Vithoba of Shri Kshetra Pandharpur - 6 in Marathi Fiction Stories by Chandrakant Pawar books and stories PDF | श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 6

Featured Books
Categories
Share

श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 6

सत्संग शक्ती समाजाचा आत्मा आहे. समाजाची प्रगती समाजाची विकास समाजाची स्थिती हे सर्व संतमंडळी वर अवलंबून असते. संतांचा सत्संग केल्याशिवाय आत्मानंद मिळणे शक्य नसते. संतांच्या आचरणाने निर्भेळ आनंदाचा समाज आस्वाद घेतो.

भागवत धर्माच्या म्हणजे वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत असलेल्या पांडुरंग किंवा श्री विठ्ठल सर्वांना एकत्र करून मार्गदर्शन करतो. संत, भक्त, विठ्ठल नामाचे नामस्मरण करून भजन ,पूजन ,कीर्तन ,प्रवचन करून त्याची प्रार्थना करतात . त्याला मनापासून सामुहिकपणे आळवतात .

संत सेना महाराज हे बांधवगडचे होते .बांधवगड मध्य प्रदेशामध्ये आहे. तिथल्या एका किल्ल्यावर सेना महाराजांचे वडील नोकरी करीत.
वडील देविदास आणि आई प्रेम कुंवर बाई होती.
सेना महाराजांचे गुरू आचार्य रामानंद होते. सेना महाराज लहानपणापासून तर्क बुद्धीचे होते. भजन-पूजन ते जास्त करीत. वडिलांप्रमाणे ते राजाच्या सेवेमध्ये कार्य करू लागले. त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितले. सर्व धर्म समभाव आणि भक्ती मार्गाचे त्यांनी पालन केले. त्यांचे धार्मिक काम प्रचंड होते .त्यांच्या कार्याला जनतेने संमती दिली. सेना महाराज यांचा व्यवसाय खूप चांगला होता. त्यांची पत्नी सुंदरबाई सेना महाराजा प्रमाणे देवभक्ती मध्ये मग्न होती. संतांच्या कामात दुष्ट लोक आडवे येतात . तसेच झाले सेना महाराज लवकर आले नाहीत म्हणून राजांने त्यांचा शिरछेद करण्याचा हुकूम दिला. परंतु विठ्ठल कृपेने ते वाचले.
सेनाजींना विठ्ठलाचा ध्यास लागला .ते सरळ पंढरपूरला आले. विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यांनी ज्ञानेश्वर परिवारातील नामदेव, सावतामाळी ,चोखोबा या संत मंडळीची भेट घेतली .प्रवचन केले. कीर्तने केली.
ते आळंदीला आले. माऊलीच्या समाधीचे दर्शन घेतले. तेथून त्यांना मराठी भाषा अवगत झाली.
त्यांनी मराठीतून
ज्ञानेश्वर गुरु ज्ञानदेव तारू देवो
अशी ज्ञानेश्वरांची कीर्ती गायला सुरुवात केली. मराठी भाषेत त्यांनी अभंग रचना केली. त्यांनी महाराष्ट्रात अनेक कीर्तन केली. प्रवचने केली. जगाला अनेक चांगले उपदेश केले .सेना महाराजांनी समाजातील मानवनिर्मित उच्च नीचतेचे भेदाभेद नष्ट करून जगाला खऱ्या समाजाची ओळख करून दिली. त्यांनी भरपूर अभंग रचले. गवळण .काला महात्म्य यावर प्राविण्य मिळवले .सर्व नाभिक समाजाला भूषण ठरलेल्या या संतांचे जीवन चरित्र फारच सुप्रसिद्ध आहे.

माझे झाले स्वहित। तुम्हा सांगतो निश्चित
करा हरीचे चिंतन । गावे उत्तम हे गुण.
प्रभू कृपेविण । नाही अनन्य साधन ।

विठ्ठल सर्वांना दर्शन देतो. असे भागवतधर्माचे आचरण आहे. पांडुरंगाच्या दर्शनाने मनात अत्यंत आनंद होतो. त्याच्या रूपात मन रमते .त्याचे गुण आपल्यात येतात. असे समजून अनेकांना त्याच्या भेटीची ओढ लागते. सगुण आणि निर्गुण भिन्न असून त्या दोघांचे एकच रूप आहे .ते म्हणजे विठ्ठल. हे मनाला पटते. भजन कीर्तन प्रवचन नामस्मरणात भाग घेतल्यामुळे सर्व जण एकमेकांना आपलेसे वाटतात.

सर्वांना विठ्ठलाची भक्ती करण्याचा सर्वांना अधिकार आहे. सर्वांना ज्ञान मिळवण्याचा हक्क आहे .त्यासाठी विठ्ठलाच्या पायाशी जाऊन त्यांची सेवा करणे ही गरज आहे. विठ्ठलाच्या चरणी शांती अनुभवाला येते.

रांजणगावचा संतोबा पवार विठोबा भक्त होता. आषाढी वारीला संतोबा पंढरपूरला जायचा. त्याच्यासोबत दोन हजार यात्रेकरू होते. जिथे निरा नदीचा संगम आहे.तिथे पावसामुळे नदीला पूर आला. मात्र सर्वांना पंढरपूरला जायचे होते. त्यामुळे संतोबा पवार पांडुरंगाचे स्मरण करून नदीत शिरला आणि पुढे गेला .त्याने नामस्मरणाचा सपाटा लावला त्याच्या बळावर पुरातून तो पलीकडे आला. तो चमत्कार बघून सगळे लोक आश्चर्यचकित झाले . पांडुरंग नामाचा महिमा ऐकून त्याच्या बरोबरचे वारकरी पलीकडे गेले. संतोबा पवार नामधारक आहे म्हणून तो तरला. हे विठ्ठलाने ओळखले होते. त्याच्याकडे सोबतचे यात्रेकरू तसे नव्हते .तरीसुद्धा संतोबा खोटा पडेल म्हणून पांडुरंगाने नदीचे पात्र रुंद केले अशी आख्यायिका आहे. आणि संतोबा पवाराच्या पुण्याईने सर्वांनी नदी पार केली . नदी पार करताना त्यांना गुडघ्याच्या वर पाणी लागले नाही .पलीकडे गेल्यावर सर्व लोक आनंदाने संतोबाचा जयजयकार करू लागले. सगळे पांडुरंगाचा जयजयकार करू लागले.

संत निळोबाराय पिंपळनेरचे होते. निळोबारायांच्या स्वप्नात जाऊन तुकाराम महाराजांनी त्यांना उपदेश केला . त्यांच्यावर विठोबा प्रसन्न झाला. निळोबाराय कीर्तन करी. त्यांचा स्वाभिमान निरभिमानी होता. ते सर्वांचा उत्तम आदर सत्कार करायचे. त्यांची बायको व मुले होती. ते निर्मळ वृत्ती ठेवून जे काही मिळेल त्यात गुजारा करायचे. निळोबाराय खूप मोठे संत होते. ते निरंतर नामस्मरण करीत. संसारात राहून विठ्ठल भक्ती करीत.

भागवत धर्म म्हणजे योग . योगेश्वर हरीच्या नामात दंग होऊन पंढरपूर भक्तीमय झाले. याचा जास्त जोर योगावर होता. योगक्रिया अवघड असते .पण भक्तिमार्ग ज्ञानी व अज्ञानी लहान-थोर स्त्री-पुरूष गरीब श्रीमंत सर्वांना आचरण्यास सोपा आहे.
भगवंताच्या प्रार्थना ज्या ओव्या आणि अभंग आहेत. ते अभंग आणि ओव्या सोप्या भाषेत आहेत. ते सहजज्ञान आहे. त्याचा अर्थ सर्वांना कळतो .नीति तत्वज्ञान शास्त्र सर्वसामान्यांना कळतात .

भागवत धर्मात म्हणजेच वारकरी संप्रदायात भजन, प्रवचन, किर्तनाला फार महत्त्व आहे त्यावेळी सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक एकत्र येतात. त्यांच्यामध्ये प्रेमाचे संबंध वाढतात. राष्ट्रप्रेम निर्माण होते .समाज निर्माण होतो. नामस्मरण ईश्वराची वैयक्तिक बाजू आहे. कीर्तन-प्रवचन सामाजिक बाजू आहे. या सर्वांचे एकमत होण्यासाठी सर्वांनी त्यांची भक्ती-शक्ती विठ्ठलाच्या पायाशी वहायला हवी. पंढरपुरचा राणा जयजय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल...

पंढरपुरचा विठ्ठल सर्वांच्या सुखासाठी धावतो. रात्रंदिवस त्याला झोप नाही. त्यासाठी रुक्मिणी माता त्याचे कान उघाडणी करते. तरीसुद्धा श्री विठ्ठल भक्तांच्या हाकेला धावून येतात. अशी धारणा भावना विठ्ठलाची प्रार्थना करणाऱ्या, त्याची पूजाअर्चा करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये वर्षानुवर्ष वाढत रहाते. यामध्येच सगळे विठ्ठल भक्तीचे सार सामावले आहे.

विठ्ठल नामाने मनाचे अनेक रोग ,अनेक आजार अनेक समस्या अनेक नैराश्य निघून जातात याचा अनुभव विठ्ठल भक्त घेतात. ते जगाला सांगतात . त्या ओढीने त्याचे फक्त पंढरपूरला येतात. विठ्ठलाच्या चरणाशी त्याचं मनोगत सांगतात .विठ्ठल त्यांचा आदर करतो. त्यांना मार्गदर्शन करतो .त्यांच्या समस्या सोडवतो . अशा भावना मनात बाळगून वर्षानुवर्ष आषाढीची एकादशीची वारी लोकं करीत राहतात .कारण वारी चुकली की त्यांना पाप केल्यासारखे वाटते. अनेक लोकं अनेक वर्ष पंढरीची वारी करत आहेत .अनेकांच्या मनात विठ्ठलाने आपल्याला काही द्यावं अशी भावना सुद्धा नसते. ते निस्वार्थी मनाने त्यांच्या कुटुंबासहित पंढरीच्या वारीला जातात. याची देहा याची डोळा विठ्ठलाचं दर्शन घेतात.

विठ्ठल तो आला आला. सर्वांना मिळून गेला .
असे गायन करून लोक विठ्ठलापाशी त्यांच्या दुःख सुखाची गाऱ्हाणी ठेवतात. अशा भक्तांना खात्री असते विठ्ठल त्यांची गार्‍हाणी नक्की सोडवेल .त्यांना मार्ग दाखवेल. याची त्यांना आशा असते. त्यांचा विठ्ठल त्यांची आशा फोल घालवीत नाही. त्यांची निराशा करत नाही. उशिरा का होईना त्यांच्यापर्यंत त्याची भक्ती पोचते . तो त्याला न्याय देतो. अखी कुटुंबच्या कुटुंब श्री विठ्ठल भक्तीत दंग झाली आहेत.
चोखामेळाचे पूर्ण कुटुंब. नामदेवाचे पूर्ण१५ माणसांचे कुटुंब .ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्ण कुटुंब. विठ्ठल भक्तीमध्ये रममाण झालेले दिसून येते. प्रचंड कुटुंब भक्ती आणि माणसांचा गोतावळा विठ्ठलाच्या भोवती आहे. त्याचं कारण एकच आहे.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.. असा नामघोष सर्वत्र होतो.

पंढरपूरच्या पांडुरंगाच्या देवळाच्या आसपास अनेक संतांच्या समाध्या आहेत. त्यांना भक्तजन मंडळी पायरी असे म्हणतात. नामदेवाची पायरी . कान्होपात्राची पायरी, जनाबाईची पायरी.

श्रीकृष्णाचे आडनाव यादव होते. इसवी सन सहाशे साली इस्लामी आक्रमणामुळे सर्व भारतभर परकीयांनी मुसलमानांनी धुडगूस घातला. ते देऊळ पाडीत. लुटालूट करीत .अधर्माचा वापर करत. हे सर्व मुसलमानी सत्ते मध्ये चालू होते. त्यावेळी अल्लाउद्दीन खिलजी याने कृष्णदेवराय यांच्या देवगिरी राज्यावर आक्रमण केले. नंतर त्याची अनेक आक्रमणे तिकडे होत राहिली. त्या आक्रमणातून विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती कृष्णदेवरायाने अनेक वेळा लपवून ठेवली .वाचवली तोडफोड पासून. यादवांच्या काळात पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती वाचवण्याचे मोठं कार्य कृष्णदेवरायाने केलं. कृष्णदेवराय श्रीकृष्णाचे वंशज होते .त्या घराण्यातील राजाने यादवांच्या राज्याचे साम्राज्य मध्ये रूपांतर केलं . अलाउद्दीन खिलजीने नर्मदा नदीच्या काठावरचा भाग आपल्या ताब्यात घेतला होता. त्याची साम्राज्य वाढविण्याच्या लालसा होती. तो सतत दक्षिणेकडे स्वाऱ्या करत होता. उत्तरेकडे मुस्लिमांचे राज्य प्रबळ होते .त्यांना दक्षिणेकडे त्यांचे सामर्थ्य दाखवण्याचे होते .त्यामुळे ते दक्षिणेवर स्वार्‍या करीत . त्यावेळी महाराष्ट्राची सामाजिक स्थिती खूपच विस्कळीत होती .त्या काळामध्ये कृष्णदेवरायने दक्षिणेतल्या विठ्ठल मंदिराच्या मुर्तीचे अनेक वेळा रक्षण केले.

समाजामध्ये प्रबोधनाचे कार्य विठ्ठलाच्या हाती आले होते. ते कार्य सर्व संस्थांच्या मार्फत समाजातील लोकांपर्यंत पोहोचले. संत हे विठ्ठलाचे प्रचारक होते. विठ्ठल विठ्ठल करून ते समाजाला जागृत करत होते. समाज जागृत करून प्रगती करत होते. समाजामध्ये सत्त्वगुणाची वृद्धी होत होती. जगण्याला पर्याय निर्माण झाला होता .अशी विठ्ठल भक्ती लोकांपर्यंत त्यांच्या इंद्रिया पर्यंत व्यक्त होत होती. त्यांचे नेत्र ,कान, मुख ,हृदय इथपर्यंत पोचली होती .ज्यांची वाईट प्रवृत्ती होती. त्याला आळा बसला. अहंकार त्यांचा गळून गेला. त्यांच्या बुद्धीचे द्वार उघडले. ज्यांच्या मनामध्ये विषयाचे संक्रमण होते. ते कमी झाले . सगळ्यांवर भक्तिमार्गाचा संस्कार झाला. सुखदुःखाचा मागोवा घेत अनेकांचे जीवन सुखमय बनले. हा मोठा फायदा विठ्ठल भक्तीने झाला. सजीवत्वाचा संचार सगळीकडे झाला . चैतन्य पसरले. फक्त मनुष्य प्राणीच नाही तर वृक्ष, पक्षी ,पशू यांचे सुद्धा चांगलेच सत्संगाचे प्रमाण वाढले.

बुद्धीची शक्ती वाढण्यासाठी विठ्ठलाची भक्ती कामाला आली . विठ्ठल भक्तीचा परिमळ हृदयात जाऊन स्थापित झाला. समाजाला दिशा मिळाली .हिंसा कमी होऊन आयुष्याची किर्ती वाढली.

स्वतःच्या आयुष्याचा विचार करण्याची प्रवृत्ती वाढली. दुसऱ्याला त्रास होणार नाही या बद्दल वारकरी संप्रदाय सगळ्यांनाच प्रबोधन करत राहिला. बुद्धी ही माणसाची होती. त्याला दिशा दाखवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने केले. मनुष्य बुद्धीमध्ये बदल करून जन्म मरण याची जी द्विधा अवस्था होती त्याला निश्चित असा आकार निर्माण झाला.

अनेक विकृती आणि गुन्हेगारी वृत्तीची माणसं मनोवृत्तीत बदल होऊन विठ्ठलाच्या भक्तीमध्ये आली. तसेच चांगल्या स्वभावाची माणसे त्यांच्यासोबत राहून एकमेकांना पूरक अशी साथ-संगत देऊन समाजाचा उत्कर्ष झाला. संतांच्या संगतीचे सुख त्यांना मिळाले. संतांचा महिमा त्यांना कळाला. त्यांचे अधिकार त्यांना माहीत झाले. तीर्थयात्रा घडल्या .समाज वाममार्गाला जात होता .तो उत्तम मार्गाला येण्यासाठी जे काही होतं ते विठ्ठलाने भक्तांच्या आणि संतांच्या ह्रृदयात वास्तव्य करून घडवून आणले.

अनेकांच्या हृदयात विठ्ठल चिंतन सुरू झाले. अनेकांना हरी नामाचा छंद लागला. सर्व दिशा, स्थाने आणि दिवस शुचिर्भूत झाले .जी लोकं एकमेकांना ओळखत नव्हती. ते एकमेकाला माऊली माऊली असं नमस्कार करून ओळखायला लागली. त्यांच्यामध्ये सद्गुणांचा फैलाव झाला. त्यामुळे मनुष्याच्या कीर्तीचा उदय झाला. आणि अनेकांना सज्जन रूप प्राप्त झाले.

समाजामध्ये ज्ञानी लोक होते ते स्वत:ला आत्मनिष्ठ म्हणवणारे लोक होते .त्यांच्या व्यवहारांमध्ये बदल झाला. समाजासाठी आपण काहीतरी करावे .शांतीच्या योगाने समाजाला उपयोगी पडावे. दूर्गुणावर नियंत्रण ठेवावे. अशा प्रकारची लोक समाजात तयार झाली. धनाची लालसा कमी झाली . समाज रक्षणाची खटपट निर्माण झाली .समाजाच्या प्रगतीचे बीज विठ्ठल भक्ती मध्ये आहे.

श्री विठ्ठल कोणत्या गावी राहतो. हे काही लोकांना माहीत नव्हते. ते लोक पायी यात्रा करीत लोटांगण घालत पंढरपूरला येऊ लागले. परमेश्वराचे रूप डोळ्यात साठवु लागले . त्यांच्या दुःखाचे क्षण कमी झाले. विठ्ठल माझा जीव .विठ्ठल माझा कुलधर्म. तोच माझा भाव. विठ्ठल माझा गुरु .तोच माझा तारू .
अशा प्रेरणेने अनेक लोक दरवर्षी विठ्ठल वारी करू लागले.

ढोंगी, लबाड दांभिक लोक यांचे महत्त्व कमी झाले.
जे जनतेला लुटत होते त्यांच्याबद्दल समाजामध्ये जागृती झाली . लोक शहाणी झाली. जे दुसऱ्यांना गांजत होते अशा लोकांना मनुष्य ओळखू लागला .
मूर्ख होते व ज्यांना काही कळत नव्हते .त्यांना विठ्ठल भक्तीचा खरा अनुभव आला . त्यांचे जीवन गौरवपूर्ण बनले. ते हरिकीर्तन ऐकण्यासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला लागले. घरी हरीपाठ करू लागले. अशा अनेक घटना विठ्ठलाच्या अवताराने सिद्ध झाल्या. या कारणाने श्रीविठ्ठल थोर समाज सुधारक आणि प्रबोधनकार शक्तीचे प्रेरणास्थान ठरले.

अनेक दीनदुबळ्या, गरीब, पतितांचा उद्धार घडला. ज्यांना आपल्या जीवनाची लायकी माहीत नव्हती असे अनेक लोक समाजामध्ये पुढे येऊन काम करू लागले. समाजहित जपू लागले. स्वतः समाजाचे कल्याण व्हावे म्हणून झटू लागले .त्यांचे कौतुक सर्वत्र होऊ लागले. थोडेफार सुखमय जीवन सुरू झाले . प्रत्येकाच्या मनामध्ये स्नेह निर्माण झाला. त्यामध्ये जे स्वार्थी लोकं होते त्यांची सुधारणा घडली नाही .ते तसेच जन्माला आले आणि तसेच गेले. तरीही त्यांना जीवनदान मिळत होते. परंतु त्याचा फायदा ते घेत नव्हते अशी लोकं निश्चितच समाजाला लागलेली कीड असते.