Ti aani to - 41 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 41

Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

Categories
Share

ती__आणि__तो... - 41

भाग-४१

[सॉरी वाचकहो...काही कारणामुळे मला भाग लिहायला वेळ झाला.....क्षमा असावी......आशा करते हा भाग तुम्हाला आवडेल.....काही चुकल असेल तर समजून घ्या तुमचा स्पोर्ट असाच राहुदे....कमेंट्स नक्की करा....]



जेवून झाल्यानंतर राधा स्वतःमध्ये हरवल्या सारखी खेळत बसली होती.........रणजीत तिला एकटक बघत होता........त्याला आज राधा वेगळीच भासत होती......ती सुखरुप आहे यातच रणजीत खुश होता.........


राधा: ओ साखरपेरकर...ओ साखरपेरकर...


राधा लहान मुलासारख करत बोली.....


रणजीत: हा बोल न राधा..तुला काही हवाय का?


राधा: नाही ओ..मला सांगा माझ घर कुठ आहे? मी क़ाय हॉस्पिटलमधीच राहणार का?


रणजीत: आआ ब नाही तू घरी जाणार ना पण बरी झालीस की..तोवर तू माझ्या घरी राहा..हु


राधा: का मी तुमच्या घली का राहु?..मी नी नाही राहणार..


रणजीत: अग अस क़ाय करतेस ते..ते तुला बर नाही ना जर तू घरी गेलीस तर तुझे आई बाबा पण आजारी पडतील ना,आता ते आजारी पडले तर तुला दुःख होइन ना म्हणून तू माझ्या घरी राहा बरी झालीस की जा..हा..


राधा: ओके,पण मग मला सांगा तुमचे घरचे नाही का पडणार आजारी...?


रणजीत: मेमरी डिफ्यूज झाले पण अक्कल तेवढच आहे..नको टिकडे जास्त डोक चालत हिचा..खरच राधला समजवन इम्पॉसिबल आहे..हे कृष्णा हिची मेमरी डिफ्यूज केलीस पण अंगातली मस्ती नाही😑


रणजीत हळूच बोला.......


राधा: आ क़ाय बोलात🙄


रणजीत: काही नाही..बग माझ्या घरी मी आहे ना डाक्टर कोणी आजारी पड़ल तर मी बर करेंन लगेच पण तुझ्या घरी तर कोणी नसनार ना..म्हणून आणि माझ्या घरी मस्त झोपाला आहे,खेळणी आहेत खुप,भरपूर चॉकलेट आहेत,तुझ्यासोबत खेलायला खुप लोक आहेत...तुला खुप मज्जा येईल..आ मग येशील ना माझ्या घरी????


राधा: अम्म्म🙄 ओते...येते मी..


रणजीत: हु,मानली बाबा एकदाची😤


राधा: साखरपेरकर..मला माझ्या आई बाबांचा फेस आठवत का नाही आहे...😢


राधा रडवेला चेहरा करत बोली.......तिच्या या प्रश्नावर रणजीतला क़ाय उत्तर द्यावे कळले नाही........


रणजीत: आ र राधा..तू आता झोप हु आपल्याला उद्या घरी जायच आहे न...हु झोप..आणि जास्त विचार नको करू सगळ नीट होईल हु..


तो विषय बदलत बोलला.........


राधा: ओके गुड़ नाइट...


रणजीतने राधाला बेडवर झोपवल आणि मग तो विचार करताच झोपला.........सकाळी नर्सने राधाला फ्रेश केला आणि मग रणजीत राधा सोबत घरी निघाला..........गाड़ी मध्ये बसून राधा खिड़की बाहेर पाहत होती..........तिचा निरागस चेहरा रणजीत निहाळत बसला होता...


📻🎶


बेसुरे दिल ने सुर खनका दिए


इश्क के मोती है छनका दिए


अब उड़ रहा हु जैसे रंगीन बुलबुला


नाद खुला नाद खुळा


हाय हाय लग गया रे इश्क का नाद खुळा..


कारमध्ये मस्त रेडियो सुद्धा चालू होता..........राधा गाण गुनगुनत बसली होती.......रणजीत तिला पाहत बसलेला......त्याच्या डोळ्यासमोरून त्यांनी एकत्र घालवलेले क्षण गेले....


आजमा जरा


करने गुलामी मै खड़ा


बंदिशे तोड़ के,


राह में तेरी मै बढा


अनकहे उलझे सवालो से तेरे


ख्यालो से मैं मिल रहा


नादखुळा नादखुळा


लग गया रे इश्क का नाद खुळा..


वाड्यासमोर गाड़ी येऊन थांबली........तस घरातील सगळे लोक बाहेर आले.......रणजीतने राधाला गाड़ी बाहेर उतरवल........सगळ्यांना त्याने फोन वर कल्पना दिलीच होती म्हणून कोनी काहीच बोला नव्हता आणि राधाच्या आई बाबान ही बोलावल नव्हतं......


रणजीत: आ ब र राधा,हे बग माझ घर..कस आहे?


राधा: आले वा!! खुप मस्त😃एवढं मोठ घर तुमचा..मी तर इथे लपाछपी पण खेलू शकते...


रणजीत: हो मग..आणि हे बग माझी फॅमिली..माझे आई बाबा..काका काकू..आजी..दादा वाहिनी..लहान बहिन रेवा..दादाची मूल ऋग्वेद आणि रुता..


राधा: हाय..हाय..सगळ्यांना हाय!!


रम्या: हाय राधा..


राधा: हाय..अअअअअ मी तुम्हाला काय बोलू..?


रम्या: मला,रम्या ताई म्हण हम्म...


राधा: ओके आणि बकीच्याना..????


ती सगळ्यांना पाहत बोली.....


सुमन: मला आई बोल...


सदाशिव: मला बाबा..


महेश: मला महेश काका बोल..


माधवी: मला काकू..


रेवा: मला रेवा बोल हम्म😃


राहुल: मला दादा बोल..


आजी: मला आजी बोल ओके..😊


राधा: हा चालेल..आणि ए तुमची नाव काय आहेत..


रुता: मी रुता आहे काकू..ओळखल नही का..आणि हा आपला ऋग्वेद...


राधा: तू काकू कोणाला बोलते..मी नी तुझी काकू नाही..


रणजीत: आ आ आ ब वाहिनी..


रम्या: रुता राधाला आराम करु दे चल तू आत..


रुता: अग मम्मा पण...


रम्या: बबडू चल..


चल वेद..


रम्या तिला हात पकडूंन घेऊन जाते....


सुमन: जीत राधाला घेऊन जा खोलीत..


रणजीत: हम्म..चल राधा..


राधा: अम्म..


रणजीत: काय झाल राधा..कसला विचार करतेस..


राधा: ती लुता मना काकू का बोली..


रणजीत: अग,ती अशीच बोली...तिला मस्करी करायची स्वयं आहे...बर ए तुझ्यासाठी चॉकलेट आनुन ठेवलेत मि खोलीत..


राधा: खर,चला न म लवकर लवकर...😃चला चला..


रणजीत: अग हो हो..


रणजीत राधाला चॉकलेट देतो तशी ती खुप खुश होते........आणि पटकन चॉकलेट खायला सुरवात करते तिचा तो अवतार पाहुन रणजीत खुप हस्त होता........त्याने मोबाइलमध्ये तिचे बरेच फोटोज काढले......ही छोटी राधा त्याला खुप आवडत होती.....


राधा: साखरपेरकर मस्त होते चॉकलेट..थैंक्यू..


रणजीत: वेलकम 😃बर आता तुझी तू गप्प खेळ हम्म मला जरा काम आहे ते करतो...


राधा: ओके..


रणजीत मग लैपटॉप वर त्याचा काम करत बसतो......बाहेर पाऊस पड़त होता........राधाला पावसात भिजायची खुप इच्छा झालेली........रणजीतची नजर चुकवून ती गपचुप बाहेर गेली........आणि गैलेरी मध्ये उडया मारू लागली......पावसाचा थेंब अंगावर झेलताना तिचा तो हसरा चेहरा पाहण्यासारखा होता......तिच्या आवजाने रणजीतच लक्ष बाहेर गेला तर बाहेर राधा बाई भीजत होत्या.........आणि जोरात गाणी गात होत्या.......रणजीत लगेच पळत तिच्या जवळ गेला.......


रणजीत: राधा..भीजत का आहेस..चल आत..चल..


राधा: नही,मी नी नही येणार..तुमी पण भिजा न माझ्यासोबत...मज़्ज़ा येते ना...


रणजीत: नको राधा,आत ये...


राधा: ना ना...


राधाचा आनंद पाहुन रणजीत ही गप्प बसला.......काय करणार बायको समोर नवरा गप्पच तर बसतो😂..राधा नाचत होतीच तेवढ्यात तिचा पाय घसरला आणि ती पटकन खाली पडली........तस रणजीत तिला पाहुन हसला.......राधा लगेच बारीक तोंड करून बसली........मग रणजीत ही बाहेर गेला आनी मुद्दाम पाय घसरुन पडला........तस राधा हसायला लागली......


रणजीत: घे मी पण पडलो😅


राधा: मग पडणारच न माझ्यावर हसलात ना..म्हणून सांगते राधा से पंगा पड़ेगा महंगा😂


रणजीत: हो बाई हो..😂


राधा: बर मी नी तुम्हाला एक गाण एकवते ह..


रणजीत: बर बोल..


राधा: छोटुशी बाहुली,खेलायला चालली..आआआ अम्म्म

रणजीत: पुढे..

राधा: बाहुली पली😅पुढचा मना आठवत नाय..

रणजीत: वेडी😂😂


मग दोघे ही आत येतात......आणि चेंज करून झोपी जातात......कामात असला तरी रणजीत तिला मेडिसिन वेळेत द्यायचा........जेवन ही भरवायचा........तिची सगळी काळजी तो घेत होता.......अगदी लहान मुलाना जपतात तस तो तिला जपत होता.....राधा सुद्धा त्याच्या फॅमिलीसोबत आनंदाने राहत होती.....पण मधेच ती रडायची,तीच डोक जड़ वहायच......अचानक काहीतरी ती बड़बड़ करायची....कोणालाच राधाची अवस्था बघवत नव्हती.....पण सगळे रणजीतकड़े बघून गप्प बसायचे.......


जवळ जवळ महीना उलटला असेल....राधाच्या अवस्थेत थोड़ा फरक वाटत होता....पण बदल आणखी नव्हता....रणजीतच सगळ लक्ष राधाकडे लागलेला....कामाचा खुप नुकसान होत असल्यामुळे रणजीतची आज काल चिड़चिड होत होती.....सकाळी रणजीतला कसला तरी आवाज येऊ लागला.....डोळे चोळत तो उठला.....समोर पाहतो तर काय,त्याची रूम अस्थावस्थ झालेली......सगळा सामान इकडे तिकडे होता....आणि राधा सोफ्यावर उडया मारत होती....तिच्या या मस्ती मुळे रणजीतचे काही बिजिनेस डील चे पेपर फाटले......हे पाहुन रणजीत खुप चिडला....


रणजीत: राधा$$$....


तो तिच्यावर ओरडत म्हणाला....


राधा: कक काय झाल😢


रणजीत: काय करतेस तू हु..काय करतेस..अग खोलीची काय अवस्था केलीस तू..आणि माझे हे महत्वाचे कागद होते..तेच तू फाडलेस..कोणी सांगितले होते हे करायला..गप्प बसता येतच नही का तुला..अक्कल नाही का वेंडी आहेस का तू..वेडीच आहेस खरतर😤👺


राधा: सससस सॉरी मी नी ते...


रणजीत: काय सॉरी..😡गप्प बस जरा आता..सगळ माझ नुकसान करतेस तू..सांगून समजत नही तुला..पनवती लावलेस नुसती...बघाव तेव्हा नाटक नुसती..काम म्हणून करू देणार नाही...


त्याच बोलन ऐकून राधा खुप रडायला लागली....रणजीतचे डोळे रागाने लाल झाले होते....राधा तिकड़ूंन लगेच निघुन गेली.....रणजीत ही नंतर रागतच खोली साफ करू लागला......बराच वेळ झाला राधा खोलीत फिरकली पण नव्हती....रात्री रणजीत जेवायला खाली गेला सगळे खाली बसले होते...


सुमन: ये बस बाळा..काय रे राधा मागून येते का..


रणजीत: खोलीत नही ती..दुपार नंतर आलीच नाही ती खोलीत..


सुमन: काय..अरे ती घरात नाहीच..दुपार पासून ती दिसेना कुठ..


रणजीत: काय.आई तु नीट पाहिले का..कुठे तरी असेल ती..


माधवी: हो अरे जीत..कुठेच नाही ती..आम्हाला वाटल की तुझ्या सोबत बसले...जेवली नाही रे पोर..


रणजीत: अरे यार..कुठे गेली असेल राधा..


राहुल: चल जीत आपन तिला शोधायला जाऊ..चल..


रणजीत: हो चल..


सदाशिव: आम्ही पण तिला शोधतो..


महेश: हो चल


रणजीत: ह्म्म्म😢


सदाशिव: काळजी नको करू बाळा..भेटेल ती हु..


सगळे वेगळे होऊन राधाला शोधतात.......रणजीतला स्वतःचा खुप राग येत होता.......त्याला तिची खुप काळजी वाटत होती.......तो गाड़ी खुप वेगाने चालवत होता.......किती तरी तास होतात राधा कुठेच भेटत नव्हती.......मग रणजीतला राहुलचा फोन येतो.....


रणजीत: हेल्लो...हा दादा📱


राहुल: जीत राधा सापडले..पण ती बेशुद्ध अवस्थेत आहे,तिच्या डोक्याला थोड़ लागलाय पन....📱


रणजीत: काय...ती ठीक आहे का..जास्त लागलाय का?....📱


राहुल: नाही मी हॉस्पिटलमध्ये आहे..M.K hospital मध्ये..तू लवकर ये....📱


रणजीत: हु..मी येतो...📱


रणजीत राहुलशी बोलत असतो.......तेवढ्यात त्याच्या गाड़ी समोर एक बाई येते.......रणजीतच लक्ष नसल्यामुळे गाड़ी वरुन त्याचा तोल सुटला आणि त्या बाईला गाडीने ठोकर दिली......रणजीत पटकन गाड़ीतुन खाली उतरला......समोर ती बाई बेशुद्ध पडली होती.......रणजीत पटकन तिला गाडीत बसवून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला......

क्रमशः