लग्नप्रवास - भाग १
आज रोहन जरा लवकर तयार झाला.कपाटातून एक ठेवणीतील कुर्ता काढला.खरतर त्याने तो जेम तेम दोन वेळाच घातला होता.एकदा चाळीच्या कोणत्यातरी कार्यक्रमात आणि शेजारच्या सुरेशच्या लग्नात.आईच्या दहावेळा ओरडून झाल्यावर रोहन आवरून बाहेर च्या खोलीत आला.खोली म्हणजे त्यांच घर म्हणजे चाळीतल दहाबाय दहा च्या दोन खोल्या सगळा संसार त्यातच..एवढ्या दोन खोल्यात रोहनच जग सामावल होत..... अंथरुणाला खेळलेली एक वयस्कर आजी तिची खाट, बाळांतपणाला आलेली त्याची बहिण, थकलेले आई वडील सगळे अगदी त्या घराला महाल समजूनच राहत होते.अश्यात आज घरात वेगळाच उत्साह होता.. रोहनला मुलगी बघायला घरातील सर्व लोक जात होत. रोहन तसा दिसायला गोरापान, देखणा आणि बँकेमध्ये कारकुनाची नोकरी करत होता. त्याला वधू-वर सुचूक मंडळातून स्थळ आलं होत प्रीती जोशी ह्याच.
मी प्लेट, कपबश्या, आणि पोह्यची डिश घेऊन उभी होती. तेव्हाच पाठीमागून आवाज आला. हे वसंत जोशी ह्यांचे हेच घर ना? मी एक्दम गोंधळून गेली. मनात म्हणाली.
अरे! देवा पाहुणे आले वाटत. पण इतक्या लवकर. मुलाकडचे सकाळी ११ वाजता येणार होते!
तेव्हा लगेच मी भानावर आले आणि म्हणाले. हो! हो!
हेच घर आणि नमस्कार करायला हात जोडले. बघते तर काय? कपबश्याचा किणकिण आवाज आणि डिशचाही आवाज येत होता. असे वाटले कि, डिश मधून पोहे सांडले की काय.तुम्हला बघून. लगेचच भानावर आली आणि हातातली प्लेट सावरली आणि म्हणाले.
एखादी कपबशी फुटली की काय?शेजारच्या काकूंच्या आहेत. तुम्ही हसलात. तेव्हा खरंच तुम्ही खूप गोड हसलात.तेव्हा मला एक गाणे सुचले.
ती पहिली भेट
तीच माझ्या प्रीतीची.......
जशी किनाऱ्याला भेट
समुद्राच्या लाटेची..........
मी म्हणाले, या बसा ! बाबांना पाठवते.
बाबा मुलाकडचे आलेत ?
इतक्या लवकर कसे ?
कदाचित गाड्या late असतील, म्हणून वेळेआधीच आले असतील.
बरं बरं. आईला सांग.
हो! बाबा.
केसाआड चेहरा तुमचा
मनाला भूल पाडत होता.........
मग हृदयाचा तोल
हळूहळू जात होता...........
तेवढ्यात मातोश्री आल्या आणि म्हणाल्या , काय झालं तू आली ते दिसलं का त्यांना?
हो, त्याच्यासमोर चुकून कपबश्याचा आवाज झाला.
मूर्ख पोरगी! असे म्हणत आई मनातल्या मनात हसली.
तुमच्या बाहेर बसून मस्त गप्पा रंगलेल्या.
आणि मी मात्र स्वयंपाकघरात हुळूच तुमच्या चेहऱ्याकडे पाहून लाजत होते. आणि तुमची नजरही हुळूच माझ्यावर पडत होती.
तिची ती नजर ....
हळूच माझ्यावर घसरली
आणि माझ्या डोळ्यांनी
तिला लगेचच सावरली...........
गप्पा बाजूला ठेवून अचानक माझी एन्ट्री झाली. आणि तुम्ही गप्पा सोडून माझ्याकडेच बघत राहिले.
आणि हळूच मी म्हटले," चहा मध्ये अजून साखर थोडी टाकू का?
हो! हो! नक्की.
मग लाजून पापण्या तिच्या
झुकल्या खाली.......
जेव्हा थरथरत्या हाताने
घेतला हात तिचा माझ्या हातात..........
सर्व आटोपल्यानंतर तुम्हला आणि मला थोडा वेळ सर्वानी एकांत दिला.
आणि आपल्या आवडी निवडीवर आपण मनसोक्त बोलो. गप्पा मारत असताना एकमेकांकडे हुळूचं बघणं, डोळयांच्या खुणा, मध्येच हसणं,मध्येच लाजणं.
क्षण जरा अडकूनच गेला
आमच्या दोघात तो थांबून गेला......
हृदयाचे ठोके फक्त चालत होते
तेव्हा श्वासानी पण खूप संवाद केला,,,,,,,
शेवटी परत आपण सर्वासमोर आलो. तेव्हा तुम्ही लगेचच होकाराथी मान डोलवली. मी मात्र थोडा वेळ घेतला.
कार्यक्र्म आटोपल्यानंतर वडिलांनी मला विचारले," मुलगा पसंद आहे का तुला?"
तेव्हा मी हि होकाराथी मान डोलवली आणि तुला त्याच रात्री SMS केला.
ती पहिली भेट
तीच माझ्या प्रीतीची........
जशी किनाऱ्याला भेट
समुद्राच्या लाटेची..........
रोहनला त्याच रात्री आपल्या प्रश्नाचे उत्तर हो मिळाल्यामुळे तो भलताच खुश होता. दोघांची जवळ जवळ मध्यरात्र होई पर्यंत chatting सुरु होती. दोघांनाही झोप काही केल्या येत नव्हती. कधी भेटायचं असा प्रश्न जेव्हा रोहन केला तेव्हा प्रीती थोडी गोंधळून गेली. पण लगेचच तिने ह्याचे उत्तर हो असे दिले."उद्या भेटलो तर चालेल का आपण."
पण कुठे?
एखाद कॉफी शॉप मध्ये. मला माहीत आहे दादर जवळ सुरभी कॉफी शॉप आहे तिथे भेटू. संध्याकाळी ७ वाजता.
"ठीक आहे. ठरलं तर."
प्रीती: "आई माझी ती नवीन चप्पल कुठे आहे.
प्रीतीची आई: का. आज अचानक नवीन चप्पल. काय कोणत्या मैत्रिणीचा वाढदिवस वैगरे आहे का? नवीन चप्पल घालून चाली आहे ती?
प्रीती: अग! मी रोहनला भेटायला चाले आहे. संध्याकाळी यायला जरा उशीर होईल.
प्रीतीची आई: ठीक आहे.
हॅलो, मी पोचले आहे रेस्टॉरंट मध्ये तू कुठे आहेस? प्रितीने थोडं दबक्या आवाजातच विचारलं. पहिल्यादांच असे मुलाला भेटायला आली होती. त्यामुळे साहजिकच थोडी घाबरली होती. "अरे मी इकडे बसलोय, इकडे बघ मागे, ये लगेच".रोहनने मोठ्या उत्साहाने तिला जवळ बोलवले. रोहन आणि प्रीतीची पहिलीच भेट होती.
"काय गं एवढी घाबरतेस कशाला, जस्ट चिल". रोहनने वेटरला बोलवलं आणि दोन सँडविच आणि दोन कोक मागवले. ऑर्डर दिल्यानंतर त्या दोघांनी गप्पा मारायला सुरुवात केली. काय मग कसा वाटतोय मी? प्रीती थोडी गोंधळात पडली, त्याच्या बायोमध्ये जे काही लिहल होत त्यामुळेच प्रीतीला रोहनचा प्रोफाइल आवडला होता. त्याच्या बायो मध्ये ठळक अक्षरात लिहलं होत वाचनाची आवड, लिखाणाची आवड. खरं सांगायचं तर प्रीतीला पण वाचनाची आणि लिखाणाची आवड अगदी लहानपणापासूनच होती. मग काय दोघाच्या गप्पा सकाळ गुड मॉर्निग पासून ते रात्री गुड नाईट पर्यंत चालत असे.तो कमी बोलायचा पण मनाला स्पर्श करेल असाच बोलायचा.त्याच्या ह्याच बोलण्यामुळे तिला तो खूप आवडू लागला. म्हणून त्याने भेटीसाठी विचारले, तेव्हा ती नाही म्हणू शकली नाही.
हॅलो, मॅडम. कुठे हरवला आहात तुम्ही, मी काय विचारतोय, प्रीती विखूरलेयल्या स्वप्नांतून बाहेर आली. अरे खूप छान दिसतोयस तू, आणि whatsapp dp मध्ये खूप छान दिसतोस तू. ती मिश्किल हसली. एव्हाना रोहनला कळलं होत कि ती त्याची टेर उडवत आहे ते. पण रोहनचा ड्रेसिंग सेन्स खूप खराब होता. जीन्स पॅन्ट वर फॉर्मल shoes हा फॉर्मुला तिच्या डोक्याच्या बाहेर होता. म्हणून न राहवता तिने विचारलं, हि कोणती फॅशन आहे साहेब? रोहन म्हणला, इतरांची style सगळे कॉपी करतात. मी मात्र माझी नवीन style बनवतो. आणि दोघेही जोरजोराने हसू लागले. रोहन अबोल, साधा, पण जे बोलेल ते बिनधास्त बोलणारा होता. त्या दोघांच्या गप्पा अगदी रंगत होत्या. तेव्हा त्याने मध्येच एक प्रश्न केला, आपलं लग्न झालं आणि उद्या तुला किंवा मला चांगला जॉब भेटला तर सगळेच अंतिम निर्णय मीच घेईन. ह्या प्रश्नांनी प्रीती अस्वथ झाली. पण तिने खाली मान घालून ऐकून घेतलं. आजवर प्रीतीच्या आई बाबांनी कधीच कोणता निर्णयावर बदल केला नव्हता आणि कधीच जबरदस्ती केली नव्हती. मग रोहन की असं म्हणू शकतो? संसार हा दोघांचा, मग निर्णयही दोघांचेच असणार. प्रितीने काहीच न बोलता मान खाली घातली.आजचा दिवस संपला प्रीती खूप चिंतेत होती? पुढे काय करावे. लग्नासाठी होकार तर दिला आहे. पण आयुष्यात निर्णय चुकणार तर नाही ना? ह्या भीतीने ती अस्वथ होती.
ह्या कथेत पुढे काय होणार आहे? ते दोघे एकत्र येतील कि प्रीती लग्नाला नकार देईल?
उर्वरित कथा पुढे.........................
धन्यवाद