Janu - 18 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | जानू - 18

Featured Books
Categories
Share

जानू - 18


समीरच्या प्रेमाचं भूत पुन्हा जानू च्या डोक्यावर बसत.
आज विचारू समीर ला आपण आवडतो का ..मगच पुढे ठरवू म्हणून ती त्याला मॅसेज करते.

जानू:हॅलो.

समीर: अरे वा आज लवकर आठवण आली माझी..

जानू : हो आली..का येऊ नये का?

समीर : तस कुठे बोललो मी ? बर बोल काय म्हणते?

जानू : समीर मला तू खूप आवडतो.

समीर : हो का? मला ही तू खूप आवडतेस माझी गुडीया.

जानू : खरंच ?

समीर: हो ग .पणं अचानक अस का विचारलं स?

जानू : बर सांग ना काय काय आवडत तुला माझ्यात ?

समीर : काही पणं काय विचारते ..ये पागल पोरी.

जानू : अरे सांग ना..

समीर : सर्व आवडत ?

जानू : अरे अस काय रे नीट सांग ना..

समीर :बर ऐक .. तुझ् बोलणं ..तू दिलेलं ब्यां ड..तुला भेटणं सर्व आवडत मला..

जानू ऐकुन खूपच खुश होते ..समीर ला ही आपण आवडतो हे ऐकुन तर ती हवेतच उडायला लागते..आता ती ठरवते समीर ला आपल्या मनातील सांगायचं च.

कॉलेज मध्ये एक व्याख्यान माला आयोजित केली होती ..आणि सर्व विद्यार्थ्यांना एका हॉल मध्ये जमा करून कार्यक्रम सुरू होता..जानू आणि समीर ही आज एकाच हॉल मध्ये होते ..स्टेज वर चे सर काय सांगतात याकडे जानू च लक्ष च नसत..ती फक्त समीर कडे पाहत होती..समीर ही अधून मधून तिला पाहून हसत होता..नकळत तिच्या कानात त्या सरांचे शब्द पडले ..मनातील गोष्टी भावना ..मनात च न ठेवता त्या व्यक्त केल्या पाहिजेत ..गेलं गेल्यानंतर अशा गोष्टींचा पश्र्चाताप होतो..जानू ला वाटलं जस सर आपल्यालाच उद्देशून बोलत आहेत की काय .? कार्यक्रम संपला सर्व घरी गेले ..जानू च लक्ष मात्र त्या व्याख्यान मालेतील ऐकलेल्या शब्दात च होत ..घरी गेल्या वर ही तिला तेच शब्द पुन्हा पुन्हा आठवू लागले..आणि तिने मनाशी ठरवलं आज सांगायचं च समीर ला की त्याच्या वर आपल किती प्रेम आहे ? तिने फोन उचलला व मॅसेज टाईप केला रोजच ती समीर सोबत मॅसेज नी बोलायची पणं आज तिचे हात थरथर होते ..मोबाईल पडेल की काय असं वाटू लागलं..तिला ..खूप हिम्मत करून तिने टाईप केलं.

जानू : हॅलो समीर.

समीर : हा बोल.

जानू : मला तुला काही तरी सांगायचं आहे रे ?

समीर : अग सांग ना मग विचार काय करतेस ?

जानू : समीर ..

समीर : अग काय समीर समीर ..बोल की पटकन .

जानू : माझं तुझ्या वर खूप प्रेम आहे ..मला तू खूप आवडतोस ..
जानू ने एका दमात सर्व मॅसेज टाईप केला व हुश्श केलं ..
समीर काय बोलल याची तिला खूप आतुरता लागली होती..समीर हो बोलला तर ..आपण तर आनंदाने उड्या मारू की काय असं तिला वाटू लागलं..ती मोबाईलच्या स्क्रीन कडे एक टक पाहत होती..समीर चा रिप्लाय आला..आता तीच हृदय जोर जोराने ध ड धड त होत.. रिप्लाय वाचायची तिची हिम्मत होत नव्हती..आनंद आणि भीती दोन्ही भावनेने तिचं मन भरून गेलं होत...मन खूप बेचैन होऊन रिप्लाय वाचायला सांगत होत..तिने वाचायला सुरवात केली..

समीर : सॉरी जानू पण मी तुला फक्त फ्रेन्ड मानतो..आणि हे असल प्रेम बिम मला जमत नाही..त्या भाव ने वर तर माझा विश्वास ही नाही..
वीज कोसळावी असा जानू ला धक्का बसला तो रिप्लाय वाचून..

समीर चा रिप्लाय वाचून जानू ला धक्काच बसतो ..काय करावं हे तिलाच कळत नसत...मन खूप रडत असत हात थरथरत असतात..समीर काय मॅसेज पाठवत आहे पुढे हे ही तिला पाहू वाटत नाही..अचानक तिला खूप राग येतो त्यात ती त्याला मॅसेज करते.

जानू: या पुढे माझ्या सोबत बोलू नकोस.

समीर: अग पण आपण फ्रेंड्स बनून राहू ना.

जानू : समीर ..माझ्याने ते जमणार नाही..मैत्रीत एकदा प्रेमाची भावना आली की फ्रेन्ड स बनून राहणं अवघड असत..या पुढे नको बोलुस ..

समीर पुढे काय बोलतो याचा विचार ही न करता ती आपला मोबाईल ऑफ करते.पणं डोकं सुन्न झालेलं असत .. आपलच चुकलं..आपण किती मूर्ख..उगाच का त्याच्या काळजी ला प्रेम समजून बसलो..कशाला पुढाकार घेतला? त्याला काहीच वाटतं नाही आपल्या बद्दल तर मग त्याला राग का येत होता..आपण भास्कर सोबत बोललं की ..मैत्री अशी असते का ? मैत्रीत कधी दुसरं कोणी बोललं तर इतकं कोण जळत? आणि त्याचे डोळे ..ते तर कायम हेच सांगायचे ना की जानू खूप आवडतेस तू मला...आणि तो आपल्याला माझी गुडी या म्हणाला होता ना...जानू च मन खूप रडत होत आणि तिचे डोळे सतत वाहत होते..रात्र भर फक्त समीर चा विचार करून ती बधीर झाली होती .. पहाटे केव्हा तरी तिला झोप लागली पणं कॉलेज ला जायचं म्हणून ती उठली..रडून रडून डोळे सुजले होते ..डोकं जड झाल होत.. तब्बेत थोडी खराब आहे असा बहाणा तिने घरी सांगितला व ती कॉलेज मध्ये गेली..रोज बाईक पार्किंग मध्ये समीर ची बाईक पाहण्याची सवय झाली होती ..पणं आज तिने तिकडे मान ही वळवली नाही..खूप संयम ठेऊन तिने समीर ला टाळलं..तो समोर दिसला आणि आपण त्याला पाहून तर पुन्हा आपण ढासळू अस तिला वाटत होत म्हणून तिने मान खाली घालून च वावरण पसंद केलं... समीर समोर येऊन गेला की नाही तो आला की नाही याचा ही तिला पत्ता नव्हता.... बस पहिल्या सारखे अनोळखी होऊ अस तिने ठरवल होत.दोन दिवस झाले होते समीर ने ही तिला कॉन्टॅक्ट करायचं प्रयत्न केला नव्हता ...आणि तिचं निश्चय दृढ झाला होता की खरंच समीर ला आपल्या बद्दल काहीच वाटत नाही..आणि या गोष्टी चाच खूप त्रास तिला होत होता.. न राहून समीर ची खूप आठवण यायची पणं आता त्याचं प्रेम नाही.. तर आपण जबरदस्ती ही करू शकत नाही ..म्हणून ती स्वतः ला समजावत होती..आपल प्रेम एकतर्फी राहील याची खंत मनाला बोचानी देत होती.
आज बऱ्याच दिवसांनी भास्कर तिच्या सोबत बोलत होता..तो नोट्स बद्दल तिला काही तरी विचारत होता..ती ही त्याला काही तर सांगण्यात व्यस्त होती ..सहज तिची नजर .. समोर गेली ..समीर त्या दोघांना च पाहत होता.. आणि त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता....जानू ने समीर ला पाहिलं होत व ती तिथून निघून गेली.
दुसऱ्या दिवशी ही कॉलेज सुटताना न राहुन तिने मागे वळून पाहिलं होत ..रोज कॉलेज सुटल्यावर समीर व जानू एक मेकांना पाहून नजरेनेच bye करत ..आज ही मनाला खूप सामावून ही जानू च्या मनाने तिच्या विरुद्ध वागायचं ठरवल होत..तिने मागे वळून पाहिलं आणि भास्कर दिसला..मागे..तो तिला bye म्हणाला ..तिने हलकीशी smile केली..आणि त्याच वेळेस पाहिलं की समीर कोपऱ्यातून तिला पाहत आहे ...किती विचित्र भाव होते त्याच्या डोळ्यात जणू जानू ने मोठा अपराध केला की काय ..त्याचे डोळे पाहून जानू मनातून हललीच ..हिम्मत जुळवून ती पुढे निघून गेली.
पाच सहा दिवस झाले होते ..आता समीर ला विसरायचं ठरवुन जानू स्वतः ला सावरण्याचा प्रयत्न करत होती ..त्यात आज आईने तिच्या साठी खास आणलेला निळ्या रंगाचा चुडीदार आईच्या हट्टा साठी तिने घातला होता..कॉलेज मध्ये गेल्या पासून सर्वजण जानू ची तारीफ करत होते ..आज खूपच छान दिसत आहेस ..म्हणून तिचं कौतुक करत होते..समीर थोडा वेळाने आला होता कॉलेज मध्ये पण त्याने ही जेव्हा जानू ला पाहिलं त्याची नजर हटत नव्हती तिच्या वरून ..सारखा तो तिच्या अवती भोवती फिरत होता आणि तिला पाहत होता ...आणि याला काय झालं आज असा विचार करून जानू त्याच्या कडे दुर्लक्ष करत होती....समीर जानू समोर येऊन आज काय वाढदिवस आहे की काय म्हणून तिच्या शी बोलण्याचा प्रयत्न करतच होता ..की ..भास्कर समोर आला आणि आज छान दिसतेस जानू म्हणाला..समीरच्या बोलण्याकडे जानू ने दुर्लक्ष केलं आणि ..भास्कर ला थँक्यु बोलून ती तिथून निघून गेली..तसा समीर चा जास्तच जळफाट झाला.

समीर आणि जानू च बोलणं बंद होऊन आठ दिवस झाले होते ..जानू घरी पुस्तक वाचत बसली होती..पणं विचार मात्र डोक्यात फक्त समीर चे च चालू होते ..इतक्यात फोन ची रिंग वाजली ..स्क्रीन वरच नाव न पाहताच ..जानू ने फोन उचलला.

जानू : हॅलो कोण ?

समीर : इतक्या लवकर विसरलीस ?खूप लवकर विसरते स तू जानू..

समीर चा आवाज ऐकुन जानू पटकन स्क्रीन वर पाहते फोन समीर चाचं असतो..याने आज कसा काय फोन केला या विचारात ती असते की ...त्याचं बोलणं ऐकून ती पुढे बोलते.

जानू : नाही..मी स्क्रीन कडे पाहिलं नव्हत.

समीर : होय का ? खरंच का ? की माझा नंबर ही काढून टाकलास?

जानू:नाही..पणं काय बोलायचं आहे आता ? मला नाही बोलायचं तुझ्या सोबत ..
अस बोलून जानू फोन ठेवून देते..

समीर पुन्हा तिला फोन करतो ..दोन ..तीन..चार..तो फोन करतच राहतो .....जानू ला कळतच नव्हतं की हा असा का करत आहे...शेवटी ती फोन उचलते.

समीर : तुला मी फोन ठेव बोललो होतो का ?मग का ठेवलास ?आता तुला माझ्या सोबत बोलू ही वाटत नाही का ?

जानू ला समीर चा आवाज नशेत असल्या सारखा वाटतो..

जानू : समीर तू ड्रिंक केली आहेस का ?

समीर : होय केलीय ..

जानू : का ?

समीर : तुझ्या मुळे ..
त्याचं बोलणं ऐकून जानू ला शॉक बसतो ...माझ्या मुळे ड्रिंक ..मी काय केलं अस ?

जानू : माझ्या मुळे मी काय केलं अस ?

समीर : तू काय केलंस ? तू खूप बदलली जानू ...आता तुला भास्कर आवडतो ना ..खूप बोलू वाटत ना तुला त्याच्या सोबत...आणि मला काय म्हणत होतीस की माझ्यावर प्रेम करतेस ..आणि बघतेस भास्कर कडे..तुम्ही मुली अशाच असता ग ..लगेच विसरता..थर्ड क्लास ..

जानू : त्या भास्कर ला का मध्ये आणतो त्याचा काय संबंध ? आणि माझ्या मनात त्याच्या बद्दल काही नाही.

समीर : भास्कर च नाव काढलं तर किती राग आला बघ तुला..मनात काही नाही पणं डोळ्यात आहे ना बघतेस ना त्याला?

जानू : समीर तू शुद्धीत नाहीस आपण नंतर बोलू..

समीर : होय ..मी नाही शुद्धीत पणं तू तर आहेस ना मग तू अशी कशी वागतेस ?

जानू : तुला काय फरक पडतो रे ..आणि मी तुला काय सांगत बसले य ..मी कशी आहे ते ..जानू पुन्हा रागाने फोन ठेवते.

समीर च बोलणं ऐकून तिचं डोकं बधीर झालं होत ..शी काय विचार करतो हा आपल्या बद्दल आणि आपण याच्या वर प्रेम केलं..थर्ड क्लास बोलला तो आपल्याला? जानू सुन्न होऊन विचार करत असते आणि समीर तिला वेड्या सारखं फोन करत असतो जानू आपल्याच विचारात दंग असते आणि फोन किती तरी वेळ वाजत च राहतो.

क्रमशः