वाटलं, आताच जाऊन मिठीत घ्यावं तिला.... पण, नंतर आइस क्रीमच्या स्टॉलवर एका मुलाच्या थोबाडीत मारताना बघून, पाऊल मागे घेतलं.....😂 काय म्हणून, काय विचारताय...😂 स्वतःचं तोंड सुजवून घ्यायचं नव्हतं ना राव..... 🤣🤣
ती दिसल्यापासून माझं मन तिच्यातच..... ती त्या फंक्शनमध्ये कुठे जाते, काय करते हेच सतत बघत होतो.... एका बाईला बसायला स्वतः उठून, जागा देताना बघून खात्री पटली.... मुलगी गुणी आहे आणि आता काहीही झालं तरी हिलाच आपण पटवणार....😍
मिशन सुरू झालं...... आणि तेव्हाच तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.... रात्रभर तिची स्वप्न उघड्या डोळ्यांनीच पाहत राहिलो.... कारण, डोळे मिटायला ती नजरेसमोरून जायला नको का...🙈 तसाच रात्र जागलो तिच्या स्वप्नात.....😍 उघड्या डोळ्यांनी........😍
दुसऱ्या दिवशी फेसबुक अकाऊंट चेक केलं.... बघितलं तर फ्रेंड रिक्वेस्ट रीजेक्टेड....😂 परत सहा महिने हेच केलं..... ती रिजेक्ट करत होती मी पाठवत राहिलो...... हम तो तेरे आशिक हैं सदियों पुराने..... चाहे तू माने, चाहे ना माने.....😂😂❤️😌
सहा महिन्यांनंतर......🙄😏😣😒😑😐😔😟😒
एकदाची तिने फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केलीच.... जाम खुश झालो होतो राव.....😍 बोलायला सुरुवात तशी तिने शिव्या देऊनच केली..... हा म्हणजे तिच्यातला ॲटीट्युड मला दिसलाच होता आणि त्याचा प्रत्यय बोलताना येईल ह्यावर मी काँफिडन्ट सुद्धा होतोच.....😂 कसंय शेठ(😂😂😂😂😂) इज्जत घालवायची तयारी आधीच असावी या बाबतीत (प्रेमाच्या बाबतीत)..... म्हणजे, नंतर इज्जत कोणी (फक्त मुलींनी..... कारण, बाकीच्यांनी हात लावायची हिंमत जरी केली तरी, आपला त्याला आदराने नमस्कार असेल.....) काढली तरी फरक पडत नाही.... म्हणून, तर मी फुल्ल तयारीत होतो.....😎
असेच बोलण्यात दिवस जात होते.... ती मात्र तिचा मोबाईल नंबर द्यायचा नाव घेत नव्हती.... मग मिच शक्कल लढवली.....🙈
एकदा असच.......
मी : "तू किती सुंदर दिसतेस अग....😘"
ती : "काय काम आहे सरळ बोल...... इतकी लाडी - गोडी नको....🤨"
च्यामारी हिला कसं पट्कन समजलं राव.....🙈
मी : "अग ते मला तुझ्या ट्युशन क्लासेसमध्ये यायचं होतं जरा इंक्वायरी करायला..... सो, तुझा नंबर मिळेल??"
ती : "अरे मग ट्युशन क्लासेसचा नंबर देते....... त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कर ना..... क्लासेस माझ्या पप्पांचे नाहीत.....😏"
मी : "हे आहेच म्हणा.... ओके दे त्यांचा....🙈"
तिने नंबर दिला.... आता हीचा नंबर कसा काढायचा हा मोठा प्रश्न! सो, मी तिच्या क्लासेसमध्ये जायचं ठरवून, एक दिवस मस्त पैकी तयारीत गेलो..... क्लास सुटला आणि सगळे बाहेर आले ही मात्र सगळ्यांच्या शेवटी क्लास बाहेर पडली..... मी तिच्या स्कूटी जवळ जाऊन थांबलो.... तिचं लक्ष माझ्याकडे नव्हतं....
मी : "हॅलो.....😍"
ती : "तू.....🤨"
मी : "हो ते क्लासेस....🙂"
ती : "जा ना मग.... माझं तोंड कशाला बघत बसलाय....😏"
तिचं हे बोलणं अपेक्षित होतं म्हणून, काही वाटलं नाही..... मी आत फक्त नावासाठी जाऊन आलो.... खरं तर मला क्लासेस वगैरे काही जॉईन करायचे नव्हते.....😉 खरी बोंब तर ही, "हमें तो लूट लिया मिल के हुस्न वालों ने गोरे - गोरे गालो ने काले - काले बालों ने.....😂"
मी बाहेर आलो ती फ्रेण्ड्स सोबत गप्पा मारताना दिसली..... मी तिथे गेलो.....
मी : "येतेस सोबत माझ्या...??"
ती : "कुठे?🤨"
मी : "चल कॅफे जाऊया मला काही बोलायचं आहे.....🙂"
ती : "फाईन..... हे गाइज..... सी यू टुमारो.... बाय....🙂"
फ्रेंड्स : "बाय....😁😉😉"
ती : "निकलो ऐसा कुछ नहीं हैं....😁"
तिच्या फ्रेंड्सला सांगून, ती तिच्या स्कूटी जवळ आली.... मी माझी बाईक घेऊन, लगेच तिच्या मागे आलो.....
मी : "हे माझ्या सोबत चल ना..... तुझी स्कूटी असुदे इथच....🙂"
ती : "नो... थँक्स्.....😏"
मी : "ओके ऍज योअर् विश्.....🙂"
स्कूटी स्टार्ट करत ती.....
ती : "बाय द वे..... जायचं कुठे आहे.....??"
मी : "ते नाही का ॲलेक्स कॉर्नर जवळ एक कॅफे आहे.....🙂"
ती : "ओह्ह.... दॅट 'फुड लवर्स कॅफे'...🙄"
मी : "येस... तिथेच....🤗"
ती : "लेट्स गो.....😉"
आम्ही निघालो.... तिथे आत मी एक रूम आधीच बुक केलेलं.... बट, तिने नकार दिल्यामुळे आम्ही बाहेरच बसलो......😬😞😞
ती : "रूम का बुक केलं होतं तू?🤨 आय मीन काय गरज होती...?🤷?"
मी : "अग आपल्याला प्रायव्हसी तेवढीच.....🙂"
ती : "ओ.... हॅलो.... प्रायव्हसी साठी आपण गर्ल फ्रेंड, बॉय फ्रेंड नाही..... समजलं ना....😏"
मी : "ओके फाईन...... दे ऑर्डर दे......🙂"
दोघांनी आपल्या आवडीचे डिश ऑर्डर केले आणि एन्जॉय केलं..... ती तिची डिश ऑफर करेल म्हणून, मी काही वेळ खायचा थांबलो पण, तिने तसं न करता स्वतःचे डिश खायला सुरुवात कधीचीच केलेली.....😂 गप मी माझी डिश संपवली.....😂 बिचारा मी.....😂
सगळं फिनीश करून, जायच्या वेळेस....
मी : "हे मला तुझा नंबर तर दे यार......😞"
ती : "ओके.... घे...."
मी पटकन नंबर नोट करून घेतला.....😍💕
ती : "चल मी निघते ओके..... बाय....🙂 थँक्स् फॉर योअर् ट्रिट.....🙂"
मी : "माय प्लेजर....🙂🙂"
आम्ही दोघे निघालो..... ती घरी गेली असेल पण, मी जाऊन एका गार्डनमध्ये निवांत बसलो...... आज तिच्यासोबत घालवलेले ते क्षण आठवून, एकटाच गालात हसलो...... खरंच तिच्या प्रेमात वेडा झालो होतो..... हेच सांगायला नेक्स्ट प्लॅन करावा म्हणून, खिश्यात हात टाकला आणि मोबाईलवर थिएटर शो चेक केले..... डेट ०१/०५/२०१६ टाईम - @१०:३० मॉर्निंग शो.... कॉर्नर सिट बुक करायचा विचार मनात डोकावून गेला सुद्धा.....🙈 पण, ते मी जाणीवपूर्वक टाळले..... तिला आवडेल की, नाही हा संभ्रम होताच......😞 म्हणून, बुक केले टीकीट्स आणि तिला कॉल केला......
ती : "काय रे, नंबर द्यायला वेळ नाही..... तिकडे लगेच कॉल!....🙄"
मी : "नको करायला हवा होता का?"
ती : "आता केलाच आहेस तर, बोल....😏🤨"
मी : "ठेवतो मग......😉"
असं म्हणत मी फोन कट केला....... मला वाटलं तिकडून तिचा येईल....... 😁😂😂😂😂 आलाच नाही..... मग अर्ध्या तासाने मिच परत कॉल केला.......
मी : "अरे तू तर कॉल बॅक ही केला नाहीस यार....😒"
ती : "काम कोणाचं...... तुझं की माझं..... मग....🤨🤨"
मी : "बरं....... ते जाऊदे.... बाघी, येत्या २९ एप्रिलला रिलिज होत आहे...... तर, आपण जायचं ०१ मे.....??"
ती : "थिएटर....... वो....🤩🤩🥳 जाऊया..... 🤩"
ती एक्साईटमेंट मध्ये बोलून गेली......
मी : "ओके.... मी बुक केला शो..... मॉर्निंग १०:३०.... सो, तू मला जगदंबा स्क्वेअरवर भेट... किंवा डायरेक्ट पी. व्ही. आर. ॲज योअर् विश्.....🙂"
ती : "बुक ही केलंस...... ओके देन..... मी डायरेक्टच येते..... डन....🙂"
तिने फोन ठेवला आणि इकडे माझ्या हृदयाने, मन आणि मेंदूचा ताबा घेतला....🤩 उद्या तिला आपल्या हृदयात तिच्याविषयी असणाऱ्या भावना सांगायच्या हा विचार करूनच घरी आलो.... कधी - कधी तिला भेटतो आणि सांगतो असं झालं होतं..... जेवून झोपी गेलो..... सकाळी मला लवकरच जाग आली...... तिला बघितल्यापासून हे रोजच घडत होतं....🙂😍 पट्कन फ्रेश होऊन, रेडी झालो..... कॅज्युअल आऊटफिट्स विअर् केले अँड खाली आलो.....
समोर येऊन जेव्हा तिने टाळी वाजवली.......👏👏 तेव्हा भानावर आलो.....🙈
ती : "हॅलो..... गूड मॉर्निंग....🙂"
मी : "गूड मॉर्निंग....☺️☺️"
ती : "सो, निघुया थिएटर..... ते सोडतात लवकर आत.... मॉर्निंग शो असला की.... तिथं छान फोटोज् क्लिक करू चल....😍😍"
माझा हात पकडत, ओढतच मला ती तिकडे घेऊन गेली..... मला तिचा तो हक्क गाजवणारा बिहेविअर् जाम आवडला होता...... आत पी. व्ही. आर. मध्ये माझ्यासोबत सेल्फी आणि स्वतःच्या ढीगभर सेल्फी काढून झाल्यावर......😂
ती : "ओह्ह गॉड..... फक्त टेन मिनिट्स टू गो..... चल चल..... पटकन.....🙈"
मी : "तू हो पुढं मी पॉप कॉर्न अँड स्नॅक्स घेऊन आलोच.....☺️"
ती : "सोबत कोल्ड ड्रिंक्स....😍"
मी : "हो......😁🙉"
ती ऑडी आत जाऊन बसली..... मी सगळं घेऊन आत आलो..... मूव्ही सुरू झाला..... ती मूव्ही बघण्यात आणि मी तिला बघण्यात बिझी झालो..... कारण, माझी फेवरेट जरी श्रद्धा कपूर असली......😌 तरी, त्या क्षणी माझी ही श्रद्धा कपूर मला जास्त क्यूट दिसत होती.....🤗😌😌 तिची ती अखंड बडबड, तो क्यूटनेस, तो डिंपल, ते हसणं सगळच कसं वेडावणारं होतं..... एक्साईट होऊन, ती मला मूव्ही मधले फनी मोमेंट सांगायला माझ्या किती तरी जवळ आली होती.... हे तिलाही समजले नव्हते.....
मला आठवतं जेव्हा श्रद्धा कपूरने टायगर श्रॉफला तो डायलॉग फेकून मारला...... "तू जो ये अपने नैनो से बाण चला रहा हैं ना ये मुझ पे काम नहीं करेगे...." तो सेम डायलॉग तिने मला फेकून मारताना....... हाय....🤗🤩😍 माझी ती क्यूटिपाय..... कसले गोड एक्स्प्रेशन दिले होते राव तिने......😍😍😍 मूव्हीतल्या सगळ्याच साँग्जवर ती वेड्यासारखी हातवारे सोबतच एक्स्प्रेशन्स करताना बघून, मी खूप हसलो होतो..... इतका मी माझ्या लाईफमध्ये कधीच खुश नव्हतो जितका आज.... वाटलं हिला आताच सांगून द्यावं.... पण, मनाला धिर देत शांत बसलो.... मूव्ही संपला आणि आम्ही बाहेर आलो......
ती : "वाव यार..... किती क्यूट दिसत होती ना ती....😍"
मी : "हो.....😍"
ती : "आय लाईक दॅट टायगर वाला डायलॉग..... अभी तो मैने शुरु किया हैं.....😁😁 बट, मॅन विलन मला जाम आवडला.... काय हॉट दिसत होता...... श्रद्धाच्या जागी मी असते ना..... मी वीलन सोबतच लग्न केलं असतं....😍😍"
आता मात्र तिच्या ह्या बोलण्यावर मी मोठ - मोठ्याने हसलो.....😂😂 ती मला बघून, हसली आणि असेच हसता - हसता दोघेही हरवलो.....😍😍
थोड्या वेळाने..... केसांना हळूच कानामागे घेत, चेहऱ्यावर क्यूट स्माईल विथ गालावरची खळी..... ती मला म्हणाली.....
ती : "मी स्कूटी घेऊन येते...... आपण गार्डन जाऊया.....😌"
मी : "मला तुला काही सांगायचं आहे अग.....😞😞"
ती : "तिथे निवांत बसून बोलूया ना.....😌"
मी : "मी वाट पाहतोय..... लवकर ये......😌"
ती क्यूट लाजत निघून गेली.... मी तिथेच थांबलो.... ती तिची स्कूटी घेऊन बाहेर आली आणि माझ्याकडे बघत तिथेच थांबून माझ्यात हरवली..... पार्किंग मेन रोडच्या दिशेने होती जो की, खूप हेवी ट्रॅफिक असणारा रोड होता..... मी माझी बाईक कॅफेच्या पार्किंगमध्ये पार्क केल्याने तिच्याच स्कूटीने आम्ही जाणार होतो...... मी पी. व्ही. आर. बाहेर थांबून, तिला स्वतः कडे बोलवत होतो पण, ती माझ्यात इतकी हरवली होती की, तिला तिच्या दिशेने भरधाव येणारा वेगवान ट्रक ही दिसला नाही..... काहीच क्षणात होत्याचं - नव्हतं झालं.... माझी "ती" रक्ताने विव्हळत पडली होती....😭 जाऊन तिचा हात हातात घेतला..... ती माझ्याकडे बघत होती..... मी मदत मागत वेड्यासारखा लोकांना विनवत होतो..... शेवटी कोणी ॲब्यूलंस बोलावली देवच जाणे.....🥺 तिला रुग्णालयात हलविण्यात यशस्वी झालो......🥺🥺 डोक्याला सीरियस इंज्युरी झाल्याने, ती आताच शुध्दीवर येणार नव्हती..... डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे कमीत - कमी तीन दिवस तिला शुद्ध येणं पॉसिबल नव्हतं..... म्हणून, वाट बघण्यावाचून पर्याय नव्हता.......
तीन दिवसांनी आज......
ती शुध्दीवर आल्याचं समजलं..... मनात खूप भिती आहे माझ्या..... ती काय म्हणेल? तिच्या घरचे काय म्हणतील? देवा काय करू..... माझे मन आणि हृदय दोन्ही, मला एकच प्रश्न विचारत आहेत..... करू का हिम्मत? तिला प्रपोज करायची..!?