Marriage Journey - 8 in Marathi Love Stories by सागर भालेकर books and stories PDF | लग्नप्रवास - 8

Featured Books
Categories
Share

लग्नप्रवास - 8

लग्नप्रवास - ८

रोहन मात्र तिची आठवण काढता काढता झोपी गेला तेवढ्यातच त्याच्या मोबाईल ची रिंग वाजली. फोन पोलीस स्टेशन मधून होता.पोलीस स्टेशन मधून फोन आलेला कळताच रोहन एकदम खडबडूनजागा झाला आणि त्याने पोलिसांना प्रीती मिळाल्याचे सांगितले. हे ऐकताच रोहनने लगेचच पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. रोहन एकदाचा पोलीस स्टेशन मध्ये आला आणि प्रीतीला बघताच त्याने तिलाजोराची मिठी मारली.

कळतच नाही कधी मनाशी मन जुळत,
पाहता पाहता प्रेमाचं फुल खुलत,
येताच कोणी आयुष्यात,
आयुष्य वेगळ्याच वळणावर वळत,
अन आयुष्यभर साथ देण्यासाठी,
आपल्याला ही कोणी तरी मिळत,
प्रितीने सुद्धा रोहनला कडकडून मिठी मारली, दोघांनाही पोलीस स्टेशनमध्येच रडण्यास सुरुवात केली. शेवटी प्रितीने रोहनला सांगितले कि, कशा पद्दतीने प्रीती पोलीस स्टेशनला पोहचली ते.

दोघांची आनंदांत रात्र निघून गेली. तेव्हाच रोहनच्या फोनची रिंग वाजली.रोहनने फोन उचलला.

रोहन: हॅलो, कोण बोलत आहे आपण?

टूर मॅनेजर: रोहन देशपांडे तुम्हीच का.तुम्ही मधुचंद्र ट्रॅव्हल्स मधून हनिमूनच package घेतलं आहे ना महाबळेश्वरच्या ट्रीपसाठी.

रोहन: हो.

टूर मॅनेजर: त्या संदर्भात मला काही बोलायचं आहे. तुम्ही मला थोडा वेळ देऊ शकाल का?

रोहन: हो, बोला ना.

टूर मॅनेजर: उद्या तुम्हला आमची एक गाडी तुम्हा दोघाना हॉटेलवर घ्यायला येईल. फक्त एक प्रॉब्लेम आहे. तुमच्यासारखेच अजूनही काही लोक तुमच्याबरोबर फिरणार आहेत. तर तुम्ही त्यांच्याबरोबर गाडीमध्ये comfortable असाल का?

रोहन: ठीक आहे. किती लोक आहेत आणि किती सीटरची गाडी आहे.

टूर मॅनेजर: सर, ४ ते ५ सीटरची गाडी असणार आहे. तुमच्या बरोबर गाडी शेअर करताना अजून दोन व्यक्ती असतील. तर तुम्हला चालेल का.

रोहन: ठीक आहे.

टूर मॅनेजर: धन्यवाद. उद्या तुम्ही सकाळी १०च्या आत नाश्ता करून रेडी राहा. आमची गाडी हॉटेलच्या गेटपाशी उभी राहील.तुम्ही वेळेत या.

रोहन:थँक्स.

दुसऱ्या दिवशी सकाळी रोहनने मोठ्या आवडीने कुर्ता घेतलेला तो प्रितीने मोठ्या हौशीने घातला. तिने जो कुर्ता परिधान केलेला त्यात ती खूप गोड दिसत होती. रोहनने प्रीतीला सुंदर दिसण्याचा इशारा केला आणि बोलला " तुझ्यावर हा कुर्ता खुप खुलून दिसत आहे." त्याला प्रीती म्हणाली, म्हणजे काय दिसणारच खुलून, एवढ्या प्रेमाने जो दिलाय तुम्ही मला. ह्यावर हसून रोहन आणि प्रीती दरवाज्याला कुलूप लावून नाश्त्यासाठी गेले.

प्रेम म्हणजे काय असत

त्याने हसून एकदा तिला विचारले

प्रेमा मध्ये फुलतात रंगीन फुले

प्रयत्नाने होतात सारे मार्ग खुले

त्याला नि तिला हवा असतो सहवास

सुखाचा एकांत आणि प्रेमाचा सुहास

प्रेम म्हणजे जीवनभरची साथ

जणू निर्जन वाटेवर आधाराचा हात

प्रेमात हसणं सगळ्यांनाच जमत नसतं

कारण प्रत्येकाला ते सुख मिळत नसत.

नाश्ता करता करता प्रीतीच्या फोनची रिंग वाजली. प्रीतीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. अरे! बाबाचा फोन. प्रितीने दोघेही आम्ही आनंदित आहोत अशी खुशाली सांगितली. नाश्ता करून रोहन आणि प्रीती बाहेर पडताक्षणीच गाडी पार्किंग लॉट मध्ये गाडी पार्क करून त्या दोघांचीही वाट बघत ड्राइवर उभा होता. तितक्यात ड्रायव्हरने रोहन देशपांडे म्हणून हाक दिली. रोहनने हात दाखवत त्याला इशारा केला. येत आहोत म्हणून. आणि दोघेही गाडीत बसले. दहा मिनिटांनी ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि सांगितले ह्याच हॉटेलमधून काही अजून लोक तुमच्या बरोबर प्रवास करायला येणार आहेत.समोर बघताक्षणीच अजून रिकाम्या दोन गाड्या उभ्या राहिल्या. दहा मिनीटांनी सर्व जण आले आणि त्या दोन गाड्यामध्ये विभागून बसले आणि शिल्लक राहिलेले दोन जणांना ड्राइव्हरने रोहन आणि प्रीतीच्या गाडीत घेतले. आता त्याच्या सफरीला सुरुवात झाली. तेथील रस्ते नागमोडी वळणाचे आणि डोगराळं होते असे वाटत होते जणू आकाशपाळण्यात बसल्यासारखेच वाटत होते. प्रीतीच्या बाजूला आजी बसलेली. आणि गाडी डावे उजवे वळण घेऊन भरदार वेगाने जात असल्याकारणाने सर्वाचा तोल जात होता. सारखी ती आजी प्रीतीकडे रागाने पाहत होती. प्रीती म्हणाली आता गाडीचं नागमोडी वळणाने चालली आहे.

पहिलं ठिकाण महाबळेश्वर मंदिर होत. दोघेही गाडीतून उतरून दर्शनास निघाले. ते मंदिर थोडं उंच होत आणि चालत जाताना तीन रस्त्याच्या दुतर्फा छोटी छोटी दुकान होती. दुकान बघत बघत ते मंदिरात पोचले. ऐतिहासिक नोंदीनुसार महाबळेश्वर मंदिर 1215 मध्ये बांधले गेले. या मंदिरात शिवाचा पलंग, डमरू आणि त्रिशूल असून ती अंदाजे ३०० वर्षे जुनी होती.महाबळेश्वर मंदिराच्या बाजूला रामदासी मठ आहे. हे सर्व बघून झाल्यावर दोघेही गाडीत येऊन बसले. त्यानंतर प्रीतीला ड्रायव्हरचा आवाज ऐकू आला म्हणून तिने खिडकीबाहेर डोकावून बघितले, बघते तर काय आजीबाई ड्रायव्हरचे कान भरत होती. हे दोघेही प्रत्येक वेळी एकत्र का बसतात. आम्ही जसे तीन गाड्यामध्ये विभागलों आहोत. तसेच त्यानाही विभक्त करा. हे प्रितीने रोहनला सांगितले, तेव्हा तिच्या बोलण्याकडे कानाडोळा करत त्याने घरी फोन लावला. आणि घरची खुशाली विचारली.

दहा-पंधरा मिनीटांनी सर्व जण दर्शन घेऊन आपापल्या गाडीत बसत होते. तेवढ्यात ड्रायव्हरने खिडकीवर knock करत दरवाजा उघडण्यास सांगितले. सर, तुम्ही पुढे बसाल का. असं आजीच म्हणणं आहे. तेव्हा रोहन बोलला, ठीक आहे. हे ऐकताच आजीने ड्रायव्हरला इशारा केला. नाही म्हणून त्या दोघांनाही वेगवेगळ्या गाडीत बसायला सांग. असं सांगून माझी मोठी लेक इकडे बसणार आहे असे कारण दिले. ड्राइवर रोहनला म्हणला, सर तुम्ही वेगळ्या गाडी बसतात का? तेव्हा रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. तो गाडीमधून बाहेर आला.

"हे काय चाललंय तुमचे? एकतर आम्ही गाडी शेअर केली आहे." त्यानंतर तुम्ही पुढे बसायला सांगितले आणि आता बोलत आहेत वेगळ्या गाडीत बसू मी. आणि माझी बायको ह्या गाडीत. हे कस शक्य आहे. पैसे दिले आहेत फुकट प्रवास नाही करत आहेत. तुमची मनमानी चालणार नाही. आम्हला आताच्या आता हॉटेलवर सोडा दोघाना.हा आवाज ऐकताच मुख्य ड्राइवर पुढे आला आणि म्हणला, काय चाललंय? तेव्हा रोहनने घडलेला सर्व प्रसंग सांगितला.

सर्व जण उपस्थित होते तेव्हा मुख्य ड्राइवर म्हणाला, हे बघा हे हनिमून couple आहे. त्यांना वेगवेगळं बसवता येणार नाही. हे ऐकताच सर्वाना त्याची आज्ञा पाळणं बंधनकारकच होत. हे ऐकताच प्रीतीचा जीव भांड्यात पडला आणि तिने सुटकेचा श्वास घेतला. हे सर्व हाताची घडी घालून आजी निमूटपणे बघत होती. तिला तिच्या मुलींनी भरपूर समजावले. तू असं का करतेयस तू. बस ना, थोड्यावेळची तर गोष्ट आहे. पण ती काहीकेल्या ऐकेना. कारण तिला तिच्या माणसांसोबत गाडीत बसायचं होत.शेवटी तिची मुलगी आणि जावई रोहन आणि प्रीतीच्या गाडीत बसायला आले.आणि बसताक्षणीच जावयाने रोहनची माफी मागितली.

"सॉरी, आमच्या सासूबाईमुळे तुम्हला त्रास झाला. काय करणार तिचा स्वभावच तसा."

ठीक आहे. झाले ते झाले. आता ते प्रतापगडाच्या दिशेने त्यांनी वाटचाल केली. शेजारी बसल्यामुळे रोहनने प्रीतीच्या खांद्यावरून हात टाकून आपल्या जवळ घेतले. आणि दोघांनी मिळून सेल्फी काढल्या.

कळीचं फुलणं हा तर तिचाच गुण

वेड्या कवींसाठी मात्र ती प्रेमाची खूण.

पाखराचे बोल कुणासाठी गाणे

कुणी येऊ धुंदी कोणी येई तराणे..

कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद

कुणी शोधे राधा कुणी शोधे मुकुंद...

तुम्हाला आजचा भाग कसा वाटला, मला नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा. भेटू पुढील भागात तोपर्यंत थांबतो.