Janu - 13 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | जानू - 13

Featured Books
Categories
Share

जानू - 13

समता समीर ची क्लासमेट समीर सोबत खूपच प्रेमाने बोलत होती ..हे पाहून जानू ला तिचा राग आला.का आला हे तिला ही कळत नव्हते? पण राग तर आला होता..त्यामुळे समीर ला ती त्याचा डान्स छान झाला हे ही बोलली नव्हती..शेवटी रात्री समीर ने च जानू ला मॅसेज केला.

समीर : हॅलो.

जानू : हाय.

समीर : काय मॅडम आज बोलला नाही काहीच ? डान्स आवडला नाही का ?

जानू: छान होता .

समीर : आता मी विचारल्या वरच सांगणार होतीस का ?

जानू : का ? मी नाही सांगितलं तर काय होत ? ती समता आहे ना सांगायला.

आता समीर ला कळलं की जानू ला समता चा राग आला आहे त्याला खूप हसू आल पणं जरा तिची फिरकी घेयला म्हणून तो ही बोलला

समीर : हो ग,किती छान बोलते ना ती आणि डान्स ही किती छान करते आणि दिसते ही किती छान?
समीर हे सर्व जानू ला चिडवन्या साठी बोलत होता पण जानू ला ते सर्व खर वाटलं व तिचा राग जास्तच वाढला..

जानू : मग तिच्या सोबत च बोल ना ..इतकी आवडत असेल तर ..bye

आता मात्र समीर ला काही सुचेना त्याची फिरकी त्याच्या वरच उलटली होती..

समीर : अग वेट ,लगेच बाय काय ? आणि समता फक्त माझी क्लासमेट आहे ..मी तर असच बोललो..ती छान असू दे नाही तर कशी ही मला काय ?

जानू ला हे ऐकुन खूप चांगलं वाटलं की समता बद्दल समीर च्या मनात काही नाही.पणं काय बोलावं हे तिला कळेना .म्हणून ती फक्त त्याला ok असा रिप्लाय देते.समीर ला वाटत अजून ती रागातच आहे .

समीर : ऐक ना .फ्रेन्डशिप डे आला आहे ना ?

जानू : हो .

कॉलेज लाईफ म्हणजे फ्रेन्डशिप डे , व्हलेन टा ई न डे ..हे मोठ्या प्रमाणात साजरे केले जाणारे डेज ..बरेच जण खूप आतुरतेने या दिवसाची वाट पाहत असतात..हे दिवस म्हणजे सुवर्णकाळ असतो तरुण साठी .

समीर : मग ,उद्या भेटुयात का ?

जानू: हो कॉलेज ला येणार आहे मी .

समीर : कॉलेज मध्ये नाही ग,कॉलेज बाहेर कुठे तरी कॉफी शॉप ला तिथेच फ्रेन्डशिप डे ही साजरा करू.कॉलेज मध्ये आपल्याला कुठे नीटस बोलता येत ?

जानू ला काही सुचतच नाही अस अचानक भेटणं ते ही कॉलेज बाहेर कोणी पाहिलं तर काय बोलतील ? आणि समीर ला एकटं भेटायचं ? काय करावं काही सुचेना ..इतर वेळी तर किती डोक चालत पणं अशा वेळीच का बंद होत हे डोकं ..हे देवा काय हे ? जानू चा बराच वेळ काही रिप्लाय येत नाही हे पाहून समीर पुन्हा तिला मॅसेज करतो.

समीर : हॅलो ..काय झालं ? काही च का बोलत नाहीस ? जर तुला खरंच माझ्या वर विश्वास असेल तर च भेटू ..नाही तर इट्स ओके..

काय करावं हे जानू ला अजून हि सुचत नव्हत..पणं तिच्या ही नकळत तिने समीर ला हो म्हणून रिप्लाय दिलेला असतो ..असच असत माणसाचं एखाद कोणी आवडू लागलं की डोक आणि मनाचं भांडण चालू होत ..आणि त्यात नेहमी मन च जिंकत ...जानू च डोकं बोलत होत ..नको कशाला भेटायला ? कोणी पाहिलं तर काय होईल ? आणि बाबा ना सांगितलं तर ? ते काय विचार करतील ? पण मन म्हणत होत ..समीर आपला मित्र आहे आणि जितकं आपण त्याला ओळखतो तो खूप चांगला आहे ..आणि फक्त कॉफी साठी च भेटायचं बोलत आहे ना तो आणि फ्रेन्डशिप डे ही आहे ..तो आपल्याला नेहमी मदत करतो ..किती छान आहे तो ..इतक्या मुली कॉलेज मध्ये असून ही तो कधी त्यांच्या बद्दल विचार करत नाही..आणि आपल्या शी फ्रेन्डशिप केलीय त्याने तर आपण कसं त्याला नाही बोलायचं ? शेवटी मना चा विजय होतो व जानू भेटायला तयार होते .
समीर कॉलेज ला येणार नसतो ..आणि त्याने जानू ला कॉलेज सुटलं की कॉलेज पासून जवळ असलेल्या कॉफी शॉप मध्ये यायला सांगितले असते .

जानू ला रात्र भर झोप नसते ..उद्या आपण समीर ला भेटायचं ..भीती आणि आनंद दोन्ही मनात गोंधळ घालून बसलेले असतात.त्याचं विचारात सकाळ होते .जानू कॉलेज साठी तयार होते ..कॉलेज ला जाते पणं कधी एकदा कॉलेज सुटत असच तिला झालेलं असत .शेवटी कॉलेज सुटत आणि जानू समिधा ला मला थोड काम आहे तू जा म्हणून सांगते .. व कॉलेज मधून बाहेर पडते . लेडीज शॉप मध्ये जाऊन एक फ्रेन्डशिप ब्यान्ड विकत घेते .. व समीर नी सांगितलेल्या कॉफी शॉप कडे वळते पणं जस कॉफी शॉप जवळ येवू लागली तस तिचे पावले जड होत आहेत अस तिला वाटू लागल ..भित भित च तिने कॉफी शॉप मध्ये पाऊल ठेवले व नजरेने पाहिलं समीर ला शोधू लागली .

क्रमशः