दुसऱ्या दिवशी जानू कॉलेज मध्ये जाते ..समीर कुठे दिसतो का ते पाहत असते..बराच वेळ समीर दिसत नाही..मग ती क्लास रूम मध्ये जाऊन बसते...अजून लेक्चर सुरू होणारच असतो की क्लास रूम बाहेरून समीर जाताना दिसतो..ती पळतच क्लास रूम बाहेर जाते..
जानू : समीर..
जानू समीर ला आवाज देते त्याला वाटत ती परत बोलण्या साठी च थांबवत असेल..त्याच्या चेहऱ्यावर हलकस smile येत...तो थांबतो.
जानू त्याने दिलेलं फ्रेन्डशिप ब्यान्ड त्याच्या हातात देते आणि याची गरज नाही आता..तुला कोणाच्या भावना कळत नाहीत मैत्री तर काय करशील अस बोलून जाते..समीर ते घेतो पुढे जाऊन जोरात आपल्या हाताची मुठ भिंतीवर आदळतो ..जानू ला ते पाहून खूप वाईट वाटत लागलं का विचारावं ही वाटत पणं तो पर्यंत तो निघून जातो...जानू मात्र त्याचा विचार करत राहते..शेवटी तिचं प्रेम होत तो ..काळजी तर वाटणारच...पणं त्याने बोललेले शब्द पुन्हा आठवतात त स ती शांत होते .
घरी जाऊन पोहलीच होती की पुन्हा समीर चा फोन येतो..अरे याला काय झालं आहे ? का फोन करत आहे आता ? सकाळचा प्रसंग आठवून जानू फोन उचलते आणि फोन नाही उचलला की हा परत काही तर करायचा .
जानू : हॅलो
समीर : काय झालं ? फ्रेन्ड शिप टो.. च.. त होत का हातात ? का दिलं स परत ?
जानू : नकोय मला ते ..
समीर : पणं तूच बोलली होतीस ना कधीच काढायचं नाही हातातून ..स्वतः च बोललेले विसरते स ना ?
जानू : हो बोलले होते पण आता आपल्यात फ्रेन्ड शिप नाही.
समीर : का ? तुम्ही मुली अशाच ग,आता तुला तो भास्कर आवडतो ना ..पाहतेस ना त्याच्या कडे ..
जानू ला त्याचं बोलणं ऐकून खूप चीड येते..याच डोक च फिरल आहे वाटत काही ही काय बडबडतो ..
जानू : किती वेळा सांगू त्या भास्कर ला मध्ये आणू नकोस... आणि मी त्याला नाही पहिलं.
समीर : खोटं बोलतेस तू..मी पाहिलं होत ..तू त्याला पाहिलं होत..
जानू : अरे तो अचानक समोर आला म्हणून काय मी त्याला पाहत होते का ? आणि दिसत तसं नसत.
समीर : म्हणजे तू कबुल केलंस ना की तू त्याला पाहत होतीस ?
जानू : बस हा तुझं खूप झालं ..हजार वेळा मी तेच तेच सांगत बसणार नाही..तुला जे समजायचं ते समजून घे ..पणं खर काही बदलणार नाही.
अस बोलून जानू फोन ठेवते ..ह्या समीर शी आपण आता कधीच बोलायचं नाही काय विचार करतो तो आपल्या बद्दल ..आपलीच बुद्धी भ्रष्ट झाली होती जे प्रेम करायला गेलो .असा विचार करत जानू झोपी जाते.
आता भास्कर जरी बोलायला आला तरी जानू त्याला टाळत होती..तो समीर कुठून तरी पाहायचा आणि परत चालू होयचा त्यापेक्षा नकोच बोलायला कोणा सोबत ..अस तिने ठरवल होत.
शिपाई काका समीर ला शोधत होते ..त्यांना जानू दिसली जानू नुकतीच क्लास रूम बाहेर आली होती आणि त्यांनी तिला सांगितलं .. बेटा जरा समीर कौशिक ला निरोप देशील का की त्याला स्टाफ रूम मध्ये बोलावलं आहे..मला खूप काम आहे माझ्या कडे वेळ नाही. काका पणं मी...ते तिचं ऐकुन न घेताच निघून जातात..हे देवा हे काय ? ज्याच्या पासून लांब पळते य सगळे मला त्याच्या कडे च पाठवायला का पाहत आहेत ? जानू स्वतः च्याच कपाळावर हात मारून घेते..आणि समीरच्या क्लास रूम बाहेर जाऊन उभी राहते ती तिथूनच आवाज देते ..मी .कौशिक ला स्टाफ रूम मध्ये बोलावलं आहे..समीर दाचकतो..जानू आपल्याला मी.कौशिक बोलली? आज पर्यंत तर फक्त समीर बोलत होती ..त्याच्या मनाला ते सलत..ती निघून जाते .आणि समीर पळतच तिच्या मागे जातो आणि तिला गाठतो .
समीर : ये हे मी.कौशिक काय ?.
जानू : मग काय बोलू ?
समीर : समीर बोल ना?
जानू : सॉरी..मी तुझं नाव घेणं सोडलं आहे माझ्या साठी तू आता मी.कौशिकच आहेस.
समीर काही बोलणार इतक्यात जानू च बोलते की जावा..काम असेल बोलावलं आहे त र..अस म्हणून आपल्या क्लास रूम मध्ये जाऊन बसते.
जानू टाळत असली तरी भास्कर बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि जानू मात्र समीर पाहिलं आणि परत काही तरी बोलेल म्हणून घाबरून गार होत असे...आज ही तसच झाल भास्कर बोलला जानू ने त्याला टाळलं पणं समीर ने पाहिलाच..ब्बस ..आज आणि परत हा सुरू होणार ..हे देवा काय चुकी रे माझी ..मी कुठे त्या भास्कर सोबत बोलायला मरत आहे..का अस होत आहे ..? जानू घरी गेली..ती आज वाटच पाहत होती समिरच्या फोन ची ..आणि आलाच फोन आज तिने ठरावलच होत आज याच काहीच ऐकुन घ्यायचं नाही..एकदाच याच टेन्शन बंदच करून टाकू एक तर याला मी फक्त फ्रेन्ड वाटते याच प्रेम नाही माझ्या वर आणि याचा एवढा का धाक ?
जानू : हा बोल ..
समीर : ओ म्हणजे तुला माहित होत माझा फोन येणार?
जानू : हो आता इतकं तर कळत मला ..इतकं तर ओळखते तुला.
समीर : इतकं कळत तर..का अग अस वागतेस जे मला आवडत नाही..का बोलतेस भास्कर सोबत?
जानू : अरे तुला काय फरक पडतो ? एक तर मी तुला प्रपोज केलं तर सरळ नाही म्हणालास ..याच किती दुःख झालं असेल याची कल्पना तर आहे का तुला..? आणि मी स्वतः ला सावरण्याचा प्रयत्न करत होते तर तुझा हा रोजचा धाक..
मला तर भीती वाटू लागली आहे आता कॉलेज ला येयची.तुला काय फरक पडतो ..मी कोणाशी ही बोलले तर..?
समीर : फरक पडतो मला ..कारण तू फक्त माझी आहेस .
जानू : छान ..एक तर प्रेम नाही...आणि तू माझी आहेस ?
समीर : आहे माझं तुझ्या वर प्रेम..हेच ऐकायच होत ना तुला ? i love u jaanu..
रिप्लाय वाचून तर जानू ला तो नाही बोलला होता तेव्हा पेक्षा ही जोराचा शॉक लागतो..मी स्वप्नात नाही ना म्हणून तो मॅसेज चार पांच वेळा वाचते..
जानू : काय बोललास ?
समीर : तुला वाचता येत ना ? वाच ना मग ..i love u
जानू : पणं तू तर नाही म्हणाला होतास ना ?
समीर : हो पणं मला नाही पाहवत दुसरं कोणी तुझ्या कडे पाहिलेलं ..तुझ्या सोबत बोललेल..तू माझी आहेस .
बापरे केवढी खुशी जानू तर हवेतच ..समीर कधीच भेटणार नाही त्याचं प्रेम आपल्याला कधीच मिळणार नाही अस च ती समजून बसली होती त्याच्या त्रास खूप होत होता तिला पणं अस अनपेक्षित प्रेम मिळाल्यावर ..कोणाचा स्वतः वर ताबा राहील..
जानू : समीर ,अजून एकदा बोल ना.
समीर : काय ?
जानू : i love you ..
समीर : अग बोललो ना किती वेळा बोलू ?
जानू : अरे बोल ना plz ऐकत बसाव वाटत आहे रे plz एकदा बोल
समीर : i love u gudiya..
जानू: i love u too समीर आज मी खूप खूप खूप खुश आहे फक्त तुझ्या मुळे .. थँक्यु यू समीर..
समीर : हो पणं तू अजिबात दुसरं कोण सोबत बोलायचं नाहीस ..मला अजिबात आवडत नाही..तू मही आहेस.
जानू :हो बाबा तुझीच आहे .नाही बोलणार कोना सोबत...पणं अजून एकदा बोल ना i love you
समीर:ये पागल पोरी बस आता ..खूप झालं ह..नाही तर खरंच पागल होशील..
जानू : काय रे समीर ..एक तर तू अस सांगितल तुझं प्रेम जगात अस कोणीच तुझ्या सारखं प्रेम प्रकट केलं नसेल..पणं असू दे तरी ही मी खूप खुश आहे .
समीर : बर चल परत बोलू .
जानू : ok
जानू फोन ठेवते पणं तिच्या डोक्यात अजून समीर च i love you घुमत असत..ती खुशीने वेडवली होती .. बेड वर चढून आज चक्क ती नाचली ते ही स्वतःच गान म्हणत..
आज में उपर
आसमा नीचे
आज में आगे
जमाना हे पीछे.
क्रमशः