#तू_ही_रे_माझा_मितवा.
अंतिम भाग -ला व्हिए एन रोझ!!
{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}
तू_ही_रे_माझा_मितवा...
#भाग_3८
“चला मॅडम खूप उशीर झालाय..” लॅच उघडत मोना म्हणाली.
“मोना...मी गुड नाईट म्हणून येते.” ती लाजत म्हणाली.
“कुणाला?” मोनाने जाणूनबुजून चिडवलं.
“.....त्याला,रूम नंबर ४५ ”
त्याच्या रूमकडे इशारा करत ती म्हणाली आणि गालात हसली.
“ओह्ह फायनली...ओह्ह माय गोड.”
तिने ऋतूला घट्ट मिठी मारली.
“ऋतू,पण तो उद्या जातोय असं म्हटला गं?”
मोना काळजीने म्हटली.
“नाही जाणार तो..मी जाऊच देणार नाही.”
तिने डोळे मिचकावले.
“go....”
तिच्या केसांवरून हात फिरवत ती म्हणाली.मोना आत निघून गेल्यावर तिच्या काळजात धडधड..कबीरला कसं सांगायचं,काय बोलायचं ह्याची कितीतरी वेळा मनातल्या मनात पारायण झाली, दीर्घ श्वास घेत तिने बेल वाजवली.
एकदा,दोनदा..तिसऱ्यांदा...काहीच रीस्पोंस नाही.फोन ट्राय केला,उचलला नाही.तिने जरावेळाने पुन्हा बेल वाजवली.
ह्यावेळी आतून हालचाल जाणवली.
तिचं हृदय दुप्पट वेगाने धडधडत होतं.त्याने दरवाजा उघडला.
डोळे पूर्ण जडावलेले.अर्धवट मिटलेले.पूर्ण विस्कटलेले केस.
ती आत येणार तसं त्याने तिला बाहेरच थांबवलं.
“प्लीज गो.” रमचा तीव्र वास तिला लगेच कळला.
“Are you drunked?” तिने नाखुशीने विचारलं.
“Ya I am..! Please leave”
तो तसचं डोअरफ्रेमला डोकं टेकून,वाक्य जुळवत बोलला.
तिचं लक्ष आत गेलं सगळं समान रूमभर पसरलेलं होतं.कपडे थोडे बॅगेत, थोडे बाहेर कसेही फेकलेले होते.
ती त्याला बाजूला करून आत गेली.
“हे काय ये कबीर?”
तो खुर्चीवर बसला.डोकं दोन्ही हातांनी गच्च दाबून ठेवलं होतं.
तिने त्याचे कपडे आवरायला सुरुवात केली.
तिच्या फोटोंच्या फ्रेम काही बॅगेत, काही बेडवर त्यावर ऋजा लिहलेलं.
ती बघतच राहिली.हे कधीपासून आहेत ह्याच्याकडे? तिला आश्चर्य वाटलं.
त्याचे कपडे व्यवस्थित ठेवले ,त्याची बॅग लावून तिने बाजूला ठेवली.
त्याच्यासमोर खुर्ची ओढून बसली,त्याच्या केसांमधून हात फिरवत त्याला शांत करायचा प्रयत्न केला.
“बॅग का भरत होतास? मी पाठवलेला मेसेज वाचला तू ? समजला ना तुला?”
“ऋजू प्लीज लिव्ह..this is not right..!” तो उठला,त्या अवस्थेतही तिच्या हाताला धरून त्याने जड पावलांनी तिला दरवाजाकडे नेलं.
“Whats not right Kabir? What happen tell me,I am not going .” ती दरवाज्याजवळ थांबली.
ती ऐकत नाहीये पाहून तिच्या बोटांमध्ये बोटं गुंफत तिला त्याने दरवाज्याला धडकवल,तिच्या डोळ्यात बघत तिच्या चेहऱ्यावरून हलकेच हात फिरवला.
“Go otherwise I will kiss you..!” तिच्या कपाळावर डोकं टेकवत,डोळे मिटून घेत तो म्हणाला.
“kiss me!!” त्याच्या हनुवटीला धरून तिने त्याच्या चेहरा तिच्यासमोर धरला.
तो तिच्या डोळ्यात बघत राहिला,त्याचे डोळे भरून आले होते. तिला त्याने बाजूला केलं.
“मला तुझ्या कुठल्याच दुःखचं कारण बनायचं नव्हतं ऋजा,मी आलो आणि तुझं सरळसोप्पं आयुष्य भरकटलं.I am responsible dam it.Now everything will be ok मी त्याला सांगितलंय हं तुझी काळजी घ्यायला.” भिंतीला टेकून उभा होता आणि नशेत बडबडत होता.
“कबीर...तू शुद्धीत नाहीये,तू झोप.” तिने त्याला जरा ताकदीने बेडवर बसवलं.
“ऋजा तो व्यवस्थित काळजी घेईल ना तुझी...?” तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला.
“कबीर..काय बोलतोय?”
“तुझ्या डोळ्यात जर पाणी आणलं तर मारामारी!....you तो know ना I just love ......”
तिच्या खांद्यावर डोकं ठेऊन तो अर्धवट बोलला.
डोळे बंद होते.
तिने त्याला व्यवस्थित झोपवलं.झोपेत अगदी निरागस दिसत होता.त्याच्या गालांवर ओठ टेकवायची इच्छा तिने आवरती घेतली. तिला तिचंच हसू आलं.
सकाळी भेटल्यावर वेदविषयी झालेला गैरसमज कसा दूर करायचा याचा विचार करतच ती बाहेर आली.
*****************
वेदच्या येण्याने काळजावरचं ओझं हलकं झालं होतं.
तिला पहाटेच जाग आली.ती जरावेळ बाहेर गॅलेरीत आली.अजूनही अंधार होता.वेगवेगळ्या पक्षांचे आवाज आसमंतात भरून राहिले होते.
चांदणं जरावेळाने कूस बदलवून झोपी जाईल आणि उजेड पडेल.जंगलाचा गोडसर आणि जलाशयाचा पाणकळा असलेला संमिश्र वास पहाटेला सुगंधी बनवत होता.
हे तर रोजच असतं पण आज प्रेमाची जाणीव आणि ती स्वीकारण्याची हिंमत ह्या दोन्हीही गोष्टीमुळे सगळं विशेष वाटत होतं.
कबीरला आताच भेटायचं ह्या एकच जाणिवेने ती मोहरली होती. कबीरला भेटायचंय हा विचार येताच तिने घाईघाईने आवरायला घेतलं. जरावेळाने तयार होतांना आरश्यात बघून स्वतःच लाजण्याचे उद्योग चालू होते.
ओलेते दाट आणि खाली सोफ्ट कर्ल केलेले केस,प्रेमाच्या रंगात उजळून निघालेला सतेज गव्हाळ रंग...आणि गर्द कॉफी रंगाचे डोळे.
त्या डोळ्यात काजळ रेखतांना होणारी हातांची थरथर.वन शोल्डर बेबी पिंक टोप आणि त्यावर बारीक फुलांची सुन्दर प्रिंट असलेला फ्लेयर्ड लॉंग व्हाईट स्कर्ट.हलकीशी लिपस्टिक आणि कबीरच्या प्रेमात गुलाबी झालेले गाल.
तिचा फोन वाजला तसं ती भानावर आली.पलीकडे वेद होता.
“निघतोय..बाहेर येतेस का?”
“आले..”
मोनाला बळजबरिने उठवून ती फोन घेऊन बाहेर पडली.
कबीरच्या रूमकडे एकवार बघून तिला आज वेगळंच समाधान वाटलं.
ती पार्किंगमध्ये आली.अगदी हलकसा उजेड पसरला होता. तेवढ्यात वेद ही मागून आला.त्याने गाडीत बॅग ठेवली.
“चलो...फायनली काहीतरी संपल्याची तरीही उरून राहण्याची जाणीव काय असते ते आज कळलं.लौकिक अर्थाने प्रियकर प्रेयसीसारखं प्रेम आता जिव्हाळा बनून उरणार ..हो ना?” तो हसत म्हणाला.
“हो...वेद खूप कमी नात्यांना हे सुंदर वळण मिळतं,आपण भाग्यवान आहोत.”ती हसून म्हणाली आणि जरा बाजूला वळली.
तिचं लक्ष गेलं, कबीरची गाडी नव्हती.तिने घाबरून पार्किंगमधल्या वॉचमनला विचारलं.
“दादा इथली गाडी?”
“मॅडम ते कबीर साहेबांची गाडी ना? तुम्ही इथे आले त्याच्या थोडं अगोदर गेले बघा.”
तिच्या हाता पायातला त्राणच गेला.तिने घाईघाईने त्याला फोन लावला.त्याने उचलला नाही.
तिचे डोळे भरून आले.
“वेद त्याला काल वाटलं की आपण पुन्हा एकत्र आलो आहोत,रात्री मी भेटायला गेले तेव्हा हेच बडबडत होता,फोन पण उचलत नाहीये.स्टुपिड!” तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.
“ये... प्लीज रडू नको,चल गाडीत बस.जास्त दूर गेला नसेल तो.इकडे काही वर्दळही नाहीये रस्त्यांवर,तुला फूलस्पीडने पोहचवतो.बस लवकर.come on.”
त्याने गाडी वळवली आणि तो निघाला.पूर्ण रस्त्यावर धुक्याची चादर होती.गाडी वेगाने पळवता येत नव्हती.तरीही अदमास घेत तो पूर्ण प्रयत्न करत होता.ती सारखी फोन लावत होती,तो उचलत नव्हता.तिचा धीर सुटत चाललेला.
इकडे त्याचीही परिस्थिती दोलायमान...डोळे डबडबलेले समोरचं, बाहेरचं धुक्यात भिजलेलं वातावरण,उथळ दरीच्या काठाकाठाने जाणारा रस्ता..मनात एकच...शेवट हाच होणार होता मग दुराव्याचं जहर इतकं का भिनतंय?
इकडे तिच्या आसवांना खंड नाही.
“तू त्याला कालच का क्लियर केलं नाही ऋतू.”
“मी त्याला त्याच्याच बंदिशच्या भाषेत समजावलं होतं वेद...त्याने तो मेसेज बघितलाच नाही.” ती हुंदके देत म्हणाली.
जरावेळाने धुकं विरतंय असं वाटून त्याने अजून जरा स्पीड वाढवला.गर्द जंगलात,वळणावळणाच्या रस्त्यांवर फक्त त्यांची गाडी.जरावेळाने वेदच्या नजरेच्या टप्प्यात एक गाडी आली.
“ऋतू ती बघ,ती गाडी आहे का कबीरची?” ती सारखा त्याचा मोबाईल ट्राय करत होती,त्याच्या बोलण्याने एकदम भानावर येऊन तिने काळजीपूर्वक बघितलं.
“हो वेद, ती त्याचीच गाडी आहे.” तिच्या चेहऱ्यावर क्षणात ऊन पसरलं.
त्याने जरा स्पीड वाढवला.त्याच्या टप्प्यात गाडी आली तेव्हा त्याने हॉर्न दिला.नंतरही बराचवेळ तो हॉर्न देत राहिला.
वेदने एक रुंद वळण बघून त्याच्या गाडीला ओव्हरटेक करून त्याची गाडी अडवली.कबीरची गाडी थांबली.
वेद सुस्कारा देत सीटला मागे टेकून बसला.
कबीर बाहेर आल्याच पाहून झटक्यात सीटबेल्ट काढून तो बाहेर आला.ती रागात आत तशीच बसून होती.
“मिस्टर कबीर मोबाईल बघतात का जरा?” वेद चिडला होता..
कबीरने जाकेटच्या खिश्यातून मोबाईल काढला आणि चेक केला.कितीतरी मिसकॉल्स होते.
“अक्च्युली..सायलेंटवर होता कळलं नाही,चुकलंच जरा तुम्हाला भेटून, विश करून जायला हवं होतं पण अर्जंट काम आलं सो निघालो.सॉरी” तो अडखळत बोलला.
“ब्रो,काय विश करणार होतास ? तू ऋतूला कधी जाणून घ्यायचा प्रयत्न तरी केलास का? तिच्या डोळ्यात काय दिसतं तुला? तू तिच्यासोबत असण्याचा प्रयत्न करायचा सोडून तिला एकटं टाकून का जातोस? तूच बोललास ना काल ती नादान आहे,मग तुला तिची नादानी कळत नाही? आमचं ठीक आहे आम्ही आहोतच उथळ पण तू तर सारासार विचार करू शकतोस ना?”
“म्हणजे?” त्याचेही डोळे भरून आले होतेच.
“म्हणजे तुझी अमानत आहे तूच सांभाळ..मला उशीर होतोय.” वेद गाडीकडे वळला.दरवाजा उघडून त्याने हात धरून ऋतूला बाहेर काढलं, ती प्रचंड संतापली होती, कबीरकडे न बघता तशीच उभी होती.
“ऋतुजा हे तुझं त्या वाढदिवसचं गिफ्ट ...सांभाळ” तिच्या डोक्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवून तो गाडीत बसला आणि निघून गेला.
त्याच्याही डबडबलेल्या डोळ्यांना आता रस्ता दिसत नव्हता. थोडं पुढे आल्यावर गाडी थांबवून त्याने मनसोक्त रडून घेतलं.खूप मोठ्ठ ओझं उतरल्यासारखं त्याला झालं.
”कदाचित क्षणार्धात आपलं आयुष्य सोप्पं करून टाकणारा आपला मितवा कोण असतो हे आपल्याला कधीच कळत नाही.”
**********
मोठ्या रुंद वळणाला त्याने त्याची गाडी बाजूला उभी केली होती. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक उथळ दरी आणि व्हॅली पॉईंट कडे जाणारा बोर्ड.बऱ्यापैकी उजळलं होतं.दरीत सोनेरी ढगांचे पुंजके आणि त्यावर पांघरून घालणारं धुकं साचलं होतं.
ती अजूनही तिथेच दूर उभी होती.आजूबाजूचा परिसर पूर्ण झाडांनी वेढलेला.मधूनच होणारी झाडांची सळसळ.थंडगार वातावरणाने अंगावर काटा येत होता.एक शोल्डर ऑफ असल्याने जास्तच थंडी वाजत होती.तो गाडीला टेकून उभा,तिच्याकडे फक्त बघत होता. अंगात मस्टर्ड रंगाचा डर्टी वॉश टीशर्ट, डार्क ब्लू जीन्स आणि जॅकेट.तो जॅकेट काढून तिला देणार तसं तिने डोळे पुसले.
‘तिथेच थांबायचं कबीर...अजिबात बोलायचं नाही आणि मागे पण यायचं नाही.”
रागात रस्ता क्रॉस करून ती व्हॅली पॉईंटकडे निघाली.
थोडं पुढे गेल्यावर एका सुंदर पॉईंटला रेलिंगने कव्हर केलेलं होतं आणि समोर निसर्गाचं भरभरून वरदान...फेसाळणारे ढगच त्या प्याल्यात भरून होते.तिच्या मागून तो आलाच.ती जागेवरूनच ओरडली.
“Stop,तिथेच थांबायचं.”
“तो शेजारच्या झाडाला टेकून तिथेच थांबला.तिचे लाडिक नखरे बघून.चेहऱ्यावर जरासं हसू.
“हसतोय तू ? मोबाईल बघतो का जरा.” ती प्रचंड चिडली होती.
“ऐक..प्लीज.” तो भावनांनी ओथंबलेल्या,जड झालेल्या आवाजात म्हणाला.
“स्टॅच्यु...एकदम स्टॅच्यु.” ती जागेवरून ओरडली.
जरा जरा थंडीने कुडकुडत उभी असलेली.डोळ्यात क्युटसा राग.ऑफ शोल्डरमुळे उठून दिसणारा टॅटू.
आणि त्याच्या चेहऱ्यावर जरासं हसू.
तिच्या फोनमधून त्याला पाठवलेली लिंक तिने ओपन केली.
प्रभा अत्रेंच्या आवाजातली बंदिश त्याने लगेच ओळखली.
“जमुना किनारे मोरा गाव , सावरे ऐजैयो सावरे”
एवढे ऐकवून तिने ते बंद केलं.
“तू म्हटला होतास ना,राधेला प्रेमाची जाणीव होते तेव्हा ती त्याला यमुना किनाऱ्यावर बोलावते,मग का नाही बघितला तू हा मेसेज? बोल...”
त्याने फक्त खांदे उंचावून स्टॅच्यु असल्याचं तिच्या लक्षात आणून दिलं.
“अरे तू स्टॅच्यु आहेस नाही का...ओके..! आज मी बोलणार तू फक्त ऐकायचं.”
त्याने गोड हसून मानेनेच होकार दिला.
तो हाताची घडी घालून,झाडाला टेकून तिच्या गोंडस चेहऱ्यावर नजर खिळवून उभा होता.
“तर....तू द मिस्टर कबीर...!
खूप फिलोसॉफी मांडत असतोस ना,क्युटसं बोलून मला माझ्या पासून दूर करतोस हो ना?
तू आता माझी फिलोसॉफी ऐकायची...
मला नेहमी बंदिशीत बंद करतोस, आज फक्त माझं गाणं ऐकायचं.
तू दूर होतास तेव्हा स्वप्नांत तुला कितीतरी वेळा हे सांगून झालंय ऑलरेडी पण आता समोर ऐक-“
तिने झरझर मोबाईलवर बोटं फिरवले आणि गाणं लावलं-
Hold me close and hold me fast
The magic spell you cast
This is "La vie en rose"
When you kiss me, heaven sighs
And though I close my eyes
I see "La vie en rose"
When you press me to your heart
I'm in a world apart
A world where roses bloom
And when you speak, angels sing from above
Everyday words seem to turn into love songs
Give your heart and soul to me
And life will always be
"La vie en rose"
ला व्ही एन रोझ....ही माझी फिलोसॉफी आहे तुझ्यासाठी.
माझं आयुष्य कुठेतरी प्रेम असण्या नसण्याच्या समेवर असतांना तू आलास.. ला व्ही एन रोझ..! तेव्हा मी ह्या आयुष्याला गुलाबी रंगात पाहिलंय...!
त्या समुद्राच्या काठावर आपल्यात हेलकावे खाणाऱ्या पडद्याच्या पलीकडून ह्या डोळ्यांनी तू हा जो काही माजिक स्पेल केला होतास ना त्या निळ्या समुद्राच्या निळाईची शपथ मी ह्या आयुष्याला गुलाबी रंगात पाहिलंय...!
कबीर,त्या मंदिरात फुलं तोडतांना मला नकळत उचलून घेतलं होतंस तेव्हाच कुठल्यातरी क्षणांत मी ह्या आयुष्यातून समांतर आयुष्यात निघून गेली असावी, त्या गाभाऱ्यात ती शुभ शकुनांची पांढरी फुलं ठेवतांना माझे विचार शून्य होते,त्या शुभ्र फुलांची शपथ..कदाचित तेव्हा मी ह्या आयुष्याला गुलाबी रंगात पाहिलंय...!
ते मचाण,ती आयुष्य जोडणारी सावळी संध्याकाळ..समोरची हिरवळ आणि मावळतीचे गहिरे केशरी रंग. त्या क्षणी कुठल्या हक्काने तू ओठ टेकवले माहित नाही,त्या एका क्षणांत तुझ्यानावे आयुष्य झालं होतं कबीर,तुला कसं कळलं नाही?
माझे बंद डोळे आणि बाहेर इतक्या रंगांची उधळण,..तरीही बंद पापण्यांच्या आड मी ह्या आयुष्याला गुलाबी रंगात पाहिलंय...!
कबीर तू बोलायला लागलास की मेल्ट होते..तुझ्या प्रत्येक वाक्यावर मी फिदा होते,तुझ्या विस्कटलेल्या मेसी फ्रिन्ज केसांमध्ये माझं मन गुंतून पडतं, एंजल लाईक फील होतं आणि तुझं बोलणं म्हणजे एक सुरेल बंदिश एखादं प्रेमगीत असल्यासारखं माझ्यात कायम जिवंत असतं.कालपर्वाचा तो सूर्यास्त,त्या दिवशीचा ते चांदण्यात न्हालेलं चंदेरी जलाशय तुझ्या ह्या हेझल रंगाच्या डोळ्यांमध्ये उतरलं होतं,ह्या हेझल रंगातही मी ह्या आयुष्याला गुलाबी रंगात पाहिलंय...!
कबीर माझा आत्मा,माझं हृदय,मी स्वतः पूर्णपणे तुला केव्हाच समर्पित झालीय.तुझ्या रंगात रंगून सगळे रंग एक होऊन देखील शेवटी मी ह्या आयुष्याला फक्त तुझ्यासोबत गुलाबी रंगात पाहिलंय...!”
तिचा आवाज पूर्ण भिजला होता,गालांवरून ओघळणारे अश्रू जणू गुलाबी झालेले.
तो स्तब्ध उभा...तिने पुन्हा डोळे पुसले.
स्कर्ट सावरून प्रपोजच्या परफेक्ट पोझमध्ये बसली.
“मिस्टर कबीर सरदेसाई.....तुम्ही इन्फिनिटी खडूस आहात...तरीही माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि किती आहे ते मी कदाचित कधीच सांगू शकणार नाही.तुझ्यासोबत असलेला माझा प्रत्येक क्षण काय ,प्रत्येक श्वास halcyon आहे......मी नादान आहे बालिश आहे..इम्पेशंट,अवघड,किचकट अशी काहीसी, आय ऍम अ परफेक्ट रॉयल मेस...तुला ही नादानी आयुष्यभर सहन करायला आवडेल? कबीर सरदेसाई will you marry me?”
क्षणभर शांतता. दोघांच्या डोळ्यात एकमेकांत विरघळण्याची ओढ.
त्याने तिला मिठीत घेण्यासाठी त्याचे हात पसरवले.
“ना....उत्तर दे. बोल काहीतरी otherwise I will kiss you!”
ती डोळे पुसत म्हणाली.
“Come on..kiss me !”.
ती उठली आणि त्याच्यापर्यंत धावत जाऊन तिने उडी मारली,त्याने अलगद तिला वर मिठीत उचलून घेतलं.
रडतच ती त्याच्या भारदस्त मिठीत विसावली,तिच्या गुलाबी ओठांना हक्काने आपलसं करून तिच्या प्रश्नाला त्याने ओठांनीच उत्तर दिलं होतं.
त्याच्या ओठांवरचा हा गोड होकार कितीतरी वेळ ती टिपत राहिली.त्यात कितीतरी विरहाचे क्षण वितळत होते,आठवणी उतरत होत्या.बंदिश सुरात बांधल्या जात होत्या.
तिच्या गुलाबी ओठांवर त्याचेही विरहाचे जहरिले क्षण गोड झाले होते. भानावर आली तेव्हा त्याच्या डोळ्यात पाहून तिला क्षणभर त्याच्या इतक्या जवळ असण्यावर विश्वासच बसला नाही.
लाजून त्याच्या कुशीत स्वतःला लपवायचा प्रयत्न करत होती.
तिची हनुवटी जरा वर करून तिच्या डोळ्यात बघायचा प्रयत्न करत होता,तिने नजर चोरली.
एरव्ही कधी न होणारी गोड धडधड जाणवली.
“इतकं लाजायचं मिसेस कबीर सरदेसाई?”
ती अजूनही त्याच्या मिठीत होती,तिच्या दाट केसांमधून हात फिरवत,तिच्या गालांवर ओठ टेकवत तो हळुवारपणे म्हणाला.त्याचं ते बोलणं ऐकून ती मोहरली.
“एक मिनिट...” त्याने पाकिटातून तिचं अंक्लेट काढलं तो खाली बसला.
“पाय पुढे कर..” तिने आश्चर्याने स्कर्ट जरा बाजूला केला.
त्याने तिच्या पायात अंक्लेट घातलं.तिच्या चेहऱ्यावर आता उगवतीचे रंग चढत होते,केसांत कोवळा प्रकाश माळला जात होता.
ती त्याच्या शेजारी बसली.त्याने तिला एका हातच्या कवेत घेतलं होतं,त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन तिने डोळे बंद करून घेतले.
“हे तू सांभाळून ठेवलं होतंस?”
“मी तुला म्हटलं होतं ना प्रेमाच्या बाबतीत माझी फिलॉसॉफी आहे-Koi no yokan...!
मी तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो ऋजू जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं होतं...तेव्हापासून फक्त तू आणि तूच आहेस...ह्या सहा महिन्यात तर तुझ्यापासून दूर जाऊन जास्त तुझ्यात हरवलो होतो,बस आता एक क्षणही दूर जाऊ देणार नाही.हा आपला दोघांचा होल्सियन मोमेंट आहे.”
तिच्या किंगफिशरच्या टॅटूवर ओठ टेकवत तो म्हणाला.
मावळतीच्या सूर्याने एकत्र आणलेले दोघं शेवटी उगवत्या सूर्याच्या साक्षीने एक झाले होते.
चांगल्या गोष्टींना सगळेच ऍक्सेप्ट करतात,आपल्यातला रॉयल मेस जो स्वीकारतो तोच मितवा..!
आयुष्यात येणारे सगळे रंग जो प्रेमाच्या रंगाने रंगवून टाकतो, ज्याच्या स्पर्शात,ज्याच्या फक्त सोबत असण्यात आणि कधी कधी नसण्यात ही आयुष्य कम्प्लीट असल्याची जाणीव आहे तोच मितवा...!!
ज्याच्या नजरेने आयुष्य प्रेमाच्या गुलाबी रंगात रंगून जात असेल आणि जेव्हा केव्हा ही फील करणार La Vi En Rose…!!
तेव्हा त्याचा हात पकडून त्याला सांगायला वेळ करू नका-
“#तू_हि_रे_माझा_मितवा.”
*****समाप्त*****
©हर्षदा
तुम्हा वाचकांची कथा तुम्हालाच अर्पण- तुम्ही कथेला प्रेम दिलं,मला लिहायला,कथा पूर्ण करायला तुम्ही प्रोत्साहित केलं..ही कथा तुमच्याशिवाय कुणाला अर्पण करणार?
यातलं जे काही सुमार आहे ते माझं आणि उत्तमोत्तम लिहून घेतलं ते तुमचं आहे.
एक वर्ष दोन महिने चाललेली कधी मध्येच थांबलेली ही सोबत,तुमच्या सोबतचा हा प्रवास माझा होल्सियन प्रवास होता.
गोष्टीला शेवट नसतोच ती चालूच राहते पण आपण थांबायचं,पात्र त्यांच्या समांतर जगात जगत राहतात..कायम!
ऋतू,कबीर वेद तिघांना निरोप देतांना काय फिलिंग आहे हे जवळपास २५० पानं,लाखभर शब्द लिहणाऱ्या लेखिकेला आज सुचत नाहीये,कदाचित विश्वास आहे तुम्ही समजून घेणार.
एक पोकळी जाणवतेय..काहीतरी हातातून सुटून दूर निघून गेल्यासारखं वाटतंय...तरीही एक नम्रपणे नमूद करू इच्छते,याचा दुसरा भाग,दुसरं पर्व असं काही असणार नाहीये.किंबहुना माझ्या कुठल्याच कथेचं नाही.
कथा तिच्या शीर्षकात जाऊन एकरूप होते तेव्हा शेवटाचा पूर्णविराम देणं ही मी माझ्यातल्या लेखिकेला घातलेली अट आहे.
अशा करते तुम्ही समजून घ्याल...नवीन कथेसोबत भेटूच पण ही कथा संपल्यावर येणारी रितेपणाची जाणीव......अवघड आहे!!
तरीही तरीही.......हे रितेपणातलं दुःख,अश्रू इतके गोड नि जहरीले का असतात खांसाहेब ?
ज्यांची स्टोरी पूर्ण झाली,ज्यांची अपूर्ण राहिली त्या मितवामधील माझ्या सर्व पात्रांना....गुड बाय!!
Au revoir !!!
Copyright©2019 हर्षदा
All rights reserved. No part of this story may be reproduced or used in any manner without the prior written permission of the copyright owner, except for the use of brief quotations in a review.