(सिलू एक शांत, संस्कारी आणि सुस्वभावी मुलगा होता. कोणतीही मुलगी सहज त्याच्या प्रेमात पडेल असा होता तो. मग रोजेला हिला तर सिलूचा एक महिन्याचा सहवास मिळाला होता. तर मग ती सिलूच्या प्रेमात नाही पडणार असे कसे बारे नाही होणार!! आता पुढे..)
सिलू दिवसरात्र त्या प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या मागे होता. त्याला खाण्यापिण्याचीही शुद्ध नव्हती. रोजेला कामाबरोबर सिलूच्या खाण्यापिण्याकडेही लक्ष देत होती. तिला माहीत होते की, सिलूचे मुग्धावर खूप जास्त प्रेम आहे आणि आता एक आठवड्यानंतर सिलूला पुन्हा कधी भेटता येईल ह्याची तिला शाश्वती नव्हती. पण रोजेला मनातल्या मनात सिलूवर प्रेम करायला लागली होती. तिला सिलूचा सहवास हवाहवासा वाटत होता. रोजेला इतकी सुंदर होती की, दूसरा कोणी तरुण असता तर तो आतापर्यंत रोजेलाच्या बाहुपाशात असता. पण सिलू असा नव्हता तो रोजेलाकडे एक चांगली मैत्रीण म्हणूनच पहात होता.
आज सिलूने लाइट ब्ल्यू कलरचे शर्ट घातले होते. तो आज रोजच्यापेक्षाही हॅंडसम दिसत होता. रोजेला ला क्षणभर त्याला बघण्याचा मोह आवरला नाही. तिला असे वाटले की, सिलूला घट्ट मिठी मारावी आणि त्याच्यावर सर्वस्व वाहून टाकावे. पण तिने स्वत:च्या भावनांवर ताबा ठेवला. आज तिचे कामात लक्षच नव्हते. सिलू जे बोलत होता ती फक्त हा ना इतकेच बोलत होती.
काहीवेळानंतर सिलूच्याही हे डोक्यात आले त्याने रोजेला ला विचारले, “रोजेला आज तुझे कामात अजिबात लक्ष नाही आहे. तू ठीक आहेस ना? तुला बरे वाटत नसेल तर आपण उद्या कंटिन्यू करूयात का काम?”
पण रोजेलाचे आज लक्षच नव्हते म्हणून सिलूने तिच्या खांद्याला धरून तिला हलविले. तर रोजेलाने कसलाही विचार न करता सिलूला मिठी मारली. सिलूसाठी हे अनपेक्षित होते. त्याने तिला लागलीच बाजूला केले. पण रोजेला ला आता तिच्या भावनांवर ताबा मिळविणे कठीण जात होते. तिने पुन्हा सिलूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला.
तिने सिलूवर किस्सचा जणू वर्षाव सुरू केला. सिलूने तिला दूर ढकलले आणि तो रूममधून निघून गेला. सिलूला रोजेलाच्या अशा विचित्र वागण्याचा खूप राग आला होता. त्याला तिचा चेहरा सुद्धा बघू नये असे वाटत होते. पण कामापुढे त्याचा नाईलाज होता. तो आज दिवसभर हॉटेलवर आलाच नाही. रात्री खूप उशिरा तो त्याच्या रूमवर गेला तर रोजेला त्याची वाट बघत तिथेच थांबली होती. तिने केलेल्या कृत्याबद्दल तिला शरम वाटत होती.
तिने सिलूशी बोलण्याचा प्रयत्न केला पण सिलूने तिला तिच्या रूममध्ये जायला सांगितले. मग ती तिच्या रूममध्ये निघून गेली.
सकाळी उठल्यावर ती पुन्हा सिलूच्या रूमवर आली. पण सिलूने कामाशिवाय दुसरे कोणतेही संभाषण तिच्याशी केले नाही. तिला सिलूशी खूप काही बोलायचे होते. पण सिलू कामाव्यतिरिक्त तिच्याशी काहीही बोलण्यास तयार नव्हता. काम संपेपर्यंत संध्याकाळ झाली. सिलूने सगळे पेपर्स एकत्र केले आणि मग स्कॅन करून मेल केले त्यानंतर तो जेवायला हॉटेलच्या रेस्टोरंटमध्ये निघून गेला. त्याने रोजेला ला विचारले सुद्धा नाही. रोजेला रडतच तिच्या रूममध्ये निघून गेली.
सिलू त्याच्या रूमवर खूप उशिराने पोहोचला. तो फ्रेश होऊन झोपायला जाणार एवढ्यात कोणीतरी त्याच्या रूमचा दरवाजा ठोठावला. त्याने दार उघडले तर समोर रोजेला होती. तिला सिलूशी बोलायचे होते. पण सिलूने तिला रूमच्या आत घेण्यास नकार दिला.
रोजेलाने सिलूची माफी मागितली आणि दरवाजातच उभे राहुन ती सिलूला म्हणाली, “सिलू मला माफ कर. तुझ्या इतक्या दिवसाच्या सहवासात मी कधी तुझ्या प्रेमात पडले हे माझे मलाच कळले नाही. त्यादिवशी तू इतका हॅंडसम दिसत होतास की, मी स्वत:ला तुझ्याजवळ येण्यापासून रोखू शकली नाही. मला माहीत आहे तुझे प्रेम मुग्धावर आहे. पण तरीही आज मला माझ्या मनातल्या भावना तुझ्याशी शेअर करायच्या होत्या म्हणून मी इथे इतक्या रात्री आले आहे. असो, मी सगळे महत्वाचे पेपर्स तुला मेल केले आहेत ते तू तपासून घे. माझ्याकडून सगळे काम पूर्ण झाले आहे. मी आताच रूममधून चेकआऊट करीत आहे. तुझ्या आणि मुग्धाच्या भावी आयुष्यासाठी तुम्हा दोघांना माझ्याकडून शुभेच्छा.” असे म्हणून रोजेला निघून गेली.
सिलूला खूप वाईट वाटले. पण तो काहीही करू शकत नव्हता कारण सिलू तर फक्त मुग्धाचा होता ना.
इथे मुग्धा पहिल्यांदा विमान प्रवास करून परदेशात जाणार होती. ती खूपच आंनदीत होती. घरच्यांचा निरोप घेऊन ती विमानाच्या दिशेने निघाली. तिने जॉर्ज आणि मीराला देखील तिच्या फ्लाइट डिटेल्स पाठविल्या होत्या. ती दोघे तिला रिसीव करायला एयरपोर्टवर येणार होती. मग सिलू आल्यावर त्याला खूप मोठे सुरप्राइज मिळणार होते.
सिलूचे काम आज पूर्ण झाले त्याची अमेरिकेची फ्लाइट उद्या होती. त्यामुळे त्याने आज रूमवर आराम करण्याचे ठरविले. त्याला थोडा एकांत हवा होता. म्हणून त्याने फोन सुद्धा स्विच ऑफ केला आणि तो झोपी गेला.
थोड्यावेळाने उठल्यावर पाय मोकळे करण्यासाठी तो हॉटेलच्या लॉबीमध्ये आला. तिथे त्याने रीसेप्शनवर थोडी माहिती विचारून तो एका गिफ्ट शॉपमध्ये गेला आणि त्याने जर्मनीची आठवण म्हणून काही वस्तू खरेदी केल्या.
आज सिलू एयरपोर्टच्या लॉबीमध्ये त्याच्या फ्लाइटच्या घोषणेची वाट पाहत बसला होता. त्याने मुग्धाला मेसेज केला की तो घरी गेल्यावर तिच्याशी बोलेल. सिलू फ्लाइट मध्ये चढला. त्याच्या मनात २ दिवसात घडलेल्या घटनांचे विचारचक्र सुरू होते. इतक्या दिवसांची चांगली मैत्री रोजेलाच्या एका चुकीच्या कृत्याने संपली होती. याचे सिलूला फार वाईट वाटत होते. त्याने रोजेलाचा विचार मनातून कायमचा काढण्याचा निर्णय घेतला.
काही तासानंतर सिलू सुखरूप अमेरिकेला पोहोचला. त्याने त्याच्या रूमचा दरवाजा उघडला आणि लाइट लावली आणि समोर पाहतो तर मुग्धा उभी होती.
मुग्धा सिलूला पाहून जोरात ओरडली “सरप्राइज”
सिलूला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मुग्धाला बघितल्यावर त्याचे डोळे आनंदाने भरून आले. मुग्धाची ही परिस्थिती काही वेगळी नव्हती.
त्याने मुग्धाला घट्ट मिठी मारली आणि अगदी लहान मुलासारखे तो रडू लागला. मुग्धाने त्याला सांभाळून घेतले. सिलू शांत झाल्यावर मुग्धाने त्याला पाणी दिले आणि ती त्याच्या समोर बसली. सिलूला अजूनही विश्वास होत नव्हता की, मुग्धा त्याच्या इतकी जवळ आहे. तो तिला एकटक निरखून पाहत होता. त्याला क्षणभर वाटले हे स्वप्न तर नाही ना.
पण नाही हे स्वप्न नव्हते. मुग्धा खरच त्याच्या समोर बसली होती. त्याला तिच्याशी कसे आणि काय बोलावे हेच सुचत नव्हते. त्याने मुग्धाचा हात हातात घेतला. इतक्या दिवसात खूप काही अनपेक्षित घडले होते. पण ते सगळे नकारात्मक होते. फक्त एक गोष्ट सोडून ते म्हणजे मुग्धाचे इथे येणे.
ते पण अश्यावेळी जेव्हा त्याला तिची सगळ्यात जास्त गरज होती. मुग्धाने सिलूला त्याच्या जर्मनी ट्रीपबद्दल विचारले आणि अर्थात रोजेलाबद्दल सुद्धा.
पण सिलूला आता ते सर्व आठवून स्वत:चा मूड खराब करायचा नव्हता. त्याने मुग्धाच्या मांडीवर स्वत:चे डोके ठेवले. मुग्धा त्याच्या केसांवरून हात फिरवत होती. सिलूला क्षणभर वाटले की, हा क्षण इथेच थांबावा. ती दोघे एकमेकांत गुंतली असताना अचानक दारावरची बेल वाजली व ती दोघं भानावर आली.
सिलूने दरवाजा उघडला तर समोर जॉर्ज आणि मीरा होते. त्यांच्या हातात जेवणाचे पार्सल होते. सिलू काहीवेळात जेवण मागवणारच होता. तेवढ्यात ही दोघे आली. अजूनही मुग्धा इथे कशी आली हे सिलूला समजले नव्हते.
जॉर्ज आणि मीराने मुग्धाकडे बघितले आणि तिघेही हसायला लागले. सिलूला काहीच कळत नव्हते.
मग जॉर्ज सिलूला उद्गारला, “काय मग कसे वाटले सरप्राइज?”
“सरप्राइज ? म्हणजे हे सगळे तुम्ही दोघांनी केले. पण कसे ? आय रीयलि कांट बिलीविट” , सिलू आश्चर्यचकित होऊन म्हणाला.
“सगळे नाही. पण हा इथे पोहोचायला मुग्धाला मदत नक्की केली”, मीरा म्हणाली.
“मग मुग्धा बोलू लागली, “ सिलू ह्या दोघांमुळे मी तुझ्यापर्यंत सुखरूप पोहोचू शकले नाहीतर इतक्या मोठ्या देशात मी तुला कसे शोधणार होते.” असे बोलून मुग्धाने मुंबई ते अमेरिका पोहोचण्यासाठी तिने काय शक्कल लढविळी आणि उमाने तिला कशी मदत केली. हे सगळी इत्यंभूत माहिती तिने सिलूला दिली.
सिलूला खर्च मुग्धाचा फार गर्व वाटत होता. पण त्याचबरोबर त्याला मुग्धाचे त्याच्याबद्दल असलेले अस्सीम प्रेम सुद्धा जाणवत होते. त्याने मुग्धाला पुन्हा मिठी मारली. जॉर्ज आणि मीरा जोरात ओरडले आणि त्या दोघांना चीयरअप केले. मग चौघांनी मिळून डिनर केला. मग जॉर्ज आणि मीराला निरोप देऊन सिलू आणि मुग्धाने खोली आवरली आणि मग वेगवेगळ्या खोलीत दोघेही झोपायला गेले.
दोघेही प्रवास करून आल्यामुळे फार थकले होते. त्यामुळे पडल्या पडल्या दोघांची झोप लागली.
त्यांना झोपून काही तास उलटले असतील. इतक्यात रात्री कोणीतरी जोरजोरात दरवाजा वाजवत होते. आवाजाने दोघांची झोपमोड झाली. दोघेही एकत्र दाराकडे धावले.
पुढे पाहतात तर काय????
क्रमश:
(नक्की कोण होते दरवाजात? पुढे काय झाले हे जाणून घेण्यासाठी ही कथामालिका वाचत रहा. तसेच हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. हा भाग आवडल्यास त्याला लाइक, कमेन्ट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद)
@preetisawantdalvi