Ek Saitaani Ratra - 1 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 1

The Author
Featured Books
Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 1

माझी पाहिलीच कथा मला शुद्धलेखन बदल काहीही माहिती नव्हत!माझा पाहिलाच प्रयत्न.... त्यात थोड्याफार चूका आहेतच.ह्या कथेत... पण कंडार मध्ये.... मात्र अशा चूका सापडणार नाहीत....🙏🏾🙏🏾🙏🏾
 
मध्यरात्री 1:45 अद्यात जंगल
 
रात्रीची वेळ अंगात सफेद रंगाची टीशर्ट आणि खाली निळी जीन्स व पयात चप्पल बूट वगेरे काहीही नव्हत . त्या युवकाला पाहून त्याc वय जेमतेम 19 असाव तो जंगलात एकटाच पळत होता .पळतावेळेस कधी तो पाठिमागे तर कधी पुढे पाहत होता.काय माहिती तो का पळत होता. कोणाची भीती होती त्याला . कोण पाठलाग करत होत त्याच. का तो आस कावराबावरा होउन पळत होता .असच पळता पळता त्याच पाय कशात तरी अडकून तो धडाम....................कन पडला .खुपच जोरात पडल्या मुले त्याच्या तोंडा ला मार बसला नाक फुटले व नाकातून रक्तची धार लागली.
भल भल रक्त वाहू लागल .तरी सुध्दा त्याला त्या जखमांचे काहिच वाटले नाही. एक वेळ त्याने पुन्हा मागे वळून पाहिल की कोणी आहे तर नाही. त्यांनी ऊभे राहण्याचं प्रयत्नही केल पन पाय एका झाडाच्या खोडात अडकल्या मुले मुरगळून पायाची साल्टी निघून रक्त वाहुन जमीन पुर्ण लाल होऊन गेली होती. अंगात जेवढी ताकत शिल्लक होती तेवढी तर धावण्यातच व्यर्थ गेली होती.तरी सुध्दा एक शेवटचा प्रयत्न म्हणून कस बस स्वतच शरीर त्याने हलवल आणि त्या झाडाखाली पाठटेकून बसला जंगल असल्या मुळे झाड खुप मोठ होत .असच 2 मिनीट झाली आस्तील की तोच कुचबुजन्या चा आवाज आला .....
 
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
काय रे तुमच्या आईची................ लेकानो काय माणूस खायचाच माहितीहे का तुम्हाला हा साले फ़ट असा एक काना खाली मारण्याचा आवाज आला आणि
त्या युवका ने हळुच झाडाच्या मागच्या बाजूला पाहिलं तर तिथे 5 माणस होती पन त्या माणसा मधे जो माणुस त्या 4 जणांशी संवाद सादत होता तो सोडून ती 4 मणुष्य खूपच विचीत्र वाटत होती कारण त्या सर्वांचा चेहरा सरल नाक जस चेटकीणिच आसत आणि डोळे तर गोल जस की एक रुपया च्या नाण्या येवढे मोठे आणि दात एकदम पिवळे आणि डोक्याच्या वर मोठे वाढलेले केस आणि सरड्या सारखी जीभ . आणि कपाळावर मोठा गोल घुमट थोड विचीत्र च होते ते आणि त्यांचा अवतार ही .एकाच्या हातात धनुष्य होत दुसर्याच्या हातात चाकू आणि कोय्ता की ज्याला थोडस रक्त लागल होत.आणि तिसर्याच्या हातात एक मोठी . gasoline petrol chain saw tree cutting machine
की जी पुर्ण रक्ताने माख्ली होती व त्या धार धार पातान वरुण थेंब थेंब रक्त
पडत होत अस वाटत होत की रक्त ताजेच आहे. आणि चौथ्याच्या पेहरावा वरुण आस वाटत होत की तो एक शेफ आहे chef jacket घातल होत त्या वर रक्त नी फक्त रक्त लागल होत व हातात एक चमच्या होता.खुपच विचीत्र आहे की नाही हे सर्व. ही अशी माणस सुध्दा असू शकतात ह्या काळात आतापुढे पाहुयात >>>>>>>>>
जर तो जंगला बाहेर पडला तर तुम्हा राक्षसांच काही खर नाही.
जा गवसा त्याला कच्चा खाऊन टाका जा माझ्या राक्षसांनो जा.
तो माणूस पुन्हा म्हणाला हो हो..... करत सर्व त्या युवकाल5 शोधायला निघाले
इकडे झाडामागून तो युवक हे सर्व पाहत होता पन तो माणूस जो त्यांच्याशी बोलत होता त्याचा चेहरा दिसू शकला नाही पन त्या इसमाचे केस सफेद होते आणि पोत्याच्या सूटल होत व वत्याच्या शरीरयष्टि वरुण तो वयस्कर वाटत होता आणि त्याच्या डाव्या हाता वर राक्षसाची मूर्ती असलेला टेटू होता.जे त्या युवका ने पाहिल होत .
 
पुढे>>
 
त्या युवका ने आता कसला विचार न करता शरीरात जेवढी होती नाही तेवढी ताकद लाऊन स्वताला ऊभ केल आणि लंगडतच चालु लागला . जर माणसाला स्वातच मरण पुढे दिसत असेल तर तो त्या परिस्तितीतून वाचण्यासाठी कोणत्या ही थराला जाऊ शकतो.
पुढे >>>>>>
10-15 मिनिट चालून झाल्यावर त्या युवकाला गाडी च्या हॉर्न चा आवाज आला
इथे जवळच कुठेतरी highway असायला हव मला थांबून चालणार नाही
त्या युवकाने स्वतःला अस म्हणत लंगडतच चालु लागला .
तो युवक 20-25 पावल चालत गेला नाही की तोच पाठिमागे पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले नी त्या युवकाने स्वताला लपवण्यासाठी एका काळोख्या जागेचा आसरा घेतला आणि एका खड्यात लपून बसला ती चार राक्षस आता त्या युवकाच्या पासुन फक्त 20मीटर लांब होती.ते सर्व आता त्याला कधी ही पकडू शकत होती.पन थोडी फार चूक ही त्या युवकाचा घात करू शकत होती. आणि एक चूक त्या युवका कडुन होउन च गेली
त्या युवकाच्या पायाला झालेल्या जखमेतून रक्त पडत होत.आणि तीच मोठी चूक तो युवक करुन बसला.जर त्याने जखमेवर कोणत कापड वगेरे बांधले असते तर बरे झाले असते .
 
आरे हे बगा रगत पडलय जमिनिवर .त्या चौघांच्या मधुन एक जण म्हणाला
तस सर्वानी खाली पाहिल.आणि एकाने खाली वाकुन रक्ताचावास घेतला
ताज हे ताज हे रगत इथच लपलाय तो लपंडाव खेळतो काय आमच्या बरोबर हा हा हा हा हा करत सर्व हसु लागली .ये सश्यला जिवंत पकडा मेजवानी बनवायची आहे.तो चेफ जैकेट घातलेला राक्षस म्हणाला .
चाकू व कोय्ता घासत ये तेचे हात पाय तर मीच कापणार जाम धार करुन ठेवलिये कोय्त्यला तो राक्षस आजुबाजूला पाहत म्हणाला त्याची ती भेदून टाकणारी नजर पाहून तर त्या युवकाची बोबडीच वळली त्याने भीतीने एक आवंढा गिळला आणि खड्यातून पुन्हा थोड वर पाहिल. तर आता ती 4 राक्षस तिथे त्या जागेवर नहव्ते .4- 5 मिनट खड्यात च काढल्यवर पूर्ण खात्री झाल्यावर त्याने हलकेच खड्यातून चारी दिशेला पाहिल व .बाहेर आल्यावर
ज्या दिशेनी ट्रक च्या हॉर्न चा आवाज आला त्या दिशेने एक एक पाऊल पुढे ताकत चालू लागला 15-20 मिनिट चालून झाल्यावर त्याला समोर highway दिसु लागला.highway पाहून त्याच्या जिवात जीव आला . 20-22 मिनिट झाले पन अद्याप एक ही गाडी किवा ट्रक येताना नाही दिसला . मग तो थोड आडबाजूलाच लपून बसला की कोणाला दिसु शकणार नाही.
 
मध्यरात्री 3:00
 
 
थंडी चांगलीच बहरली होती धुक तर अस पडल होत की समोरच काहीही दिसत नव्हत.अशातच धुक्यातुन 2 headlights चा प्रकाश दिसू लागला भ्र्र्र्र्र्र्र्र"भुर्र्र्र्र्र्र म आवाज करत धुक्याला चीरत एक ट्रक बाहेर आली. पुढच्या ड्राईव्हिन्ग सीटवर एक वयस्कर माणूस बसला होता वय जेमतेम 55-56 अस्तील अंगावर एक निळ्या कलरचा थंडीपासुन वाचण्या साठी एक फुल स्वेटर घातला होता .आणि खाली एक काळ्या रंगाची पँट होती
त्या युवकाने ट्रक ला बघताच एक आशेचा किरण त्याला दिसु लागला.त्याने ट्रक ड्राइव्हर ला हात धाकवत थांबन्याचा इशार केला .ट्रक ड्रायव्हर ट्रक थांबवली त्या युवका ला एकदा दोनदा खालून वर पाहायल नाक फुटून पूर्ण चेहरा रक्ताने माखला होता त्याची सफेद टीशर्ट रक्त लागल्याने लाल झाली होती . निल्या जीन्सला माती लागली होती व काटया कुट्यातून धावल्या मुले जागोजागी जीन्स फाटली होती .असा हा त्याचा अवतार पाहून तो ट्रक ड्रायव्हर म्हणाली की
काय रे ये पोरा येवढ्या रात्री जंगलात आणि हे नाकातून रक्त पडतय तुझ्या.
आता खर खर सांगतो का लावू पोलिसाना फ़ोन मोबाइल हातात घेऊन तो ट्रक ड्रायव्हर म्हणाला.
तसा तो युवक थोडा रडकुंडीचा चेहरा करतच नाही हो काका मी काही केल नाही pls मला आधी ट्रक मधे बसू द्या मी तुम्हाला सगळ सांगतो सर्व रस्त्यात. अस म्हणतोस ठीक आहे म ये बस त्या ट्रक ड्रायव्हर ने दरवाजा खोल्ला आणि त्या युवकाला ट्रक मध्ये बसायला जागा दिली.
काका pls तुम्ही लवकर ट्रक चालु करा ना मी तुम्हाला रस्त्यात सगळ सांगतो नाय तर ते येतील...........................................................
काय म्हणालास कोण येतील तो ट्रक ड्रायव्हर म्हणाला.
क्क्क्क्क्क काय नाही तुम्ही चलाना इथुन pls तो युवक थोडा घाबरतच म्हणाला. तस त्या ट्रक ड्रायव्हर ने चावी फिरवली भ्र्र्र्र्र्र्र्र्र्र.......... इंजिन चा आवाज पन ट्रक
नाही चालु झाली पुन्हा एकदा चावी फिरवली भ्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र..............
पुर्ण जंगल सामसुम होत आणि ह्या आशा भयवह रात्रीत
त्या ट्रक चा आवाज रात्रिच्या वातवरणात भय निर्माण करत होता.
त्या आवाजा सोबतच त्या युवकाचे डोळे आजुबाजुचा परिसर बघुन कोणी अपल्याला पाहत तर नाही ना की कोणी त्या रात्रीच्या अंधारात दबा धरुन बसलेले आहे जे कधी ही अचानक बाहेर निघेल आणि आपला घात करेल आपल्याला मारुन टाकेल त्या रात्रीच्या अंधारात आपल्या शरीराचा फडशा पाडेल.भ्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र......... ट्रक च्या आवाजाने त्या युवकाची तंद्री भंग पावली.
च्यायला चालु का नाही होत ही. ट्रक ड्राइव्हर म्हणाला.
काय झाल काका ट्रक का नाही चालु होत.तो युवक म्हणाला
खाली उतरुन बघायला लागल काय प्रोब्लेम झालाय..तू थांब इथेच मी काय झालय ते बघतो .दरवाजा उघडून तो ट्रक ड्रायव्हर बाहेर गेला
चेक करु लागला काय बिघाड झालाय ते .इकडे रस्त्याच्या कडेला झाडाझुडपां तोडी हलकेच हलचाल जाणवायला लागली सळसळासल्ल....... सळसळ्सल
 
ते युवकाची नजर सळसळणार्या झाडाझुडपांत गेली त्याची पाचावर धारणबसली त्याचे श्वासोनूश्वास वाढू लागले आता आपल काही खर नाही आता आपल्याला ते घेऊन जातील.मारुन खातील मला. मनात भीतीने
काहूर माजवळ .वेगवेगवेगळे भयानक विचार येऊ लागले. काय निघेल आतमधुन ते राक्षस तर नसतील ना .अचानक त्या झाडाझुडपांतून एक छोटासा आकार बाहेर आला सफेद रंग दोन छोटे दात दोन मोठे कान दोन
मोठे डोळे आणि त्या मुलाच्या तोंडामधुन दोन शब्द निघाले....................
 
जस माणूस प्राण्यांना खातो
तसेच हे जंगलातले राक्षस माणसांचे
मांस खातात हाहाहाहाहाह😈
 
क्रमशः
 
माझी ही पहिलीच कथा थोड्या चूका झाल्या तरी मोठ्या मनाने माफ करा आणि हो कथेत काही चूका आढल्यास coment करा मी पुढच्या भागात सुधारन्याचा प्रयत्न नक्कीच करीन मित्रानो.like coment करायला विसरु नका pls येवढि छोटीशी विनंती
अजून बरेच भाग येतीलहा पहिलाच भाग इथेच संपतोय
 
भेटुयात पुढच्या भागात कोण आहे तो युवक
ट्रक चालू झाल का तो वाचला का त्या झुडपांजवळ काय आहे .
.तो युवक एकटाच जंगलात आला होता की कोणी अजून हि बरोबर आल होत. आशा खुप प्रश्नांची उत्तर मिळतील पुढच्या भागात. तो मिलते है