Savar Re - 7 in Marathi Love Stories by Amita Mangesh books and stories PDF | सावर रे.... - 7

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

सावर रे.... - 7

सप्त सुरांची सुरमयी आरोळी देऊन पक्षांच्या किलबिलाटाने आणि सूर्याच्या किरणांचे चहू बाजूला तुषार फुलवत पहाटेने आपले डोळे थोडेसे किलकिले केले होते तोच एक आवाज आला,

आई…... आई

बिचारी आई सकाळी पांढरे फुटायचा आधीच उठते हो, तिने आवाज ऐकून आश्चर्याने पाठी पाहिले तर नितीन चक्क सहा वाजता सकाळी उठून तयार होऊन तिला हाक देत होता. त्याला प्रतिउत्तर न देताच ती क्षणभर तशीच त्याच्या कडे पहात राहिली.

त्याने पुन्हा तिला आवाज दिला, अग आई अशी पाहतेस काय, प्लिज चहा दे ना पटकन, मला उशीर होतोय.

त्याची आई त्याच्या जवळ येत म्हणाली अरे रोज तुला मी न उठवता जाग येत नाही आणि आज चक्क तयार आहेस?

आई मला एक महत्वाचे काम आहे मी बाहेर जातोय, संध्याकाळी परत येईन . आईच्या खांद्याना पकडत तिला किचनकडे नेत तो पुढे म्हणाला आता पटकन तुझ्या हातचा चहा दे बघू डोकं खूप जड झालंय.

हो रे बाबा देते पण डोकं का जड झालं रात्रभर झोपला नाहीस का?

नितीन थोडा कचरत म्हणाला अग हो...म्हणजे….काय माहीत पण झोपच येत नव्हती.

अरे होत कधी कधी हा घे चहा मग बरं वाटेल. पण इतक्या सकाळी कुठे निघालास?

ते अग ऑफिसचे काम आहे एकाला भेटायला पुण्याला जायचे आहे तेंव्हा लवकर निघालो.

बरं सावकाश जा, आणि लवकर ये. तो पर्यंत नितीन बाहेर पडून गेला ही होता.

आई मागे वळत असेल तेव्हढ्यात जाई तयार होऊन तिच्या समोर, आईसाठी आजचा दुसरा धक्का, ती बिचारी पुन्हा तशीच तिच्याकडे पण पहात उभी राहिली तर जाईने तिला ईशाऱ्याने विचारले, काय झाले.

आई तिच्या अंदाजात म्हणाली आज माझी मुलं शहाण्या सारखी वागतायत तेच पहात होते.

इकडे नितीन घरा बाहेर येताच त्याने एक कॉल केला,

हॅलो,...

……….

हा… हा निघालो मी,

……..

थोड्याच वेळात पोहोचेल मी.

………

सांगितलं ना आताच कोणाला काहीही सांगण्याची गरज नाही. वेळ आली की सांगेन मी.

……..

येईल लवकरच वेळ येईल, मग काहीही लपवायची गरज लागणार नाही.

…….

मी सांगितलं ना मी सगळं ठीक करेन.

……..

आता त्यासाठीच येतो आहे ना मी.
मग भेटल्यावर बोलू ठेवतो बाय.

नितीन नियोजित ठिकाणी पोहोचला, तिथे तीच व्यक्ती त्याची वाट पहात उभी होती. त्याने जाऊन त्या व्यक्तीची भेट घेतली. जुजबी बोलून ते दोघे स्टेशन वर आले आणि पुण्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले.


इकडे यश अजूनही घोडे विकून झोपला होता. पण एलेना लवकर उठून तयार झाली होती. कालच्या टेंशन चे पडसाद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. एखादे फुल झाडावरून तोडावे आणि ते मलुल व्हावे तशी तिची अवस्था झाली होती. माईंनी तिला जबरदस्तीने नास्था करायला बसवले होते पण तिचे खाण्यात लक्षच नव्हते. माईंनी तिची प्रेमाने विचारपूस केली, काही झालंय का हे ही विचारलं, मात्र तिने मॉम डॅड ची आठवण येतेय अस सांगून वेळ मारून नेली. तिने माईं कडे जाईबद्दल जाणून घेण्यासाठी तिचा विषय काढला. माईचत्या तोंड भरून जाईची तारीफ करू लागल्या. आणि ओघात त्यानी तिला आपली भावी सून मानले होते हे ही बोलून गेल्या. एलेना मात्र आश्चर्याने त्याना पहात राहिली. माईंच्या लक्षात येताच त्यानी तिची मनधरणी पण केली आणि एलेना ने हसून त्याना काही झालेच नाही असे दाखवले. पण मनातून ती खूप गिल्टी फील करत होती. माई खूप छान वागत होती तिच्या सोबत. त्यामुळे तिला तिच्या मॉम ची आठवण येत होती. तिने तिचा फोन घेऊन एक कॉल केला आणि तिचा नास्था सम्पवून तिच्या रूम मध्ये निघून गेली.

नितीन पुण्यात पोहोचला, शहराच्या बाहेरच एका छोट्याश्या गावात त्याला जायचे होते. त्या ठिकाणी जायला किमान एक तासाचा पुन्हा प्रवास करायचा होता म्हणून त्या दोघांनी एका हॉटेल मध्ये जाऊन मस्त पुणेरी मिसळी वर ताव मारला आणि एका खाजगी वाहनाने दोघे निघाले.
त्याच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीने भीतीने नितीन कडे पाहिले. नितीन ने डोळ्यांनीच आश्वासन दिले, सगळं काही ठीक होईल मी आहे ना त्याचा नुसत्या बघण्यातच एक प्रकारचा आत्मविश्वास जाणवत होता. नितीन मात्र मनातून खूप घाबरला होता. तिथे गेल्यावर काय आणि कसं बोलायचं याचा तो विचार करत होता.

तासाभराचा प्रवास सम्पवून ते दोघे ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. आता पर्यंत सगळं ठीक होईल ह्या विचारांवर ठाम असलेल्या नितीनने समोरचे दृश्य पाहून आपले हात पाय गाळले. म्हणायला ते छोटंसं गाव होतं, पण तो जिथे उभा होता तिथे एक प्रशस्थ वाडा उभा होता. वाडा कसला महल वाटत होता तो. आजू बाजूला हिरवीगार झाडे आणि शेती. वाड्याच्या समोर छान फुलझाडांची बाग होती. लाल रंगाच्या दगडाचे बांधकाम असलेला. जुनी व आधुनिक विचारसरणी मिळून केलेली निर्मिती हिरवळीच्या चादरीवर उठून दिसत होती. डौलाने उभा राहिलेला तो वाडा नितीनला त्याच्या सामर्थ्याने जणू लाजवत होता.

नितीन अवाक होऊन सगळं पहात एकेक पाऊल पुढे टाकत होता. वाड्याच्या मेन गेट ने आत प्रवेश केला तर दहा बारा लोक वेग वेगळी काम करताना दिसत होती. नितीन आणि त्या व्यक्तीला पाहिल्यावर आश्चर्याने ते लोक उभे राहून त्याना एकटक पहात होते. नितीन ला आता भीती वाटू लागली होती. तो भेदरलेल्या नजरेने इकडे तिकडे पहात तसाच पुढे चालत राहिला. दारातुन पुढे आत आल्यावर एक छोटे अंगण होते आणि त्याच्या बाजूने चौकोनी पडवी सारखं बांधले होते तिथेच बसण्याची व्यवस्था केली होती. तिथे पोहोचल्यावर एक 55ते 60 मधल्या भारदस्त व्यक्तीचा रुबाबदार आणि भारदस्त आवाज आला, या आलात तुमचीच वाट पहात होतो.

यश आज दिवस भर घरीच होता. माईंकडून लाड पुरवून घेत होता. एलेना शांतच होती फक्त कामापूरत बोलत होती. तिला कंटाळा आला असेल म्हणून माईनी यश ला आणि एलेना ला जबरदस्ती बाहेर फीरायला पाठवले.

यश पण मनात नसताना तिला टेकडीवर घेऊन गेला. ही तीच जागा जिथे ते कॉलेज मध्ये असताना नेहमी येत असत. तिथे आल्यावर त्याच्या सगळ्या जुन्या आठवणी पुन्हा जिवन्त झाल्या. त्यात जाईचा समावेश जास्त होता. तो भरभरून बोलत होता. त्याच्या प्रत्येक आठवणीत सुरुवात आणि शेवट जाईनेच होत होता.

एलेना शांत होती. तशीही ती मोजकेच बोलायची पण यश सोबत असताना मनमोकळं रहायची. आज जणू कुठे तरी हरवल्या सारखी दिसत होती.

त्याने न राहून शेवटी तिला विचारले, व्हॉट हॅप्पेन एलेना, आर यु ओके?

तिने त्याच्याकडे पाहून खांदे उडवत फक्त इतकंच म्हटलं की येस आय एम फरफेक्टली ऑल राईट.

तिच्या उत्तराने त्याचे समाधान झाले नव्हते, आपलेच काही तरी चुकलं असणार म्हणून ती अशी वागते हे समजायला त्याला वेळ लागला नाही.
त्याने पुन्हा एकदा तिच्या खांद्याला पकडून तिला स्वतः कडे वळवून तिच्या डोळ्यात डोळे घालून अगदी जिवाच्या आकांताने तिला भावुक होऊन विचारले, काय झालं? माझं काही चुकलं का? तू इतकी डिप्रेस का दिसत आहेस? प्लिज सांग मला बोलली नाहीस तर कस कळेल मला.

एलेना निर्विकार राहून त्याच्या पासून थोडी दूर झाली आणि म्हणाली, यश आय थिंक तू पुन्हा विचार करावा अस मला वाटतंय.

त्याने न कळून तिला विचारलं, कसला विचार? काय म्हणायचं आहे तुला?

ती त्याच्या नजरेला नजर मिळवत म्हणाली, आपल्या रिलेशनबद्दल.

त्याला जोराचा धक्का बसला त्याला कळत नव्हते ती का अस बोलतेय. तो लगेच रियाक्ट झाला... काय? काय म्हणालीस तू?

ती पुन्हा तेच म्हणाली, आपल्या रिलेशन बद्दल पुन्हा विचार करावा?

पण का? काय झालं एलेना, माझं काही चुकलंय का? हे बघ जे काही असेल तू बोल ना मला. विल सॉर्ट आउट. पण डायरेक्ट अस नको बोलुस. इट्स हर्टीग मी.

ती रागाने त्याच्याकडे वळून म्हणाली, रिअली इट्स हर्तींग टू यु? अँड व्हॉट अबाऊट मी? आय एम एन्जोईंग धिस?
डिड यु रियलाईज, मी किती डिस्टर्ब आहे ते? पाहिलं तू माझ्या कडे?

यश गोंधळून गेला होता होता तो काही बोलणार तर तीच पुढे म्हणाली,

मी माझा देश, माझे मॉम डॅड सोडून इथे तुझ्या साठी आले होते ना यश, मी आपल्या रिलेशन साठीच आले होते ना इतक्या दूर. आय थॉट तू माझ्या सोबत असशील नेहमी. पण नाही अजून आपलं लग्न पण झालं नाही तर ही अवस्था मग नंतर काय होईल? डू यु हॅव आंस्वर?

यशची विचारशक्ती संपली होती . आपल्या आजूबाजूला काय घडतंय त्याला कळतच नव्हतं की नेमकं काय बोलावं. एलेना ला काय बोलायचं आहे ते त्याच्या डोक्यावरून जात होतं.

तो तसाच तिला म्हणाला मी तर सतत तुझ्या सोबतच होतो ना? मग अस का बोलतेस तू?

एलेना ने तिचे भरलेले डोळे पुसले आणि त्याला म्हणाली, रिअली तू माझ्या सोबतच होतास का?

त्यानेही न कळून फक्त तिच्या कडे पाहिले.

त्यावर ती मिश्किल हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली, खरंच विचार कर यश तू माझ्या सोबत असतानाही माझ्या सोबत होतास का?
मला नेहमी अस वाटत होतं की तू माझ्या जवळ नाहीस. नेहमी तू तुझ्या विचारात तुझ्या आठवणीत, तुझ्या स्वप्नात माझ्या सोबत नसून दुसर कोणासोबत तरी रहातोस. मी दूर दूर वर तुझ्या सोबत नसते. मला नेहमी एकटं वाटतं. कुठेतरी हरवल्या सारखं. पण तू ना कधी माझा विचार केलास ना माझ्या फीलिंग चा.

ती रडत होती तो तिच्या जवळ आला आणि तिचे डोळे पुसत म्हणाला, हे खरं नाहीये. तुलाही माहीत आहे ना माझं किती प्रेम आहे तुझ्यावर? मग का असा विचार करतेस तू? हे बघ जर काही चुकत एडेल तर सॉर्ट करू या ना आपण. अफ्टरऑल आपण लग्न करणार आहोत ना?

तिने एक मोठा श्वास घेऊन म्हटलं, लग्ना साठी खरं प्रेम असावं लागतं ना यश?

त्याने झटक्यात तिला प्रतिप्रश्न केला, काय? खरं प्रेम नाही का आपल्यात? मग हे काय आहे? आणि गेले दोन वर्षे जे आपण सोबत आहोत ते काय होत?

ती अगदी निर्विकार होऊन म्हणी कदाचित आकर्षण असेल ते.,

आता तो चिडला होता, तो आवाज चढवून तिला म्हणाला, तुला काय मी खेळणं वाटलो का? जे माझ्या प्रेमाला तू आकर्षण म्हणतेस? आयुष्य भर सोबत रहायचं म्हणून आपण लग्न करणार आहोत आणि तू आकर्षण म्हणतेस याला.

ती पण तरिही शांततेत म्हणाली, हो आकर्षणच असेल तुझ्या कडून, कारण मला तुझ्या डोळ्यात माझ्या साठी ते प्रेम कधी दिसलेच नाही.

व्हॉट रबिश एलेना. तो चवताळून म्हणाला, तू अस कसं म्हणू शकतेस?


त्यावर ती अगदी सहज म्हणाली, बीकॉज ऑफ हर…

तो आश्चर्याने पुन्हा तिला म्हणाला, कोना बद्दल बोलतेस तू?

एलेना शांततेत म्हणाली आय थिंक इट्स जाई…

विजेच्या धक्क्याने उडाव तसा झटका यश च्या मनाला बसला.

तुला कळतंय का तू काय म्हणतेस ते? जाई आणि माझ्या बद्दल असा विचार करतेस तू?

ती अजूनही तिच्या ठाम निर्धाराने म्हणाली, हो मलाच काय सगळ्यांना असंच वाटतं, आणि दिसतं पण फक्त तुला कळत नाही.

यश चिडून तिला म्हणाला, एलेना शी इस जस्ट अ फ्रेंड यार, तू असा कसा विचार करतेस?

आता पर्यंत शांत बोलणारी एलेना चिडून म्हणाली, का नाही करणार असा विचार यश? जाईच्या नुसत्या नावाने तुझ्या डोळ्यात चमक येते,उठण्या पासून झोपण्या पर्यंत फक्त जाई असते तुझ्या डोक्यात. जाईला काय आवडते, काय नाही. तीच दिसणं, हसणं, तीची छोटीशी गोष्ट पण लक्षात राहते तुझ्या. अनपेक्षित पणे तू मला आणि जाईला कंपेर करू पहातोस.

इनफ एलेना, असं काही नाहीये एलेना, प्लिज वेगळा अर्थ नको काढुस.

ओहह रियली? मी वेगळा अर्थ काढतेय? मग माझ्या प्रश्नांची उत्तरे दे मला.

विचार तुला जे काही विचारायचे ते विचार.

आपण फिरायला गेलो होतो दोघेच होतो ना, मग माझ्या बद्दल किती वेळ बोललास आठवून सांगशील का?
मॉल मध्ये शॉपिंग करताना मी किती वेळ होते तुझ्या सोबत थोडा विचार करून सांगशील का?
की तिथे फक्त जाईच होती जीच्यावरून तुझी नजर हटत नव्हती.

इथं आल्या पासून मी पहातेय तुझ जग तुझी फॅमिली आणि जाई च्या भोवती गुरफटून गेलेय मला मी कुठे आहे ते सांगशील का?

यश लग्नात गेलो होतो तिथे तुझं लक्ष माझ्या पेक्षा जाईवर जास्त होतं त्याच कारण सांगशील का?

त्या ठिकाणी जाईला कुणीतरी स्पर्श केला तर तू किती बेचैन झालास त्याच कारण सांगशील का? तउझ इतका राग मी कधीच पहिला नव्हता. पार्टीत माझ्या सोबत पण असे प्रकार घडले होते ना पण तेंव्हा तू असा रियाक्ट झाला नव्हतास कधी. पण त्या दिवशी जाई साठी, कसल्या फीलिंग होत्या त्या?

तिला काहीही झालेलं तुला सहन होत नाही ना का करतोस तिची इतकी काळजी की सोबत मी होते तेही तुला भान राहिले नाही. सांग ना यश ह्या सगळ्याच मी काय अर्थ काढावा?
तू माझ्यात पण तिलाच शोधत असतोस रे.

यश फक्त ऐकूण घेत होता. त्यालाही आता कळत नव्हते की एलेना च्या प्रश्नांची उत्तरे तिला कशी घ्यावी. कसे सांगावे तिला की जाई बद्दल त्याला नेमकं काय वाटतंय तो विचार करत होता.

एलेना त्याची तंद्री तोडत त्याला म्हणाली, यश टेक युअर टाईम अँड क्लिअर इट. नाहीतर तिघांच्या आयुष्याची वाट लागेल.

एक आवंढा गिळून तो म्हणाला एलेना मी सगळं ठीक करेन फक्त माझ्यावर विश्वास ठेव.

तिने पुढे येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, आहे. माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण कधी कधी आपलेच निर्णय चुकीचे असतात.

अस नको बोलुस, दोन वर्षे आपण सोबत आहोत ते काय होत मग?

मला ही वाटलं होतं यश पण आता वाटतंय मी तुमच्या दोघांमध्ये आले आहे.

नाही एलेना अस काही नाही ना तू मध्ये आलीस ना जाई आपल्यामध्ये येणार. मी प्रॉमिस करतो तुला.

यश प्लिज समजून घे, मी तुला थोडा वेळ देते, त्यात तू विचार कर आणि तुझा निर्णय घे.

निर्णय काय घ्यायचा तुला वाटतय ना तर आपण उद्याच एंगेजमेंट करून घेऊ मग तर झालं.

नाही यश आता ते शक्य नाही.

पण का?

यश मी आजच रात्री परत जातेय. रात्री1.20ची फ्लाईट आहे.


क्रमशः...........

thank you फ्रेंड्स जे मला रेग्युलर कमेंट्स करत आहेत. खूप छान वाटत तुमच्या कंमेंट आल्या की.
जे फोल्लोवर आहेत त्यानाही पुन्हा एकदा सांगते तुमच्या दोन शब्दांच्या कंमेंट पण लिहायला स्फुर्ती देतात.