The trip is a horror story in Marathi Horror Stories by प्रियांका कुटे books and stories PDF | सहल एक भयकथा

Featured Books
Categories
Share

सहल एक भयकथा

प्रेम.. एक उंचपुरा देखणा तरुण... महाविद्यालयाचा टॉपर.. आणि सगळ्यात फेमस... शिक्षकांचा ही लाडका.... सहज मदतीला तयार होणारा... बोलण्याने साखर पेरायचा तो... शहरातील प्रसिद्ध महाविद्यालय अर्थात के . डी. महाविद्यालयातला एक देखणा तरुण अशी प्रेम ची ओळख...घरी आई आणि बहीण होते... वडील तो लहान असताना वारलेले .. मग आईने उद्योग हातात घेतला आणि प्रेम टेक्स्टाईल, प्रेम प्लायवूडस अशा कंपन्या उभारल्या..... आणि प्रेमला आणि त्याच्या बहिणीला अर्थात प्रीती ला लाडात वाढवले....


दुसरा तरुण म्हणजे नरेश... साधा, शेळपट, थपथपीत बसवलेले केस, किती तरी वर्षे वापरात असलेली स्लिपर... डोळे झाकणारा भिंगाचा चष्मा... असे एकंदर मेंगळट रूप असणारा.. नरेश.. नरेशच्या घरी वडील सरकारी कार्यालयात लिपिक आणि आई घरीच असायची... खूपच साधारण त्याचे लाईफ होते... आई वडील म्हणतील ती पूर्व दिशा... असे साधारण त्याचे नियम होते...


तिसरा तरुण अरविंद... थोडासा खोडकर... उंचीला बरा... कुठेही बोलायला ओळखीची गरज नसणारा..... असा अरविंद...

घरात मोठा भाऊ बहिण आई बाबा... त्याच्या खोडकर स्वभावामुळे बाबांचा कायम ओरडा खाणारा... बहीणीचा लाडका आणि आईचा ही ..... बाबा सरकारी बँकेत मॅनेजर पदावर तर आई सरकारी विद्यालयात मुख्याध्यापक होत्या.. भाऊ सिव्हिल इंजिनिअरच्या शेवटच्या वर्षाला तर बहिण इंटेरिअर डिझायनिंगच्या पहिल्या वर्षाला होती... ती अरविंद पेक्षा लहान होती...


चौथी तरूणी माधवी.. arrogant कोणालाही फटकळ पणे बोलणारी.. तितकीच आपल्या मित्रमंडळीना जीव लावणारी... पण एकटीच आई वडील भाऊ बहीण कुणीच नव्हते... फक्त मित्रमंडळी तिचा परिवार होते... पाचवी तरूणी तनुजा . साधी सरळ सगळ्यांचे ऐकून घेणारी आणि सगळ्यांना समजून घेणारी तिलाही कोणी नव्हते ती आणि माधवी एकत्र राहायचे.. दोघीही छोटे बुटीक चालवून महाविद्यालयाच्या फीस भरायच्या... तर हे पाच ही जण के . डी . महाविद्यालयात कम्प्युटर इंजिनिअरींगच्या तिसऱ्या वर्षाला होते.. तीन वर्षे एकत्र असल्याने ते एकमेकांचे चांगले मित्र बनले होते... या पाचही जणांच्या आयुष्यात एक भयंकर वळण येणार होते.. ज्यापासून सगळेच अनभिज्ञ होते...


सन १९८०...

गंगे.. ए गंगे... अग वाईच इकल्या अंगाला ये की... गजानन आपल्या खड्या आवाजात ओरडत होता... त्याला काही सापडत नव्हते... म्हणून तो ओरडत होता.... गंगा त्याची बायको... त्याच्या आवाजाने धावतच त्याच्या दिशेने गेली... गजानन चा राग तिला ठाऊक होता... तिला पाहून त्याचा आवाज अजून वाढला..." काय ग ए, काय डवास्क बिस्क हाय की नाय.....माही बंडी आणि बमोडा का काय ते सापडत नाय.. बघ बिगीबिगी ... मला शेतावर जायला येळ व्हतोय.... मालक नाय तर मला उभा फाडतील ...

गंग.. : अहो धनी, हाय की हितचं, वाईच थांबा..मी देतू लगोलग आणून.... असे म्हणून गंगा त्याला त्याची कपडे आणून देते.. आणि गालात हसून निघून जाते.. तसा गजानन एकदम ओशाळल्यासारखा बघत राहतो...


त्याच्या मनात येते. : रोज मला कापडं सापडती न्हाय .. हीला बरी सापडीत्यात.. काय क्वाड हाय देवाजीलाच माहित.... असे म्हणून तो घरातून निघतो..


तो गेल्यावर गंगा मात्र मनसोक्त हसते आणि म्हणते.. : एवढं वरीस झाले.. कारभारी काय सुधरायचे नाव घेत न्हाय...😀😀 आणि ती तिच्या कामाला लागते....


गजानन सुभान पाटलांकडे शेती बघायचा... बायको गंगा घरातले उरकून कांदा, भाकरी आणि ठेचा घेऊन त्याला सोबत करायला यायची.... पाटलांची शेती ही बागायत होती... त्यांचे एक वेगळेच प्रस्थ होते.. प्रत्येकाच्या अडीअडचणीला ते धाऊन यायचे... आणि अश्या पाटलांकडे गजानन गंगा काम करायचे.. म्हणून त्यांना कसलीच कमी नव्हती... गंगा गरोदर होती।.. त्यामुळे तिला थकवा लवकर येत होता.. गजानन पण तिला घरीच थांबयाला सांगायचा.. पण आपले धनी एकटे राबतातत.. म्हणून ती मदत करायला येत होती... फार कोवळ्या वयात लग्न झाल्याने ती आता तरूणाईत आलेली... गजानन पण समजूतदार होता.. म्हणून त्याने मुलासाठी घाई नाही केली.. त्यांचा दहा वर्षाचा संसार पार पडला होता...

गंगा थोडी शिडशिडीत बांध्याची पण आता गरोदरपणामुळे आलेला उठाव... गहूवर्णीय... टपोरे डोळे... कोरीव भुवया... गुलाबी ओठ.. लांब सडक केस... आणि केसांची घट्ट अशी वेणी जेणेकरून एकही केस बाहेर नाही येणार... अशी सुव्यवस्थित गंगा... गंगाला नुकताच पाचवा महिना लागलेला... तिचे नेहमी बाळाच्या वाढीचे चेकअप होत होते.. आणि हे सगळे मालकीण बाई अर्थात सुभान पाटलांच्या अर्धांगिनी सुमती बाई जातीने बघायच्या... त्या काळात गडगंज पैश्यावाल्यांना परवडतील अशीच इस्पितळ होती.. सामान्य माणसाचे काम नव्हते ते.. तिला सुमती बाईंनी आपल्या घरीच ठेवून घेतले होते.. मुलीप्रमाणे ते तिचा सांभाळ करत होते.. ते स्वतः निपुत्रिक होते.. म्हणून ते गजा आणि गंगाला खूप जपत होते...


गजानन एक साधा सरळ दिलदार असा.. पिळ असलेल्या मिशा डोक्यावर पटका अंगावर बंडी अन् खाली बरमोडा ती पण अण्णांच्या सांगण्यावरून नाय तर आधी धोतर नेसायचा...दिसायला ही देखणा होता गजा... बायकोला फुलाप्रमाणे जपायचा... पण कधीतरी छोट्या गोष्टी वादासाठी पुरेश्या होत्या.... अण्णा अर्थात सुभान पाटील.. त्यांना अख्ख्या गावात अण्णा या नावाने ओळखायचे...


गंगा आता सातव्या महिन्यात आलेली.. पोटाचा उभार स्पष्ट दिसत होता.. आणि तिच्या गालाची लालीही..☺️☺️... तिच्या डोहाळजेवण करायची संधी सुमतीबाई जाऊन देतील का... त्यांनी खूप हौसेने स्वतः सगळी तयारी पाहिली.... आणि गंगाला भरभरून आशीर्वाद मिळाले..... धनुष्यबाण हातात फुलांची टोपली.. फुलांचा कमरपट्टा... केसांना माळलेले गजरे..मरून रंगाच्या नऊवारी साडीमध्ये अगदी खूलून दिसत होती.... सगळ्या सुवासिनी म्हाताऱ्या गोताऱ्या तिला भरभरून आशीर्वाद देत होते...

त्यात ती सुखावून जात होती.... आता पाय सुजत चालले होते.. हालचाल पण जास्त नव्हती...किंबहुना मालकीण बाई तिला करून देत नव्हत्या... त्या म्हणायच्या... " पोरी, बाईच्या जन्माला काम चुकलेले नाही.. पण जेव्हा अशी अवघड वेळ असते. तेव्हा आराम गरजेचा असतो.. ही वेळ पुन्हा येत नसते ना... तेव्हा तू आता आराम कर... आणि आम्हाला छान धष्टपुष्ट बाळ दे...


गंगा : अवो पर, असे किती दिस.. म्या करीन की, कटाळा व्हुतू पडूपडू... म्या वझच करन की .. आता द्वान महीन्यात व्हीन की मोकळी...

सुमती बाई: अग तू शांत बस बघू... मला सगळे माहीत आहे... काही काम करायची गरज नाहीये तुला.. मी बोलले ना.. गप पडून राहायचे... थोड्या रागातच पण प्रेमाने त्यांनी गंगाला दम भरला...

गंगा. : जी मालकीण बाई.. तुम्ही म्हणशाल तसे...


अण्णा ओसरीवर आलेले तेवढ्यात सुमती गंगाचे बोलणे ऐकून त्यांनीही सुमतीच्या बोलण्याला दुजोरा दिला... आणि बाहेरूनच एकाला पाणी आणण्यासाठी पाठवले... अण्णांबद्दल सांगायचे म्हणजे माणसातला देव... अख्ख्या गावाचा पालनकर्ता.. नेहमी शुभ्र दूधाच्या रंगाचे कपडे.... गळ्यात एक चैन, एवढा श्रीमंत माणूस पण दागिना फक्त एकच... बऱ्याच जणांना नौकरी धंद्याला लावून दरवेळेस चौकशी करणारा असा हा माणूस.... अण्णा शेती, पशुपालन, कुक्कुटपालन , सिमेंट कॉँक्रिंट, साबण कारखाना, तूप कारखाना अश्या वेगवेगळ्या उद्योगधंद्यात सक्रिय होते.... त्यांना खूप मान होता गावात... तर सुमतीबाई या मोठ्या मनाच्या होत्या.. त्यांना गावात माई म्हणून ओळखले जात होते... वयोमानानुसार आलेल्या सुरकुत्या.. अजिबात न लपवलेले शुभ्र पांढरे केस... आणि गोल गोरा चेहरा..अंगावर असणारी फक्त लाल रंगाची साडी... वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये लाल रंगाच्या साड्या माई नेसायच्या... लाल रंग माईंचा आवडता होता.... लाल रंगाचा मोठा ठिळा ज्याने अर्ध कपाळ झाकले जात होते....


आता नववा महीना संपत आलेला... अचानक खूप मोठी कळ आली... गंगा खूप जोरात ओरडली आणि तिचा श्वास ही फूलू लागला.... माई तिच्या शेजारच्या रुममधे होत्या.. तिच्या किंकाळीने त्या उठून तिच्या रुममधे आल्या... तिची अवस्था पाहून त्यांनी घाबरतच डॉक्टर ना फोन केला.... डॉक्टर चेक करून गेले.. आणि ताबडतोब इस्पितळात हलविण्यास सांगितले.... तिला श्वास घेता येत नव्हता.... तिला शुध्दीवर आणणवयाचे प्रयत्न सगळ्याचे चालू होते... ती पण आपल्या बाळासाठी शुध्दीवर राहायचा प्रयत्न करत होती... आणि अखेरीस एका राजबिंड्या मुलाला गंगा ने जन्म दिला... गजा सहित माई आणि अण्णा ही खूप खूष होते... त्यांना गंगाला भेटायचे होते... पण गंगा शुध्दीवर नव्हती....


असेच काही वर्षे गेली... गंगा आणि गजाचा मुलगा प्रदविग्न आता १० वर्षाचा होता... माई आणि अण्णा ह्यात नव्हते... पण गजाने सार काही नीट सांभाळले होते... अशातच दुधात मिठाचा खडा पडल्यासारखे काही घडले..

प्रेम, नरेश, अरविंद, माधवी आणि तनुजा तिसऱ्या वर्षाच्या परिक्षा देऊन सुट्टी च्या बेतात होते... काही ठरत नव्हते.. कारण एकही ठिकाण नव्हते.. जिथे ते गेले नव्हते...मग माधवीने सुचवले... असे एखाद्या शांत ठिकाणी जाऊ.. जिथे जास्त डिस्टर्बन्स नसेल... अरविंद ला तिच्या डिस्टर्बन्स शब्दावर खूप हसू आले... खोडकर वृत्तीचा अरविंद जीव तोडून हसत होता... तर त्याचे हसणे पाहून arrogant माधवी रागाने लाल झाली होती... ती त्याच्या वर धावून जाणार तेवढ्यात तनुजा मध्ये आली आणि म्हणाली.. : मधू , सोड त्याला , stop behaving like a child.. तो मस्करी करतोय.. सोडून दे...


माधवी : अशी मस्करी करतात का तनु... यात हसण्यासारखे काय होते बरे.. इडियट कुठचा... असे बोलून ती गाल फुगवून बसली...

तिचे गोबरे गाल रागाने फिकट गुलाबी दिसत होते... तिला असे पाहून लेक्चर मधून आलेला प्रेम तिला पटकन गठूडे बोलला..

प्रेम : गठूडे का झालय मॅडमचे.. कोण काय बोलले का??

तनुजा : अरे काही नाही, थोडे बिनसलय... पण तू अजून राग देऊ नकोस काही ही बोलून..

अरविंद : (हळू आवाजात) आताच मला मारायला आलेली .. तनू ने नसत अडवले.. तर माझा जीव गेला असता..🙄


प्रेमाचे गठूडे ऐकून माधवी थोडी गालात हसू लागली... प्रेम ला माधवीचा राग घालवणे .. चांगले माहिती होते... पाच ही जण असे होते की, एकमेकांना साथ देऊन एकमेकांचे रूसवे फुगवे घालवत होते...

प्रेम : गाईज, एक सरप्राईज आहे ..... माझ्या कडून सगळ्यांना...

आमच्या फार्म हाऊस वर पार्टी होणार आहे... आणि ती झाल्यावर आपण काही दिवस तिथेच थांबणार आहोत...


पटवर्धन फार्म हाऊस म्हणजे शहरातल्या मोठ्या इंडस्ट्रीज मधले एक... अशा ठिकाणी पार्टी म्हटल्यावर नकार देण्याचा प्रश्नच नव्हता... आणि पुन्हा तिथे काही दिवस राहणे ... सोने पे सुहागा झालेला... सगळ्यांनी एकत्रीत होकार भरला.. आणि पुढल्या आठवड्यात जाणे फिक्स झाले...


**************************************************

इकडे प्रेमची आई सलग १५ वे बक्षीस जिंकल्या होत्या.. बेस्ट बिझनेसवूमन म्हणून... आणि याच सेलिब्रेशन ची तयारी त्यांच्या फार्म हाऊस वर चालली होती... त्या काही वेळ भूतकाळात रमल्या ज्यात त्यांचे पती सासू सासरे त्यांच्या सोबत होते व प्रेम प्रीती लहानगे होते... प्रदविग्न अर्थात प्रेमचे वडील.. (ऐकल्यासारखे वाटते ना नाव).. बरोबर ओळखलत मित्रांनो गजा आणि गंगाचा मुलगा... तर जाऊयात का भुतकाळात...


चला तर मग...

***********************************************


प्रदविग्न दहा वर्षाचा असताना एक घटना घडलेली असते... प्रदविग्न त्याच्या मित्रांसोबत खेळत असताना एका पडक्या घराजवळ येतो.. तिथे खूप शांतता असते.. उशीर ही बराच झालेला असतो... अचानक एक भयंकर किंकाळी त्यांच्या कानावर पडते... सगळे मित्र त्या दिशेने बघतात... तर एक बाई तिला ओढणारी काही माणसे तिथे अजून एका माणसाला खेचत आणत असतात.. ही सगळी मुले ते सगळे पाहत असतात... अंगावर सरकन काटा आल्यासारखं प्रत्येकाला जाणवते... त्यातला एक इसम त्या बाईचे केस पकडून तिला जोरात आदळतो.. आणि त्याच्या शेजारच्या माणसाला बोलतो...


पहिला इसम : हीच का ती, आणि हा कोण.. (प्रदविग्न त्या काळोखात डूबलेल्या इसमाला डोळ्यात प्राण आणून बघायचा प्रयत्न करत होता... त्याचे एक आभूषण त्याला खटकत होते...) अचानक एक मोटार सायकल चा प्रकाश त्या इसमाच्या चेहऱ्यावर पडला आणि इकडे खिडकित उभ्या प्रदविग्न ने तो लगेचच ओळखला... (तो कोण होता हे हळूहळू कळेलच)


दुसरा इसम : हो उस्ताद, हिच ती आणि हा तिचा भाऊ आहे.. खूप अडवले याने.. म्हणून त्याला ही घेऊन आलो... तुम्ही बघा काय करायचे ते..


पहिला इसम : ( त्या बाईकडे बघून) हम्म...तुझ्यावर खूप दिवसापासून लक्ष होते.. तुला दोनदा नीट विचारले.. तू काय ऐकले नाहीस... म्हणून तुला उचलून आणावे लागले... आता तुला सोडणे माझ्या साठी धोका आहे... आतापर्यंत ज्या प्रकारे मी मुलींना संपवले तसेच तुलाही संपवतो... पण रितसर तुझा उपभोग घेऊन.. हाहाहाहाहाहा😈😈😈


ती बाई : माझे ऐका, मला सोडा, मी काय वाईट केल आहे तुमचे... मी कोणालाही सांगणार नाही तुमच्याबद्दल .. तीन दिवसांनी माझे लग्न आहे.. माझे आई वडील हा धक्का नाय सहन करू शकणार... .


पहिला इसम : आता तर ते शक्य नाही पोरी, आणि तुझ्या आईवडिलांना आधीच यमसदनी पाठवले आहे... त्यामुळे त्यांची काळजी करू नको..( एक विकृत हास्य आणत तो बोलला)


ती बाई : त्याचे बोलणे ऐकून तिच्या पाया खालची जमीन सरकते... ती जोरजोरात आक्रोश करून त्या माणसाला बडवते..


एक जोरात हिसका देऊन तो तिला एका तंबूमध्ये खेचतो आणि तिचे लचके तोडून झाल्यावर तिला तिथेच संपवतो.. एक विकृत हास्य घेऊन तो त्या तंबूमधून बाहेर येतो... आणि तो सगळे पेटवून टाकतो... तितक्यात एक आवाज त्याच्या कानी पडतो... " मी सोडनार नाही तुला, माझ्या सारख्या जेवढ्या मुलींना त्रास दिला आहेस.. त्यांचा बदला घेईन... तुझ्या वंशात कोणी सुखी राहणार नाही... ते ऐकून मात्र प्रदविग्न अस्वस्थ होतो आणि यंत्राप्रमाणे पाय टाकत घरी येतो... इकडे त्याची वाट पाहत गंगा रडत बसली असते.. त्याला पाहताच त्याला कवटाळून त्याचे मुके घेते... त्याला काही विचारणे तेव्हा कोणाला योग्य वाटत नाही... त्याचे मित्र ही नुसते धक्का बसल्या प्रमाणे शांत असतात...


दुसऱ्या दिवशी सकाळी गंगा विचारते..


गंगा : का रे प्वारा, कुड गेलतास काल.. काय झालत.. सांगशील का न्हाय..


गजा. : अग , जरा दमाने घे की. प्वार भ्यालले दिसतय.. जरा त्याला नेटके वाटून दे की..


गंगा. : अव, पर त्यो कुड गेलता.. काय झालत कळायला नग का..??


गजा .: व्हय, जरा टायमाने त्यो सांगन... येळ द्ये त्याला


तसा प्रदविग्न बोलला की त्याने काय काय पाहिले आणि कोणाला पाहिले... सगळे त्याने नीट आठवून सांगितले... ते सगळे ऐकून गजा मात्र आ वासून पाहत राहिला... त्याचवेळेस गजा ने गाव सोडायचा निर्णय घेतला.. आणि प्रदविग्न च्या शाळेचे कारण करून त्याने गावातून काढता पाय घेतला...


ते सगळे शहरात स्थायिक झाले.. पुढे प्रदविग्न चे शिक्षण , लग्न , मुले सारे काही सुरळीत झाले.. पण प्रदविग्न च्या मनात कुठेतरी त्या बाईचा आवाज घुमत राहयाचा... प्रेमची आई प्रेम च्या आवाजाने भानावर आल्या.. व पार्टीमध्ये सामिल व्हायला बाहेर आल्या..


निशा पटवर्धन अर्थात निशा पाटील प्रदविग्न पाटील याची बायको... पण नवरा सासु सासरे सगळे वारल्यानंतर तिने आपल्या बाबांचे आडनाव लावून उद्योग चालू ठेवला.. आणि कालांतराने त्याला प्रेमचे नाव दिले.. आज सलग १५ व्या वर्षी बेस्ट बिझनेसवूमन पारितोषिक जिंकल्यानंतर तिने एक उच्च शिखर गाठले..


प्रेम ५ वर्षाचा असताना प्रदविग्न साइटवरून घरी येताना कार अपघातात वारले आणि त्या धक्कयाने गजा आणि गंगा ही काळाच्या पडद्याआड गेले... तो काळ निशासाठी खूप खडतर होता... ५ वर्षाचा प्रेम आणि २ वर्षाची प्रीती सांभाळत उद्योग पण पाहायचा होता.. तिच्या वडीलांनी तिला या सगळ्या मध्ये मदत केली.. उभारण्यासाठी बळ दिले.. त्याचाच विचार करून तिने पाटील नाव काढून पटवर्धन नाव लावले आणि त्याला एका शिखरावर नेऊन ठेवले... निशा तिच्या award ceremony मध्ये हे सांगताना भावुक होत होती.. आजपर्यंत ती कधी बोलत नव्हती.. कदाचित ठरवून तिने तसे केले असावे.. पुढे ती सांगत होती की, येत्या वर्षापासून प्रेम माझा मुलगा सारे काही सांभाळणार आहे.. त्याची डिग्री पूर्ण झाली.. की सगळे त्याच्या हाती सोपवेल.. प्रेम ला थोडे अनपेक्षित होते पण त्याला ते स्विकारणे होतेच... तसा तो ही तयार झाला.. समारंभ झाल्यानंतर घरी आल्यावर


प्रेम : आई, खूप अभिनंदन तूझे.. वी प्राऊड ऑफ यू..


निशा : थँक्यू बाळा, तुलाही असेच जिंकायचे आहे.. आणि त्याआधी खूप काही शिकायचे आहे..


प्रेम : हो आई, नक्कीच.. मी पूर्ण प्रयत्न करेन...


प्रीती : मॉम, काँग्रॅजुलेशन... सो हॅप्पी फॉर यू...😊😊😘😘


निशा: थँक्यू बेटा...


प्रेम : बोला, कुठे टेबल बूक करायचा..


निशा : त्याची गरज नाही प्रेम, मी सांगितले घरी बनवायला सगळे..


प्रेम : आई तुझी पण कमाल आहे, एवढी मोठी बिझनेसवूमन आणि सगळ सेलिब्रेशन घरी... ठिक आहे... आई मला तुझ्याशी थोडे बोलायचे होते...


निशा: बोल न बाळा...


प्रेम : आई , आम्ही मित्र मिळून पिकनिक प्लॅन करतोय... लास्ट सेमिस्टर झाल्यावर.. मग मी आपले काम ज्वाईन करेन.. चालेल न...


निशा : हो रे बाळा, तुला हवा तेवढा वेळ घे.. तू स्वतः रूजू होशील तो पर्यंत मी वाट बघेन...


प्रेम: थँक्यू आई


पंचपक्वानांचा आस्वाद घेऊन सगळे निद्रेच्या आधीन होतात..


**********************************************


एक कार तिच्या विशिष्ट गतीने जात असते... आत बसलेला इसम चेहऱ्यावर समाधान घेऊन गाणी गुणगुणत जात असतो.. अचानक कानावर एक आवाज येतो... तू... मला.. वाचवू शकत होताससससस.... त्या आवाजाने तो इसम पूरता घाबरतो.. आजूबाजूला कोणी दिसत नाही.. हवेतून आवाज आल्याची त्याला पूर्ण खात्री होते.. पुन्हा एक आवाज येतो... तुला माहिती आहे मला कोणी मारलय... तू ओळखतोस ना... भित्र्यासारखे खिडकीतून सगळे पाहत होतास.. किव नाय आली तुला माझी... यावेळी आवाज खूप मोठा होता... शेवटच्या वाक्यासरशी तो सारे काही समजून जातो.. आणि समोरच्या आरशात त्याचे लक्ष जाते.. पूर्ण घामाने चिंब होऊन थरथरत तो आरशात पाहतो... एक पूर्ण जळालेली बाई त्याला त्या आरशात दिसते.. फाटलेले ओठ, जळालेले मांस, पिंजारलेले केस, मोठमोठी नखे, उलट दिशेला हात ... भयंकर असे ध्यान त्याला दिसत होते.. त्याच्या गाडीचा कंट्रोल सुटत होता.. तेवढ्यात ते भयान बोलते झाले..


ती बाई : प्रदविग्न.. हेच नाव न तुझे, का नाही वाचवले मला, तुझ्या कड्याचा आकार पाहूनच मी ओळखले तू पाटलांचा आहेस.. आणि तो नराधम पण पाटलांचा होता.. हो न.. ओळखतोस न तू त्याला.. बोल..


प्रदविग्न : तोडांतून शब्द फुटणे कठीण होते तरीही शब्दांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत बोलतो.. मी लहान होतो.. ती घटना अजूनही माझ्या मनावर घात करते.. तुम्हाला वाचवणे अशक्य नव्हते.. पण त्या गोष्टीने आम्ही घाबरलेलो.. हो तो इसम माझा चुलत भाऊ.. अर्थात माझ्या आजोबांच्या भावाचा नातू.. पण त्याला असे पाहून माझी ही बोबडी वळाली होती...


ती बाई : तू लहान होतास ..पण आता तू माझी मदत करू शकतोस न...


बोलण्याच्या नादात समोरून आलेल्या वाहनाला टक्कर लागून प्रदविग्न ची गाडीला अपघात होतो.. आणि पुन्हा तिचे काम अर्धवट राहते.. पण ती म्हणते की. तू नाही पण तूझा वंशज माझी मदत करेन.. मी स्वतः त्याला बोलवून घेईन.. आणि ती ढसाढसा रडू लागते...


प्रेम नरेश आणि अरविंद ला भेटण्यासाठी कँम्पस मध्ये त्यांची वाट पाहत असतो... तर दुसरीकडून माधवी आणि तनुजा त्याच्या जवळ पोहचलेल्या असतात... तेव्हा प्रेमला त्याची पिकनिक धोक्यात आल्याचे जाणवते.. कारण त्याने फक्त नरेश आणि अरविंदचा विचार केलेला असतो... आता मात्र धर्मसंकटात पडल्याचे त्याला जाणवते.. माधवी आणि तनुजा त्याच्या शी बोलत असतात.. पण त्याचे लक्ष नसते.. या दोघींना कसे सांगायचे जायला.. तो याचाच विचार करत असतो... तितक्यात माधवी बोलते...


माधवी : प्रेम, काय झाले इतका शांत का आहेस... एक्जामस तर ओके होत्या ना... एवढे का तोंड पाडलयस...

तनुजा : हो न, इतका का निराश झाला आहेस.. बोल काय ते...

प्रेम : थोडे उदास होण्याचे नाटक करत.. अरे यार, आई उद्यापासून ज्वाईन व्हायला सांगते... आज कुठे इथून सुटलो.. परत उद्या तिथे अडकायचे... काय सांगू त्याच टेन्शन मध्ये आहे....

माधवी : अरे यार.. काकूंना थोडा वेळ माग.. एक महीना वगैरे.. अन त्या दरम्यान एक ट्रीप करू... काय वाटते...

प्रेम : आता प्रेमला स्वतःच्या पायावर दगड मारल्याचा अनुभव झाला.. अरे , अस कस.. आई बोलली म्हणजे ज्वाईन केले पाहिजे.. काय तरी विचार करून सांगितले असेल न आईने...


तेवढ्यात मागून आवाज येतो... अरे, प्रेम तू काल म्हणालास ना मला वेळ हवाय.. सहलीला जायचय.. वगैरे वगैरे... ती निशा होती...


आता मात्र प्रेमची अडकित्यातल्या सुपारी सारखी अवस्था झाली.. त्याला काय बोलावे कळेना... तो हळूच तिथून पळ काढणार तितक्यात माधवीने त्याचा कॉलर पकडला.. आणि त्याला आवाज चढवून विचारू लागली फिल्मी स्टाईलने : कितने लोग जा रहे हो..


प्रेम: ३ सरदार...


माधवी : हमका काहे नाही बोले...


प्रेम : सिर्फ लडकोका फिक्स किया हूँ.. इसलिए आपको नाही बताया...


माधवी : तो हमसे झूठ काहे बोला..


प्रेम : आप नही मानती , इसलिए आपको नाही बताया.. माफी सरदार..


माधवी : तुमका माफी चाहि.. तो हमरी इक बात कान लगायके सुनल्यो.. हम भी तोहार साथ आएंगे..( तनुजा कडे बघत).. क्यों सांभा..


तनुजा : जी सरदार.. आप सही कह रहे हो...


इतका वेळ त्यांचा ड्रामा बघणारी निशा खदखदून हसू लागते आणि प्रेमला दोघींना घेऊन जायला सांगते... नाही तर काही खर नाही बाबा.. आणि त्याला गाडीत यायला सांगते...


माधवी आणि तनुजा : कौनसा ठिकाणा जाना है तनिक बताओ...


प्रेम : अरे अजून ठरावयचय .. रात्री कॉलवर बोलू.. बाय...


दोघीही हसत हसत त्याला बाय करतात आणि घरी निघून जातात...


नरेश आणि अरविंद आज जरा लेट कॉलेजच्या बाहेर येतात.. त्यांना प्रिन्सिपल सरांनी थांबवलेले असते.. त्याच्या मार्कसनुसार त्यांना ऑफर आलेली असते.. जी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते.. त्याचे मेहनतीचे फळ त्यांना मिळालेले असते... पण त्यांना ज्वाईन करायला दिड महीन्याचा अवधी असतो... तसे ते दोघेही घरी पोहचतात...


रात्री १० ची वेळ.. या पाचही जणांचा कॉल चालू होतो... त्यात नरेश आणि अरविंद त्यांना मिळालेली ऑफर सांगतात.. आणि दिड महीन्याने ज्वाईनिंग चे सांगतात.. सगळे त्यांना अभिनंदन करून मेन मुद्द्यावर येतात... सहल कुठे काढायची आणि किती दिवस... बरीच ठिकाण फिरल्यामुळे काहीच नक्की होत नव्हते..


मग गूगलच्या साह्याने एक ठिकाण मिळालै... त्या ठिकाणाचे नाव होते.. बिरासपूर... हे नाव अँन्टिक आणि वेगळे होते.. पण मुलाच्या तोंडून हे नाव ऐकल्यावर निशा ने त्याला दुसऱ्या ठिकाणी बघण्यासाठी सुचविले..



प्रेम च्या तोंडून बिरासपूर ऐकून निशा प्रचंड घाबरते.. तिला ते दिवस आठवू लागतात जे प्रदविग्न ने डायरीमध्ये नोंद करून ठेवले असतात.. कारण तिचा प्रत्यक्ष असा काहीही संबंध बिरासपूर शी नसतो आला , पण नवऱ्याच्या सांगण्याने आणि डायरीत वाचल्याने त्या जागी जायचा विचार ती करू शकत नसते.. तिला डायरीतला एक प्रसंग आठवतो..


***************************************************


भर दुपारी प्रदविग्न त्या घटनेनंतर शहारातील त्यांच्या कंपाऊंड मध्ये खेळत असतो.. वय साधारण १२ ते १३ असावे.. त्याची आई गंगा घरातले आवरत असते.. आणि गजा पाटलांनी अंगावर दिलेला भार सांभाळत असतो... त्याने बरीच प्रगती केली असते.. पाटलांनी त्याला प्रत्येक गोष्ट समजावली असते.. त्यामुळे त्याला उद्योग सांभाळण्यात कसला त्रास होत नसतो.. गावातला उद्योग एका विश्वासू माणसाकडे सोपवून शहरात तो इतर उद्योग सांभाळत असतो... तर प्रदविग्न त्याच्या मित्रांसोबत खेळत असतो.. एक वाऱ्याची झूळूक येऊन त्याच्या कानाजवळ जणू बोलत असते..

तू मला वाचवले नाही.. मी आता भटकून दमली आहे.. माझी मदत कर... असे म्हणत तो आवाज त्याच्या पासून दूर गेला आणि पुन्हा त्याच्या समोर ते विदारक दृश्य येऊन गेले... तो तिथेच मोठमोठ्याने रडू लागला.. त्याला घरी जायचे ही सुचले नाही.. तो तिथेच कोलमडला.. एका शेतातून परतणाऱ्या इसमाने त्याला घरी आणले.. तो किती वेळ तिथे पडला असावा त्याला त्याचे भान नव्हते.. पण डोळे उघडल्यावर जेव्हा आई बाबा दिसले तेव्हा तो पुन्हा रडू लागला... त्याला फक्त भीती वाटत होती.. बाकी त्याला काही कळत नव्हते.. जस जसा तो मोठा होऊ लागला त्याला त्या प्रसंगाचे गांभीर्य समजू लागले.. पण त्याचा कुविख्यात असलेला भाऊ त्याच्या नजरेसमोर आला की त्याची भितीने गाळण उडायची... त्यानंतर बऱ्याचदा त्याला असे ऐकू यायचे आणि नंतर ते दृश्य दिसायचे... ज्याने तो पूरता घाबरून जायचा.. कधीच मच्छर ही न मारलेला प्रदविग्न आपल्या भावाला कोठडीत नेण्याचा विचार देखील करू शकत नव्हता.. असेच दिवस ओलांडले आणि प्रदविग्न ला एक चांगली संधी चालून आली.. तो एकटा निर्णय घेऊ शकत असल्याने त्याच्या सोबत कोणी नव्हते.. डील पक्की करून समाधानाने ड्रायव्हिंग करणाऱ्या प्रदविग्न ला पुन्हा तोच आवाज आला आणि ते भयान त्याच्या समोर प्रकट झाले.. ज्यामध्ये त्याचा जीव गेला...


सगळे आठवून एक हुंदका देत निशा रडू लागली... तिला या गोष्टीची भिती वाटत होती की प्रेम किंवा प्रीती ला या गोष्टीचा त्रास नको व्हायला.. म्हणून बिरासपूरचे नाव ऐकल्यावर तिच्या चेहऱ्याचा रंग उडालेला..

*************************************************


इकडे प्रेम गुगल सर्च करत असतो आईने नको सांगितल्यावर तो त्या गोष्टींचा विचार सोडून देतो .. आज्ञाधारी... 😊 पण सर्च करताना सारखे बिरासपूर येत होते.. त्याला आता काही सुचत नाही... तो विचार करतो कदाचित साईट हँग होत असावी... तो लॅपटॉप पुन्हा चालू करतो.. प्रत्येक प्रकारे टेक्निकली चेक करतो.. पण बिरासपूर पुन्हा पुन्हा येत असते.. हे तिचे निमंत्रण असते .


आता प्रेम ला एक वाडा दिसू लागतो आणि हळूहळू तो वाडा त्याच्या समोर जिवंत होतो जणू त्याला बोलवतोय असा जाणवते..

आईच्या आवाजाने प्रेम भानावर येतो.. तो पूर्ण चिंब झालेला असतो.. त्याला असे पाहून निशा ही घाबरते.. आणि त्याच्या लॅपटॉप स्क्रीनवर तो वाडा झळकत असतो.. निशा तो पाहून स्तब्ध होते... तिला आता भिती जाणवत असते.. तसे ती ठरवते प्रेमला सारे काही सांगावे.. जेणेकरून हे सगळे त्याच्या लक्षात येईल... यानंतर निशा प्रेम ला प्रत्येक प्रसंग समजावून सांगते आणि बिरासपूर ला जाणे किती धोक्याचे आहे हे ही निक्षून सांगते..

पण प्रेम मात्र सगळे जाणून घेतल्यावर जराही न घाबरता बिरासपूर ला जाण्यासाठी सज्ज होतो.. निशा त्याला अडवायचा प्रयत्न करते.


निशा : प्रेम, बाळा तू समजतो तेवढे सोपे नाही आहे हे.. यात जीवाला धोका आहे.. तू नको करू याचा विचार.. ती स्वतः तुला बोलवाते.. आजूबाजूला वातावरण निर्मिती करून.. पण तू दुर्लक्ष कर बाळा.. खूप गमावले आहे मी आधीच.. आता नाही माझ्यामध्ये सहनशक्ती अजून गमावयाची... आणि ती रडू लागते..


प्रेम : आई, नको रडूस, ऐक माझे तिच्या जागी आपली कोणी असती तर आपण केली नसती का तिची मदत.. देव न करो आपल्या प्रीती वर असा प्रसंग आला असता तर.. आपण तिची मदत केली असती ना आई.. नको अडवू मला.. मला जाऊदे... आणि मी काही एकटा नाही .. माझे सगळे मित्र सोबत असणार आहेत.. तू नको काळजी करूस.. आता तर आम्ही बिरासपूरला च सहल करणार.. आणि माझ्या पूजनीय काकाला शिक्षा करणार...


निशा : आपल्या इवल्याशा प्रेम ला अचानक मोठा झालेला पाहून धैर्याने त्याची सोबत करते आणि त्याला जायला होकार देत म्हणते..


माणुसकी जीवंत असेपर्यंत

नाही कोणी हरणार

संपली तुझी क्रूरता

तू आता मरणार..


तुला शिक्षा द्यायला

वारस माझा येणार

तुझे कुकर्म तूला गिळंकृत करणार..


प्रेम, नरेश आणि अरविंद माधवी आणि तनुजा सोबत बिरासपूर ला जायला निघतात.... प्रेम ला निशा कडून वाड्या बद्दलची माहिती मिळालेली असते.. त्यामुळे ते सगळेच थेट वाड्याकडे जायला निघतात साधारण पाच तासाचा तो प्रवास होणार असतो... उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रखर ऊन गाडीच्या कानाकोपऱ्यात पसरलेलं असतं... बिरासपूर शहराचे ठिकाण असतं आणि त्याचा आत साधारण वीस किलोमीटर प्रेम चा वाडा असतो... नऊच्या सुमारास हे सारेजण वाड्याच्या दिशेने जायला निघतात त्यांना साधारण तीन च्या आसपास वाजणार होते.. त्यामुळे सोबतच त्यांनी भाजी चपाती बांधून घेतली होती... ड्रायविंग ची वेळ प्रत्येकावर येणार होती... सुरुवात अर्थात प्रेम ने केली... हळूहळू सर्व जण गाडीमध्ये बसले.. लागणारे सारे सामान असल्याची खात्री केली.. माधवीला तर नाही पण तनुजा ला छान स्वयंपाक येत होता.. तिने ही त्या दृष्टीने सामान पाहून घेतले.. आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत यांची स्वारी निघाली...

*************************************************

निशा : अग बाई, मुलांना जाऊन चार तास झाले,.. फोन लावू का?? कुठपर्यंत पोहचले बघू तरी..

कॉल लावत असते.. दोन तीन रिंग होतात.. समोरून नरेश बोलतो.

नरेश : हेलो काकू, प्रेम झोपी गेलाय.. तोच ड्रायव्हिंग करत होता.. आता अरविंद चालवतोय कार.. आम्ही तासाभरात पोहचू कदाचित.. तसे तुम्हाला कळवू आम्ही..

निशा : ठिक आहे , बाळा सगळ्यांनी काळजी घ्या.. आणि काही लागले तरी मला कळवा... जपा स्वतःला..

नरेश : हो काकू.. तुम्ही ही काळजी घ्या.. मी प्रेम ला नंतर करायला सांगतो कॉल...

निशा : हो बेटा, ठेवते मी फोन..


काही वेळाने एक फलक अरविंदला दिसून येतो.. ज्यावर बिरासपूर ५ किलोमीटर असे दिसते.. पण वाडा तर त्याच्या अजून २० किलोमीटर पुढे असतो... म्हणजे अर्धा पाऊन तासाचे ड्रायव्हिंग ... अरविंद एका गावकऱ्याला थांबवून विचारतो..

अरविंद : ओ काका, पाटलांचा वाडा याच रस्त्याला आहे का?? अजून किती दूर असेल.. जरा सांगू शकाल का??

गावकरी : पर तुम्ही कोण म्हणायचे.. त्या सुनसान जागी तुमचे काय काम.. काय वोपणार तर नाय ना तिदं.. नशेच्या गोळ्या बिळ्या.. काय पिलान हाय तुमचा.. कळू दे की जरा...

कधीही न बोलणारा नरेश : ओ काका, अहो काय बडबडताय.. आम्ही काय बोलत नाही तर काहिही बोलताय.. आम्हाला फक्त योग्य मार्ग दाखवा.. बाकी आम्ही बघू..


त्या आवाजाने प्रेम ही जागा होतो आणि मग क्रमाने अरविंद, माधवी, तनुजा, प्रेम चौघेही नरेशकडे पाहत राहतात.. अगदी आश्चर्यचकित होऊन... तसा तो गावकरी त्यांना कुठून कसं वळायचे हे समजून सांगतो आणि मग निघून जातो... अजूनही सगळे नरेश कडे पाहत असतात... नरेश मात्र गपगुमान त्यांच्या नजरा झेलत असतो... तेवढे महान काम केले असते त्याने..साधारण १५ मिनटात गाडी वाड्याच्या बाहेर असते... पालापाचोळ्याने भरलेला रस्ता.. गवत उगवून हातापर्यंत आलेले.. त्याच्यासमोर एक भला मोठा दरवाजा.. ज्याची एक बाजू उघडी होती तर एक बंद.. त्या उघड्या दरवाजातून अरविंद गाडी आत घेऊन आला..


सगळे जण खूप वेळाच्या प्रवासाने दमले होते.. सगळे बाहेर येऊन तिथले ते मरगळलेले दृश्य पाहत होते.. समोरच एक लाकडी दरवाजा होता.. ज्याला टाळे नव्हते... कोणीच राहत नसल्याने तिथे सारे काही सहज उघडता येण्यासारखे होते... आत प्रवेश केल्यावर प्रचंड मोठा दिवानखाना जो आता धूळीने माखला होता.. त्यात उच्च प्रतीच्या लाकडाचे भलेमोठे कपाट ज्याला अलमारी म्हणू शकतो.. लांबलचक दिवाण तो ही धूळीमध्ये बुडालेला... मधोमध एक शाही झुंबर जे एवढ्या धूळीतही चकाकी सोडत नव्हते... एक रस्ता उजव्या हाताला स्वयंपाक घर न्हाणीघर दर्शवत होता.. तर डाव्या हाताला एक मोठी बाग... जिची फुले सूकून पडली होती.. पूर्ण वाड्याची हालत गलिच्छ झालेली... आता यांना तिथे रहायचे होते.. मग सगळ्यांनी मिळून एक खोली साफ करायची ठरवली.. आणि कोणी तरी माणूस किंवा बाई बघून इतर खोल्या नंतर साफ करू.. असे ठरवले...

तनुजा ने सोबत आणलेल्या वस्तूंमधून काही जिन्नस काढून जेवण बनवले.. ते ही छोट्या स्टोव्ह वर... कारण किचन ची हालत असते.. सगळे चविष्ट भोजनाचा आनंद घेतात.. आणि निद्राधीन होतात...

***************************************************


साधारण १९९० -९२ असा काळ निमिष पाटील नावाचा तरुण एका तरूणीचा खून करून सारे काही जाळून शांतपणे बसलेला असतो.. जणू काही झालेच नाही.... त्याच्या साठी हे सगळे जणू रोजचे होते.. त्यात भर म्हणून तो अनिष्ट शक्तींना आमंत्रण देत असतो.. त्याने मारलेल्या जीवांना नरकयातना देण्यात त्याला जणू समाधान मिळत असते.. अशीच एक मरणोत्तर नरकयातना भोगणारी ती असते जी प्रदविग्न ला आणि प्रेम ला बोलवत असते.. निमिष हा अंत्यत क्रूर वृत्तीचा आणि भयंकर विचारांचा मनुष्यरुपी सैतान असतो.. त्याच्या अश्या वागण्याने त्याला भयंकर मरणाला सामोरे जावे लागते.. गावात कोणीही थांबत नाही.. गाव ओसाड पडतो.. त्याचा जिच्यावर जीवापाड प्रेम असते ती बायको ही ऐन गरोदरपणात त्याला सोडून जाते.. पूर्णपणे खचलेला निमिष स्वतःला त्या अनिष्ट शक्तींना सोपवतो.. आणि तिथेच त्यांना थोपवतो...पण असे होत नाही.. त्या अनिष्ट शक्ती त्याच्या होणाऱ्या वारसाला घेराव टाकतात.. जो कालांतराने निमिष सारखा होऊ लागतो...


१९९३

निमिष ची बायको कल्पना एका गोंडस मुलाला जन्म देते.. पण त्या मुलाचे वागणे कुठूनच साधारण नसते.. तो रडत तर नसतोच पण खूप गूढ असे त्याचे वागणे असते... एकदा आईचे दूध पित असताना त्याने लचका तोडण्याचा प्रयत्न केला.. पण थोडक्यात निभावले.. दूधाची बाटली चालू केली तर तीही चिरफाड करून टाकून द्यायचा...एक वेगळीच ऊर्जा त्या बाळामध्ये दिसून येत होती.. कल्पना ला समजले होते नक्की काय होतय.. तिला निमिष चे वागणे आणि ते सारे काही आठवले जे तिने अगदी जवळून पाहिले होते... तिच्या छातीत एक कळ उठली.. तिने कसबस स्वतःला सावरले..आता पुढे काय हा विचार करून ती अस्वस्थ होते.. तेवढ्यात कल्पना ची आई हौसाबाई तिला कनिष्क महाराजांना भेटायला सांगते.. ते अशा अमानवी शक्तींना पिळवटून लावण्यात प्रसिद्ध होते... कल्पना ही आईच्या सांगण्यावरून कनिष्क महाराजांना भेटण्यासाठी तयार होते... कनिष्क महाराज हे साधारण पंचविशीतले व्यक्तीमत्तव .. त्यांचे वडील नवनाथ हे एक नावाजलेले सत्पुरुष होते.. त्याच्याच मार्गदर्शनाखाली कनिष्क महाराज तयार झाले होते.. एक गोल चष्मा , चेहरा नेहमी दाढी मिशी ने झाकलेला.. कझ्यूल कपडे अंगावर आणि कोल्हापूरी अश्या अवतारात कनिष्क महाराज असायचे.. आणि एक सुंदर गोंदण त्यांच्या एका हातावर होते.. जे कदाचित देवाच्या संलग्न असावे..


कल्पना आधी बराच वेळ त्यांना निहाळत बसली कारण ते कूठूनच महाराज वाटत नव्हते... तिला असे पाहताना पाहून त्यांनी हलके हसून तिला बसण्यास सांगितले .. तसे तिने नमस्कार करून स्थानग्रहण केले..

कनिष्क महाराज : बोला, आपण माझ्या कडे आलात.. काय असेल ते सविस्तर सांगा.. माझ्या वेशावर जाऊ नका.. मी असाच असतो..

कल्पना : कल्पना त्यांना सारे काही सांगते आणि तिच्या कडून प्रत्येक गोष्ट ऐकताना कनिष्क महाराजांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असतात.. निमिष नक्की कोणाची पूजा करत असतो हे त्यांना कळून चुकते..

कनिष्क महाराज : कल्पना ताई, मी हे नेहमीसाठी नाही थांबवू शकत. कारण हे खूप खोल रूजलेले आहे.. यासाठी तुम्हाला तुमच्या मुलाला अविवाहित ठेवावे लागेल.. आणि त्याच्या मरणोत्तर या गोष्टीचा नाश होईल... पण काही वर्षांसाठी मी हे थोपवू शकतो.. किमान त्याचा राग आपण कमी करू शकतो... पण एक गोष्ट लक्षात असूद्या.. तुमच्या मुलाला एक निष्पाप मनाचा आणि कन्या राशीत जन्माला मुलगा मारू शकतो... मी सध्या एक अभिमंत्रित धागा त्याला देतोय.. त्याने त्याच्या रागावर नक्कीच अंकुश पडेल.. असे म्हणून महाराज त्या लहानगच्या कमरेला एक धागा बांधतात आणि कल्पना ला सांगतात त्याच्या पंधराव्या वाढदिवसाला त्याला पुन्हा घेऊन या...

कल्पना : ठिक आहे महाराज, खूप खूप आभार आपले..

असे म्हणून काही दक्षिणा ठेवून कल्पना आणि तिची आई तिथून निघतात..

************************************************


त्याचवेळी प्रदविग्न आणि निशा एका इस्पितळातून एका छोट्या मुलाला घेऊन घरी येत असतात.. घरी गंगा ने एक नावाजलेले पंडित बोलावले असतात.. जे प्रदविग्न च्या बाळाचे नाव आणि भविष्य सांगणार असतात.. जशी ही तिघे घराजवळ येतात.. तशी गंगा प्रसन्न मनाने त्यांना ओवाळून त्यांच्या वरून घास उतरून टाकते.. मग आधी माय लेक आणि मागून प्रदविग्न असे ते घरात येतात.. ते पंडित निशाच्या हातताल्या बाळाला बघून प्रसन्न हसतात.. निशाला खाली बसायची खूण करून ते बाळाच्या डोक्यावर आपले हात ठेवतात आणि म्हणतात..

पंडितजी : अद्भुत, आनोखी ग्रहदशा.. पवित्र ,पावन, निष्पाप, प्रेमळ ... अशी कुंडली आहे बाळाची.. बाळाचे नाव प्रेम ठेवा.. खूप उन्नती करणार आहे हा... याच्या हातून नेक काम होणार आहे.. शुभं भवतू... कन्या राशीचे अक्षर आहे..

निशा : पंडीतजी, आपले शुभाशीर्वाद नेहमी पाठीशी राहूद्या.. नमस्कार करते..

पंडीतजी एवढे बोलून तिथून निघतात...

***********************************************


प्रेम सकाळी उठून आवरून गावाकडे येतो.. कोणी सफाई साठी तो शोधत असतो.. तितक्यात निमिष च्या मुलाचा एक गडी त्याच्या समोर येतो.. नवीन माणसाला जसे वरून खालपर्यंत पाहतात तसाच तो करत होता... प्रेम ला त्याचे असे बघणे अस्वस्थ करत होते... त्याने पटकन त्याला विचारले

प्रेम : ओ दादा, मला काही माणसे हवी होती.. वाडाच्या सफाईसाठी.. माझी मदत कराल का जरा..

तो इसम : कुठला वाडा.. तू कोण हाय.. न कायला साफ करायचाय त्यो वाडा..जरा ईस्कटून सांग..

प्रेम : अहो तो आमचा वडिलोपार्जित वाडा आहे.. आमचे पाटिल आजोबा होते न त्यांनी बांधला होता..

तो इसम : पाटिल आजोबा?? तू कोण म्हणायचा??

प्रेम : मी प्रेम, पाटील आजोबांचा पंतू.. माझे वडील प्रदविग्न आणि आई निशा .. गजानन पाटिल आणि आजी गंगा..

तो इसम : का...... य??? तू गजाचा नातू.. पर तू इथं कायला आलास...

प्रेम : का म्हणजे??? माझे घर आहे इथे.. मी कधीही येऊ शकतो..

तो इसम काहीही न बोलता निघून जातो... आणि एक माणूस प्रेम ला वाडा साफ करायला घेऊन येतो.. तसे प्रेम त्याचे धन्यवाद करून पुन्हा वाड्याच्या दिशेने येतो..

***************************************************

एका मखमली दिवानावर एक उंची पोशाखात एक पंचविशीतला तरुण बसलेला असतो.. त्याच्या जवळून अत्तराचा गंध येत असतो.. डोळ्यांवर उच्च प्रतिचे सनग्लासेस .. हातात एक तीन चार तोळ्याचे ब्रेसलेट.. गळ्यात एक गोफ.. दुसऱ्या हातात उच्च प्रतिचे घड्याळ.. महागडे बूट.. आणि सेट केलेले केस... दिसण्यात एक रूबाब आणि बोलण्यात मगरूरी ... त्याच्या संपत्तीचा माज त्याला पाहून समजून येत होता.. त्याच्या डाव्या बाजूच्या भिंतीला एका फोटोला हार लावला होता आणि खाली नाव होते कै. निमिष पाटील.. तो उपद्व्यापी त्या फोटो जवळ जाऊन नाटकी रडत बोलला

सार्थक (निमिष चा मुलगा) : बाबा, तुम्ही जे वागलात .. ते आज माझ्या वर आलय.. मी का हा त्रास सहन करू.. का तुम्ही असे वागले.. माझे लग्नही होणे कठीण आहे.. आता मी काय करू... असे म्हणत तो जोरजोरात हसू लागतो.. कमरेचा दोरा कधीच काढून टाकलेला असतो.. आणि बोलतो की, सार्थक ला जज पाहिजे ते तो कसही मिळवतो.. त्याला कोणीही अडवू शकत नाही..

कल्पना : (एका दोरीने बांधलेली).. बाळा, तू चुकीचे करतोय.. तुझ्या मामाच्या बोलण्यात येऊ नकोस.. तुला फसवून त्याला सगळे मिळवाऊ आहे.. त्याच्या सारखा नीच होऊ नकोस.. जागा हो बाळा.. ऐक माझे..

सार्थक : आई, तू नको त्रास करून घेऊस.. मी आहे न मी बघेन...

तितक्यात सार्थक चा मामा अर्थात प्रेम ला भेटलेला तो इसम जगदिश तिथे येतो.. आणि सार्थक ला प्रेम आल्याचे सांगतो.. तो कोण आहे हे देखील सांगतो.. तेव्हा तिथे वावरणारी आणि प्रेमला येण्यास भाग पाडणारी ती आनंदी होते.. आणि त्या मामाच्या डोक्यात पटकन एक ग्लास फोडते.. कोणाला काही कळत नाही.. सगळे आ वासून ते सारे पाहत राहतात

जसा जगदीश आत येऊन सार्थक ला सारे सांगतो .. तसा तिथे घुटमळणारी आनंदी ची आत्मा प्रसन्न होते.. आणि जगदीशला पाहून तिच्या वर अतिप्रसंग झालेला दिवस तिला आठवतो.. कारण निमिष सोबत जगदीश ही तिथे असतो.. आणि तिच्या अश्या अवस्थेवर फिदीफिदी हसत असतो.. तेच आठवून ती त्याला मारते... अचानक झालेल्या हल्ल्याने जगदीश जागीच कोसळतो..आणि ते ग्लास ही शेवटच्या टेकूसहीत त्याच्या अंगावर पडते.. इतर लोकही भयचकित नजरेने घडलेले पाहतात.. सार्थक मात्र आपल्या मामाला वाचवण्यासाठी इस्पितळात धाव घेतो.. इकडे हे सगळे बघून कल्पना हसू लागते.. आणि तुझा घडा भरला जगदीश अशी आरोळी ठोकते...


***************************************************


इस्पितळात जगदीश आयसीयू मध्ये.. शेवटच्या घटका मोजत असतो.. तो ग्लास थेट त्याच्या ब्रेन ला डॅमेज करतो... त्यामुळे वाचण्याची अपेक्षा शून्य असते.... बेशुद्ध अवस्थेत त्याला एक भास होतो की, इस्पितळाच्या खिडकीतून त्याच्यावर कोणीतरी झेप घेणार आहे.. पण खरोखरच चांदिच्या पिंजारलेले केस आणि संपूर्ण खोबणी झालेले काळेकुट्ट डोळे घेऊन आणि एक मळकट साडी नेसून आलेली ती आनंदी जगदीश वर झेप घेते आणि त्याचे काळीज काढून घेऊन त्याच्या अंगावर बसून खाऊ लागते.. त्याचे शरीर चिरफाड करून त्याचा एक ही अंश जागेवर ठेवत नाही.. पूर्ण रागाच्या भरात ती त्याला संपवते .. तरीही तिचा राग शांत होत नाही.. आता मात्र तिला फक्त तिच्या वर झालेल्या अतिप्रसंग शेवटचा टप्पा अर्थात सार्थक च्या अंगी असलेली शक्ती तिला गाठायचे असते... त्याच शक्ती मुळे तिच्या सारख्या बऱ्याच तरूणींना आपले प्राण गमवावे लागले असतात.. तिचा सामना खूप बलशाली शक्ती शी होणार याची कल्पना तिला असते.. पण तिला मुक्ती शिवाय काही सुचत नसते... ती आता पुढच्या प्रसंगासाठी तयार होते...


***************************************************


मामा गेल्याच्या दुःखात सार्थक खूप रडत असतो.. प्रत्येक कामात मामा त्याची मदत करत असतो.. त्यामुळे त्याचे असे जाणे सार्थकला सहन होत नाही... कल्पना चा आक्रोश आला .ती एकेकेला संपवेन ती कोणाला सोडणार नाही...


सार्थक संपूर्ण दिवस त्याच्या रूममध्ये एकटा राहतो.. त्याला मामाचे असे जाणे त्याला खूप दुखी करत असते... तितक्यात अचानक दिवे चालू बंद होऊ लागतात.. त्यांची चूरचूर वाढते.. आणि मंद प्रकाश होऊ लागतो... समोरच्या भिंतीवर एक प्रोजेक्टर प्रमाणे दृश्य दिसू लागतात... ज्यात एक इसम एका मुलीला ओढत आणत असतो... त्या इसमावर लाईट पडताच त्याचा चेहरा पाहून सार्थक सावध होतो आणि निरखून पाहयाला लागतो... तो इसम म्हणजे सार्थक चा बाबा निमिष असतो.. त्याने केलेल्या वाईट कृत्यांची ती एक चित्रफीत असते.. त्यात त्याने जेवढे पाप केलेले असते.. त्याची झलक दिसते.. त्या अनिष्ट शक्तींचा वापर.. मुलींवर केलेले अत्याचार सार काही दिसून येते... ते सगळे पाहून सार्थक स्तब्ध होतो... त्याला काही कळायच्या आत दिवे पेटू लागतात आणि एक सफेद सावली त्याच्या समोर येऊन उभी राहते... तिला पाहून सार्थक घाबरतो.. पण ती सांगते की, घाबरू नकोस.. मी तुला काही करणार नाही.. तुझ्यातल्या अनिष्ट शक्तींना मला संपवायचे होते.. त्यातील पहिए पायरी तुला सत्य दाखवणे होते.. पुढे अजून खूप काही आहे.. ज्यामुळे तुझ्यातला माणूस त्यावर विजय मिळवून त्या शक्तीला कायमचा संपवू शकतो... नाय तर तुला या जगाचा निरोप घ्यावा लागेल.. कारण तुला मारणारा तुझ्या जवळपास आला आहे... तू ठरव आता काय करायचं आहे.. पुढची पायरी तुला लवकरच अनुभवायला मिळेल..

नमस्कार मित्रांनो,


सार्थक त्याच्या वडीलांचा खरा चेहरा पाहिल्यापासून खूप शांत होतो... त्याला त्याच्या वडीलांचा आणि स्वतःचा खूप राग येत असतो... पण तो वाईट मार्ग सोडून चांगल्या मार्गाने जायचा प्रयत्न करू लागतो.. तो जरी निमिष च्या शक्तींच्या अधिपत्याखाली असला.. कल्पनाचा चांगुलपणा त्याच्यात जिवंत असतो... तो आपल्या आईला म्हणजे कल्पनाला दोरखंडातून सोडवतो.. तिचा इलाज करतो.. या गोष्टीत एक महिना निघून जातो... त्या दरम्यान त्यातली ती वाईट शक्ती बाहेर यायचा प्रयत्न करत असते.. पण सार्थक तिला थोपवण्यात यशस्वी होतो.. कल्पना ही आपल्या मुलाला त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करत असते.. पण आता कल्पना ला भिती असते ती चंद्रग्रहणाची.. त्या वेळेसचा निमिष चा अवतार तिला पूर्ण लक्षात असतो.. साधारण दिड महिन्यावर चंद्रग्रहण येऊन ठेपलेले असते.. सार्थक मधली वाईट शक्ती ही त्याच्या वर भारी पडत असते.. सार्थक तिला थोपवत असतो.. पण ग्रहण जवळ येत असल्याने त्याला ते थोडे अवघड पडते..

***************************************************

आनंदी एका मोठ्या वाडाच्या बाहेर असते.. कोणी पंडितजी असतात त्या वाड्यात.. आतले वातावरण तिला प्रवेश करू देत नसते.. तिला वाट बघण्याखेरीज पर्याय नसतो... एक प्रहर उलटल्यानंतर पंडीतजी एक पूजा सांगायला जात असताना आनंदीला दिसतात.. पूजेचे सामान दिसल्याने ती या गोष्टीचा अंदाज बांधते.. ती पंडीतजीना आवाज देते... तसे पंडीतजी सावध होतात... वरून सदरा खाली धोतर.. पायात ॲक्युपंक्चर वाली सँडल वय झाल्यामुळे.. अंगावर जाणव अशी ऐकून पंडीतजी ची वेशभूषा... आवाज ऐकून पंडीतजी आजूबाजूला पाहू लागतात... सोबत असणाऱ्या दोघांना पुढे जायचा इशारा करतात.. तसे दोघेही तिथून पुढे जातात... ते पुढे जाताच आनंदी त्यांच्यासमोर येते.. तिच्या चांगल्या रूपात...

आनंदी : (पंडीतजी समोर येऊन त्यांच्याशी बोलू लागते... )

बाबा, मला तुमची मदत हवी आहे....

पंडितजी , अर्थात आनंदीचे बाबा.. आपल्या लेकीच्या अशा अवस्थेवर त्यांना रडू फुटते... ते तिला पाहून तिच्या अश्या अवस्थेची चौकशी करतात.. कारण त्यांना निमिष आणि त्याच्या कृत्याबद्दल काहीही माहिती नसते... आनंदी आतापर्यंत घडलेल्या घटना त्यांच्यासमोर मांडते ते ऐकून पंडित जी टाहो फोडून रडू लागतात...


ऐन लग्नाच्या तीन दिवस आधी मुलगी गायब झालेली असते.. शोध घेऊन सापडत नाही.. प्रेत ही हाती लागत नाही.. कारण निमिष ज्या शक्तींना आव्हान देत असतो.. त्या आपल्या भक्ष्याचे निशाणही मागे ठेवत नसतात.. तीच अवस्था निमिषची ही झालेली असते.. अश्यात आनंदीचा कण ही त्यांना सापडत नाही.. म्हणून आज एवढ्या वर्षांनी तिला अश्या अवस्थेत पाहून पंडितजी तूटून जातात... आणि तिला विचारतात..

पंडितजी : आनंदी, पोरी.. काय मदत हवी आहे तुला माझी.. बोल मी नक्की मदत करेन...

यावर आनंदी सार्थक आणि प्रेम दोघांबद्दल पंडीतजीना सांगते.. आणि सार्थक ला त्या शक्तींपासून कसे वाचवता येईल असे विचारून घेते.. सगळे ऐकून पंडीतजी तिला काही गोष्टी सांगतात..आणि निघून जातात.. त्यांना मुलीच्या आठवणीने भरून येत असते.. पण ते तिथून निघून जातात...

***************************************************

सार्थक कल्पना ला औषध देऊन तिला झोपवून दिवाणखान्यात येऊन बसतो.. त्याला आज जरा उदास वाटत असते.. जणू कोणी त्याचे हास्य चोरून नेलय... सार्थक बसला असतो तिथे त्याच्या उजव्या बाजूला अंगभर आरसा असतो.. अर्थात त्यात अख्ख्या माणसाचे प्रतिबिंब दिसू शकेल एवढे... सार्थक सहज आरशात पाहतो तर त्याची हालत बेकार होते.. एक भयंकर अशी आकृती त्याला आरशात दिसते.. असे नाही की त्याने कधी आरसा पाहिलेला नसतो.. पण आज अगदी विलक्षण गोष्ट घडलेली असते..एक भयानक असा चेहरा सार्थक समोर उभा राहतो.. सुळे तोंडातून बाहेर आलेले.. भयंकर चेहरा.. डोळे आत रोवलेले लाल झालेले.. डोक्यावर शिंगे ओठांवर काळा द्रव चिकटलेला.. अश्या विस्कळीत रुपात सार्थक ला त्याचे दर्शन घडत होते.. सार्थक घाबरून पळू पाहत होता.. पण जणू त्याला पकडून ठेवल्यासारखे जाणवत होते..त्या भयान ने एकच आवाज केला.. जणू गर्जनाच..या चंद्रग्रहणाला मी माझ्यासोबत तुला घेऊन जाणार कायमचा..हिहिहिहिहिहि..


सार्थक स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न करत असतो.. पण तो निष्फळ ठरतो.. सार्थक तिथेच बेशुद्ध होतो..

या कहाणीत थोडे मागे जाऊ..

कनिष्क महाराज जेव्हा १५ वर्षाच्या सार्थक ची कुंडली बघत असतात..

कनिष्क महाराज : तुमच्या मुलाच्या मृत्यू जरी कन्या राशीच्या इसमाकडून लिहला असला तरी त्याच्याआत वसलेली शक्ती ही त्याचा घात करू शकते.. आणि तो घात बरोबर २८ वर्षांनी येणाऱ्या चंद्रग्रहणाला असेन.. त्या आधी एकदा मला नक्की भेटा.. मी त्याच्यावर काय तरी उपाय सांगेन..

कल्पना : महाराज, माझ्या लेकाला मला या सगळ्यातून बाहेर काढायचे आहे.. तुम्ही माझी मदत करा.. महाराज...

कनिष्क महाराज : ताई, मला ही त्याची काळजी आहे.. तुम्ही फक्त त्याला माझ्याकडे वेळोवेळी आणा.. आणि हा धागा त्याच्या सोबत नेहमी राहू द्या...

त्याचवेळेस जगदीश चे येणे.. कल्पना ला तिथून उचलून बाहेर आणणे.. सार्थक कल्पना बद्दल वाईट सांगणे.. तिला ठार वेडे ठरवणे.. संपत्ती आपल्या नावावर करून घेणे.. हे सगळे घडते.. सार्थक ला मात्र मामा योग्य वाटतो.. आणि पूर्णपणे तो मामाचे बोलणे ऐकू लागतो...

*************************************************

कल्पना ला आवाजाने जाग येते.. औषधाचा अमल असल्याने पापण्या जड होत असतात.. ती तशीच दिवाणखान्यात येते.. आपल्या लेकाला असे जमीनीवर पडलेले पाहून ती घाबरते.. समोरच्या आरशात अजूनही तो असतो.. कल्पना ला धूसर दिसत असते.. ती तिथेच बाजूला कोसळते.. तेव्हा तिच्या कानाजवळून आवाज येतो.. "तुझ्या लेकाला , मी लवकरच नेणार.. " हीहीहीहीहीही....


प्रेम एका गुहेच्या बाहेर उभा असतो.. मंत्रोच्चार त्याच्या कानावर पडत असतात.. त्या मंत्रोच्चाराच्या समाप्तीनंतर त्याला कोणीतरी आवाज दिला आहे असे जाणवते... पण आत गुहेत काळोख असल्याने त्याचे पाऊल पुढे जात नाही... त्याचबरोबर आतून परत आवाज येतो.. घाबरू नकोस तसाच आत ये.. वाट दिसेल तसा पुढे ये...तसा तो आवाज ऐकून प्रेम पुढे जाऊ लागतो... खूप अंतर चालून गेल्यावर आतमध्ये एक यज्ञ करून एक वृद्ध गृहस्थ प्रेमच्या नजरेस पडतात... ते खड्या आवाजात मंत्रोच्चार करत असतात..

प्रेम त्या यज्ञाच्या फूटभर अंतरावर असतो... तो एकटक मंत्र उच्चारणाऱ्या गृहस्थांकडे पाहत असतो... काही वेळाने ते गृहस्थ आपले मंत्र थांबवतात आणि एक मोठा श्वास घेऊन मूठभर विभूती त्या यज्ञात टाकतात.. आपले डोळे उघडून ते समोर पाहतात तर एक खंजर सारखा चाकू त्यांच्या समोर प्रकट होतो... तो हातात घेऊन ते प्रेमला त्यांच्याजवळ बोलवतात.. त्याच्या डोक्यावर हात ठेवून ते काही मंत्र पुटपुटतात.. त्यात प्रेमला सार्थक चे आयुष्य त्याचे आयुष्य दोन्ही दिसते.. त्याचा जन्म हेतू त्याला लक्षात येतो..

त्याच्या डोक्यावरून हात काढून ते गृहस्थ त्याला गावात असणाऱ्या मारूती रायाच्या मंदिरात यायला सांगतात आणि तिथून अदृश्य होतात... प्रेम त्याच्या आंथरूणात घामाने चिंब भिजलेला असतो.. नरेश त्याला या अवस्थेत बघून घाबरतो तर अरविंद मात्र त्याला जवळ जाऊन उठवायचा प्रयत्न करतो...

अरविंद : प्रेम, काय रे एवढा का भ्यायला आहेस.. उठ बर.. काय झाले.. वाईट स्वप्न पडले का??

अरविंदच्या आवाजाने आणि हलवण्याने प्रेम जागा होतो.. श्वास अजूनही फुलत असतात.. तो घाबरतच अरविंदला अ.. नाही.. असे उत्तर देतो.. आणि पुढे बोलू लागतो...

प्रेम : अरविंद , एक बाबा आलेले माझ्या स्वप्नात .. जे एका गुहेत होते.. त्यांनी मला तिथे बोलावून बऱ्याच गोष्टी दाखवल्या.. आणि इथे येण्याचे कारण सांगितले.. त्यांनी मला हनुमान मंदिरात बोलावलय.. आजच.. मला घाई करायला हवी.. कमी दिवस आहेत हातात..

****************************************************

कल्पना आणि सार्थक जमिनीवर पडलेल्या अवस्थेत असतात.. तेव्हा आनंदी तिथे येते.. त्या आरशात दिसणाऱ्या भयावह आकृतीला ती आपल्या चांगल्या आणि पवित्र स्पर्शाने जाळण्याचा प्रयत्न करते.. तिचा पवित्रपणा सहन न होऊन तो तिथून नाहिसा होतो.. तशी आनंदी कल्पना आणि सार्थक ला तिच्या त्याच स्पर्शाने शुध्दीवर आणते... दोघेही भयाच्या अंमलाखाली असल्यासारखे उठतात.. तशी आनंदी बोलू लागते..

आनंदी : घाबरू नका, तुम्ही दोघे सुरक्षित आहात.. सार्थक तुला मी दुसऱ्या घटनेसाठी बोलली होती ना.. तिची वेळ आली आहे.. त्यासाठी तुला गावातील मारूती रायाच्या मंदिरात जावे लागेल. तिथे तुला सगळे कळेल.. आजच तिथे जाऊन पुढील टप्पा गाठायचाय आपल्याला...

सार्थक : (अजूनही भेदरलेल्या अवस्थेत) मला.. खरच गरज आहे.. दैवी सानिध्याची.. मी इतके भयंकर पहिल्यांदाच अनुभवलय..

आनंदी ताई.. तुम्ही मला यातून लवकरात लवकर मुक्त करा.. नाहीतर मी स्वतः मुक्त होतो.. असे म्हणत सार्थक एक सुरा त्याच्या पोटात खूपसायला जातो..

आनंदी : (सुरा ओढून घेत) सार्थक हे एवढे सोपे नसते रे.. तुझ्या बाबाने असा अविचार नसता केला.. तर सगळे नीट होते.. त्याच्या वासनेच्या हट्टापायी सगळे विपरीत घडत गेले.. असो.. जे झाले ते उकरून काढण्यात काही अर्थ नाही.. पण जे होऊ शकते ते नक्कीच करायचे आहे..

कल्पना : हो बाळा, आपण प्रत्येक प्रयत्न करून बघायचा आहे.. तू निश्चिंत राहा.. नक्कीच योग्य मार्ग सापडेल आपल्याला..

****************************************************

गावाच्या मध्यावर मारूती रायाचे भले मोठे मंदिर होते.. जवळपास दोन एकरच्या क्षेत्रात ते पसरले होते.. उंच पायऱ्या, टेकडीची जागा, भव्य आंगण, तितकेच भव्य सभामंडप , खांबावर कोरलेले जय श्रीराम आणि मारुती रायाची विभिन्न रूपं.. लहानपणापासून ते कुमार वयापर्यंत चे .. त्यात सुर्य देवास गिळंकृत करछ पाहणारे बाल हनुमान देखील कोरले होते.. आणि जय श्रीराम च्या मंत्रानी पावन झालेला दिव्य गाभारा.. साधारण वीस फूट उंच मारुती रायाची मूर्ती आणि त्याच्याच जवळ राम लखन सितामाई यांच्या त्याच उंचीच्या मूर्त्या होत्या.. बजरंगबली प्रणाम करताना दिसत होते.. तर राम लखन सिता आशीर्वाद देताना दिसत होते.. अगदी प्रसन्न असे वातावरण होते चहूबाजूंनी..


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आनंदीचे बाबा अर्थात प्रेमच्या स्वप्नात आलेले पंडीतजी होते.. ते एका कोपऱ्यात ध्यान मग्न होते.. ते प्रेम ची आणि सार्थक ची वाट पहात होते.. काही वेळाने प्रेम आणि अरविंद तिथे पोहचले.. ते पंडितजीना शोधत आत आले.. एक दोघांना वर्णन केल्यावर त्यांनी पंडितजी ना कुठे भेटता येईल हे सांगितले.. तसे पंडितजी त्या दोघांसमोर येऊन उभे राहिले.. प्रेम ला ओळखायला वेळ लागला नाही.. त्याने पंडितजीचे पाय धरले.. आणि म्हणाला...

प्रेम : बाबा , मला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला आहे.. पण याला दुसरा उपाय नाही का?? आतापर्यंत रोखलेले अश्रू अनावर होऊन पंडीतजींच्या पायांना स्पर्श करत होते.. काही ही झाले तरी सार्थक प्रेम चा भाऊ होता आणि त्यामुळे त्याला या गोष्टीचे वाईट वाटत होते...

प्रेम ला दोन्ही खांद्याला धरून पंडीतजी उठवत म्हणाले..

पंडितजी : प्रेम, तू काळजी करू नको.. तुझ्या शी या बद्दल बोलण्यासाठी मी तुला इथज बोलावले आहे.. ये इथे अंगणात बसू यात..

मंदिराच्या अंगावर बाक होते.. ज्यावर पंडीतजी सोबत प्रेम आणि अरविंद असे बसलेले.. पंडीतजी पुढे बोलू लागले...

पंडितजी : प्रेम, बाळा .. सकाळी एक स्वप्न तुला पडले.. ज्याचा आधार घेऊन तू इथवर आलास... त्या स्वप्नात तू पाहिले असशील एक चाकूरूपी खंजर प्रकट झाला होता.. तो खंजर हा फक्त आणि फक्त त्या वाईट शक्तीला कायमस्वरूपी संपवण्यासाठी तुला कट करायला वापरायचाय.. आणि हे येत्या चंद्रग्रहणला शक्य आहे.. जेव्हा सार्थक पूर्णपणे त्या वाईट शक्तीच्या अमलात असेन... त्यासाठी तुझ्या कडे दिड महीन्याचा कालावधी आहे.. त्या कालावधीत तुला काही मंत्र शिकायचे आहेत.. त्याची गरज तुला नक्की लागेल...

प्रेम : ठिक आहे बाबा, तुम्ही सांगाल तसे आणि ते मी करायला तयार आहे..

इकडे सार्थक आनंदाश्रूनी आपला चेहरा भिजवत प्रेम कडे कृतज्ञतेने पाहत असतो.. आपल्यासाठी हा प्रत्येक धोका पत्करायला तयार आहे.. याची त्याला जाण होते..

प्रेम , पंडीतजी , अरविंद, कल्पना असे सगळे बसलेले असतात.. सार्थक आणि आनंदी दोघांनाही दूर बसवलेले असते.. कारण पंडीतजी सार्थक मधल्या वाईट शक्तीच्या सर्वनाशाबद्दल सांगणार होते.. म्हणून त्याला दूर बसवलेले..


पंडीतजी : प्रेम , बाळा तुला काही मंत्र मी आज देणार आहे.. त्याचा पुरेपूर अभ्यास कर.. आणि मन एकाग्र करून त्यांचज उच्चार कर.. सार्थक ला आता तुझ्याबद्दल वाईट भावना नाही आहे.. त्यामुळे तुमच्या मध्ये काही मतभेद नाही होणार.. आणि योग्य वेळ आल्यावर मी तुला तो चाकूरूपी खंजर देईन...


प्रेम खंजरचे नाव ऐकून उतावीळ होऊन पंडीतजीना विचारत असतो कि, पंडीतजी त्याला थांबयाचा इशारा करून.. पुढील गोष्ट ऐकायला सांगतात...


पंडितजी : (दोन्ही हातांची बोट ओठांवर ठेऊन एक दीर्घ श्वास घेऊन पुढे बोलतात.) आपल्याला सार्थक च्या आतमध्ये वास करणारी दृष्ट शक्ती संपवायची आहे.. सार्थक ला नाही.. आणि हे चंद्रग्रहणाच्या दिवशी शक्य होणार आहे.. हा दिव्य मंत्रानी उदयास आलेला चाकूरूपी खंजर या गोष्टीमध्ये तुझी मदत करेन.. आणि या मंत्रानी तुला वार करणे सोपे जाईन.. मी या सगळ्यात तुझी फक्त लांबून मदत करू शकतो.. वयोमानानुसार मला लढणे शक्य नाही.. पण माझ्या अंत्यत जवळचे मित्र नवनाथ त्यांचा मुलगा कनिष्क आपली मदत करेन.. तो अशा अनिष्ट शक्तींसाठी राक्षस आहे.. सगळे ठरल्याप्रमाणे व्यवस्थित होईल याची मला खात्री आहे.. मारुतीराया तुमच्या सोबत आहे.. असे म्हणून ते प्रत्येकाला मारुती रायाचे एक पेंडंट देतात...


कल्पनाला असे संभ्रमात पाहून पंडितजी सांगतात कि, हा तोच कनिष्क महाराज आहे ज्याच्या कडे तू सार्थकला नेत होतीस.. तो नक्कीच या सगळयातून सोडवेल.. आणि मारुती रायाला स्वतः पासून दूर करू नका... आणि पोरी जशी सार्थक च्या अंगातून शक्ती संपून जाईन.. तसे त्यालाही हे पेंडंट घाल.. सगळे काही सुरळीत होईल.. देवावर विश्वास ठेवा...


****************************************************


सार्थक आणि आनंदी त्या लोकांची वाट पाहत मंदिराच्या दूरवर बसलेले असतात.. आनंदी सार्थकला धीर देत असते.. सगळे नीट होईल असे समजावत असते.. आनंदीला आधीच पंडीतजींकडून सगळे समजते.. जेव्हा ती पहिल्यांदा पंडीतजींना भेटते... त्यामुळे तिला पूर्ण विश्वास असतो की सार्थकला काही होणार नाही..


सार्थक : आनंदी ताई, मला खूप भयंकर जाणवतय.. प्रेम माझ्यासाठी.. स्वतःचा जीव धोक्यात घालतोय.. किती ते साहस.. पण मला त्याच्यासोबत जगता येणार नाही.. आणि त्याच्या हातून आलेले मरण मला या त्रासातून मुक्त करेल.. त्याचा मी नेहमी ऋणी राहीन... असे म्हणून तो रडू लागतो.


आनंदी : सार्थक, जे आपल्या भाग्यात लिहून ठेवले आहे.. ते कोणी पूसू शकत नाही.. तू निश्चिंत राहा.. तुझे मन वाईट गोष्टींपासून लांब ठेव... त्या शक्तीचा जमेल तेवढा विरोध कर.. आणि चंद्रग्रहणासाठी स्वतःला तयार कर.. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत...


तितक्यात समोरून पंडीतजी आणि इतर मंडळी येताना आनंदीला दिसतात.. आनंदीला आता सगळे जण पाहू शकत असतात.. ती जणू यांच्यातला एक भाग झालेली असते... पंडीतजी कल्पनाला दीड महीना सांभाळून आणि जागरूक रहाण्याचा सल्ला देतात.. आणि प्रत्येक जण आपपल्या दिशेने निघून जातात. कल्पना आणि सार्थक वाड्यावर येतात.. थोडा थकलेला असल्याने सार्थक त्याच्या खोलीत झोपायला जातो.. आणि कल्पना काही जेवन बनविण्यासाठी किचनमध्ये जाते...


*************************************************


प्रेम मंत्रोच्चार करत असतो.. त्याला तसे पंडीतजींनी सांगितलेले असते.. आणि आपल्या भावासाठी तो हे सगळे मनापासून करत असतो... दिवसातून १८ तास सतत मंत्रपठण प्रेम करत असतो.. त्या प्रभावामुळे त्याला एक दिव्यता प्राप्त होते... आज सलग २० दिवस प्रेम मंत्रपठण करत असतो.. अचानक त्याच्या दिव्य दृष्टीने त्याला सार्थक दिसू लागतो.. शांत पहुडलेला... त्याचज ते निरागस रूप प्रेम ला सुखावून जात.. पण क्षणभरच.. कारण काही वेळाने तिथे एक भयंकर आकृती त्याला दिसते.. जी सार्थक पासून काही अंतरावर असते... आनंदीच्या स्पर्शाने त्याचा जळालेला अर्धा चेहरा भयंकर दिसत असतो... त्याला जणू समजते की, प्रेम त्याला पाहू शकतो आहे... तो जोरात गर्जना करतो , " तू कितीही प्रयत्न कर, मी याला घेऊन जाणार .. बोटावर मोजण्याइतके त्याचे आयुष्य आहे आता... खिहिहिहिहि.... आणि तसा तो सार्थकच्या हातावर एक जखम करतो आणि पुन्हा भेसूर हसून तिथून निघून जातो.. त्याचे हसू मात्र प्रेम च्या कानात घूमत राहते...


*****************************************************


सार्थकला जखम झाल्याने त्याला ताप चढतो.. कारण त्याची नखे विषारी असतात.. ज्यातले विष रक्तात भिनल्याने त्याची ही अवस्था होते.. त्या अनिष्ट शक्तीला सार्थक ला कमजोर करायचं असते जेणेकरून ग्रहणाच्या वेळेस तो कसलाच विरोध न करता त्याचा प्राण त्यागेल.... सार्थक ची हालत दिवसेंदिवस खंगत जाते.. दहा दिवसांवर ग्रहण येऊन ठेपलेले असते... सार्थकची अवस्था प्रेम ला अजिबात बघवत नसते... तो पंडीतजींना सारे काही सांगतो... त्यावर पंडीतजी हास्य करून त्याला निश्चिंत राहायाला सांगत होते... त्यानंतर सार्थक ला त्रास होताना पाहून सुध्दा प्रेम काही करू शकत नव्हता..


****************************************************


एका खोलीत पाठमोऱ्या स्थितीत एक जण मंत्रजप करत बसलेले असतात.. त्यांच्या मंत्रप्रभावाने सार्थक ची फिकट निळी त्वचा पूर्वीप्रमाणे दिसू लागत होती.. पण ताकद कमीच पडत होती.. ते इसम मंत्रोच्चार खड्या आवाजात बोलत होते.. ज्याचा परिणाम सार्थक च्या आत वसलेल्या त्या अमानवी शक्तिवर दिसून येत होता... पण चंद्रग्रहण जवळ येत असल्याने तो जास्त प्रभावशाली जाणवत होता.. अखेरीस चंद्रग्रहणाचा दिवस उजाडला आजची रात्र भयावह अनुभवाची सिमारेषा पालटणारी होणार होती...


चंद्रग्रहण सुरू झाले होते.. हळूहळू चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मधोमध येत होता सगळीकडे लख्ख काळोख पसरला होता... कल्पना पूर्ण जागी होती.. कारण निमिष चा अवतार तिला समोर दिसत होता.. ती फक्त आपल्या गळ्यातील पेंडंट वर हात धरून देवाचा धावा करत होती.. इकडे सार्थक च्या खोलीत त्याचा चेहरा अमानवी झाला होता.. डोळे खोबणीसारखे रक्ताळलेले .. चेहरा निस्तेज पोतल्यासारखा केस हवेत झुलणारे.. सुळे बाहेर आलेले.. हातापायांची नखे चाकूसारखी धारदार झालेली..तोडांतून एक भयंकर आवाज.. भक्ष्याच्या शोधात बाहेर पडलेला तो म्हणजे सार्थक मधले अमानवी रूप.. जसा त्याने खोलीतून बाहेर पाय काढला तसे आपोआप दिवे चालू बंद होऊ लागले... जणू काय आता फूटतील असे ... त्याचे एक एक पाऊल पडताना वाड्याला हादरे बसत होते... ते ऐकून कल्पना च्या कानठळ्या बसत होत्या... पण तिला सार्थक ची जास्त काळजी वाटत होती.. आधीच खंगलेल्या प्रकृती मध्ये असलेला सार्थक आज पूर्णपणे त्या अमानवी शक्तीच्या अंमलाखाली होता... कल्पना च्या पोटात एकच गोळा आला.. तिला तिथेच घेरी आली.. ती सार्थकच्या विचारांनी कासावीस झाली होती..


**************************************************

प्रेम मंत्रपठण करत होता.. आणि त्याच्या जवळच कनिष्क महाराज होते.. दोघेही मंत्रोच्चार करत होते... ते ही आसपासच्या चार खोल्यांमध्ये आवाज जाईल असा... प्रेम थोडा कमजोर पडत होता.. कारण आदल्या दिवसापासून न खाता पिता मंत्रजप तो करत होता... त्याला याची जराही सवय नव्हती... पण फक्त सार्थक साठी तो हे करत होता.. काही वेळाने त्याला सार्थकचा वाडा दिसू लागला आणि तिथे भटकणारे ते भयान ही त्याच्या नजरेस पडले... ते कधी भिंतीवर चढत होते तर कधी हात जमिनीवर टेकवून चालत होते आणि फिदीफिदी हसत होते... त्याला जणू प्रेमच्या अस्तित्वाची जाणीव झाली.. तसा त्याने एक आरोळी ठोकली


अमानवी शक्ती : तू, काही करू शकत नाहीस.. आज मध्यरात्री मी याला घेऊन जाणार.. उगाच तूझी शक्ती वाया घालवतोयस.. सोड हे सगळे... नाय तर तू पण प्राण गमावशील.. खिहिहिहिहि.. ठिहिहिहिहि..


असे म्हणून ते अमानवी हसू लागले ... प्रेमचा पारा चढला आणि त्याने मंत्रोच्चार वाढवून उदी त्या वाटेने फेकली.. पण जसे उदी हवेत मिसळल्यावर प्रेम कुठल्या दुसऱ्या जागेत असल्याचे जाणवले.. तसा तो घाबरला... कनिष्क महाराजांनी त्याचा हात हळूच दाबला.. त्याला रुद्राक्ष स्पर्श झाल्याने तो भानावर आला.. आता प्रेम ने पुन्हा ध्यान लावले.. ते अमानवी मात्र चिडत ओरडत होते.. काही होत जे त्याला वाड्यावर थोपवत होते.. वाड्याबाहेर तो कोणाचाही घास करू शकत होता.. म्हणून त्याला मंत्रोच्चाराच्या प्रभावाने वाड्यात बंदिस्त केले होते... .


काही वेळाने प्रेम चे मित्र वाड्याकडे येतात.. प्रेमला मदत करण्या हेतूने ... त्यांना कल्पना नसते की, प्रेम तिथे नाही आहे.. त्यात ते भयान वाड्याच्या आत फिरत असते.. त्याला एवढ्या दिवसांची त्याची भूक भागवायची असते.. हे चौघे वाडाच्या मुख्य दरवाजाच्या समोर उभे असतात.. आत जाणे किती भयावह असू शकते याची त्यांना पुसटशी कल्पना ही नसते... तसे ते दरवाजा आत प्रवेश करतात आणि .. घप्प काळोख पाहून जागीच थिजतात.. नरेश घाबरट असल्याने त्याला काही सुदरत नाही.. तो पुढे जायला घाबरतो.. तसा अरविंद तनुजा त्याच्या सोबत त्या काळोखात रस्ता शोधत आत जातात... तेव्हा दूर छतावर त्यांना काहीतरी बेंद्रं दिसते.. तसे ते तिघे सावध होतात... त्याला वाड्याबाहेर जाता येत नसले तरी समोरून आलेल्या ना तो नक्की भक्ष्य बनवू शकत होता.. तसे त्याने या तिघांवर चाल केली.. माधवी अजूनही बाहेर होती.. त्या अमानवी शक्तीने नरेश ला ओढून घेतले आणि त्याच्या मित्रांसमोर त्याचे दोन तुकडे केले ज्यानंतर अरविंद आणि तनुजा च्या सर्वांगावर त्याच्या रक्ताचा पाट वाहिला.. आणि ते भयान जोरजोरात किंचाळून बोलू लागले..


आले मी न्यायला याला

शमवाया माझी भूक

केली इथवर येऊन

तुम्ही मोठी चूक

माझे पूर्ण होणार आता ध्येय

मी याला नेणार करण्या सोबत शय्य

खिहिहिहिहि ... ठिहिहिहिहि... खिहिहिहिहि ..


तसा ते अमानवी ताकदीने नरेशचा घास घ्यायला सुरुवात केली... इतके भयानक दृश्य पाहून दोघेही पूर्णपणे घाबरले.. मागून दरवाजा कधीच बंद झाला होता.. बाहेर माधवी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होती.. तिने बाहेर असताना मोठी किंकाळी ऐकली होती.. ती नरेश ची होती .. हे समजायला तिला वेळ लागला नाही.. ती दरवाजा जवळ पोहचताच दरवाजा बंद झाला होता.. तनु आणि विंदा आपले प्राण वाचवायला जागा शोधत होते... ते अगदीच त्याच्या कक्षेत आल्याने प्रेम असमर्थ वाटत होता.. आपल्या मित्रांचे असे हाल पाहून.. प्रेम कमकुवत झाला होता.. तेव्हाच कनिष्क महाराजांनी त्याला धीर देऊन त्याच्या हातात दोन रूद्राक्ष माळा दिल्या.. ज्या अनुक्रमे तनु आणि विंदा साठी होत्या.. प्रेम ने हात वाढवताच दोघांच्या गळ्यात माळा पडल्या आणि क्षणात बाहेर जायचा मार्ग सापडला.. मुख्य दरवाजा उघडला.. तसे हे दोघे बाहेर च्या दिशेने पळाले.. त्या अमानवी शक्तीला जशी जाणीव झाली.. ती ही त्यांच्या मागे पळाली.. तनु पटकन बाहेर आली आणि विंदा मात्र एका दाराला अडकला.. ज्यामुळे त्याच्या गळ्यातील माळ अडकून वेगळी झाली.. तनुला समजताच ती त्याला हात द्यायला मागे वळाली पण तोपर्यंत त्या अमानवी शक्ती नज त्याला वाड्यात खेचले होते.. इकडे बाहेर आलेली तनु जोरात ओरडल्याने माधवी तिथे आली.. तनु तिला पाहून अजून रडू लागली. आणि तिला सार काही सांगितले.. ते ऐकून माधवी थिजली.. इतके भयंकर पहिल्यांदा ऐकत असावी ती.. इकडे प्रेम दोन मित्रांना गमावल्याच्या दुःखात असतानाही मंत्रजप करत होता.. धीर द्यायला कनिष्क महाराज होतेच....


****************************************************

साधारण इंग्रजी राजवट होती तो काळ.. एक लावण्यवती तेव्हा इंग्रज्याच्या हवेलीत काम करण्या हेतू रूजू झालेली.. अंत्यत रूपवान आणि सुंदर अशी ती अप्सरेप्रमाणे दिसणारी रमा .. तिचा सुडौल बांधा आणि तिची नजर पुरेशी होती.. वेड लावण्यासाठी.. तसा एक इंग्रज अधिकारी तिच्या मागे पुढे फिरू लागला.. तिला संभोगाची मागणी घालू लागला.. तुला हवे ते देईन अशी आश्वासनं देऊ लागला... तिने आधी खूप दुर्लक्ष केले.. पण नंतर तिने प्रत्येक अधिकाऱ्याशी शय्यासोबत केली.. तिला रोज वेगवेगळ्या अधिकाऱ्यासोबत संभोगाची जणू सवयच झाली... तिला हवं ते मिळत होते ज्याची नशा तिच्यावर चढू लागली.. काही दिवसांनी तिच्या या वागण्याबद्दल इंग्रजाना समजले... त्यावेळेस मात्र काही जणांचा पारा चढला.. तिच्या सुंदरतेपुढे सगळे तिच्या मध्ये गुंतले होते.. आणि ती याचा फायदा घेत होती.. एका रात्री ती अशीच शय्यासोबत करायला आली असताना त्या अधिकाऱ्याने तिला थेट हवेलीच्या बाहेर आणली आणि तिथे झाडाजवळ तिला बांधली.. ती जागा म्हणजे आताचे बिरासपूर होय... ती जेवढ्या सोबत संभोग करत असते.. ते सगळे समोर उभे असतात... रोज नवी कारणे उभी करून ती प्रत्येकाला खोटं बोलत होती.. त्यामुळे त्या सगळ्यांनी तिला झाडाला बांधून जाळण्याचा निर्णय घेतला होता... आणि शिवाय त्यांची गुपिते बाहेर पडत होती.. ज्याचा संशय रमावर साहजिकच येत होता.. रमाने तिने असे काही केले नाही सांगून पण ती विश्वास पात्र नव्हती होत.. तसा एकाने पटकन पुढे येऊन जाळ पेटवला... तशी अग्नीज्वाळा भडकू लागली... आणि ती जोरजोरात किंचाळू लागली.. पाहता पाहता काही वेळानंतर अग्नी ने तिचे निम्मे शरीर जळून पडले होते.. तिला तिथेच गाडले गेले आणि तिचा अध्याय संपला...


काही दिवसांनी हळूहळू अधिकारी गायब होऊ लागले.. त्यांचे प्रेत सापडत असे वेशीवर... आणि सोबत काहीबाही लिहलेले पण असायचे... मला मारले तसे सगळे मरणार.. त्यावेळेस नवनाथ महाराजांचे आजोबा तिथे आले.. एक उत्कृष्ट पंडीत म्हणून त्यांची ख्याती होती.. त्यांना वेळीच एका अधिकाऱ्याने बोलावून घेतले होते.. तिला जाळलेल्या झाडामध्ये तिला कैद करून पंडीतजींनी ठेवले.. ती जोरजोरात ओरडत बोलत होती.. मी मुक्त होणार आणि जो मला बोलवेन त्याला सुखी करून मारणार आणि प्रत्येक पिढीला त्याच्या त्रास देणार... माझ्या प्रमाणे तो किंवा ती शय्यासोबत करणार प्रत्येकासोबत आणि त्या प्रत्येकाला मृत्यू देणार.. मला सोडवणारा किंवा सोडवणारी लवकर येईल.. खिहिहिहिहि.. ठिहिहिहिहि... अश्या कर्कश आवाजात ती ओरडत होती..


************************************************


साधारण १९९० साली २० वर्षाचा निमिष त्या झाडाजवळ आला होता.. जिथे ती कैद होती.. निमिष एक सरळ नाकाने चालणारा मुलगा होता.... त्याला कसलीही वाईट सवय नव्हती... त्याचा मित्र त्या हवेलीत राहत होता.. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निमिष आणि त्याचे मित्र तिथे आले होते... निमिष ला सगळे एक हूशार मुलगा म्हणून ओळखत होते.. आणि तेवढाच सरळमार्गी.. तो तिथे आला आणि तिला मुक्त व्हायची चटक लागली.. ती त्याला जवळ बोलवण्याचे प्रयत्न करू लागली.. पण तो कठोर असल्याने ते शक्य झाले नाही.. नंतर तिने देवकी बाईंचा अर्थात निमिष च्या आईचा आवाज काढला , तो ऐकून मात्र निमिष सावध झाला... तो आवाजाच्या दिशेने जाऊ लागला.. आई इथे कशी.. हा त्याचा मूळ प्रश्न.. हळूहळू आवाज वाढू लागला.. त्या चांडाळणीला फक्त त्याचा स्पर्श हवा होता.. तो अगदी झाडाजवळ येऊन पोहचला... आणि त्याचा हात मागे काय आहे हे पाहण्यासाठी झाडावर पडला आणि तिथेच घात झाला... तिला संधी मिळताच ती निमिष च्या शरीरात प्रवेश करती झाली... निमिष काही क्षणातच आडवा झाला... कितीतरी वेळ तो तसाच पडला होता..


काही लोक माघारी जात असताना त्यांना निमिष दिसला... तज धावतच त्याच्या कडे गेले.. त्याला शुध्दीवर आणण्याचा आटोकाट प्रयत्न चालू होता.. पण काही झाले नाही.. तसा एका तरूणीचा स्पर्श त्याला झाला.. एक कळ त्याच्या सर्वांगात उठली आणि तो खाडकन जागा झाला.. ती होती कल्पना.. तिला निमिष विषयी प्रेम भावना होती.. पण ती निमिष चे भक्ष्य होऊ शकत होती... निमिष ला ही ती आवडत होती.. पण त्याच्या आत असणाऱ्या तिला फक्त हा खेळ जाणवत होता... निमिष ला जणू जाणीव झाली.. त्याच्या हातून वाईट कृत्य घडणार आहे याची.. तो तडक तिथून निघून गेला... त्याने स्वतःला खूप रोखले.. पण त्याच्या आत असणारी ती आता मोकाट होती.. तिला भक्ष्य हवे होते.. एवढ्या वर्षातून ती पहिल्यांदा शिकार करणार होती.. तिने मुली पळवण्याचे सत्र सुरू केले.. अचानक गावात भितीने जागा झाली.. तरुण मुली बाहेर जायला घाबरू लागल्या.. अशातच चंद्रग्रहण आले.. त्या वेळेस नेमके कल्पना घराच्या खिडकीत उभी होती.. तिने एक नजर बाहेर टाकली तर तिच्या काळजाचा ठोका चुकला.. एक महाभयानक उपद्रव तिला तिथज दिसले.. तिने प्रसंगावधान दाखवत खिडकी बंद केली.. पण ते श्वापद बाहेरून किंचाळत ओरडत होते..


देवकीबाईंच्या ही गोष्ट लक्षात आली की निमिष सोबत काय होतय.. पण तिने न डगमगता नवनाथ महाराजांची भेट घेतली आणि त्यांना सारे काही सांगितले.. तसे महाराजांनी एक उपाय सांगितले.. की दैवी मुहूर्ताला जन्माला आलेली मुलगी निमिष साठी योग्य असेल.. कारण तिच्यात दैवी अंश असणार.. पण हे सगळे थांबवणे मला शक्य नाही.. हे फक्त काळ थांबवू शकतो.. त्यांचे बोलणे ऐकून देवकीबाई तिथून निघतात... ते मुलीच्या शोधात असतात की त्यांच्या हातात एक कुंडली लागते.. ज्याच्या मुखपृष्ठावर दैवी मुहूर्त असे लिहलेले असते... ते पाहून देवकीबाई भलत्याच खुश होतात आणि कल्पना निमिषचे लग्न लावून देतात...


तिच्या सोबतचा संभोगाचा त्याला त्रास होत असतो.. तो तिच्या पासून दूर राहत असतो.. किती तरी मुलींना त्याने भक्ष्य केलेले असते.. त्यानंतर आनंदी बरोबरही तेच होते..


*************************************************


सार्थक त्या दिवाणखान्यात वेडावाकडा फिरत असतो.. चंद्रग्रहणाला समाप्तीसाठी तासभरही राहिलेला नसतो.. आणि अजून काहीच साध्य झालेले नसते.. प्रेम अगदीच घामाने डबडबलेला असतो..त्याच्या दोन मित्रांच्या आहूतीचा सूड त्याला घ्यायचा असतो.. पण जास्त वेळ मंत्रपठण केल्याने त्याची शक्ति संपुष्टात येऊ लागते.. कनिष्क महाराज आता ताबा घेतात.. चाकूरूपी खंजर प्रेमच्या हातात सोपवतात .. त्याला मंत्रोच्चार करून प्रेमला सांगेन तेव्हा उगारयला सांगतात... वेळेची गती कमी होऊ लागते.. इकडे चंद्रग्रहण संपुष्टात येऊ लागते.. तसा सार्थक अस्वस्थ होऊ लागतो.. त्याच्या मधली ती त्याच्या आत्माला टोचू लागते.. शरीर सोडण्यासाठी अगदी प्रवृत्त करू लागते... कनिष्क महाराज हळूच प्रेम ला बोलतात की, तू तिला भटकव.. आणि संधी मिळताच तिला संपवून टाक... सार्थकचा आत्मा बाहेर येत नाही.... हे पाहून रमा स्वतः बाहेर येऊन त्याची आत्मा खेचत असते.. हा वेळ साधून प्रेम त्या बेसावध आणि कुकर्मी आत्म्यावर त्या चाकूरूपी खंजरला तिच्या आरपार करतो.. त्यानंतर तिचे रूपांतर राखेत होते आणि सार्थक खाली कोसळतो...


सार्थक आणि कल्पना इस्पितळात असतात. दोघेही चांगल्या स्थितीत येत असतात.. तिथे प्रेम, तनुजा आणि माधवी येऊन हालचाल विचारतात.. त्यात सार्थकला माधवी आवडते.. तशी प्रेमची नजर सार्थक वर पडते. आणि त्याला तिच्याशी बोलून लग्न फिक्स करण्याचे तो डोळ्यांनी आश्वासन देतो...


आणि सगळे एकसाथ ओरडतात... कनिष्क महाराज की जय