Apurn - 8 in Marathi Love Stories by Akshta Mane books and stories PDF | अपूर्ण..? - 8

Featured Books
Categories
Share

अपूर्ण..? - 8


सो गाइज आता कुठे ? प्रश्न पडला असेल तर ....आधी जेवण करूया मग तीन चार देवस्थान आहेत इकडचे ते फिरून आल्यावर सनसेट आणि मग शॉपिंग ओकय .



आणि आज एवढंच कारण उद्या आपल्याला पॉपुलर पॉइंट्स बघायचे आहेत , आज दमलोय म्हणून सो are you ready ?..
सिड ने विचारल्यावर सर्वजनण हूटिंग करायला लागले.. एक्ससेप्ट स्वरा. सर्वांची एनर्जी लेवल खुप होती .




जेवण झाल्यावर सगळ्यांचा मोर्चा मंदिराकड़े वळला . जेवताना सुद्धा कधी चुकुन स्वरा आणि अथर्वची नजरानजर व्हायची तर कधी एकच भांड उचल जायच पण दोघही बोलतील तर शप्पत, ह्या दोघांमधे काहीतरी झालाय हे वरुणने ओळखल पण सध्या तो गप्प होता.



असच तीन चार मंदिरामधे पाया पडून झाल खुप दिवसांनी स्वरा मंदिरात प्रवेश करत होती , हा म्हणजे तिची श्रद्धा आहे देवावर पण बऱ्याच दिवसांनी .... आणि अचानक मंदिरात जाणार म्हणून तिची पावलही जड़ झाली .




स्वरा प्रत्येक मंदिरात पाया पड़ताना एक धागा पुजारी काकांना दयायची हे अथर्व आणि maddy ने लांबुन चुकताच पाहिल.
असेल काहीतरी ...तिची श्रद्धा म्हणून विषय सोडून दिला त्यांनी.



मंदिरा समोरच समुद्र होता म्हणून सनसेट बघायला जास्त लांब जायची गरज न्हवति.



सगळीजण फ़ोटो काढण्यात बिजी होते .स्वताचे तर काहिजण सुंदर अश्या निसर्गाचे.



सिडच शूटिंग एका बाजूला चालू होत , लोकांचे इंटरव्यू घेण्यात तिथली माहिती घेण्यात बिजी होता . तर maddy अथर्वच चक्क म्यारेथोंन चालु होत 😂... अहो रेसिंग.




सुंदर असा अगरबत्तीचा सुगंध .... खटयाळ धुंध करणारा संध्याकाळचा वारा... तांबूस केसरी अशी सूर्याची किरणे जी मावळतिचा वेध घेत होती. ती इंडिरेक्टली येऊन स्वराच्या चेहेर्यवर पड़त होती .



स्वरा मंदिरात एका बाजूला शांत बसून तीच हे सर्व दृश्य नेहाळण चालु होत , तीच कोणाकडे लक्षही न्हवत आणि त्यांच्यामधे जायची इच्छाही न्हवति.



डोक नूसत बधिर झालाय देवा.... नकोतो विषय नको ते प्रसंग डोळ्यासमोर येत आहेत 😢. झाल ना तुमच्या मनासारख म आता काय हवय तुम्हाला 😔. ती हे सर्व देवला म्हणत होती एक नजर तिने गणपतिकड़े वळवली आणि परत खळखळणाऱ्या समुद्राला पहात शून्यात हरवून गेली..




रनिंगमुळे संपूर्ण अंग भीजलेल अथर्वच आणि टी-शर्ट मधून सिक्स पैक्स दिसत होते त्यामुळे सर्व मुलींच लक्ष त्याच्यकडे होत .💁😪



आजुबाजुला पहात काहीतरी मिसिंग आहे म्हणत त्याच लक्ष समोर गेल तर समोर स्वरा मंदिरात बसलेली कुठेतरी शून्यात नजर लावून .



नाकात नोज पिन सिल्वर इयरिंग कपाळाला लावलेली टिकली, मोकळे केस आणि तिच्या चेहेर्यवर पडणार तंबूस सूर्याचा प्रकाश. एकंदरीत गोल्डन सिल्वर ब्यूटी दिसत होती ती.




तीला बघताच आपोआप स्माइल आल त्याच्या चेहेर्यवर ☺️.
पण तेहि काही जास्त काळ टिकली नाही सकाळचा प्रसंग आठवला त्याला .



आता पर्यन्त वाटलेली जरा डेंजर आहे पण ही उद्धट निघाली . पहिल्यांदाच जेव्हा कारच्या समोर आली तेव्हाच ओळखलेल मी हिला , समोरच्याच काही येकायच नाही स्वतःच खर 😒,
एवढा कसला राग डोक्यात घेऊन फिरत असते काय माहीत .. म्हणात त्याने आपला मोर्चा भूमी भूषणकड़े वळवला जे आपल्याच धुंधीत होते .



इतकावेळ होऊन सवरचा आवाज आला नाही म्हणून सिडने आजुबाजुला पाहिल पण ती काही नजरेस आली नाही रियाला विचारायला जाणारच होता तो पण इतक्यात स्वरा खाली येताना दिसली .


स्वरा..ss... सिड धावत स्वराकडे गेला आणि तिच्या समोर मान खाली करुन उभा राहिला .



काय झाल बोल. काही सेकंदानंतरही सिड तसाच उभा होता . आता मात्र स्वरा जरा चिड़ूनच बोलली सिड काही बोलणार आहेस तू आता 😕 . सिड...अहह गॉड🙄. ती डोक्याला हात लावत म्हणाली .



सिड तू..तू जर आता नाही न बोललास तर मी खरच निघुन जाइन... हेलो सिड तू रडतोयस? वर बघ सिड वर बघ.


आरे सॉरी मी मस्करीत म्हणाले है .. तिने सिडचा चेहेरा हातात पकडला.



सॉरी स्वरु मला न्हवत ग तुला हर्ट करायच चुकुन झाल मी कस बोलून गेलो मलाच माहीत नाही खरच😣... त्याच्या ह्या बोलण्यावर स्वरा हसायला लागली .



काय झाल हसायला ?
अरे काय सिड तू पण रात गई बात गई चोड ना, तू भी क्या याद रखेगा🙂.



सिड आणि स्वराला अथर्व आणि रियाने पाहिल पण लंबुनच . स्वराने अजूनही सिडला तसाच पकडून ठेवलेल रियाला तर कुठे जाउ आणि कुठे नको अस झालेल शेवटी सिडवर क्रश होत तीच ( well guys u know crush crush असतो शेवटी थोड़ तरी jealous फील होतच)




अथर्व... सिड स्वराकड़े बघत बसला होता त्याला कळलही नाही की कधी वरुण त्याच्या बाजूला येऊन उभा राहीला ते..




काय अथर्व साहेब कोणाकडे अस टक लावून बघताय😕? स्वरा वाहिनी आहे वाटत तिथे ? वरुण ने दूसरा बोम्ब फोड़ला. वरुण खांद्यावर हात टाकत म्हणाला तसा अथर्वने खांद्यावरचा हात झटकला आणि रागाने बघू लागला .



म काय सखीच्या विचारात होतास? सखिच नाव एकल आणि अथर्वच्या चेहेर्यवरचे हावभाव बदलले. पण हे भारी आहे सखी... स्वरा " S स " पासुन नाव स्टार्ट दोघिंचेही वरुण म्हणाला तस...


मी कोणालाही बघत नाही आहे आणि सखिचा विचार तर मुळीच नाही.




Dude dont tell me सखिचा टॉपिक फक्त तू माझ्या समोर काढु शकतोस गेट इट .



वरुण तू आधी हे वाहिनी बोलण बंद कर प्लीज... प्लीज बोलतोय मी.



का? ही होणारी वाहिनी आहे ही आमची तुला घरी....
वरुण बोलता बोलता थांबला कारण अथर्व ज्या एंगर लुकने त्याच्याकडे बघत होता अस वाटत होत काही वेळात हा गिळून खाईल वरुणला.




सॉरी भाई.. पण तुमच्यात काही वाजलय का परत ? नाही म्हणजे नीट बोलत नाही आहत तुम्ही ?.
त्याच्या ह्या प्रश्नवर अथर्व ने संपूर्ण रामायण संगीतल .
वरुण तर डोळे मोठे करु बघत राहिला . डेंजर ....डेंजर प्रकरण दिसतय अर्थवराव 🤣🤣 मी तर म्हणतो लांबच रहा तुम्ही आता😂 .




इकडे सिड स्वराची माफी मागत होता आणि स्वरा येंकुंन ऐकून थकलेली . सिड खरच बास झाल आता नाहीतर मी खरच परत रागवेन परवडणार आहे का तुला सांग मला तस .


नाही नको राहुदे सिड म्हणाला तस स्वरा हसायला लागली.
बर सरप्राइजच लक्षात आहे ना तुझ्या😉.
स्वरा अस म्हणाल्यावर सिड गप्प बसला कारण सरप्राइज म्हटल्यावर त्याला मगासचा प्रसंग आठवला .




काय रे काय झाल हवय ना लवकर भेटेल तुला नो वरी .
गाइज..... सिड..ss , वरुण..ss, स्वरा..ss चला लवकर सनसेट बघायला सगळे maddy च्या मागे गेले .



Waw 😍......सुंदरच ...अप्रतिम... बहार ....भूषणच्या तोंडातुन एकसो एक उपमा येत होत्या .
सनसेट बघण्यासाठी झालेली गर्दी आता शांत होत होती. पक्षांचा किलबिलाट त्यात वर्याचा झोत वेगळच अनुभव होता सर्वांसाठी .


अथर्व एका टोकाला बसलेला सोबत बाजूला वरुण होता अथर्वने खिश्यतुं एक चिठ्ठी काढली (हो तीच जी सखिसाठी लीहीलेली) त्याक्षणीही वरूण काही म्हणाला नाही त्याला.


बाजूला रीया आणि maddy होते रीया अगदी बिनधास्त अगदी मनलावून सनसेट बघत होती maddy च लक्ष तर सारख रियकडेच होत इवन सनसेट सोडून तो तिलाच बघत होता.




सिड.. त्याच्या शूटिंग मधे बिजी होता कैमरा तस आधी त्याने सेट करून ठेवलेला तितक्यात स्वराला एक msg आला . स्वरा ही बैग पकड़ सिड म्हणाला खरा पण हिच लक्ष असेल तर खर . स्वराsss 💥.




हो हो आलेच . बर येक तुला surprise द्यायची वेळ आली आहे....



प्लीज स्वरा आता हे काय मधेच मला वाटल तू मस्करी करतेयस. चल मला हेल्प कर आवर पटापट हा कैमरा लागला आहे का बघू एकदा म झाल.



तेवढ्यात स्वराच फ़ोन परत वाजला . सिड येक तू माझ्या सोबत ये ...... ये ना रे 👉👈... त्याचा हात पकडत स्वराने त्याला सेंटरला आणल .



" स्वरा काय चालू आहे तुझ " ...... सिड तू समोर बघ समोर सनसेटच्या इथे बघ आणि.. मी 123 बोलेन ठीकय .



बाकीच्याना काय चालू आहे काहीच समजत न्हवत भूमीने एकदा सिडकड़े बघित .... " काय चालू आहे नक्की म्हणून eyebrow वर करूँ विचारल" ...... तर तो खंदे उडवत " डोन्ट नो म्हणाला " . तर तिने मोर्चा स्वराकड़े वळवला...... " स्वरा थांब समजेल अस डोळे मिचकवर म्हणाली "



अथर्व maddy रीया सर्वजण ह्या दोघांकडे बघत होते.



सिड u ready. One two three and .......




मागून ohh my my my godSSS..... sid dear 😽..
सिड ने जसा आवाज ओळखला तो तोंडात पुटपुटला वर्धा💕?



ohh god turn झाला बघतो तर काय सोमोर वर्धा धावत येताना दिसली ohh god वर्धा तू😻😻... वर्धाने धावत जाऊंन त्याला मीठी मारली 😍.



भूमी भूषण सुद्धा शॉक बाकीच्याना तर समजच न्हवत काय चालु आहे ते .



जवळ जवळ पाच मिनिट ते दोघे तशेच उभे होते.

अख्ह अख्ह....😴 भूषणने खोकायच नाटक केल 😉.




काय म सर आवडल का सरप्राइज 😜... स्वराने वीचारल्यावर.....Thank you thank you besti 😚.. उगाचच मी तुला best friend नाही बोलत सी 😍love u yarr 😘.



सिड म्हणाला तस हो हो राहुदे मक्खन लाऊ नको आता.. " जास्त नाहीतर भाव चडायचा तीला वर्धा म्हणाली ."



स्वराss काशी आहेस माय जान 😚...वर्धा स्वराला टाळी देत मीठी मारत म्हणाली .




भुमी भूषण सॉरी रे तुला माहिच आहे न भूषण कीती वर्क असत ते म्हणून लग्नला नाही जमल यायला मी शॉपिंग पण केले बघीतलस ना तू भूमा👉👈 . सॉरी,🙁 वर्धा puppy सारखा फेस करत म्हणाली .




ठीकय ठीकय वसूल करुन घेणार आहे मी भुमी म्हणाली.
आणि बाकीच्याशी ओळख करूँ दिली.




निघायच का आता शॉपिंगला रीया ची उत्सुकता पाहुन सगळेच हसायला लागले.



ते सर्व आता महाबलेश्वरच famous चिक्की आणि संतोष चना मार्किट मधे पोहचतात.




आता शॉपिंग म्हटल्यावर मूलांच काय काम ? तर अस काही नाही आहे उलट मूलच पुढे होते काहिजण शूज किंवा वेगवेगळ्या पैटर्नचे कुर्ते , झ्ब्बे , पटियाला, शॉर्ट्स आणि बरच काही.... त्यात खव्य्येही कमी न्हवते.




भूमीच नुकताच लग्न झल्या मुळे सासु सासऱ्यांना रिलेटिव्ससाठी शॉपिंग करत होती .




काय ग स्वरा तू घे ना काहीतरी नुसती उभी आहेस रियाने विचारल .... " अग हे काय बैग घेतली आहे ना actually आम्हाला फ़ोन किवा काही पेपर्स पेन डायरी ठेवाव लागत म हेच बर "




सिडच ही काम आटपुन झाल होत. तिथुन तो passout झला तोच वर्धाचा आवाज आला ....




वर्धा काय घेतेयस ? .सी सिड छान आहे ना खुप... यु नो व्हाट.. हेच मी कीती दिवस शोधत होती... तुला सूट होईल
मस्त फैब्रिक प्रिंटेड शर्ट आहे ना मी अजुन दोन घेऊन ठेवलेत .



आता कशाला बोलू नकोस ... शूटसाठी लागत ना तुला मग ह्यावर अजुन अट्रेक्टिव दिसशील 😉.



Oky बाबा चला आता 🙏.


......अरे पण स्वरा कशी रेडी झाली यायला? , पण बर झाल आली ती ,surprise कस वाटल 😜 तिचाच प्लान होता हा सिड काय... बोल न आवडल ना.😒☹️...



हा आवडल खूपच भारी सरप्राईज़ होत😊.... i cant belive की ती अस काही करु शकते आणि चाप्टर तू पण संगीतलस नाही काही .



वर्धा.. ते सिड बोलता बोलता थांबला .... " काय बोल "




अग एक्चुअली ह्याच सरप्राइजमुळे घोळ झाला एक ...मग सिड ने वर्धाला सगळी हकीकत सांगितली .




सिड एक तर तू तिची एवढी काळजी घेतोस वरुन अस वगतोस not fair यार . (वर्धा आणि सिड मधे खूपच mutual understanding होत )



पण अर्णवला खुप मिस करतेय मी....😢 .
" तूच काय वर्धा सर्वनाच आठवण येतेय त्याची ."



सिड ग्रुप कीती शांत झालाय ना ....अर्णवची मस्ती त्याचे राडे स्वरासोबतची भांडण.. " हम्म !..... सगळच बदल आहे "



....... तसा माझा आधीही देवावर विश्वास अस न्हवताच आणि अर्णवच समजल्या पासुन तर नाहीच आहे. सगळ परफेक्ट असलेल देवला आवडत नाही वाटत. वर्धा म्हणाली.... बर तिची रिएक्शन काय होती त्यावर?



Opposite होती माझ्या सकट भूमि भूषणसुद्धा शॉक होते. बट थैंक्स टू अथर्व तुला माहीत आहे का त्याच्यामुळेच ती थोड़ी का होईना नॉर्मल झाली आहे




अथर्व म्हणजे तोच ना भूषणचा फ्रेंड... का काय त्याच ?
जे आपल्याला जमल नाही ते तो करतोय😕?



कार एक्सीडेंटपासुन ते बॉटल फेकण्या पर्यन्त सर्व सांगितल सिड ने वर्धा त्यावर हसायला लागली 😲😝😂😂😂😂......


ओह्ह गॉड सिड😮😂... बिचारा अथर्व ... पुअर बॉय ..
जाम वाट लागली आहे रे त्याची. त्याला म्हणाव लांब रहा बाबा आमच्या स्वरा पासुन अजुन ओळखत नाही आहे तीला तो 😂.


इकडे स्वरा फिरत फिरत एका दुकानापशी येऊन थांबली.
Beautiful so pretty🖤... समोर लटकवलेल्या इयरिंग ना बघुन म्हणाली .



मोरेपिसाच्या पंखासारखी डिज़ाइन , ...मधे dimond ...मेटलचे इयरिंग तयार केलेले होते. तिने ते हातात घ्यायला आणि बाजूने तेच इयरिंग कोणीतरी पकडायला .....



तू😒 ... आता काय हव आहे तुला 🙄.. हे पण कानात घालून फिरणार आहेस का ? स्वरा बाजूला उभ्या असलेल्या अथर्वला म्हणाली 😒.



हे मी पकड़ल आहे आणि मला हवय आता.... ते मी कानात घालेंन किंवा अजुन काही करेन तुला का सांगू 😒.



एक सेकंद हे आधी मी बघितल होत सो... तुझ काय आहे मधेच ना 🙄....तुला बहिण आहे , काकू तर घालु शकत नाही
आणि वरुन चोरच्या उलटया बोम्बा स्वरा वैतगुन म्हणाली😤.



हे मला आवडल आहे आणी मीच घेणार मला तुझ्याशी बोलन्यात इंटरेस्ट नाही आहे चल सोड पटकन अथर्व म्हणाला😤.



ओ काका ह्याला दूसरा पीस दया काय माहीत कुठे ठेवणार आहे . ....." नाही ग पोरी हा एकच पीस होता माल संपला सगळा आता तुम्ही तुमच बघा काय ते. "




सी बघीतलस अथर्व पुढें बोलणारच होता स्वरा मधे बोलली... " ठेव ते तुला दुसऱ्यांच्या गोष्टिवर हक्क दाखवणारे ह्या आधीही भेटले आहेत मला... dont worry आणि मला अस ओरबाड़ून घेता येत नाही 😊. तिने एक स्माइल दिली आणि निघुन गेली . and मला काडिचाहि इंटरेस्ट नाही आहे तुझ्यात.




ये हेलो ओरबाड़ून काय म्हणजे बोलायच काय आहे स्पष्ट बोल ना इडियट😤 मला.. मी हक्क काय दखवला...😡.... जाउदे काका घ्या पैसे .



अथर्व टर्न झाला तोच मागे वरुण हाताची घड़ी घालुन उभा होता.


काय ?.... झाल तुझ शॉपिंग करुन तिच्यासाठी ?😕 .
अथर्व काही बोलणार होता वरुणने थांबवल....



काय तुलाच विचारतोयस मी अथर्व... कोणासाठी हा कोणासाठी घेतोयस हे सर्व तिच्यासाठी जीचा पत्ता माहीत नाही.. जी कुठे आता ह्या क्षणाला ?...काय करतेय कोणासोबत आहे नक्की ?....आहे की नाही? हेच माहीत नाही आहे आपल्याला.. आणि तू तिच्यासाठी हे सर्व घेऊन ठेवतोयस तर का आशा ? .... am i right एक आशा आहे .



सखी.. सखी परत येईल अरे पण कधी... तीला तुझी परवा अजिबात नाही आहे असती ना जर तर पर्यत्न केला असता तिने .



सखिला माहीत होत ते पत्र तू लिहिल आहेस तरी त्या दोन वर्षात अजिबात भेटली नाही . आणि नंतर.. जेव्हा तू खरच भेटला तीला तेव्हा.. तेव्हाच काय अथर्व ?.....मी तुझ्याशी बोलतोय तेव्हा पण ती निघून गेली .



आणि आपण रोज आज काय साड़ी आवडली . उद्या काय कुर्ता. परवा काय तर हे कानातले.. तुझ्या हट्टा मुळे जिला खरच हवे होते जी ते कानातले घालनार होती तीच नको म्हणाली. आणि स्वरा खरतेच बोलली आहे ओरबाडुन नाही मिळत स्वतःहुन चालत याव लागत मिस्टर अथर्व . वरुणचा पारा पूर्ण चढ़ला होता. तो त्याच्या मित्राला बाहेर काढू शकतं नाही ह्याची सल नेहमी त्याच्या मानात रहायची.



हम्म..जाउदे मी तरी कोणाला समजवतो आहे ज्याला इतक्या वर्षात समजल नाही ते आता समजेल म्हणत वरुण निघुन गेला...


क्रमशः

अक्षता माने.