Swash Aseparyat - 4 in Marathi Fiction Stories by Suraj Kamble books and stories PDF | श्वास असेपर्यंत - भाग ४

Featured Books
  • इश्क दा मारा - 21

    अपनी मॉम की बाते सुन कर गीतिका बोलती है, "मॉम इतना कुछ होने...

  • मोमल : डायरी की गहराई - 31

    पिछले भाग में हम ने देखा कि अब्राहम और मोमल ने फीलिक्स के लि...

  • Venom Mafiya - 4

    अब आगे सिया कैंटीन में बैठी अपनी किताबों में खोई हुई थी। अचा...

  • बैरी पिया.... - 50

    मुंबई शहर : संयम का प्राइवेट जेट लैंड हुआ तो संयम और शिविका...

  • नक़ल या अक्ल - 77

    77 प्लान   अब वे लोग बाहर आने लगे तो नन्हें और नंदन जल्दी से...

Categories
Share

श्वास असेपर्यंत - भाग ४

सर्वांना ते नाटक आवडलं. विशेषतः माझा अभिनय सर्वांना आवडला होता. त्या नाटकाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा मिळालं होतं. काहींनी त्याला पैसे स्वरुपात बक्षिसे दिली होती.सरांनी सुद्धा आमच्या अभिनयाला दाद दिली होती. पण मला काही बर वाटत नव्हतं. सारखा मार खाल्ल्याने तो ही आज खरा वाला त्यामुळे पोटात दुखायला लागलं होतं. पण अभिनयाला मिळालेल्या शाबासकी मुळे त्या वेदना कुठेतरी लपून बसल्या होत्या. मला गावातील सरपंचाकडून एक वैयक्तिक बक्षीस मिळालं होतं. बक्षीस देतांना जामुनकर सरपंच म्हणाले होते की,
अमर बेटा ,
" तू खूप छान अभिनय केला. त्या नाटकाची संकल्पना पाहून माझ्या डोळ्यांत अक्षरशः अश्रू आले. तू एक चांगला कलाकार आहे. आपल्या गावाचं नाव उंचीवर नेण्याचा प्रयत्न कर."

पुन्हा एक आशावाद या व्यक्तीने माझ्यावर दाखवला होता. त्यांचे शब्द एक प्रकारे मनावर कोरले गेले होते. एकदाचा तो दिवस संपला. सर्व दिवस मी आनंदात होतो.आई - बाबा , चित्रा पण खुश होती. कारण बाया माणसे माझीचं चर्चा करत होती, म्हणून आई बाबांना पण बरं वाटल होतं . मी घरी आलो पण सातत्याने एक विचार मनात घोळत होता, की यांनी मला जो नाटकात खोटा मार असायचा पण तो स्टेज वर आल्यानंतर यांनी खरा मार दिला आणि मग मला तो अभिनय खरा वाटावा म्हणून सहन करावा लागला. यांनी सरांचा राग माझ्यावर काढला असावा. सर नेहमी यांना माझ्यामुळे यांच्यावर चिडत असायचे त्यामुळे कदाचित. सर तर नक्की त्यांना सांगू शकणार नव्हते की अमर ला खरा मार द्यावा. त्यांचा तर उद्देश असा होता की , लोकांनी बोध घ्यावा, मग सर नक्कीच सांगू शकत नव्हते.विचारा विचारांमध्ये सायंकाळ झाली.

आई - बाबा आपल्या कामावरून घरी आले . सर्वांनी हात - पाय धुतले. चित्रा खेळून घरी आली होती. मी मात्र घरीच बसलो होतो. आई येताचं दोन्हीं बकऱ्यांनी आणि आता त्यांच्यापासून झालेल्या पिलांनी में ~ ~ में करण्यास सुरुवात केली. आईने आणलेला चारा बकऱ्यांना टाकला , त्या खाऊ लागल्या. एक झिंगरी चं पिल्लू तिला काही चारा खाऊ देत नव्हतं,. तिला त्रास द्यायचं, तिच्या अंगावर खेळायचं,दूध प्यायचं, पण तरीही ती झिंगरी बकरी आपल्या पिलांना जवळ घेत असायची, शेवटी ती आईच न... आईचं प्रेम तसंही कधीही न संपणार असते. मग ती आपली आई असो वा मग जनावरांची. आईच प्रेम हे अफाटचं असतं..बर असो, या विषयांवर पुढे कधी बोलता येईल.

मी मात्र एका खाटेवर बसलो होतो. मला मात्र काही चांगलं वाटत नव्हतं. आईने चाय सर्वांना दिला मी ही घेतला बरं वाटेल कदाचित या उद्देशाने..बाबांनी दुसरी एक खाट बाहेर आणली आणि आपलं सडपातळ, लांबलचक व कामाने काळकुट्ट झालेलं शरीर सैल खाटेवर सोडून दिलं. ते आराम करू लागले. आई स्वयंपाक बनवू लागली. चित्रा तिच्या खेळण्यात गुंग झाली.मी ही तसाचं खाटेवर पडलो आणि एकटाच बाहेरचं , आकाशातील विश्व पाहू लागलो. चांदण्या लुकलुकत होत्या.एखादी तारा तुटत होता. कदाचित तो दूर असलेल्या आपल्या भावंडाना भेटावयास जात असावा,असं वाटत असायचं. पोटात अजून दुखणं सुरू होतं, पण आईला सांगू शकत नव्हतो. सांगणार तरी काय???की मला नाटक करताना त्या दोघांनी खरोखर लाथा बुक्यांचा मार दिला. त्यांनी एक प्रकारचा माझ्यावर राग काढला आणि अभिनय उठून दिसावा म्हणून मी तो निमूटपणे सहन करून घेतला. हे कारण मी आईला सांगू शकत नव्हतो. होईल उद्यापर्यंत बरे म्हणून मी कुणाला सांगितलं नाही. आईने सर्वांना जेवण वाढली. सर्वांची जेवण आटोपली पण आईची कामे अजून सुरूच होती, बाबा मात्र जेवण झाल्याबरोबर झोपी गेले आणि घोरायला लागले. त्यांच्या घोरण्याने आणि पोटात वेदनेने मला काही केल्या झोप येत नव्हती.

इतक्यात थोडा डोळा लागताचं माझ्या पोटात आता अधिक दुखू लागलं. त्याचा त्रास आता मी काही सहन करू शकत नव्हतो, शेवटी मी आई ~~ आई म्हणून ओरडू लागलो, तरफडू लागलो. आई बाबा खडबडून जागे झाले . " काय झालं अमर !!!!"
म्हणून विचारू लागले. आईचा तर जीव च पूर्ण घाबरून गेला होता. बाबा विचारत होते काय झालं अमर म्हणून, मी त्या वेदनेने बोलण्याचं भान विसरून गेलो होतो, कसातरी पोट खूप दुखत आहे बाबा एवढंच बोललो. त्यांना वाटलं की जेवणात काही बिघाड झाला असेल म्हणून पोट खराब झालं असेल. हागायला नेलं की साफ होईल बरं होईल म्हणून बाबांनी मला तेवढ्या रात्री चारही बाजूला अंधार होता, रस्त्यावर कुत्रे भुंकत होते, मोकाट गायी फिरत होत्या, डुकरे ही अन्न शोधत कचरा उकरत होती, शेवटी माझं काम एकदाचं आटपलं. पण पोटाची कळ काही कमी होत नव्हती, शेवटी घरी आलो आता थोडं हलकं वाटू लागलं पण दुखणं जसं होत तसंच होतं. पोटात एखादा कुत्रा जसा एखाद्याचा लचका तोडतो तसंच पोट करत होतो,पण तरीही मी घरी सांगितलं नाही की आजच्या नाटकातील मारांमुळे हा प्रकार घडत होता.आईने मिठाचं पाणी पाजलं वरून आईबाबांची झोप उडाली होती. मग मीच थोड्या वेळाने जागेवर झोपून गेलो , शेवटी ती रात्र संपली.

आईने सकाळी उठल्यावर गावातील एका बुवाकडे नेलं. आई साधी असल्याने आणि हा बुवा लोकांना बरं करतो असं ऐकल्याने आईने त्याच्याजवळ नेलं. बुवाच नाव जनार्धन होत...केस पूर्ण पिकलेले, गळ्यात एक ताईत, अंगावर बांडी, खाली धोतर आणि हातात चिलीम फुकत बुवा येणाऱ्या व्यक्तींना काहीतरी हवेत पुटपुटत अंगारा, कुणाला पाणी पियाला देत होता. सर्व बुवांच्या पाया पडून माघारी जात होते.मी आणि आई सुद्धा तिथे गेलो. जाताच आई बुवांच्या पाया पडली.आईने माझं पोट रात्रीपासून खूप दुखत आहे असं सांगितलं. बुवांनी एका गिलासात पाणी घेतलं त्यात काहीतरी मंत्र पुटपुटला आणि मला पिण्यास सांगितले. इच्छा तर बिलकुल झाली नाही. तो सर्व किळसवाणा प्रकार वाटला पण बुवांच्या दरबारी असल्याने नाईलाजाने ते पाणी प्यावं लागलं. सोबत त्यांनी अंगारा दिला होता. काही माझ्या पोटावर लावून दिला आणि काही घरी जाऊन खाण्यास सांगितला.आई पाया पडून आम्ही तिथून निघून आलो.दोन - तीन दिवस त्या अंगाऱ्याच्या पुड्या पाण्यात टाकून ते पाणी पिऊ लागलो. कदाचित आराम होईल या अपेक्षेने. पण ते पोटाचं दुखणं दिवसागणिक वाढत गेलं.

सुभद्रा आक्का ने आईला सांगितलं की , " अवं ये सावीतरे , पोराचा जीव घेशीन का माय?? किती दिवस झालं त्याचं पोटाचं दुखणं आहे. लहानसं लेकरू कितीक सहन करणं , आणि त्या जनार्धन च्या मागे लागली त्याने फुकपाणी करून लोकायले बर केलं असतं त मग या डाक्टर लोकांची गरज कायले असती????? जाय बाई तू तुया लेकराला शहरातल्या दवाखान्यात तिथंच आराम होईन त्याले..."

तेव्हा कुठं आई खडबडून जागी झाली आणि माझं टिटमेंट करायसाठी मला सरकारी दवाखान्यात घेऊन आली. तिथे डॉक्टरांनी एक भलं मोठं इंजेक्शन कमरेला दिला आणि काही गोळ्या खाण्यास दिल्या त्या गोळ्या घेऊन मी परत गावी आलो. एक - दोन दिवस आराम केला आणि मग ते पोटाचं दुखणं कायमचं निघून गेल. इकडे शाळेचे आठ दिवस बुडाले होते आता मात्र नियमित शाळेत जाऊ लागलो. आईने सुद्धा मी बरा झालो म्हणून सुटकेचा श्वास घेतला होता. एक दिवस शाळेतील मैत्रीण सीता ती सावकाराची मुलगी होती आणि माझ्याशी बऱ्यापैकी मैत्री होती. ती जवळ आली आणि तिने सांगितलं की ,

" तुला जो नाटकात मार बसला तो खरा होता हे मला माहिती आहे. ते माझ्या भावाने आणि त्या दुसऱ्या मुलाने मुद्दाम केलं होतं. कारण सर तुला नेहमी चांगले म्हणायचे आणि त्यांना बोलणं बसत असायचं, म्हणून त्यांनी हा घाणेरडा खेळ तुझ्यासोबत खेळला होता. त्यांच्या चुकीसाठी मी तुझी माफी मागते!!!."

अगं सीता , " तू विनाकारण माफी मागत आहेस!!!! यात तुझी चुकी काहीच नाही, आणि त्यांची पण नाही. माझ्यामुळे त्यांना सरांचे बोलणे ऐकावे लागत असायचे त्यामुळे त्यांनी हा बदला घेतला असावा. एका अर्थाने त्यांचं ही बरोबर आहे कदाचित मी चुकलो असणार किंव्हा मी त्या नाटकात भाग घ्यायला नको होता. बरं असो मला काही त्यांना म्हणायचं नाही आणि मी ते कधीच मनातून काढून टाकलं आहे आणि तू ही विसरून जा.."
यानंतर मात्र त्यांच मुलांशी समोर चांगली मैत्री झाली हे विशेष.

आता गावाकडील शाळा संपली होती. म्हणजे सातवी पर्यंत गावांमध्ये शाळा असल्यांने यानंतर च्या शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं असायचं. ज्यांची परिस्थिती चांगली असायची ते समोर आपल्या मुलांना शिकवत असायचे नाही तर अर्धवट शिक्षण सोडून काही काम धंदा करून आपलं आयुष्य काढत असायचे. कुणी काही एक कंपनीमध्ये कामाला जायचे. पण माझ्या वडिलांनी पुढील शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी शाळेत नाव घातलं. इथे शहरात मात्र वातावरण वेगळंच होतं. जिकडे - तिकडे लोकांची रेलचेल असायची. रस्त्याने वाहनांची काही प्रमाणात गर्दी होत असायची. माझा राहण्याचा प्रश्न होता, पण बाबाला कुणीतरी सांगितलं की अनुसूचित जातीच्या मुलांसाठी इथे राहण्यासाठी वसतिगृह असतात तिथे जाऊन मला वसतिगृहात राहण्यास प्रवेश मिळाला. मी ज्या वसतिगृहात राहायचो तिथल्या आजूबाजूला शाशकीय इमारती होत्या. लोकांची नेहमी वर्दळ असायची, पण वातावरण अगदी शांत शांत असायचं.

आजूबाजूला काही दोन - एक मोठाल्या इमारती होत्या . बहुतेक त्या घरचा व्यक्ती चांगल्या पगारावर असावा, असं नेहमी वाटत असायचं. आपण ही एवढं मोठं घर बांधायचं हे स्वप्न तेव्हाच रंगून जात असे. इथली शाळा सुद्धा शाळेचा आवार मोठा होता. कडक शिक्षक असल्याने त्यांनी दिलेला गृहपाठ करून जावचं लागत असे , नाही तर सरांच्या हाताचा मार खायचा हे नक्की ठरलं असायचं. ज्या दिवशी सर सुट्टीवर असायचे तेव्हा मात्र आम्हाला एक दिवस जास्त गृहपाठ करण्यासाठी मिळत असे, तेव्हा मात्र आमचा मार वाचत असायचा. दिवसागणिक दिवस जात होते. सुट्टी असल्या की मग मी आपल्या गावी जाऊन लगेच येत असायचो.

एके दिवशी वसतिगृहा शेजारील असणाऱ्या इमारती मध्ये एक वेगळीच शांतता पसरली होती.काही तरी कमी आवाजात कुजबुज सुरू होती, पण नेमकं काय झालं हे काही समजत नव्हतं. लोकं यायचे आणि चालले जायचे, काही आपआपल्या गाड्यांनी येत होते पण मला काही अजून अर्थ समजला नव्हता की काय झालं असावं या घरी?????आता लोकही जमले होते पण शांतता अजूनही होती, पण येताना बाया आपल्या डोक्यावर पदर घेऊन आणि डोळ्याला पुसत येत होत्या. तेव्हा काही वेळाने समजलं की, या घरचा म्हातारा व्यक्ती मरण पावला. हा प्रसंग मी पहिल्यांदाच पाहत होतो गावाकडे मयत झाली की जास्त आरडाओरडा असायचा, कुण्या एक लोकांना दुःख कमी आणि त्या व्यक्तीला जाळण्यात जास्त घाई असायची, तर कुणी मात्र दारू पिऊन तल्लीन असायचे, तर कुणी एक जोर जोराने रडत असायचे, लगेच एक वाजंत्री टीम सुद्धा न बोलवता हजर होत असायची. पण इथे मात्र मरणाच्या घरी सुद्धा शांतता पसरली होती. किती वेगळं होतं न यांचं जीवन!!!!पण तो प्रसंग कायमचा लक्ष्यात राहिला. आणि इतरांनी सुद्धा तसं आत्मसात करायला हवं.

" जीवन आहे तिथे मृत्यू !!!" हे अटळ सत्य आहे आणि पानं जीर्ण झालं की ते गळून पडतं तसं मानवी जीवनाचं आहे म्हणजे वय झालं की मरण येणार एवढं मात्र खरं असतं.

क्रमशः .....