Mhatarapan - 3 in Marathi Short Stories by Kavi Sagar chavan books and stories PDF | म्हातारपण - 3 - निर्णय

Featured Books
Categories
Share

म्हातारपण - 3 - निर्णय

बाहेर पितळीबंब धूर ओकत होता . बऱ्याच वेळापासून पाणी उकळत असल्यामुळे अंघोळीला घेण्यायोग्य झालेच होते . म्हणून दुर्गा काकूंनी पाणी टाकले आणि आबांना आवाज देऊ लागल्या आज बबनच घर बघण्यासाठी मुलीवाले येणार असल्याने त्याची चोख व्यवस्था व्हावी यासाठी दुर्गा काकूची धावपळ सुरू होती. आबांचा मोठा मुलगा बबन पुण्यात जॉब करत होता. शिवाय पगारहीं चांगला घरी बावीस एकर बागायत शेती धाकटा मुलगा इंजिनियर च्या दुसऱ्या वर्षाला होता. बापूंच आबांसोबत फोनवर बोलणं झालं आणि मुलीकडची लोक यायला निघाली होती. फोनवर झालेल संभाषण उरकून आबा धावत अंघोळीला आले. दुर्गा काकूना गोड बातमी देऊन टाकली. तुमच्या याहीनबाई निघाल्या आहेत. आवरलं का तुमचं सगळं मनासारखं झालं पाहिजे. हो"" हो "" आवरतेच आहे. आतल्या घरात खापरावर पुरणाचे मांडे बनवणे चालू होते . रेणू आणि सुमन यांना खास मांडे बनवायला तर सुधा कांदाभजी काढत होती. बाहेर ओसरीमध्ये गुलाब आबांचा सालदार बैठकीची व्यवस्था पाहत होता.

दुर्गा काकूंनी ठेवनितली पैठणी आज मुदामहुन काढली आबांनी मागच्या वेळी नुकतेच लग्नाची पन्नाशी साजरी केली तेव्हा .. अंबानी कधी नव्हे स्वतः दुकानात जाऊन पसंत केली व हीं खास भेट काकूंना दिली होती. दुर्गा काकूचा तसा सावळा रंग असला तरी पैठणीत त्यांच रूप अगदीच उठावदार आणि शोभून दिसत होत. आबानी त्यात छेड काढून प्रमाचा रंग भरला . सर्व तयारी झालीच होती . बापूचे आगमन हीं झाले. घर बघण्याचा कार्यक्रम सुरळीत पार पडला. पुढच्याच महिन्याची तारीख ठरवून टाकली . बबन आणि अस्मिता यांची पसंती आधीच झाली होती.

सर्व आपापल्या घरी गेले. वाडा शांत झाला. दुपारचे अडीच वाजले होते. आज नेहमीपेक्षा जास्त दगदग झाली . त्याल पुरणाच जेवण आबा चांगलेच सुस्त झाले.. विश्रांती घेण्यासाठी आपल्या खोलीत गेले .. काही वेळाने दुर्गा काकू आत आल्या.. बबनच्या लग्नाची तारीख पक्की झाल्यचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. काय दुर्गाबाई ठरलं एकदाच लग्न आता एक चिंता मिटली म्हणावं आपली नाही का ?? मोठया सुनबाई चे पाऊल घरला लागली कीं ""धाकल्या चिरंजीवाच लग्न लावून टाकू .. काकू काही वेळ आपल्या भूतकाळात डोकावून पाहू लागल्या . किती भरभर दिवस निघुन गेले . आठवणी ठेवून बबन निलेश कधी मोठे झालेत अन नोकरीला लागले . आठवलं कीं आयुष्य एखाद्या चित्रपटा सारखं भासत. बबन लहान होता तेव्हा एकही दिवस माझ्यापासून लांब राहीला नाही. आणि आता पुण्यात एकटा राहतो . पिल्लं मोठी झाली कीं .. चोच घेऊन उडून जातात. काही येतात परत तर काही…? आपल कर्तव्य एव्हडंच तर असत त्यांच्या पंखात उडण्याच सामर्थ्य भरन .. त्यांना उंच आकाशात भरारी घेताना पाहणं. सगळं लहानपण आठवून दुर्गा काकूंचे डोळे भरून आले.

त्यांना त्यांच स्वातंत्र्य द्यायला हवं ना.. !""आपण का आपल्या वेड्या मायेत डांबून ठेवायचं .. आणि का म्हणून मायेचे कुंपण कुर्वाळत बसाव. असो.. ""

देण्याघेण्याच काय ते बापूसाहेब काय म्हणतात. बघा कोणीही नाराज होऊ नये .. कुणाच्याहीं मनात अढी असू नये. उद्याच त्यांना फोन करा. हो हो करतो . बाईसाहेब अजून रात्र सरायाची आहे.

आजची…

नास्ता घेऊन दुर्गा काकू समोर उभ्या .होत्या आबा मात्र रेडिओवर जुनी गाणी ऐकत त्याचा आनंद घेत होते. अहो """अहो ""ऐकताय का ?

हो बोला ऐकतोय कीं ""! गेली तीस वर्ष तुमचंच ऐकतोय नव्ह ! तो रेडिओ जरा बंद करा . नास्ता आणलाय … हो का ""! काय बनवलं आज तुमचा आवडता तुपाचा शिरा ! अरे वा आज सकाळीच तोंड गोड करताय. काय विशेष तर नाही ना ""! गप्पं बसा या वयात कसला चावटपणा .. ! बरं मी काय म्हणते बापूंना फोन केला का ?? अरे नाही विसरलोच होतो मी नास्ता करून फोन करा काय ते बोलून घ्यायला काय होतय . नंतर उगाच गोंधळ नको .. हो बोलतो.

आबांनी फोन कानाला लावला.. काही वेळ नुसती रींग वाजत राहिली..

तशी काकूंची बेचैनी वाढू लागली. अखेर बापूंनी फोन रिसिव्ह केला देण्याघेण्याच सविस्तर बोलण झाल्यावर .. काकूंनी देव्हाऱ्यात देवाला प्रसाद ठेवला .. आणि आबांचे हीं तोड गोड केले.

बबनने ऑफिसमध्ये आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याना रजेचा अर्ज देऊन महिनाभर सुट्टी घेऊन टाकली . बबन उद्याच गावी येतोय असं दुर्गा काकूंना कळवलं होत. अस्मिता हीं बबन ला भेटायला येणार होती. आणि त्यासाठी आबांची तशी परवानगी घेऊनच . तस लग्नाच्या आधीच मुलामुलीला भेटायला परवानगी नव्हतीच .. काळ बदलत चालला होता. दोघेहीं मोठया शहरांत शिकलेली शिवाय शहरात असणाऱ्या वातावरणाचा प्रभाव होता. त्यांच भेटणं काही अर्थी चुकीचं असं नव्हतं. गावाचं वातावरण रूढी, परंपरावादि असल्याने , आणि प्रत्येक नात्याला मर्यादा होत्याच असो.

अस्मिता दिसायला देखणी सडपातळ बांधा , नाकीडोळी सरस शिवाय M.A झालेली. सासरच्या लोकांना सुनेने नोकरीं करावी अशी काही अट नव्हती. सर्व तिच्या इच्छेवर अवलंबुन होते. अस्मिता आणि बबन घरी पोहचणार होते दुर्गा काकूंचा तसा दमच होता. येतांना सुनबाईला सोबत घेऊन येण्यासाठी.

शेतात केळीची कापणी सुरू होती.

सार शिवार हिरवा शालू नेसून..प्रसन्नतेन वाऱ्याच्या तालावर नाचत असलेले पिक शोभून दिसत होती. घराजवळ राहणारा रामु निरोप घेऊन आला.

धाकल शेठ आणि ताईसाहेब आलंय आबाला निरोप देऊन घरला निघाला.

नव्या सुनबाईचे सर्व आदरतिथं केल गेलं. बबन अस्मिता दोघ शेती बघायला गेले.. शेतात सगळ्यांना भेटणे झाले. आज संपूर्ण वाड्यात प्रसन्न वातावरण होते. दुर्गा काकूंना अस्मिता जाऊ नये असं वाटलं .. मोठया जड अंतःकरणाने सुनबाईला निरोप दिला . तसेही लग्नाला दोन आठवडेच बाकी होते . अस्मिता वाड्यात परत येणार होती. कायमची ""

विवाह सोहळा जवळ येऊन ठेपला आज मात्र पूर्ण वाडा पाहुण्यांनी भरलेला होता. कामाची जमवाजमव सुरू होती. प्रत्येकाला आपापली काम नेमली गेल्याने .. आबा आणि बापू दोघ पाहुण्यांच्या स्वागतसमारंभात व्यस्त होते.

लग्नसोहळा अतिशय थाटात पार पडला .. बघनाऱ्याना त्याच विशेष कुतूहल होत. सुनबाई माप ओलाडून घरात आली. कोडंकौतुक, झाले. आणि दुर्गाकाकू धन्य झाल्या .

बबनची रजा संपत आली होती, त्याला पुण्याला निघावं लागणार होत. रात्री जेवणाच्या पंगतीत बबन ने आबांसमोर विषय मांडला .. "आबा ! दोन दिवसानी मला जावं लागणार अस्मिता सोबत येणार आहे . जवळच एक फ्लॅट बघितला सर्व बोलण झालंय. पुढच्या हप्त्यात सामान पुण्यात शिप्ट करतोय तुम्हांला भेटायला येत राहील "" ! तसही तुम्हीं कधींच शहरात जात नाही .पूर्वीची शहर आताची शहर खूप प्रशस्त आणि प्रगतशील झालीं आहेत .त्या निमित्ताने आईला ही थोडं बाहेर पडता येईल .

काही दिवस तुम्ही चला तेव्हडच.. हवापालट बबन दुर्गा काकूंकडे पाहत बोलण्याचा प्रयत्न करत होता .दुर्गा काकूंना बबन ने काही दिवस राहावे असें मनोमन वाटतं होते . त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक गंभीर भाव बबन ला स्पष्ट जाणवतं होते .

!

आबा शांततेत ऐकून घेत होते.. कुठंलिही प्रतिक्रिया नाही.. दुर्गा काकूंना मात्र सुखद धक्का होता. लग्न होऊन हप्ता झालं असेल ..आणि हे असं काही घडेल .. कल्पना नव्हती.

" तुमचा निर्णय झालाय ?

हो आबा ! आबा काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतें . काकूंची किचनमध्ये आवराआवर चालू होती . सोबत मनात चलबिचल काकूंची ही अवस्था आबांच्या नजरेतून टिपली गेली . शेवटी आईच ती " सगळं आवरून काकू आत आल्या आबा सोसायटीच्या हिशोबाची जुळवा जुळव करत बसले होते . काकू काही बोलत नाहींत त्यामुळे काळजी वाटली . अहो " का असं गप्प बसलाय तुम्ही ? नवीन हाय सगळं शिवाय मुलं शहरात रमलेली मौज मजा करायचे दिवस त्याचे . त्यानाही त्यांच्या इच्छे प्रमाणे जगण्याचं स्वतंत्र आहेच कीं " एकमेकांचे स्वभाव आवडी निवडी कळणं महत्वाचं नाही का ? समजूत काढल्याने दुर्गा काकु निश्चिंत झाल्या . मनावरचा ताण काही प्रमाणात कमी झाला . उद्या च्या तयारी विचार करत ..काकू झोपल्या काकूंना शांत झोपलेलं पाहून आबांना खरोखरच आपुलकी वाटली .

आता वाड्यात.. आणि मनात फक्त शांतता…"" होती.

बबन पुण्याला निघुन गेला. दुर्गा काकू अस्वस्थ राहू लागल्या .. आबांचीहीं आता तिच अवस्था होती. सुनेचा सहवास दुर्गा काकूच्या नशिबात नव्हताच ..

दोघांच वय होत चाललं होत. आणि वयासोबत अनेक व्याधी जडल्या होत्या.

या वयात एक अजून धक्का बसला.. लहाना मुलागा … मोटर सायकलच्या अपघात होऊन मरण पावला . ""!

आयुष्य त्यांना उतरत्या वयात अनेक भयानक अनुभव देऊन गेला.

त्या वेळी दुर्गाकाकू खूप रडल्या .. अस्मिता हीं वाडा सोडून गेली .. त्यावेळी त्याना काहीतरी विपरीत घडणार वाड्यावर काहीतरी विघ्न येणार असल्याची चाहूल झाली.. पण वेड मन भरकटल कीं .. शंका उगम पावतात . आपल्यावर लक्ष्मी रुसली आहे.. आल्या पावली तिच असं माघारी जाण .. विचित्र संकेत होता.

अस्मिता गेल्यापासून वाड्याच्या आनंदाला उतरती कळा येऊ लागली.

दुर्गा काकू ना कधीहीं बबनकडे जावस वाटल नाही .

एके दिवशी काकूंना बऱ्याच दिवसांनी चारधाम यात्रेचा विचार मनात आला.

मरण येण्याआधी चारधाम यात्रा करावी . अंबानी हीं होकार देऊन टाकला.

काही कपडे .. आवश्यक तेव्हढे पैसे घेऊन दोघ निघाले.

आज बारा वर्ष लोटली होती. गावात कुणीही आबांना व दुर्गा काकूंना बाहेर बघितल नाही. काही जवळची माणसं वाड्यात येऊन विचारपूस करून जात असत.

प्रत्येकाला हळहळ वाटायची .. परिस्थितीला कोणीही जबादार नसतो. जीवनच चक्र ज्या दिशेला फिरेल त्या दिशेला आपण जावं एव्हडंच काय ते आपल्या हातात.

रस्त्यावर चालत असताना .. काकू अगदी हाडामासाची पटलीन दिसत होती. अंबानी दोन दिवस अगोदर तिकिटं काढून घेतली, प्रवासात लागणाऱ्या आवश्यक वस्तू सोबतीला घेऊन दोघेही प्रवासाला निघाले.

आबांचा जवळचा असा माणूस गुलाब आबाकडे सलगडी होता. दोघाना तालुक्याला सोडायला आला होता.

चारधाम ला जाणारी बस समोर उभी होती. दुर्गा काकूंना प्रवासाचा योग तसा कमीच यायचा प्रवास म्हणजे काकूंसाठी दुर्मिळ गोष्ट होती. बसमध्ये म्हातारी समवययी म्हातारी जोडपे बघून काकूंना कुतूहल वाटल. जाताना गुलाबच्या डोळ्यात आश्रु वाहत होते.. कंठ दाटून आला. काकूं आणि आबांची अवस्था सारखिच होती.. गुलाबच प्रेम पाहून काकूंचा उर भरून आला. गुलाबला मीठी मारली … काकूंचा हुंदका फुटला ""… बबन..

बस मध्ये बसलेले जोडपे अचंबित होऊन पाहत होते.. भावनाविवश असा क्षण ..पाषाण हृदयी काळजाला पाझर फुटावा .. ""...!

बघणाऱ्यांच्या डोळ्यात पाझर फोडून गेला.

गुलाब निरोप देऊन परतीच्या प्रवासात निघाला होता .. वाड्याची संपूर्ण जबाबदारी घेऊन.

दुर्गाकाकूंची यात्रा सुखरूप पार पडली. आणि एक दिवस आबांचे पत्र वाड्यात पोस्टमन घेऊन आला.

गुलाबने अंगठ्याचा ठसा देऊन पत्र हातात घेतलं. पत्र दोन तीन वेळा आलटून पालटून बघू लागला. गेली इतकी वर्ष कोणाचंहीं पत्र आलं नाही. मग आज मला पत्र कोणीबरं पाठवलं असेल""?

आपल्याला वाचताहीं येत नाही.

वाड्यापासून काहीच अंतरावर जोशी गुरुजी राहत .. असत आपण त्यांना भेटलं पाहिजे. पत्रात काय लिहिलंय जाणून घ्यायचं होत.

गुलाब धावत गुरुजीच्या घरी पोहचला..

गुरुजी"" अहो.. गुरुजी""!

गुरुजींनी बाहेर डोकावून पहिल अरे गुलाब काय र बाबा आज काय काम काढलंस..

नमस्कार करतो गुरुजीं ""!

असू दे ! सुखी राहा "!

हातातल पत्र देत.. गुरुजीं पत्र आलय वाचून दाखवा तेवढ"

गुरुजींनी पत्र घेत.. अरे आबांच पत्र हाय ""

गुरुजीं वाचू लागले..


प्रिय..,

गुलाब आम्ही सुखरूप पोहचलो . तबेत चांगली आहे. प्रवास छान झाला. प्रवासात बरीच मित्र भेटली .. आयुष्य भरभरून जगल्याचा आनंद लाभला . सध्या आम्ही एका वृद्धाश्रमात आहोत. आंनदी आहोत. दुर्गाकाकु तुझी आठवण काढत असते. पून्हा वड्यात येण्याची इच्छा नाही.

आता आम्ही इथेच राहणार आहोत. वड्याची आणि धाकल्या मालकाची काळजी घे .. ""!


आबा.

पत्रावर आबांचा पत्ता नव्हता. जो होता इतर कुठल्याश्या ठिकाणचा .. आबाला भेटने अशक्य होते.

आबा आणि दुर्गा काकूला असे वृद्धाश्रमात रहावे लागले .. गुलाबला खूप दुःख झाले.

ते आजही वृद्धाश्रमात आहे..

कदाचित त्यानी घेतलेला निर्णय योग्यच होता.

आयुष्यात अश्या आणि निराशा संपली कीं सार काही संपत.. सुरू होतो एक नवा प्रवास.."