Village Village Hope - Part 3 in Marathi Fiction Stories by Chandrakant Pawar books and stories PDF | गावा गावाची आशा - भाग 3

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

गावा गावाची आशा - भाग 3

प्राथमिक आरोग्य केंद्रातून पूजाआशा सेविकेला फोन आला होता. डॉक्टर कैलाश यांनी तिला दवाखान्यातून मेडिसिन घेऊन जायला सांगितले होते. म्हणून ती औषध घ्यायला दवाखान्यात गेली. दवाखान्यात कैलास डॉक्टरांना भेटल्यावर डॉक्टरांनी तिला औषध निर्माता यांना भेटायला सांगितले. ती त्याप्रमाणे औषध
निर्माता रवींद्रना भेटली.
रवींद्र सरांनी तिला काही औषधे दिली.तेव्हा दवाखान्याची ' एल एच वी 'जयंती मॅडम जवळ आल्या आणि म्हणाल्या. पूजा छान काम करतेस तू .
तुला यावर्षीचा उत्तम कामाचा आदर्श आशा पुरस्कार मिळायला हवा. जयंती मॅडमने असे म्हणल्यामुळे पूजाला खूपच हूरूप आला होता.
प्राथमिक आरोग्य केंद्रांतील शिपायाने सुद्धा तीची चौकशी केली. ती सर्वांशी मिळून मिसळून वागत होती.

काही काही आशांच्या स्वतंत्र स्टाईल असतात. मात्र पूजाची अशी कोणतीही स्टाईल किंवा शैली नव्हती. ती अत्यंत साधेपणाने काम करीत होती. कार्य हीच सेवा अशा विचाराने आशा वर्करची ती नोकरी करत होती.
अचानक दवाखान्याचा ॲम्बुलन्स ड्रायव्हर कार्तिकने तिच्या डोक्यावर टपली मारली. तिने वळून त्याच्याकडे पाहिले. तो म्हणाला.
पूजा मॅडम बरे आहे ना सगळं .काय चाललंय सध्या..

चाललेय तुमच्या आशीर्वादाने सगळं चांगलं चाललंय माझं .ती म्हणाली.

दवाखान्यामध्ये ती आली त्याला खूपच वेळ झाला होता .आता दुपार व्हायला आली होती. दवाखान्यात लंच टाईम झाला होता. त्यामुळे तिच्या जवळच बसलेल्या दवाखान्यातल्या रक्त नमुने तपासणाऱ्या टेक्निशियन विभावरी मॅडमनी तिला जेवतेस कां म्हणून विचारले.
नको मी माझा डबा आणलेला आहे .ती म्हणाली.
अग मग जेवून घे ना. ये ये सोबत माझ्याबरोबर जेवायला ... माझ्यासोबत जेव. मी चवळीची भाजी आणलेय. तुला आवडते ना. चवळीची भाजी अग.ये लाजतेस कशाला.

नाही मी नंतर जेवते. तुम्ही जेवून घ्या मॅडम. ती म्हणाली.


तिथल्या समुदाय आरोग्य अधिकारी (सी एच ओ)साजिरी मॅडम सुद्धा खूप चांगल्या होत्या. त्या पूजा आशाशी मन मोकळेपणाने वागत. उपकेंद्रांमध्ये अधूनमधून त्या येत होत्या. त्या पूजाला कधीकधी स्वतःहून काही खायला वस्तू आणायच्या.

प्राथमिक आरोग्य केंद्रातली मावशी माऊताई पण स्वभावाने खूप चांगल्या होत्या. पीएचसीचा कर्मचारीवृंद खूपच चांगला होता. त्यामुळे पूजाला काम करायला मजा येत होती. आनंद होत होता. (पीएचसी) प्राथमिक आरोग्य केंद्रात वातावरण खूपच चांगलं होतं.


कधीकधी जिल्ह्यातून किंवा राज्य शासनाकडून अथवा केंद्र शासनाकडून आरोग्य केंद्राच्या कक्षेतील आशांच्या गावांना भेटी (उपकेंद्र) देण्यासाठी एखादी टीम येत असे . त्यावेळी पुजाच्या कार्यक्षेत्रात त्यांना आणले जाई. गाव भेटीचे पूजाचं काम उत्तम व‌ समाधानकारक आहे. असा शेरा त्या टीम कडून त्यांना मिळत असे. त्यामुळे व त्यावरून एकप्रकारे पीएचसी मधील इतर आशांच्या कामाचे मूल्यमापन केले जात होते.

आशा सेविका गावांमध्ये आरोग्यविषयक प्रबोधन करतात. त्यांच्या बीएफ म्हणजे गटप्रवर्तक त्यांच्या कामाचा आढावा घेतात... आशा वर्कर शासनास बहात्तर सेवा देतात. साथ नियंत्रण कार्यक्रमात सहभाग.घेतात. करोना काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करतात. पण त्यांचे वेतन चार हजार रुपये आहे. ते खूपच तुटपुंजे आहे असे सर्व आशांना वाटते.
आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांच्याशी तीचा थेट संबंध येत होता. ती दोघं तिला मदतीला घेत असत. पूजा सुद्धा त्यांना त्यांच्या कामात मदत करत असे. अंगणवाडी सेविका सुद्धा तिच्या मदतीवर अवलंबून होती. पूजाला अंगणवाडी सेविकेला सुद्धा मदत करावी लागत असे. या सर्व लोकांना मदत करायला पूजाला खूप आवडत असे. पूजा आशाच्या कामाने सर्व जण समाधानी होते. स्वतः पुजाही त्यामध्ये समाधानी होती. या कामाचा तिच्यावर ताण पडत होता .परंतु तिला त्याचे काहीच वाटत नव्हते.

आशा वर्करच्या श्रमाचे सोने तेव्हा होते. जेव्हा लोकं त्यांना सन्मान देतात. नाही तर अनेक वेळा त्यांना वाईट वागणूक मिळते. त्यांच्या गावातील लोकच त्यांना अपमानित करतात. पूजा आशाला सुद्धा अनेक वेळा तसा अनुभव आला होता. मात्र ती त्यांच्या तोंडाला लागत नसे. आपलं काम बरं आणि आपण बरं. असा तिचा खाक्या होता. त्यामुळे अनेक वेळा संघर्ष टळत असे. आणि तिचे काम होत असे. काही वेळा अटीतटीतचे प्रसंग येत होते. परंतु ते प्रसंग ती खुबीने सोडवत असे.

आशा स्वयंसेविकाचा पगार नुकताच वाढला होता. त्यांना दीड हजार रुपयांची पगारवाढ मिळाली होती. त्यांनी केलेल्या संपाचे चीज झाले होते.तीचे उपकेंद्र तिच्या घरापासून फार लांब नव्हते.अगदी जवळच होते. तीला उपकेंद्रात जायची फारशी गरज नव्हती.तीची सेवा ती घर बसल्या देऊ शकत होती.तीची सेवा गावातील सर्व लोकसंख्येशी संबंधित होती.खास करून महिलांशी व लहान बालकांशी संबंधीत होती. तिचे काम म्हणजे सर्वेक्षण व तत्सम कामे करणे. अशा प्रकारचे होते.