Emotional Crime in Marathi Crime Stories by सागर भालेकर books and stories PDF | भावनांचा खून

Featured Books
Categories
Share

भावनांचा खून

भावनांचा खून

साधारण ३० वर्षांपुवीची गोष्ट. केरळ मध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार आपले पाय झपाटयाने रोवत होता. त्यातच केरळची राजधानी कोचीन येथे एक देशाला हादरवणारी घटना घडली. पोलिसांना एक अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने सांगितले की, कॉन्व्हेंटमध्ये एक खून झाला आहे. पोलिसांनी लगेचच त्या कॉन्व्हेंटमध्ये धाव घेतली. तेव्हा ती बॉडी पाहता त्या प्रेताच्या चेहऱ्यावर आरोखडे आणि पूर्ण बॉडी रक्ताने माखली होती.आणि ती बॉडी पंखायला लटकत होती. तेव्हा पोलिसांनी तिथे राहणाऱ्या सर्व लोकांना बोलवून घेतले. त्या व्यक्ती बद्दल काही माहिती मिळते आहे का? जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच कॉन्व्हेंटची मॅनेजर सिस्टर रोझीने तिच्याबद्दल माहिती देण्यास पुढाकार घेतला.

सिस्टर रोझी : हो, साहेब ही मारिया आहे. काही दिवसातच ही एका मुलाला किंवा मुलीला जन्म देणार होती. आणि फादर आंद्रे ह्यांनी आश्रयास तिला ह्या कॉन्व्हेंट मध्ये आणले.

इन्स्पेक्टर शिंदे: okay, पण मग ही ह्या कॉन्व्हेंट मध्ये काय करतेय? म्हणजे ही हिच्या नातेवाईक किंवा नवऱ्याबरोबर नाही राहत का?

सिस्टर रोझी : नाही, साहेब. काही दिवसांपूर्वी छोटयाशा गावातून आंद्रे फादरने तिला ह्या कॉन्व्हेंटमध्ये आश्रयासाठी आणले. तिच्याकडून माहिती मिळाली, की, तिच्या आई-वडिलांनी आत्महत्या केली होती, आणि तिच्या बॉयफ्रेंडने तिला गर्भवती स्त्री असल्याकारणाने तिला सोडून दिल होत. एक गर्भवती स्त्री आता जाणार कुठे. ह्या उद्देशाने फादर शेरी हयांनी तिला ह्या कॉन्व्हेंट मध्ये आश्रय दिला.

इन्स्पेक्टर शिंदे: okay. हे फादर शेरी कोण आहेत. मी त्याना भेटू शकतो का?

सिस्टर रोझी : नाही. ते सध्या नवीन अनाथाश्रमाचा जीर्णोद्धार करण्यासाठी त्रिवेंद्रम इथे गेले आहेत. तेच सर्व ह्या कॉन्व्हेंटचा कारभार पाहतात. महिन्यातुन एकदा ह्या कॉन्व्हेंटला भेट देतात.

इन्स्पेक्टर शिंदे: मी आता इथून जात आहे. पण लवकरच तुमच्या सर्वांची चौकशी करायला पुन्हा नक्की येईन. सावंत ही बॉडी पोस्टमार्टम साठी फॉरेन्सिक लॅब मध्ये नेण्यासाठी ऍम्ब्युलन्सला बोलवा.

(दुसऱ्या दिवशी तर इन्स्पेक्टर शिंदेना "त्या" केसमध्ये लक्षच देता आले नाही. एका मंत्र्याच्या मुलाचे लग्न असल्याने त्याची ड्युटी तिथे लागली होती. इन्स्पेक्टर शिंदे वैतागले होते त्या लग्नाला. लग्न उरकल्यानंतर इन्स्पेक्टर शिंदेनी पुन्हा केसकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.)

प्रथम इन्स्पेक्टर शिंदे फॉरेन्सिक लॅब मध्ये गेले.व डॉ. गुप्ता ह्याची भेट घेतली.डॉ. गुप्ता ह्यांनी केस संदर्भात काही माहिती मिळवली आहे का हे जाणून घेण्यासाठी.

डॉ. गुप्ता: इन्स्पेक्टर शिंदे ह्या मुलीचं वय साधारण ३० वर्ष आहे आणि ही मुलगी प्रेगेन्ट होती. हिचा खून किंवा आत्महत्या साधारण रात्रीच्या सुमारास १० ला झाला असावा. मी ह्या केसला कदचित खून झाला आहे असं नाही म्हणणार. कारण पोस्टमार्टम केलं गेलं तेव्हा त्याचा रिपोर्ट श्वास कोंडल्यामुळे मारियाचा जीव गेला असा पोस्टमार्टम रिपोर्ट म्हणतोय.

इन्स्पेक्टर शिंदे: डॉ. गुप्ता तुम्हाला सुद्धा असं वाटतंय की, हा खून नसून ही एक आत्महत्या आहे.आणि अंगावरील रक्ताचे निशाण आणि ओरखडे.

डॉ. गुप्ता: हो, इन्स्पेक्टर शिंदे मलाही आत्महत्या वाटते पण मी आतच काही सांगू शकत नाही. तपास करणं हे तुमचं काम आहे. मी फक्त पोस्टमार्टम रिपोर्टनुसार बोलत आहे.

(केसचा गुंता कसा सोडवावा ह्या चिंतेत इन्स्पेक्टर शिंदे होते. तेवढ्यातच तिथे इंस्पेक्टर भट आले आणि म्हणाले.)

इन्स्पेक्टर भट: साहेब, मला दोन दिवसाची रजा मिळेल का, तुम्हाला तर माहित आहे की, बरेच वर्ष झाले आम्हला मुलं नाही होत आहे त्यासंदर्भात आम्ही त्रिवेंद्रमच्या एका अनाथाश्रमाला भेट देऊन आम्ही एक मुलं दत्तक घेणार आहोत.

इन्स्पेक्टर शिंदे: हो, तुमची रजा मंजूर करतो. पण दोन दिवसानंतर पोलीस स्टेशन मध्ये हजर राहायचं.

इन्स्पेक्टर भट: हो, साहेब.

(काही केल्या केसचा गुंता कसा सोडवायचा ह्या टेन्शनमध्ये इन्स्पेक्टर शिंदे असायचे आणि ही आत्महत्या नसून खून आहे. हे सत्य जगासमोर कस आणयच ह्या चिंतेत असायचे. कारण मुलीच्या बॉडीवर आऱोखड्यचे निशाण होते.परत कॉन्व्हेंट मध्ये जाऊन त्यांनी तपासाला सुरुवात केली.)

इन्स्पेक्टर शिंदे: मारियाचे आरोपी बिनधास्त फिरत आहेत. तुम्हाला नाही वाटत का, हे आरोपी पकडावे म्हणून. आणि ती आत्महत्या का करेल. ती तर स्वतःच नवीन आयुष्य जगणार होती. मला सांगा तिच्या भेटीला इथे कोण येत असे, तिची कोणाबरोबर दुश्मनी?

सगळ्या घोळक्यात घाबरतच एक लेडी पुढे आली आणि तिने इन्स्पेक्टर शिंदे हयांच्या कानात काहीतरी कुजबुजली.

(एका रूम मध्ये जाऊन तिची चौकशी करण्यात आली.त्या मुलीचं नाव मार्था असे होते.)

मार्था: साहेब, मी गेले ४ वर्ष इथे काम करतेय. माझं ह्या आयुष्यात कोणीच नाही आहे. सुरुवातीला थोडे दिवस इथलं वातावरण ठीक होत.पण हुळूह्ळू वातावरणात बदल घडून आला. ज्या प्रेगेन्ट बायकाच कोणीच नसत ते इथे आश्रयाला येतात. आणि अचानक त्याची मुलं जन्म दिल्यानंतर गायब होतात. माझ्या बाबतीत पण असच झालं आहे. मी एका लहान मुलीला जन्म दिला. एक दिवस ते लहान बाळ माझ्याकडे होत, सकाळ होताच माझं बाळ गायब झालं असं कस. मी आजही स्वतःला दोषी मानते त्या कारणांसाठी. पण साहेब, इकडे काहीतरी गडबड आहे. तुम्ही कृपया करून ह्या जागेची तपासणी करा आणि माझ्या मुलीला शोधून काढा.

इन्स्पेक्टर शिंदे: थँक्स,हो नक्की. मिसेस. मार्था आम्ही नक्की तुमच्या मुलीला शोधून काढून पण आम्हला तुमची मदत लागेल.

(इन्स्पेक्टर शिंदे काही अजून लोकांची चर्चा करतात पण त्याच्याकडून विशेष अशी माहित मिळत नाही जी मार्था कडून त्याना मिळते. आणि पोलीस मार्थाची ओळख गुप्त ठेवतात.)

इन्स्पेक्टर शिंदे: सावंत, इन्स्पेक्टर भट कोणत्या अनाथाश्रमाबद्दल बोलत होते. काही लक्षात येतेय का तुमच्या?

शिपाई सावंत: एवढं लक्षात नाही, साहेब ते त्रिवेंद्रमच्या आश्रमबद्दल बोलत होते, पण का साहेब काही झालं का.

इन्स्पेक्टर शिंदे: झालं नाही सावंत. लवकरच आरोपी आपल्या ताब्यात येईल.हे मीडियावाले मला मूर्ख बनवायला चालले होते. की हि आत्महत्या केस आहे.पण हीआत्महत्या नसून हत्याच आहे सावंत. मीच बरोबर ठरलो शेवटी.

आता मात्र इन्स्पेक्टर शिंदे ह्याच शक फादर शेरीवरती येत. इन्स्पेक्टर शिंदे त्रिवेंद्रमच्या अनाथाश्रमात येतात आणि फादर शेरी ह्याची कसून तपासणी करतात.

इन्स्पेक्टर शिंदे: फादर शेरी तुम्हाला माहित आहे का? तुमच्या कोचीन इथल्या कॉन्व्हेंट मध्ये मारिया म्हणून महिलेचा आकस्मिक मृत्यू झाला आहे ते.

फादर शेरी: हो,माहित आहे. ऐकून खूप वाईट वाटले मला. काही दिवसांपूर्वीच ती ह्या कॉन्व्हेंट मध्ये राहायला आली होती. खूप सुंदर आणि प्रेमळ मुलगी होती. तिच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

इन्स्पेक्टर शिंदे: फादर शेरी मला सांगू शकतात का, तुमच्या प्रॉपर्टी किंवा बँक डिटेल्स बद्दल काही सांगू शकतात का.

फादर शेरी: म्हणजे तुम्हला म्हणायचं काय आहे इन्स्पेक्टर शिंद की, खून मी किंवा कॉन्व्हेंट मधील कोणी व्यक्तीने केला आहे का?

इन्स्पेक्टर शिंदे: मी अजून कोणत्याच निष्कर्षावर आलो नाही आहे. मी फक्त अंदाज वर्तवला आहे. तुम्ही पोलिसांच्या चौकशीला इतके घाबरलायत का?

(सर्व गोष्टी तपासून बघितल्या गेल्या पण फादर शेरीच्या बँक डिटेल्स मध्येही काही विशेष पोलिसांच्या हाती लागल नाही. आता पर्यन्त फादर शेरीना आरोपी म्हणून इन्स्पेक्टर शिंदे मानत होते. आता मात्र ह्या केस मध्ये काहीच धागे-दोरे मिळत नसल्यनाने ते पूर्णतः हताश झाले होते. तेव्हाच इन्स्पेक्टर भट त्रिवेंद्रमच्या ट्रिप मधून नुकतेच हजर झाले होते आणि ते थेट इन्स्पेक्टर शिंदेच्या केबिन मध्ये गेले.)

इन्स्पेक्टर शिंदे: या, इन्स्पेक्टर भट. कशी झाली तुमची त्रिवेंद्रमची अनाथाश्रम्याची सहल. आणि हे काय पेढेसुद्धा.अभिनंदन.

इन्स्पेक्टर भट: साहेब, ट्रिप एकदमच मस्त झाली. आणि अनाथाश्रमामधून आम्ही एका मुलीला दत्तक घेतलं. ६ महिन्याचं मुल आहे. खूप गोंडस आहे. माझ्या बायकोने बघितल्या लगेचच तिला खूप आवडले. आणि आम्ही त्या तान्या बाळाला दत्तक घेतलं. खूप वाईट वाटते, की ज्यांना मुलं होत नाहीत ते दुःखी असतात आणि ज्यांना मुलं होतात ते एकतर पैशासाठी त्यांना विकतात नाहीतर वाऱ्यावर सोडून देतात. असो. साहेब, तुम्ही जी केस हाताळत आहात, त्या केसच काय झालं.

इन्स्पेक्टर शिंदे: मलाही आता असच वाटू लागलं आहे, ही आत्महत्याच आहे. आत्महत्या देऊन केस बंद करण्यातच शहाणपण आहे. दुसरा पर्याय नाही आहे.

इन्स्पेक्टर भट: साहेब, हे तुम्ही बोलत आहात. मी माझ्या बायकोला नेहमी तुमच्याबद्दल सांगतं असतो. कि आमचे साहेब कितीही पोलिटिकल तणाव असला तरी ते नक्की प्रत्येक केस बरोबर हाताळतात आणि नक्कीच खूनाचा तपास करून त्याला शिक्षा देतात.

इन्स्पेक्टर शिंदे: हो, मला हि तेच वाटत, पण काहीच कळत नाही ह्या केसबद्दल. जाऊ द्या, वाहिनी आता खुश आहेत ना. आणि एन्जॉय केलं ना. तिकडची बर्फी खूप फेमस आहे असं म्हणतात.

इन्स्पेक्टर भट: हो, पण साहेब मला एक गोष्ट खूप खटकली त्या अनाथाश्रमामध्ये. फादर शेरी बरोबर जी सिस्टर होती ती ऍंड्रिया सारखी फोन वर कोणाशी तरी बोलात असायची.तिची वर्तवणूक खूप संशयास्पद वाटत होती. आणि शेरी ह्यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स केली तेव्हा ती कुठे गायबच झाली.नंतर ती सारखी माझ्या पाठीमागे होती. मला तेव्हा काहीच कळले नाही. काहीतरी गडबड आहे साहेब.आणि मला वाटत आपल्या पोलीस स्टेशन मध्ये तिची missing complaint असावी असा माझा अंदाज आहे.

इन्स्पेक्टर शिंदे: हो, नक्की. बघू या.

(दोघेही missing complaint ची फाईल चेक करतात, त्यात असं आढळून येत, ज्या व्यक्तीला इन्स्पेक्टर भट अनाथाश्रमामध्ये बघतात ती सिस्टर ऍंड्रिया आणि missing complaint मध्ये तीच नाव जेनिफर. काहीतरी गडबड आहे. दोघेही परत कॉन्व्हेंट मध्ये जाऊन तपास सुरु करतात.)

(इन्स्पेक्टर शिंदे परत कॉन्व्हेंट मध्ये जाऊन तपास करतात. तेव्हा ते फादर शेरी बरोबर जी सिस्टर असते त्याबद्दल चौकशी करतात. तेव्हा ते तिचा भूतकाळ जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. इन्स्पेक्टर शिंदे सिस्टर रोझीशी वार्तालाप करतात. आणि सांगतात missing complaint मध्ये नाव different आणि इथे नाव different. मला सिस्टर ऍंड्रियाची चौकशी करायची आहे. बोलवा तिला बाहेर. सिस्टर रोझी सिस्टर ऍंड्रियाची तब्येत बरी नसल्याचे कारण पुढे ढकलते. पण इन्स्पेक्टर शिंदे अडून राहतात.सिस्टर ऍंड्रिया चौकशी साठी बाहेर येते.)

इन्स्पेक्टर शिंदे: तुमचं खरं नाव जेनिफर आहे, तुम्ही identity लपवून इकडे राहत आहात का?. पोलिसांच्या रेकॉर्ड मध्ये तुमचं नाव जेनिफर आहे. मग तुम्ही सिस्टर ऍंड्रिया म्हणून का राहतात. तुम्ही घाबरू नका. जे काही खरं आहे ते सांगा. पोलीस नक्की मदत करतील तुमची.

सिस्टर ऍंड्रिया: साहेब, इकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच नाव बदलेल असत. आणि मारिया हिची आत्महत्या नसून तो एक खून आहे. इकडे गर्भवती महिलांच्या भावनेशी खेळले जाते. मोठ्या विश्वासाने आपलं जगात कोणी जरी नसले तरी गॉड आणि कॉन्व्हेंट वर त्याचा खूप विश्वास. म्हणून त्या इथे दाखल होतात. पण नियतीने त्याच्या बरोबर वेगळेच लिहून ठेवलेले असते. इथे व्यक्तीचा खून तर होतोच शिवाय त्याच्या भावनांचा पण खून केला जातो. इथे येण्याअगोदर मी माझ्या कुटुंबामध्ये खूप सुखी होते. मी एक गर्भवती महिला होती तेव्हा. मी एक दिवस ऑफिसवरून घरी जात असताना मला बेशुद्द केले गेले. आणि इकडे आणलं तेव्हा मला असं सांगितलं, माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला आहे. तो आघात सहन करत करत मी माझी व माझ्या नवऱ्याची शेवटची निशाणी म्हणून मी काही दिवसातच माझ्या बाळाला ह्या जगासमोर आणणार होते. आणि नंतर खूप दूर निघून जाणार होते त्याला घेऊन. ते माझं बाळ सुद्धा जन्माच्या दुसऱ्या दिवशी अचानक गायब होत. मारियाचा खुन आत्महत्या नव्हे तर खून आहे, जो इथल्या सिस्टरने मिळून केला आहे. थोड्याच दिवसांनी ती एक बाळाला जन्म देणार होती. पण तिला माहित नव्हतं, की तीच बाळ दुसऱ्या दिवशी तिच्याकडून हिरावून घेणार आहे. ह्यात सर्व सामील आहेत. हे बाळाची विक्री करतात आणि बोली लावतात. ही, सर्व घटना मारियाला समजली, तिने इथून पळ काढण्याचा निर्णय घेतला. पण ह्या लोकांनी त्या निष्पाप मुलीचा जीव घेतला. का, ती हे सर्व पोलिसांत सांगणार होती. तिच्या भावनाच खून केला. ती मोठ्या आशेने कॉन्व्हेंट मध्ये दाखल झाली पण नियतीने तिच्याबरोबर वेगळाच खेळ खेळला. आणि बाळ गेल्याच दुःख पचवत नाही तेव्हा hypnotize ने त्या व्यक्तीची ओळख बदलून टाकायची. हा ह्याच खेळ असायचा. ह्यासाठी मी इन्स्पेक्टर भट ह्याचा पाठलाग करत होती. ह्यात manager रोझी आणि अन्य सिस्टरचा समावेश आहे. लोकांचा विश्वास उडून जाईल ह्या घटनेवरून. पूर्ण देशाला गुमराह करण्यासाठी ह्या केसला आत्महत्याच नाव देणार होते. प्रथम मारियाचा खून करण्यात आला आणि त्यानतर तिची बॉडी पंख्याला लटकवून आत्महत्याच केली आहे असा भास करवून दिला.पण ही आत्महत्या नसून खून आहे.तुम्ही नक्की आरोपीना पकडा. भावनांचा खून.

इन्स्पेक्टर शिंदे: हे सगळं ऐकून स्तबध्द होतात. आणि रोझी आणि अन्य सिस्टरला बेड्या ठोकतात. आणि कॉन्व्हेंटला टाळ लावतात.