Janu - 6 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | जानू - 6

Featured Books
Categories
Share

जानू - 6

नवरात्र जवळ आली होती ..चाळीत सर्व गडबड चालू होती..अभय तर फार उत्साहाने सर्व करत होता.चाळीच्या मधोमध असणाऱ्या काट्यावर सुंदर सजावट सुरू होती ..दुर्गा मातेची मूर्ती तिथेच बसवणार होते..चाळीत लायटिंग लावण्याचे काम चालू होते ..अभय शिडी वर उभा राहून ..लाईट लावण्याचे काम करत होता..पण त्याच सर्व लक्ष जानू कडे होत ..जानू अंगणात येऊन काही तरी करत होती..अभय च् सर्व लक्ष आता फक्त जानू कडे लागलं ..आणि त्याला कळलच नाही ..आणि तो धाडकन शिडीवरून जमिनीवर कोसळला..त्याला शॉक लागला होता..आवाज ऐकुन जानू ने समोर पहिलं तर अभय खाली पडला होता..त्याला लागलं का पहावं म्हणून ती जायला निघाली च होती की ..सर्वजण जमा झालेले पाहून ती तिथेच थांबली..शेजाऱ्यांनी त्याला उठवलं..पाणी दिलं ..कुठे लागलं का पाहू लागले ..पण सुदैवाने त्याच्या फक्त हाताला खरचटलं होत.. आजू,बिट्टू ने त्याला घरी नेलं..

इकडे जानू ने मिहिर ल बोलावलं..," दादाला जास्त लागलं का रे ?" म्हणून विचारलं तर ..," नाही दीदी फक्त थोड खरचटलं आहे ..बाकी दादा ठीक आहे ."
अस मिहून तिला सांगितलं .तिला बर वाटलं.

दुसऱ्या दिवशी सुट्टी होती ..दुपारी शेजारच्या काकूंनी जानू ला घरी बोलावलं ती गेली..काकू नी तिला फुलांच्या माळा बनवण्याच काम दिलं.. टोपली भर फुल ..इतकं कधी होणार ? मिहिर ही तिच्या सोबत होता.पण त्याला काही माळ बनवता येईना ..शेवटी ..जानू ने मिहिर ला अभय दादा ला बोलवून आन म्हणून सांगितलं..जानू ने बोलावलं आहे म्हंटल्यावर ..अभय ची स्वारी जाम खुश झाली ..पळतच तो काकूंच्या घरी पोहचला.

जानू:अरे वा ,तू काय निवांत बसला आहेस घरी ..इथे बघ किती काम आहे ?

अभय :मी काही मदत करू का ?

जानू: त्यासाठी तर बोलावलं आहे तुला..हा घे सुई धागा आणि पट पट बनवा माळा.

अभय: हो ..

अभय खूपच खुश होतो ..आज पहिल्यांदाच तो जानू समोर बसून तिला पाहू शकत होता..मिहिर त्या दोघांना एक एक फुल हातात देण्याचं काम करत असतो ..अभय दादा अस टक लाऊन दिदिला पाहत आहे हे पाहून त्याला मात्र हसू येत असत ..पण तो शांत बसून राहतो.
दोघे थोडा वेळ शांत बसून काम करत असतात ..मग अचानक जानू च अभय शी बोलते.

जानू : अभय,काल खूप लागलं का रे ?

अभय:नाही ग ,फक्त थोड खरचटलं.

जानू :पण असा कसा पडलास रे? लक्ष कुठे होत तुझं?

अभयला स्वतःवरच हसू येत होत ..लक्ष फक्त तुझ्याकडेच तर होत ..अस त्याला बोलू वाटलं ..पण त्याने तो मोह आवरला.

अभय : अग पाय घसरला आणि पडलो.

त्याने खोटच सांगितलं तिला.
बोलता बोलता .बऱ्याच माळा बनवून झाल्या होत्या. आता थोडीच फुल शिल्लक राहिली होती ..जानू ची आई तिला घरी बोलवत होती ..जानू ने तिथूनच थोडाच काम राहील आहे ..लगेच येते अस आई ला ओरडून सांगितलं..जानू ने जावू नये अस त्याला खूप वाटत होत ..पण तो थांब कसं बोलणार ..परत जानू ची आई ने आवाज दिला ..आता मात्र जानू गेली ..अभय तिथेच बसला होता ..मिहिर ही होता..जानू गेल्यावर..मिहिर ने हळूच अभय ला विचारल..

मिहिर: दादा ,तुला जानू दीदी आवडते ना रे ?

अभय त्याच्या बोलण्याने दचकला .. याला बर कळलं..मिहिर हसत होता.

अभय : हो रे ..मला खूप आवडते .पण मिहिर कोणाला सांगायचं नाही ?

मिहिर : गळ्या शप्पथ दादा मी कोणाला सांगणार नाही.

मग मिहिर आणि अभय ही पुढच्या तयारीला लागले .
सर्वांनी वाजत गाजत..दुर्गा मातेची मूर्ती चाळीत आणली ..सर्वजण गुलाल उधळून नाचत होते ..ढोल..वाजत होते मोठ्याने देवीची गाणी लावली होती..चाळीतले सर्वजण बाहेर येवून डान्स पाहत होते ..जानू ही आई बाबा सोबत बाहेरच उभी होती ..अभय चा डान्स पाहून तिला खूपच हसू येत होत..अभय तर आज खूपच खुशीत होता आजचा दिवस त्याला खूप छान गेला होता.
क्रमशः