याडम ""

सुलभा दिवाळीत माहेरी आलेली भाऊबीज होऊन हप्ता होऊन गेला. कालच तिला नवऱ्याने फोन करून कळवलं उद्या घेयला येतोय.

जेवण आवरली.. सगळ्यांचा निरोप घेऊन सुलभा नवऱ्यासोबत सासरी गेली. नवरा सोज्वळ आणि संस्कारी मिळाला तस पाहिलं तर आयुष्यात कुठलीही कमी नव्हतीच सुखा समाधानाचा संसार होता.

काहीच महिने झालेत लग्न होऊन त्यामुळे प्रेम हळूहळू दोघांच्या प्रेमळ सहवासात बहरत चालले होते.

सुलभा ने अपेक्षे प्रमाणे घरात सर्वाना आपलंस करून घेतलं .. जाणूकाही ती याच घरातली एक आहे. माहेर.. आपोआप परक होत गेलं. सणवार असले कीं मग जाण होत असे. सुलभा ला माहेरी करमत नव्हतं कधी एकदा घरी जाते .. मनाची चलबीचल होत असे .

लग्नाला एक वर्ष होऊन गेले. सासूबाई ची आता नातवाला पाहण्याची घाई झाली होती . सुलभा आणि तिचा पती .. दोघांना इतक्यात मुलं नको होते. नव्या प्रेमाची नवी नावालई होतीच … हिंडने, फिरणे, चित्रपट पाहने ..दोघाना एकमेकांच्या सहवासाची ओढ असायची. . एकूण सर्व आंनदात चाललं होत.

एका दिवशी अचानक थिंनगी पडली.. ती हळूहळू पेट घेत.. सुलभाचा संसार उध्वस्त होत गेला.

देवघरात पूजेला बसलेली सासूबाई ..चे मंत्रउच्चार पूर्ण घरात ऐकू येत होते. सुलभा सासर्यांना नास्ता देऊन आली . घरातली राहिलेली कामे उरकून घेऊन मग सासूबाईसोबत नास्ता करूया.. उन्ह होत आले होते .. साडे नऊ ला सासरे शेताकडे निघतात त्यांना डबा द्यायचा होता. . सुलभाला आज खूप अस्वस्थ वाटत होत. काही प्रमाणात चक्कर येऊ लागले. गेल्या दोन तीन दिवसापासून असं होत. खरं तर सांगावस वाटल हीं . कामाचा ताण आल्याने दगदग झाली.. होत असेल . म्हणून टाळाटाळ केली..

सुलभा ग्लानी येऊन पडली. समोर असलेल्या ओट्या जवळच एक मोठा दगड होता.. त्यावर पडत असता तोल गेला.. नशीब जास्त दुखापत झाली नाही. ..

गेले दोन दिवस डॉक्टर बोलले म्हणून अराम करावा लागला. दोन दिवस सून अराम करते म्हटल्यावर .. घरातली सगळी कामे सासूला करावी लागणार त्यामुळे सकाळ पासून भांडी आपटण्याचा आवाज येत होता. सुलभाला हीं तस गिल्टीफील झालं. तिबेत ठीक नसल्याने शेवटी अराम करावाच लागणार होता.

सुलभाच्या मागे मात्र आता दुःख .. वागणे लागलं

दोन वर्ष झालेत सुलभाला दिवस राहिले नाहीत..सासूचा द्वेष वाढत चालला… सुलभा ला जगणं कठीण होत गेल.प्रत्येक दिवस मन मारून जगणं नशिबी आलं..

लग्नाच्या दिवशी दिसणार सौंदर्य.. कमी होऊ लागलं. काळजी ने डोळे सुजू लागले. शरीर सुकू लागलं.. अर्ध शिशिचा त्रास वाढला.

दिवस दिवसभर उपाशीच राहू लागली. जेवणाची इच्छा मरून गेली.

रोज सासूचे घालून पडून बोलणे नवऱ्याचा तिरस्कार .. यामध्ये सुलभाची घालमेल वाढू लागली होती.

मित्राना मुलं झाली .. त्यामुळे सुलभाचा नवरा अस्वस्थ असायचा अशातच तो दारू प्यायला लागला . दिवसेंदिवस दारू पिण्याचे प्रमाण वाढत चालले होते. सुलभा नशिबाला दोष देत राहीली आणि सासू सुलभा ..

घरातली शांती पूर्ण भंग झाली. रोज काहीतरी कारण असायच रोज वादविवाद होत राहायचे. आयुष्याने एक एक रंग दाखवन्यास सुरवात केली ..

घरात जेव्हा आपलीच माणसं आपल्या विरोधात असतात.. तेव्हा आपली हार निश्चित असते.

सुलभाहीं आता रोजच्या वादात हरत होती. कधीतरी आयुष्य सुरळीत होईल. या अशेने जगत दिवस काढत .. संसाराचा गाडा रेटू लागली.

नवरा बायकोचे समंध बिघडत चाललेले सुलभा नवऱ्याच्या प्रेमापासून वंचित होती. त्यात दारूमुळे लिव्हर ला सूज यायची .. नवरा त्रास द्यायचा तरीही त्याच्या प्रेमापोटी सगळं सहन करून त्याला आधार घ्यायची. महिन्यात कितीतरी वेळा त्याची तबीयत ठीक नसे .. तो जगावा निदान आपल्या कपाळावर कुंकू असावा . प्रेम तर कधीच पारख झालं . त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जात. नवरा मात्र पुन्हा दारू पिऊन तर्रर्र.. असायचा ..

सुलभाच्या जीवनाची खूपच कठीण परीक्षा होती.

काळजी घेऊनहीं शेवटी तेच झाले… " जे नियतीने ठरवून ठेवलेल होत. संद्याकाळी खूपच दारू पिऊन रस्त्यावर पाडलेला नवरा .. घेऊन मित्र घरी आले. सुलभा ने स्वयंपाक आवरून सासू ला जेवण दिले. नवरा उठण्याची वाट पाहत ररात्रीचे दोन वाजले .. त्याला शुद्ध नव्हती. बिचारी उठवन्याचा प्रयत्न करत उपाशीच झोपली.

सकाळी सहाला जाग आली .. नवरा अजून झोपला होता . सकाळी चांगले सात वाजले तरीही उठत नाही म्हुणुन पुनः उठवन्या साठी आत गेली..

नवरा केव्हाच मरण पावला होता.

सुलभा कोलमंडून गेली.. एकच हंबर्डा.. सासू आत आली.. सगळं संपलं.. सुलभा रडत राडत बेशुद्ध झाली.

सुलभाला खूप मोठा धक्का लागला. जगणं पोरक झालं.

सुलभाला शुद्ध आली ती हॉस्पिटल मध्ये नवऱ्याला अग्नीडाग दिल्या गेला होता . आज दोन दिवस झालेत. सुलभाला हे सत्य सांगण्याची हिंमत मात्र कुणाला होईना . तिची अवस्था खूपच नाजूक होती. आईला सांगून तिला माहेरी पाठवलं गेल. सुलभाचा नवरा मरण पावला असला तरी अजूनही कपाळावरच कुंकू असच होत. मंगळसूत्र गळ्यात दिमाखात झुलत होत. हातातल्या बांगडया.. त्यातुन निघणारे स्वर तसेच होते.

हॉस्पिटल मधून सुलभा आई सोबत माहेरी आली.

इकडे दहावा, तेरावा सर्व विधी करून झालेत. मात्र सुलभा अजूनही अभिज्ञ होती.

आज सुलभा ला माहिना झाला माहेरी येऊन तिबेत सुधारली होती. तिने सासरी जाण्यासाठी इच्छा व्यक्त केली . तीला कुठे माहित होत? तिच्यासाठी सासरचा रस्ता केव्हाच बंद झालाय म्हणून "!

सकाळ झाली माणसं शेताकडे जात होती. नुकताच पावसाचा फटाका येऊन गेला. शेतकरी पेरणीची तयारी करू लागली होती.

आईला मदत केली आई शेतात निघाली . काही वेळ आराम करून सुलभा उठली तेव्हा दुसरा पहार झालं होत. अंघोळीला जावं असं वाटलं म्हणून !बाहेर ओट्यावर भरलेली टाकी नजरेस पडली . आधी अंघोळीला जाते म्हणजे अंग हलक होईल. मोरीत पाणी टाकलं.

अंगावरची साडी दोरीवर काढून ठेवली . ब्लाउजची बटन काढून दोरीवर टाकून दिले… अरे हे काय ?? अंग किती काळापटलय कींती दिवस झालेत व्यवस्थित अंघोळ केली नाहीये .

मध्येच आठवण झाली आपण दरवाजा उघडाच सोडलंय ! जाऊन दरवाजा बंद केला. आता आपण मनसोक्त अंघोळ करू ""!

तांब्या भरून अंगावर पाणी ओतल पाण्याचा गारवा अंगात भिंनला तशी थोडी स्पुर्ती जाणवू लागली.

अंघोळ करत असताना एक एक अंगाला स्पर्श होत होता. थोडी उत्तेजना जाणवू लागली तशी नवऱ्याची आठवण झाली. खूप दिवस झालेत आपण माहेरी आहोत.. नवऱ्याचा स्पर्श कधी झाला होता आठवू लागली… नक्की काहीही आठवत नव्हत.

अंघोळ उरकून साडी नेसली. आणि पुन्हा खाटीवर स्वतःला झोकून दिल. आज रिलॅक्स वाटत होत.

सुलभाच मन लागत नव्हतं "! नवऱ्याची आठवण येत असल्याने पडल्या पडल्या विचारात हरवली !

लग्न झालं त्यावेळी .. एकमेकांना दोघ खूप जपत होते, सुलभाच लग्न झालं तेव्हा .. एकमेकांना चोरून बघायचे पूर्वीचा तो काळहीं तसाच होता. लग्न जमलं कीं दोघाची भेट लग्न मंडपात होत असे. त्याआधी भेटायचा आणि बोलण्याचा योग येतच नव्हता. मोबाइल नसल्याने लग्नाआधी गप्पा मारणे हीं तसे कठीण होते. सुलभा घरात आली सत्यनारायण पूजा, कुलदैवतेला भेट वैगरे सगळे विधी आवरले होते. पाच दिवस उलटून गेले. तरीही कोणीही एकमेकांना बोलेना. दोघाची अवस्था सारखीच होती. फक्त एकमेकांना चोर नजरेन पाहणं सुरू होत. सासू सासरे बाहेर ओट्यावर बसले होते. सुलभा जेवणाची तयारी करू लागली. नवरा शेतातून आला त्याची नजर तिलाच शोधत होती. आत येऊ शर्ट काढून खुंटीवर टांगला सुलभा ने तांब्या आणून दिला .. तांब्या घेत असताना त्याचा अलगद स्पर्श तिच्या बोटांना झाला.. छातीची धडधड वाढली..मान खालीच होती. तशीच लाजून चुलीजवळ जाऊन बसली. नवऱ्याने .. घटाघटा तांब्यातल पाणी संपवलं आणि बाहेर निघून गेला. बोलायचं दोघांना पण सुरवात कोणीही करत नव्हतं. सुलभाच्या प्रेमाच पुस्तकं .. त्याच एकेक पाण हळूहळू पलटत चाललं.. संसारात प्रेमाचा सुंगध दरवळू लागला होता.

जेवण आटोपली आणि पाण्याचा तांब्या व ग्लास घेऊन निघाली.. दरवाजा जवळ मात्र.. तिचे पाय चिकटून गेले त्या मधूचंद्राची लज्जा चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती. कशीबशी धीट मनाने आत गेली. सुलभाचा नवरा शेतकरी काळया मातीत कसलेला .. रात्रीच्या प्रकाशात त्याच काळ पीळदार शरीर शरीर तिला वेड लावत होत. शरीरात प्रेमाचे तरंग जाणवू लागले.. उशाला काही अंतरावर पाणी ठेवून .. अंथरुणावर बसली घरातला झिरो बल्ब चालू होता. डाव्या कुशीवर नवऱ्याकडे पाठ करून झोपली .. मनात प्रश्नाचे काहूर माजले होते.. मिलनाची उसूकता शिगेला पोहचली..भीतीने ती रात्र तशीच गेली.

सुलभा उठली तेव्हा नवरा झोपलाच होत. अंघोळ आवरून साडी नेसताना… नवरा जागा झाला ती पाठमोहरी उभी असल्याने तिला कळल नाही. तो तिच्या मागे उभा असलेला तिला जाणवलं.. काय कराव काहीही सुचत नाही..त्याचा स्पर्श तिलाहीं हवाय .. मन तरीही पळवाट शोधत होत. सारखीच जीवाची घालमेल होत होती..

पण आठवलं कीं दोघांना खूप हसू यायच. ¡¡¡

नवऱ्याच्या आठवणीत संद्याकाळ केव्हा झाली समजलं नाही. आईला दारात बघून .. चहा बनवायला घेतला. . आईच्या चेहरा काळजीने पडला होता. मुलीच्या भविष्यात काय लिहून ठेवलं देवाने कुणास ठाऊक .. का













परीक्षा घेतोय लेकराची. आईला चहा देऊन सुलभाने आईला विचारलं.. खूप दिवस झालेत आता माझ्या गावी जायला हवं.. आईला मात्र काहीही सुचेना आता काय सांगावं आपण??

नवरा गेला . तू रंडकीं झालीस "!!तूझ्या सासूने इस्टेटीतुन बेदखल केलय.. सासरचा रस्ता हीं बंद झाला. केव्हाच "!

आईसाठी मुलीला सत्य सांगन कठीण होत.. आणि सुलभाला ते पचवन.. एक दिवस सांगावं लागणार.

होत. शेतीच्या कामाचं निमित्त सांगून वेळ निभाऊन गेली.

आज सुलभा हीं शेतात आली होती.. सोबतीला काही बाया होत्या.. शेतात खुरपायला आलेल्या त्यांच्या मदतीने सुलभा ला सत्य सांगायचं आईने ठरवलं.. दुपारी जेवणाची वेळ झाली आंब्यांच्या झाडाखाली सगळे बसलेत.. आणि सांगण्यास सुरवात केली.

सुलभा ऐकत होती… इतकं सगळं घडून गेलं आणि आपल्याला माहित नाही. नवरा गेला तेव्हा हॉस्पिटल मधें होतो. त्याच अंतिम दर्शन हीं झाल नाही आपल्याला..

सुलभा रडत होती…."! रडता रडता दातखिळ बसली..

जेवणाचे डबे तसेच घरी आले… "!!!

त्यानंतर स्वतःला सांभाळून घेत जगू लागली.. कालपर्यंत पाठीशी असलेले आई बाप देवाघरी गेले. भावाचं लग्न झाल. काही दिवस भावात राहिली.. भावजइ सॊबत पटेना .. पण सुलभाला आता भावाचा आधार होता… भावजय काही जमू देईना .. भावाने बाजूलाच राहायची सोय केली.

आधी भाऊ दुःखात सुखात हजर होत असे. बायकोला न माहिती करता खरंचायला पैसे देत..

माहिती झाले कीं घरात भांडणे व्हायची.

त्यामुळे सुलभाने म्हातारंपणात हिमतीवर वेगळं राहण्याचा विचार केला. रोज दिवस उजाडला कीं शेतात कामाला जात.. आणि रात्री घरी स्वयंपाक करून मीठ मिरची.. असेल ते खात.. जगू लागली.

सुलभाला सगळे असून परकी होती .

आज सुलभाच वय झालंय.. तरीही हिमतीवर आयुष्य जगते..

माणसाचं आयुष्य खुपचं गुंतागुंतीच आहे . तेंच कदाचित परिस्थिती प्रमाणे जगण्याच आणि लढण्याचं सामर्थ्य निर्माण करत .

सुलभा ही आता सामर्थ्यवान बनत आपलं आयुष्य जगु लागली ..!"