लग्नप्रवास- ४
रोहन आणि प्रीती च्या लग्नाची तारीख रविवार असल्याकारणाने हळद शनिवारी न लावता शुक्रवारी हळदीचा कार्यक्रम ठरवण्यात आला. दोघांचे घर पाहुण्या मंडळांनी भरले होते. एकीकडे रोहन बरोबर लग्न होत आहे ह्याचा आनंद प्रीतीला होताच, आणि दुसरीकडे हे घर आता कायम परके होणार ह्याच दुःख. अश्या संमिश्र भावना प्रीतीच्या मनात दाटून आल्या होत्या. दुपारी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला. आपल्या हातातील हिरवा चुडा बघून प्रीतीच्या चेहऱयावर एक खट्याळ हसू आले. तिने लगेचच रोहनला फोन केला आणि हिरवा चुडाचा आवाज किणकिण आवाज ऐकवला. रोहनही त्या आवाजाने बहरला. पोरीचं लग्न म्हटलं तर बापाचा दुसरा जन्म होतो. नवरदेवाचे कपडे, पाहपाहण्यारावल्यानं मानपानाची कापड, टोप्या, उपरणे, भांडी कुंडी, सोफा, सुईदोऱ्यापासून सगळं सामान पोरीच्या लग्नात द्यावं लागत. मंडपवाला, आचारी, भटजी, बांबागड्यावाला, सनईवाले या सगळ्याशी बोलणी करून ठरवायचं. रोज एक ना एक काम असल्याच.
रोहन: दोन दिवस थांब प्रीती. मग हा किणकिण आवाज तुझ्या आणि माझ्या अवतीभवती असेल.
प्रीती: हो, खरंच. एकीकडे आनंद आणि दुसरीकडे घर सोडून जाण्याचा आठवणी. ह्या घरात खूप आठवणी आहेत रे माझ्या. आई व वडिलांच्या आठवणीने खूप रडू येत आज मला. प्रथम शाळेत जाताना बाबांचा पकडलेला हात, जो कधी सोडावासा वाटला नाही. आईवरच प्रेम. आजपर्यंत सगळ्या गोष्टी निपुटपणे ऐकणारी माझी आई. आई बाबांची ती माया. ह्या सर्व आठवींनी आल्या कि मला रडू येत राहत.
रोहन: मी तुम्हला नेहमीच साथ देईन. तूला आपल्या घरात कधीच एकटेपणा वाटणार नाही.
आई वडिलांच्या लाडात वाढलेली असली तर प्रीती एक स्वाभिमानी मुलगी होती. शिक्षण झाल्यानंतर तिने लगेचच नोकरी पकडली. तेव्हा तिचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढला. पण एवढं सगळं असून ती आई व वडिलांच्या धाकात होती.तीच आपलं स्वत्रंत जग, स्वप्न, व्यक्तिमत्तव, आणि अस्तित्व होत. आणि विशेष म्हणजे ती स्वतःच्या पायावर व निर्णयावर ठाम असायची.
लग्न म्हणजे केवळ अडीच अक्षर नव्हे,
सात पावलांनी जोडले जाणारे जन्मभराचे ऋणानुबंध,
आयुष्यतला एक अनोखी मनस्वी प्रसंग,
काही क्षण हृदयाच्या कप्प्यात साठवण्यासाठीच,
तर काही क्षण डोळ्यांच्या पापापण्यावर ओथांबण्यासाठी,
आयुष्यभर जतन करण्यासाठीच आनंदी सोहळे,
साजरे करताना.........
साथ आणि आशीर्वाद हवे तुम्हा सज्जनांचे...................
इकडे दोघांच्या हळदीची तयारी चालू झाली. नाच, गाणी सर्व आनंदांत होते. दोघांना हळद संध्याकाळी लावण्यात आली. दोघांच्या घरात अगदी आनंदाचे वातावरण पसरले होते.
हळूहळू लग्नाची तारीख जवळ येत होती. तिला नवीन घर, नवीन संसार सुरु होणार आणि दुसरीकडे आई व वडिलांनी सोडून जाण्याची घालमेल.खास करून तिच्या भावाला आणि बहिणीला. लग्नाचा दिवस उजाडला. कोण दाराजवळ रांगोळी काढत आहेत. तर कोणी प्रीती लग्नात उठून दिसावी म्हणून तिला सजवत आहेत. सगळीकडे वातावरण एकदम आनंदाचं होत. सर्व पाहुण्यांची माणपणाची सोय सुंदर केली होती.
"विवाह" हे एक पुरुष व स्त्री अश्या दोन व्यक्तीमधील सामाजिक बंधन आहे.विवाहामुळे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात. या नात्यास लग्नगाठ म्हणतात. लग्न हे पवित्र बंधन आहे.व्यक्तिगत दृष्टिकोनातून विवाह हा पति-पत्नींतील मैत्री आणि भागीदारी आहे. वैवाहिक जीवनातून दोघांच्याही सुखासाठी, विकासासाठी आणि पूर्णत्वासाठी आवश्यक सेवा, सहयोगाची, प्रेमाची, निःस्वार्थ त्यागाची व अनेक गुणांची शिकवण मिळते. लग्न आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न हा माणसाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. लग्न तिचे किंवा त्याचे नसते ते दोन कुटुंबाचे असते.
पण तू भेटलीस,
सगळं हवंहवंसं वाटायला लागलं,
नातं तुझ्याशी जोडावंसं वाटायला लागलं,
तुझ्या मनाशी माझ्या मनाला,
बांधवांस वाटायला लागलं,
अन सगळं कस छान छान,
वाटायला लागलं.
दुपारी १२ वाजून ३५ मिनटाचा मुहूर्त होता. प्रीतीच्या भावाची सगळयांना अक्षदा वाटायची घाई चाललेली. प्रीतीचे काका जेवण्याची सर्व व्यवस्था बघत होते. भटजी व्यासपीठावर आले. भटजींनी मुहूर्ताच्या १० मिनिटं अगोदर मंगलाष्टका सुरु केल्या. प्रीती पश्चिमेकडच्या राशीवर पूर्वाभिमुख आणि रोहन पूर्वेला राशीवर पश्चिमाभिमुख उभे होते.मंगलाष्टक म्हणजे मंगल वचनांचे अष्टक म्हणजेच आठ श्लोकांचे असावे, मुहूर्ताची घटिका भरेपर्यंत हि गायली जातात, दोन्ही पक्षांकडील नातेवाईक मंडळी हौसेने हि मंगलाष्टके म्हणतात. रोहन पश्चिमेकडे तोंड करून उभा होता.अंतरपाट धरून एखादे मंगलाष्टक झाल्यावर, प्रीतीच्या मामाने प्रीतीच्या हाताला धरून रोहनसमोर आणून प्रीतीला पाटावर उभी केली. अंतरपाट दूर झाल्यावर प्रथम वधूने वराला हार घातला व नंतर वराने वधूला. दोघांनीही एकमेकांना फुलांचा गुच्छ दिला.वराच्या व वधूच्या मागे प्रत्येकी २ करवल्या कलश व दिवा घेऊन उभ्या होत्या.त्यांनी वर- वधू दोघांच्याही डोळ्यांना कलशातले पाणी लावून दिव्याने औक्षण केले. नंतर उपस्थित ब्रह्मवृंद- गुरुजी मंत्र म्हणत असताना दोघांनीही एकमेकांच्या डोक्यावर अक्षतारोपण केले. विवाहाच्या वेळी वधूची आई गौरीहरापाशी होती. अंतरपाट दूर होऊन वाजंत्री वाजल्यावर तिने दुधात साखर घातली, सुईमध्ये दोरा ओवाला.गौरीहराच्या बोळ्क्यांना हळद-कुंकू लावले. दोन्ही कुटुंबे एकत्र आले. वधूच्या आईने वधू-वराजवळ येऊन दोघांच्या डोक्यावर अक्षता घातल्या. अशाप्रकारे आलेल्या सर्व मंडळींनी रोहन व प्रीतीवर अक्षतांचा वर्षाव केला. आणि हा गोड, सुंदर विवाह सोहळा संपन्न झाला. सगळ्यांनी नवीन जोडपीला भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला. प्रीतीच्या आई व वडिलांनी प्रीतीचे कन्यादान केले.तेव्हा विवाह सर्व अर्थाने सुखी यशस्वी होण्याकरता धर्म, अर्थ, काम यांचा वैवाहिक जीवनात आनंद उपभोग घेताना मर्यादेचे उल्लंघन करणार नाही असा निश्चय / वचन रोहनने दिले. थोड्यावेळाने रोहनने प्रीतीला मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातले. मंगळसूत्र हे सौभाग्यचिन्ह विशिष्ट रीतीने गुंफून ते घालायचे व सासर-माहेर दोन्ही कुटुंबे एकत्र करून संसार माळेसारखा बांधून ठेव असा संदेश कन्येला दिला.मंगळसुत्रामुळे विवाहित स्त्रीला प्रतिष्ठा मिळते. नंतर रोहन आणि प्रीती एकत्र सात पाऊले चालले.
पहिले पाऊल :- तू एक पाऊल चाललीस, तुझे माझे सख्य झाले. सुंदर अन्न तयार करणारी अन्नपूर्णा हो. माझ्याशी एकनिष्ठ वाग. आपल्या कुटुंबाचे आपण कल्याण करू.
दुसरे पाऊल :- तू माझ्याबरोबर दोन पाऊले चाललीस, माझे बळ वाढवणारी हो. आपण धैर्य आणि सामर्थ्य ठेऊन कुटुंबातील आनंद संरक्षित ठेऊ.
तिसरे पाऊल :- तू माझ्याबरोबर तीन पाऊले चाललीस, धनप्राप्त करून देणारी हो. आपण दोघे संपत्ती व ज्ञानाची संमृद्धी करू.
चौथे पाऊल :- तू माझ्याबरोबर चार पाऊले चाललीस, तू सुख वाढवणारी हो. आपण दोघेही सुख, आनंद वाढवू.
पाचवे पाऊल :- तू माझ्याबरोबर पाच पाऊले चाललीस, तू संतती वाढवणारी हो. आपण दोघे सद्गुणी संतती निर्माण करू.
सहावे पाऊल :- तू माझ्याबरोबर सहा पाऊले चाललीस, तू सर्व ऋतुमध्ये सुख देणारी हो.
सातवे पाऊल :- तू माझ्याबरोबर सात पाऊले चाललीस तुझे माझ्याशी सख्य दृढ होवो. आपल्या कुटुंबाचे सुख-दु:ख आपण आपल्या हृदयात जतन करू.
अशा पद्धतीने विवाह सोहळा सुंदररित्या पार पडला. शेवटी आई व वडिलांनी सोडून जात असताना मात्र प्रितीने घट्ट आई व वडिलांना मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली. तो क्षणच तिच्यासाठी तसा होता. आलेल्या सर्व पाहण्यामंडळींनी प्रीती आणि रोहनच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
एक स्त्री साठी लग्न म्हणजे,
साधी सोपी गोष्ट नसते,
त्यासाठी कित्येक स्वप्न आणि स्वातंत्र्याची,
तिला निमूटपणे आहुती द्यावी लागत असते.
तुम्हाला आजचा भाग कसा वाटला, नक्की मला तुमच्या प्रितिक्रिया कळवा. भेटू पुढील भागात.