Diwana dil kho gaya - Part 6 in Marathi Love Stories by preeti sawant dalvi books and stories PDF | दिवाना दिल खो गया (भाग ६)

Featured Books
  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

  • मंजिले - भाग 14

     ---------मनहूस " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ कहानी है।...

Categories
Share

दिवाना दिल खो गया (भाग ६)

(मुग्धाने पुन्हा ‘हॅपी जर्नी’ असा मेसेज सिलूला सेंड केला. त्यावर सिलूने रिप्लाय केला की, “प्लीज स्वत:ची काळजी घे. मी तुला मॉर्निंगला कॉल करेन. आता तू शांत झोप. मी तुझ्याजवळच आहे मुग्धा आणि नेहमी राहीन”.
तो मेसेज वाचताच मुग्धाच्या डोळ्यात पाणी आले आणि ती मंद हसली आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली. आता पुढे..)

आज मुग्धाला ऑफिसला जायचा बिलकुल मूड नव्हता. तिला आज एकांत हवा होता आणि तो घरात मिळणे तर बिलकुल शक्य नव्हते म्हणून ती ऑफिसला जाते असे सांगून घरातून ती दुपारी जेवून निघाली. ती थेट कॉफी शॉपवर पोहोचली. तिथे कॉफी पित २-३ तास सहज निघून जाणार होते. कॉफी शॉपमध्ये आल्यावर तिच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. तिने सिलूला केलेल प्रपोस आणि त्यानंतर सिलूने तिला मारलेली मिठी. तिला हसू आले आणि सिलूच्या आठवणीने डोळ्यात पाणी सुद्धा.

सिलूचा आजचा सगळा दिवस प्रवासात जाणार होता. त्याने अम्मा-अप्पाला सुद्धा घरी कळविले की, त्याची फ्लाइट व्यवस्थित पणे टेक ऑफ झाली आहे. तो पोहचल्यावर कॉल करेल असेही त्याने सांगितले.
सिलूशिवाय घर खूप खाली खाली वाटत होत. आज अम्माचं सगळं काम निवांत होत होते. कारण आज ना सिलूच्या डब्याची घाई होती ना त्याच्या नाष्ट्याची. अम्मा सिलूला खूप मिस् करत होती. तसे अप्पा ही करत होते. पण ते दाखवत नव्हते. त्यांनी अम्माच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला धीर दिला. पोटचा मुलगा पहिल्यांदा एका अनोळखी शहरात राहायला गेला होता ते पण २ वर्षांसाठी. दोघांच्याही डोळ्यात पाणी होते.

इतक्यात दारावरची बेल वाजली. अप्पाने दरवाजा उघडला तर साहील होता. साहीलला आलेले बघून दोघेही खूप खुश झाली.
“काकू आज काय नाश्ता केला आहे? मला खूप भूक लागलीये”, असे साहील म्हणताच अम्माने इडली-चटणी आणि कॉफी आणून साहीलच्या पुढ्यात ठेवली.
साहील हा सिलूचा शाळेपासूनचा मित्र होता. सिलू घरी असेल किंवा नसेल तरी साहील हक्काने सिलूच्या घरी येऊन अम्माने बनवलेले सगळे पदार्थ चवीने खात असे. अम्मासाठी जसा सिलू तसाच साहील होता.
साहीलने कामातून वेळ काढून एक दिवसाआड तरी सिलूच्या घरी जायचे असे मनोमनी ठरविले होते.
आता सिलू परत येईपर्यंत साहील त्या दोघांची पूर्ण काळजी घेणार होता. त्याने हे सिलूला देखील सांगितले होते.

मुग्धा कॉफी शॉपमधून निघून चौपाटीवर गेली आणि तिथे वाळूत बसून ती सिलूबरोबर घालवलेले क्षण आठवत होती. इथे सिलूची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. तो मुग्धाबरोबरच्या भावी आयुष्याची स्वप्नेही पाहू लागला होता. त्याने त्याचे नेहमीचे आवडते गाणे ऐकले. आज त्याला ते गाणे ऐकताना जणूकाही तो ते मुग्धासाठी गात आहे असे वाटत होते. तो क्षणभर त्या गाण्यात रमून गेला आणि त्याला कधी झोप लागली हे त्याचे त्यालाच कळले नाही.

मुग्धा घरी आली पण आज तिचे खरंच कशातच लक्ष नव्हतं. तिच्या घरातल्यांना वाटले की, हिचे ऑफिसमध्ये काहीतरी बिनसले असेल. म्हणून त्यांनी सुद्धा इतके लक्ष दिले नाही. मुग्धा आज जेवायलाही रूम मधून बाहेर आली नाही. मुग्धा तिच्या काकीच्या खूप जवळ होती. ती सर्व काही काकीशी शेअर करत असे. पण सिलूबद्दल तिने कोणालाही काही सांगितले नव्हते आणि इतक्यात तिला काही सांगायचे सुद्धा नव्हते. तिची काकी नेहमीप्रमाणे तिला जेवायला बोलवायला आली. पण मुग्धाने ऑफिस मधले काहीतरी मॅटर सांगून त्यामुळे तिचे जेवायचे मन नाही असे बोलून संभाषण संपविले आणि तिने झोपेचे नाटक केले.

काकीला माहीत होते थोड्यावेळाने मुग्धा नॉर्मल होईल म्हणू ती ही निघून गेली. इथे मुग्धा सिलूच्या आठवणीने बेजार झाली होती. तिने तर अमेरिकेला कसे जायचे याच्यासाठी गूगलवर माहिती ही गोळा करायला सुरुवात केली.
आता काय म्हणाव या मुलीला!!

सिलूचा मध्यरात्री अमेरिकेला सुखरूप पोहचल्याचा मेसेज आला. नवीन सिमकार्ड घेतल्यावर तो सविस्तर फोन करणार होता. सध्यातरी त्याला मुग्धा आणि स्वत:च्या नात्याबद्दल कोणालाही सांगायचे नव्हते.
त्याने त्याच्या ऑफिसच्या सहकाऱ्याच्या फोनवरून घरी कॉल केला. अप्पा जागे होते. ते सिलूच्या फोनचीच वाट पाहत होते. मग सिलूने थोडे बोलून त्यांना आरामात फोन करतो असे सांगितले.

सिलूची राहायची व्यवस्था एका अपार्टमेंट मध्ये केली गेली होती. तिथे सध्यातरी तो एकटाच राहणार होता. त्याच्या ऑफिसच्या सहकाऱ्याने त्याला घराची चावी सोपविली. तो २ bhk फ्लॅट होता. त्याचा सहकारी सुद्धा इंडियन होता. त्याचे नाव विनीत होते. त्यामुळे सिलूला फार बरे वाटले. त्याने सिलूला पूर्ण घर दाखविले. तसेच सिलूला नवीन सिमकार्ड सुद्धा दिले. ज्यावरून तो पर्सनल कॉल करू शकत होता. सिलूला २ दिवसांनी ऑफिसला रुजू व्हायचे होते. विनीतने सिलूसाठी जेवण ऑर्डर केले आणि सिलूला एक कागद दिला. त्यावर विनितचा फोन नंबर आणि महत्वाचे काही नंबर लिहिले होते. थोडावेळ बसून मग विनीत निघून गेला.

सिलूने जेवण संपविले आणि मग तो गाढ झोपला. प्रवासाने तो पार दमून गेला होता. रात्री त्याला जाग आली तेव्हा मग त्याने नवीन नंबरने घरी फोन केला. अम्मा-अप्पा दोघांशी बोलून मग त्याने फोन ठेवला. साहील घरीच होता त्यामुळे त्याचे साहीलशी सुद्धा बोलणे झाले. साहील असल्यामुळे सिलूला अम्मा-अप्पाची जास्त काळजी नव्हती.

मग त्याने मुग्धाला फोन केला. त्याचा आवाज ऐकायला मुग्धाचे कान तरसले होते. सिलूने फक्त ‘हॅलो’ म्हटल्यावर मुग्धा रोमांचित झाली. काही क्षण कोणी काहीच बोलले नाही. मग मुग्धाने सिलूची चौकशी केली आणि रोज ह्याच वेळेला ती त्याला फोन करेल असेही सांगितले आणि मग थोडावेळ बोलून दोघांनी फोन ठेवला.

दोघेही एकमेकांच्या विचारात गुंतून गेले. सिलूने त्याच्या फोनवर रोमॅंटिक गाणे लावले आणि तो मुग्धाच्या विचारात गुंग झाला.
♬♬नहीं सामने, नहीं सामने ये अलग बात है
मेरे पास है तू मेरे पास है मेरे साथ है…
मेरे साथ है प्रेयसी..
तेरा नाम मैंने लिया है यहाँ
मुझे याद तुने किया है वहाँ
बड़े ज़ोर की आज बरसात है..
मेरे पास है तू.. मेरे पास है मेरे साथ है…मेरे साथ है♬♬

सिलूचा ऑफिसचा आज पहिला दिवस होता. त्याच्या ऑफिसमध्ये बऱ्यापैकी इंडियन स्टाफ होता. पण सध्यातरी तो फक्त विनीतला ओळखत होता.
विनीतने सिलूला त्याची केबिन दाखविली आणि अर्ध्या तासाने मीटिंग आहे व तिथेच त्याची त्याच्या डिपार्टमेंटमधल्या सर्व सहकाऱ्यांची ओळख होईल असेही तो म्हणाला.
काही वेळानंतर सिलू कॉन्फरन्स रूम मध्ये पोहोचला. विनीतने प्रथम सिलूची ओळख सर्व सहकाऱ्यांशी करून दिली त्यानंतर सगळेजण आपापली ओळख सांगू लागले. सिलूला सगळ्यांना भेटून थोडा धीर आला. त्याच्या डिपार्टमेंटमध्ये सुधीर, मीरा, जॉर्ज हे तीन सहकारी इंडियन होते. सुधीर ह्या कंपनीमध्ये ३ वर्षांपासून होता आणि तो इथेच सेटल झाला होता. जॉर्ज आणि मीरा यांना ही कंपनी जॉइन करून १ वर्ष होत आलेलं. एकंदर सिलूला यांच्यामुळे परके वाटणार नव्हते.

सिलूच्या कामाला जोमाने सुरुवात झाली. इंडियन टाइम आणि अमेरिकन टाइम सांभाळून तो घरी अम्मा-अप्पाला फोन करीत असे. तसेच मुग्धाशी ही ठरलेल्या वेळेवर बोलणे होत असे.

असेच काही महीने निघून गेले. हळूहळू तो इथल्या वातावरणात रमू लागला होता. मीरा, जॉर्ज आणि सिलूची चांगली गट्टी जमली होती. सुधीर ह्या सगळ्यांपेक्षा थोडा सीनियर होता. तसेच त्याची फॅमिली सुद्धा होती त्यामुळे तो ह्या तिघांमद्धे जास्त मिसळत नसे. जॉर्ज आणि मीरा लिव-इन कपल होते. त्यामुळे ती दोघे जास्तीतजास्त वेळ एकमेकांबरोबर घालवत असत. त्या दोघांना बघितले की, सिलूला मुग्धाची खूप आठवण येई. मुग्धाबद्दल एव्हाना सिलूने जॉर्ज आणि मीराला सांगितले होते.

ती दोघे मुग्धाला अमेरिकेत येण्याचा नेहमी सल्ला देत असत. त्यांचे ऐकून मुग्धाला ही क्षणभर वाटे की, सगळं सोडून सरळ सिलूकडे अमेरिकेला निघून जावे. पण सध्यातरी ते तिला शक्य नव्हते.

क्रमश:
(सिलू आणि मुग्धाची लवस्टोरी अशीच सुरू राहील. पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा आणि हो, हा भाग आवडला तर लाइक आणि शेअर नक्की करा.)
धन्यवाद
@preetisawantdalvi