Swash Aseparyat - 5 in Marathi Fiction Stories by Suraj Kamble books and stories PDF | श्वास असेपर्यंत - भाग ५

Featured Books
Categories
Share

श्वास असेपर्यंत - भाग ५

यंदा च वर्ष म्हणजे मॅट्रिक च वर्ष होतं.अभ्यास कसा करायचा,इतरांशी कसं बोलायचं,नीटनेटकी ठेवण कशी ठेवायची इत्यादी चांगल्या सवयी वसतिगृहात लागल्या होत्या. शहरी मित्र,गावातील मित्र,शाळेतील सरांशी पण चांगलं जमत असायचं. वसतिगृहात सुद्धा मोठ्यांशी,छोट्यांशी मैत्री जमली होती. सर्व काही एकदम व्यवस्थित चाललं होतं.

पावसाळा लागला,या वर्षीच्या अभ्यासाचा तडाका वाढवावा लागेल म्हणून सुरुवातीला अभ्यास जोरदार करायचा,असं मनात ठरवलं होतं.शाळा नियमित सुरू झाली. वसतिगृह सुद्धा नेमकेच सुरू झालेले होते. काही विद्यार्थी अजून वसतिगृहात आलेले नव्हते,तर काही आले होते. काही नवीन विध्यार्थी वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी येत होते, तर काही पालक आपल्या पाल्याला प्रवेश मिळतो का म्हणून चकरा वर चकरा मारत असायचे.

आज ढगाळ वातावरण असल्याने पाऊस येणार हे नक्की झालं होतं. वसतिगृहापासून शाळा चांगली तीन चार किलोमीटर वर असल्याने आणि जाण्यास सायकल नसल्याने आम्हांला पायदळ स्वारी करूनच शाळेत जावं लागतं असायचं. त्यामुळे कित्येक दा पाय दुखायचे, पाऊस असला की कपडे सुद्धा कधी कधी भिजत असायचे,पण नियमितपणे हे असल्याने त्याची जणू सवयच झाली होती. शाळेचा शेवटचा तास सुरू होता. तेच बाहेर पावसाने आपली हजेरी लावली. बाहेर धो - धो पाऊस पडायला सुरुवात झाली. अवघ्या काही क्षणात शाळेचा परिसर जलमय झाला. जिकडे तिकडे आवारात पाणीच पाणी साचले होतें. पाऊस काही केल्या कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती.

आम्ही सर्व शाळा झाल्यावर ताटकळत परिसरात उभे होतो ,पण पाऊस काही केल्या कमी होईना,म्हणून आता एकच करायचं ठरवलं की ,सरळ वसतिगृहाची वाट पकडायची. पुस्तके बरोबर प्लास्टिक मध्ये गुंडाळून ठेवली होती. बाकी कपडे ओले झाले तरी ते रात्रभर सुकून जातील म्हणून मी आणि वसतिगृहात सोबत राहत असलेला जवळचा मित्र " आनंद " सोबत चालु लागलो.

आनंद हा सुद्धा माझ्यासारखाच गावावरून शहरात शिक्षणासाठी आला होता. त्याच्या आणि माझ्या घरची परिस्थिती जवळपास सारखीच होती.त्याला सुद्धा शिकून मोठं व्हायचं होतं, त्याचे स्वप्न सुद्धा मोठे चं होते. कदाचित त्यामुळे आमचं दोघांचं चांगलं पटत असावं. रस्त्याने चालताना कुठे झाड, कुठे इमारत दिसली की थोडं त्याच्या आडोश्याला उभे राहत असू,त्यामूळे कमी भिजू असं वाटायचं पण पाऊस जास्तच असल्याने पूर्ण भिजनार हे ठरलंच होतं. लगेच वसतिगृहात येताच, आमच्या खोलीमध्ये आम्ही प्रवेश केला आणि लगेच अंगावरील सर्व कपडे काढून खोलीतच वाळत टाकून दिले.

पण पाऊस काही केल्या थांबत नव्हताच. मनात असं वाटायचं की , आज आभाळाला भोक पडलं की काय???? जेवण करून आम्ही झोपून गेलो पाऊस आपलं काम करतच होता. उद्या तरी सकाळी पाऊस उघडेल आणि परत शाळेला जायला मिळेल या आशेने आम्ही कधी झोपून गेलो कळलेच नाही. सकाळ झाली तरी पाऊस चांगलाच सुरू होता. आजूबाजूला असणाऱ्या नाल्या पार भरून निघाल्या होत्या. मेंडक्या टराव ~~ टराव करून बोंबलत होत्या. जिकडे तिकडे पाणीच पाणी साचले होते. सततच्या पावसाने हा - हा कार घातला होता. असाच पाऊस सारखा दोन आठवडे गेला नाही. शाळा तर बंदच होती पण जिकडे तिकडे पावसाने रिपरिप करून टाकली होती. होस्टेल च्या भिंती पाजरू लागल्या होत्या . कोरडी जागा तर कुठे दिसतंच नव्हती. आम्ही पार खोली मध्ये राहून वैतागून गेलो होतो. वर कौलारू असल्याने आता त्यातूनही पाणी खोली मध्ये साचत असायचं, त्यामुळे ते पाणीच काढण्यात आमचे दिवस जात होते. होस्टेल चे वार्डन सर वरचेवर भेटी देत असायचे व विचारपूस करत असायचे पण त्यांच्याकडे ही काही इलाज नव्हता. कारण पावसानेच तसा धुमाकूळ घातला होता ..

गावाकडे सुद्धा यांपेक्षा जास्त भयावह परिस्थिती होती. वावरात निघालेली पिके ही या अति प्रमाणात झालेल्या पावसाने वाहून गेली होती तर काही तग धरून उभी होती, तर काही उभ्या उभी सडून गेली होती. दुबार पेरणी ची भीती सर्व कास्तकार लोकांना वाटत होती. काहींचे व्यवसाय सुद्धा मोडकळीस आले होते. या पावसाने अतिप्रमाणात नासधुत केली होती. नदी, नाले, ओढे, तळे, धरण पूर्ण भरून गेले होते . तर काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती तर काही ठिकाणी पूर सुद्धा आले होते. रस्त्याने असणारी वाहतूक रोड च्या रोड वाहून गेल्याने विस्कळीत झाली होती. नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्याने धोका असल्याने काही कुटुंब आपला जीव मुठीत घेऊन जे हाताला लागेल ते साहित्य घेऊन बाहेरगावी जात होते, कुणी आपला जीव वाचविण्यासाठी धडपडत होते , कुणाची गोठ्यात बांधलेली जनावरे वाहून गेली होती, तर कुणाची दावणीला बांधून असल्याने जागच्या जागेवर मेली होती, तर कुणाच्या घरचा व्यक्ती पुरात वाहून गेल्याने त्या कुटुंबाचा आक्रोश तीव्र प्रमाणात होता , तर कुणी सेवाभावी संस्था आपल्या परीने पूरग्रस्तांना मदत पुरवत होती, शासन ही मदत पुरवायची पण तुटपुंजी अशीच असायची, एकाला मदत मिळायची तर दुसरा मात्र मदतीपासून वंचित राहून जायचा. सगळ्यांच्या सुखाच्या क्षणात पावसाने अशी झडप घातली होती की, लोकांना त्यातून सावरता येईना. एवढी अतिशय वाईट परिस्थिती या शैतांनी पावसाने सगळ्यांवर आणून ठेवली होती.

आधुनिक सुविधांचा अभाव, पाहिजे त्या प्रमाणात मदत नाही त्यामुळे सर्व लोकं नाकी नऊ येऊन गेले होते. हा पाऊस एखाद्या शैतांनी भस्मासुरासारखा वाटत होता . ज्याप्रमाणे भस्मासुराने यज्ञ करून शंकराला प्रसन्न केले आणि शंकराकडून वर घेतला की , तो ज्या वस्तूवर हात ठेवेल ती वस्तू जळून भस्म होत असे, बिचाऱ्या भोळ्या शंकराला काय माहिती याचा परिणाम काय होईल????? मग हाच भस्मासुर लोकांवर अत्याचार करत होता, याचा सर्व धाक देव लोकांना पडला. शेवटी उपाय म्हणून मोहिणीने म्हणजे एका स्त्री ने त्या भस्मासुराला आपल्या प्रेमात फसवले आणि त्याला स्वतःच्या कपाळावर हात ठेवण्यास भाग पाडले. बिचाऱ्याने
प्रेमात आंधळा होऊन स्वतःच्या प्रेमातच तो भस्म झाला, आणि परत सगळीकडे शांतता निर्माण झाली. तसाच हा पाऊस सारखा आग ओकत ,सारखा पाणी गाळत असल्याने त्याला आळा घालणे मानवाला तरी शक्य नव्हते.

मानव आणि निसर्ग या दोन शक्तीमध्ये कधी मानव तर कधी निसर्ग हा विजयी ठरला पण निसर्गाच्या रोद्र रूपाकडे पाहून मानव मात्र हतबल होऊन जातं असतो. सर्वांनी जगण्याची आशा सोडूनच दिली होती, कारण पाऊस काही कमी होण्याचं नाव घेत नव्हता. सर्वाना आपल्या डोळ्यासमोर मृत्यू येऊन दिसत होता. अश्याच वातावरणाने जिकडे तिकडे रोगराई निर्माण झाली , सर्व जाळणाची लाकडे ओली असल्याने बायकां स्वयंपाक करतांना नाकी नऊ येत होत्या,जिकडे तिकडे धूर पसरत होता. दिवसागणिक रोगाने थैमान घालणे सुरू केले. नवीन नवीन रोगांची साथ सुरू झाली, कुणाला हगवण तर कुणाला हिवताप तर कुणाला पिलिया, तर कुणाला डेंग्यू तर कुणाला काय??? अशी भयानक रोगराई पसरली होती. आमच्याही वसतिगृहात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. काहींना रोगाने पछाडले होते पण इथे अधिकारी वरचेवर भेटी देत असल्याने त्यांवर लवकर इलाज होत असे. पण या सततच्या पावसाने आम्हांला गावचं वेध लागलं होतं . आमचं मन काही इथे रमत नव्हतं. मला ही घरची आठवण येत होती. बहीण चित्रा,आई बाबा यांची सुद्धा आठवण येत होती. ते कसे असणार,हाच सारखा विचार मनात येत असायचा.

पावसाने आता काही दिवस विश्रांती घेतली होती. एकेदिवशी या पावसामुळे,पसरलेल्या रोगराई मुळे बहीण चित्रा बिमार पडली. तिचा चेहरा पूर्णतः उतरून गेला होता. ज्याप्रमाणे एखादं टवटवीत फुल सुरुवातीची सूर्याची उन्ह लागताचं कळी फुलायला लागतं, आणि मग भर दुपारच्या उन्हेमुळें तेच फुलात रूपांतरित झालेली कळी कोमेजून जाते त्याचप्रमाणे चित्राची अवस्था झाली होती. रात्री चित्राला हाताला चटका लागेल असा ताप आला. तापामुळे ती फनफन करू लागली . सोबतचं या रोगट वातावरणामुळे थंडी वाजायला लागली. आता आई बाबा चिंतातुर झाले. घरातील होतं नव्हतं ते चित्राच्या अंगावर टाकलं तरी तिची थंडी काही केल्या कमी होत नव्हती. चित्राचा ताप सारखा वाढत होता ,वरून राक्षसी पाऊस सारखा बरसून पडतच असे. गावात डॉक्टर नाही, आणि रात्र असल्याने कुणी नेऊन देणारं मिळणार नाही आणि डॉक्टर कडे न्यायचं तर डॉक्टर बाहेरगावी राहत असे आणि त्याच्याकडे न्यायचं म्हटलं तर आमच्याकडे साधन नव्हतं.

रात्रभर ती अशीच फणफण करत राहिली. दुसऱ्याच दिवशी सकाळी भल्या पहाटे मालकाची बैलगाडी घेतली आणि चित्राला डॉक्टर कडे घेऊन गेले. डॉक्टरांनी चित्राला इंजेक्शन दिलं आणि घरी येऊन आराम करावयास सांगितले. बाबा चित्राला घेऊन घरी आले. आल्या आल्या चित्रा झोपून गेली. आता कुठे आई - बाबांचा जीव जागेवर आला होता.
" सर्व बरं होऊ दे !!!" म्हणत आईने भगवंतापुढे हात जोडले. दोन - तीन दिवस चित्राला बरं वाटलं पण चित्राला त्या औषधांचा काही पाहिजे तितका फायदा झालेला दिसत नव्हता. सारख तिचं शरीर तापाने गरम असायचं औषध घेतले की तेवढ्या पुरताच आराम तिला वाटत असायचं, परत थंडी आणि ताप येत असायचा. तिची अवस्था आई - बाबांना पहावल्या जात नव्हती. एवढ्या तापात ती फक्त तिच्या दादाला आवाज देत असायची.

आईकडून आणि बाबांकडून तिची ही अवस्था काही केल्या पाहवल्या जात नसायची..एक दोन अजून दवाखाने केले तरी काही आराम पडत नव्हता. कदाचित अमर ला बघून चित्राला आराम पडेल म्हणून गावातील माझा मित्र म्हणजे थोडा मोठाच होता माझ्यापेक्षा बबन्या ला आईने निरोप द्यावयास पाठवले. पाऊस तर त्या दिवशी तसा काही नव्हता,अधून मधून पावसाच्या सरी बरसून निघून जात होत्या. गावावरून बबन्या निघाला तो शाळेची मधली घंटा झाली तेव्हा तो माझ्या शाळेत पोहोचला.
बबन्या येता येताच म्हणाला,

" मी प्रथम तुझ्या हॉस्टेल कडे गेलो, मला वाटलं की पाऊस सुरू असल्याने शाळा बंद असेल मग तिथल्याचं एका मुलाने तू शाळेत गेला आहे असं मला सांगितले.."
म्हणून मग सरळ विचारत विचारत इकडे आलो.

बबन नेहमी कुणाच्या ना कुणाच्या कामाला असायचा ,व नेहमी तालुक्याच्या ठिकाणी कुणाचा माल घेऊन येणे, कुणाबरोबर सोबत येणे हे नित्याचेच होतें.त्याबदल्यात तो काही एक पैसे तर कधी काही मागत असे, व गावकरी आपला वेळ किंव्हा त्रास वाचत असल्याने ते बबन ला मदत सुद्धा करत असायचे. बबन ने येताच माझ्या जवळ जे सांगितले ते ऐकून माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले...

क्रमशः......