Vithoba of Shri Kshetra Pandharpur - 3 in Marathi Fiction Stories by Chandrakant Pawar books and stories PDF | श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 3

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 3

ज्यांनी अनेक तीर्थयात्रा केल्या .ज्यांनी पांडुरंगाचे सम चरण पाहिले .त्या मनुष्याला अनंत तीर्थ केल्याचे पुण्य लाभते. अशी धारणा विठ्ठलभक्त लोकांच्या मनात निर्माण झाली. श्री विठ्ठलाला फक्त दही दुध भाताचा साधा नैवेद्य चालतो. त्याला पेढे नकोत. त्याला मोठमोठ्या मिठाया नकोत. गळ्यामध्ये सोन्याचा हार नको. गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली की विठ्ठल प्रसन्न झाला . असा सोपा विठ्ठल खेडूत लोकांच्या आवडीचा आहे.

शेख महंमद इस्लाम धर्मीय होता. विठोबाच्या भक्तीमुळे तो मराठी संत वाड्मयात अमर झाला. सजन कसाई फकीर सुद्धा विठ्ठलाचे भजन गाऊ लागला. शेख महंमद वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करीत होता. तो सुफी पंथाशी संबंधित होता. शेख मोहम्मद यांचे गुरु चांद बोधले होते. चांद बोधले यांचे दोन शिष्य होते .एक शेख मोहम्मद आणि दुसरे जनार्दन स्वामी. जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज होते. सूफी पंथ ज्ञान धारणा, अनुष्ठान, भजन-पूजन योगसाधना यावर तो पंथ आधारित आहे. शेख महंमदना वारकरी पंथातील विचारप्रणाली, तत्वज्ञान, समता, भक्ती आवडली. त्यामुळे त्यांनी विठ्ठलाची भक्ती केली .

संत कबीर विठ्ठलाचे भजन गात होते. संत जनाबाईचे भजन, कीर्तन ऐकण्यासाठी संत कबीर गेले होते. तेव्हा संत जनाबाई शेणाच्या गोवऱ्यासाठी भांडत होती.

त्यांचे भांडण बघून कबीरांनी विचारले. संत जनाबाई...
तु तुझ्या गोवऱ्या कशा काय ओळखणार ? एका स्त्रीने तुझ्या गोवऱ्या आणि तिच्या गोवऱ्या एकत्र केलेल्या आहेत .त्यामुळे त्या शेणाच्या गोवऱ्यातून तुझ्या नेमक्या गोवऱ्या कशा ओळखायच्या.
तेव्हा कबीरांना थांबवत संत जनाबाई म्हणाली .
ज्या गोवऱ्यातून विठ्ठल... विठ्ठल.. असा स्वर येत आहे. त्या माझ्या गोवऱ्या आहेत.
धन्य ती जनाबाई. धन्य ते संत कबीर...

संत जनाबाई संत नामदेवांची मोलकरीण होती. तिला जनयाची दासी म्हणून सगळे लोक ओळखत. संत जनाबाईने आपल्या अंभगात भीमा आणि चंद्रभागा नदीचा उल्लेख केला आहे. भीमा नदीचेच पंढरपूरला चंद्रभागा हे नाव आहे. पंढरपूरला तिचा आकार चंद्रकोरीसारखा आहे म्हणून भीमा नदीला चंद्रभागा नदी असे म्हणतात. पंढरपूरला भीमा नदीच्या काठावर श्री विठ्ठलाचे मंदिर आहे. ते सोलापूर जिल्ह्यात आहे. सोलापूर महाराष्ट्र राज्यात आहे.

विठ्ठलाचे दुसरे नाव पांडुरंग आहे. श्री विठ्ठलाची उपाधी पांडुरंग आहे. पांडुरंग हे विठ्ठलाचे कुळनाम आहे. सातशे आठशे वर्षापासून महाराष्ट्रामध्ये विठ्ठल भक्तांच्या मुखी पांडुरंगाचे नाम आहे. विठ्ठल, विठोबा आणि पांडुरंग एकच आहे. ती तीन्ही नावे एकाचीच आहेत. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री विठ्ठल आहे. पंढरपूरचेच नाव पंढरी आहे.

कार्तिकी एकादशीला जनाबाई आणि तिचे आई-वडील पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला आले होते पांडुरंगाचे दर्शन झाल्यावर जनाबाई तिथेच नामस्मरण करत राहिली आईवडीलांना तुला घरी येण्यास सांगितले परंतु ती काही केल्या घरी गेली नाही शेवटी तिचे आई-वडील आणि त्यावेळी जनाबाई तिचे वय सात वर्षे होते. तिला भजन करताना नामदेवांनी पहिले तिची चौकशी केली तिने सांगितले विठ्ठल रखुमाई माझे आई-वडील आहेत त्यांचीच मुलगी आहे नामदेव महाराजांना दया आली आणि तिला घरी घेऊन आले. ती नामदेव महाराजांच्या घरची सर्व काम करू लागली कामे करताना तिच्या मुखात फक्त हरिनाम असे.

नामदेवांची पत्नी गोणाई हिने तिला एकदा घरचे सगळे जेवल्यानंतर उष्टे अन्न दिले. ते उष्टे अन्न झाकून ठेवले.परंतु जनीने ते अन्न खाल्ले नाही. जनीने रात्री विठ्ठलाचे भजन सुरू केले .खूप रात्री विठ्ठल तिच्याकडे आले.तिला म्हणाले. मला काहीतरी खायला दे. जनी म्हणाली माझ्याकडे खायला काही नाही. माझ्या कडे उष्टे अन्न आहे.जे नामदेवच्या पत्नीने दिले आहे .पांडुरंग म्हणाले ते उष्टे अन्न त् मला दे. मग जनाईने आणि पांडुरंगाने ते उष्टे अन्न खाल्ले. देव भक्तीचा भुकेला असतो ते असा...

पंढरपूरचे विठोबा मंदिर खूप जुने आहे.पंढरपूरच्या पूर्वेकडच्या प्रवेश दरवाज्याला नामदेवाचे नाव आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माई मंदिरला एकूण आठ प्रवेशद्वारे आहेत. श्री विठ्ठल अवघ्या महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान आहे .तो गोरगरिबांचा जागृत देव आहे. अख्या जगात पायी चालत येऊन विठ्ठल वारी करून आपल्या आवडत्या दैवताचे दर्शन घेण्याची प्रथा फक्त महाराष्ट्रा मध्ये आहे. पायी चालत येऊन जर विठ्ठल वारी केली तर त्याचे पुण्य खूपच मोठं आहे. असे समजले जाते.
या मंदिराला १६ खांब आहेत. त्यातल्या एका खांबाला सोन्या चांदीचे वेष्टन आहे.
त्या खांबाला गरुडस्तंभ म्हटले जाते. चैत्र, आषाढ, माघ, कार्तिक एकादशीला तिथे यात्रा भरते. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला दक्षिणकाशी म्हणून ओळखले जाते.

परकीयांच्या आक्रमणाला मुळे तेराव्या शतकात समाजाची मोठ्या प्रमाणात घुसमट होत होती. त्यावेळी संत नामदेवांनी समाजाला त्यांच्या विचारांनी नवसंजीवनी देण्याचे काम केले. समाजा साठी त्यांनी भगवंत विठ्ठलाचे सोपे साधे नाम दिले. समाजातील शोषित वर्गाला विठ्ठलाच्या नामस्मरणाने जीवन दिशा दाखवली.

गणिकेच्या पोटी जन्म घेतलेल्या कान्होपात्राने स्वतःला विठ्ठलाची वधू म्हणून स्वतःला संबोधले. तरी ती विठ्ठलाची वधू न होता विठ्ठल तीची माऊली होती. नामयाची दासी जनाबाई सुद्धा विठ्ठलाला आपला पती मानते. आपला प्रियकर सांगते.
ते समाजापासून स्वतःचे रक्षण होण्यासाठी...
या सर्वांचे लाड भगवंत विठ्ठलाने पुरवले होते. कानू पत्र पंढरपूरच्या जवळ मंगळवेढा येथे राहत होती दिसायला सुंदर होती. एक दिवस गावातून रामकृष्णहरी असा जयघोष करीत वारकरी चालले होते ते पांडुरंगाच्या दर्शनाला निघाले होते त्यांना तिने थांबवले त्यांना विचारले तुम्ही कुठे जातात ते म्हणाले आम्ही पंढरपूरला विठ्ठलाला भेटायला चालू आहे विठ्ठल आमचा भार सांभाळत सारे जग विठ्ठलाने भरले आहे विठ्ठलाचा महिमा ऐकून भारावून गेली मग तिला विठ्ठला भेटण्याची वेडच लागले. ती त्याच्यासोबत पंढरपूरला आली ती तिथेच तिने राहायचे ठरवले विठ्ठला शरण गेली विठ्ठलाची सेवा करू लागली विठ्ठलाचे भजन गाईन नर्तन करू लागली विठ्ठलाच्या प्रेमात दंग झाली.

समाजाला अनिष्ट प्रथांतून बाहेर काढण्यासाठी संता च्या मदतीने विठ्ठलाने व्यूहयोजना केली होती. प्रबोधनाच्या चळवळीत अप्रत्यक्षरीत्या भगवान विठोबा सुद्धा सामिल होते. मानवी वर्णव्यवस्थेने तयार केलेल्या तटबंदीमध्ये मनुष्य जातीची घुसमट होत होती. त्या घुसमटीतून समाजाला आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी स्वतः श्री विठोबाने लोकांना भक्तीचा मार्ग सोपा करून सांगितला .
जय जय राम कृष्ण हरी... यामध्ये राम आहे. कृष्ण आहे. श्री शंकर आहे. हरी म्हणजे शंकर...

कीर्तनकार पंढरीची आणि पांडुरंगाचा महिमा सांगतात. ते उगीच नाही त्याला तसे अनुभव मिळाले असावेत व त्यांची बुद्धी तशी त्यांना तसे करायला सांगत असावेत. पांडुरंग भक्तांचा दास होता.

संत रोहिदास सुधारक होते. ते खूपच आधुनिक विचारांचे होते.

निवृत्तीनाथांनी सुद्धा हरिपाठ दिला होता. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक होते. ज्ञानेश्वर ,सोपान, मुक्ताबाई, ही तीघे त्यांचे भावंडे होते
यांचा निर्वृत्तीनाथ माता पिता प्रेमाने सांभाळ करीत होते. ज्ञानेश्वरांनी नऊ हजार ओव्या लिहिल्या होत्या.
ज्ञानेश्वरांनी सुद्धा हरिपाठ हा नामपाठ लिहीला होता. त्या हरी पाठाचे महत्व खूप आहे. देवाची आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे तिथेच थोड्या दूरवर एक आळंदी आहे तिचे नाव चोराची आळंदी आहे.
त्यांनीच पसायदान लिहिले होते.
२१ व्या वर्षी ज्ञानेश्वराां इंद्रायणीकाठी आळंदी येथे समाधी घेतली होती.

सातशे पंचवीस वर्ष महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांनी सर्व स्तरातील समाजाने आपल्या हृदयात विठ्ठलाला अढळपद दिलेले आहे.

संत नामदेव आणि भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेतले आणि ते भागवत धर्माचे आद्य प्रचारक बनले होते. संत नामदेव यांचे आडनाव रेळेकर होते. शिखांचा ग्रंथ गुरु साहेब यामध्ये नामदेवांच्या बावीस काव्यरचना आहेत. त्यांनी भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत फडकावली होती. संत नामदेव संत शिरोमणी होते. संत नामदेव यांच्या कुटुंबात एकूण पंधरा जण होते. संत नामदेवांच्या बाबतीत असे म्हटले जाते की एका कुत्र्याने त्यांची चपाती पळवली ती चपाती त्या कुत्र्याने कोरडी खाऊ नये म्हणून संत नामदेव त्या कुत्र्याच्या मागे तुपाचा पेला घेऊन धावत होते. एवढी प्राणी दया त्यांच्यामध्ये होती.

संत नामदेव विसोबा खेचर यांचे शिष्य होते. संत विसोबा खेचरांचे गुरू ज्ञानेश्वर महाराज होते .तेव्हा ज्ञानेश्वर वीस वर्षाचे होते जेव्हा संत नामदेव विसोबा खेचर यांना गुरु करायला गेले. तेव्हा विसोबा खेचर यांच्या अंगावर खरजे सारख्या जखमा झाल्या होत्या. ते बघून नामदेवांना खूपच विचित्र वाटले. या खरूज झालेल्या माणसाला आपला गुरु करावा के नये अशी जराही शंका त्यांच्या मनात आले नाही. आणि कळस म्हणजे विसोबाखेचर शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. संत नामदेव आणि ज्ञानदेव यांनी सामाजिक क्रांती घडवली होती त्याने सामान्य व्यक्तींना हरी भक्तीचा मार्ग मोकळा केला होता. नामदेव लोकांना सांगत देव देवळात नाही तो माणसाच्या हृदयात आहे माणसामाणसांमध्ये आहे भागवत धर्मात सर्वांना समान न्याय आहे भेदभाव नाही. संत नामदेवांचे शिष्य चोखामेळा चोखामेळा नात्याने छातीशी कवटाळून शिष्य बनवले होते. संत चोखोबांची लहान बहीण निर्मळा हे सुद्धा संत होती. संत चोखोबांनी जनाबाईला स्वतःचे बहीण मानले होते. चोखोबांची सख्खी बहीण निर्मळा ही संत बंका महाराज यांची पत्नी होती. संत बंका यांची सखी बहीण चोखोबा महाराजांची पत्नी होती. तिचे नाव संत सोयरा... सोयरा सुद्धा संत होती. संत चोखोबा आणि संत सोयरा यांचा मुलगा कर्ममेळा हा सुद्धा मोठा संत होता. तो दिव्यांग होता... त्याला हात पाय नव्हते.

पंढरपूर पासून मंगळवेढा गाव जवळ आहे. संत चोखामेळा एका इमारतीच्या बांधकामाचे काम सुरू असताना तिथे गेले आणि त्या इमारतीचे बांधकाम कोसळले त्यामध्ये चोखोबाचा अंत झाला भगवान विठ्ठलाला फार दुःख झाले त्यांच्या अस्थी नामदेवांनी पांडुरंगाचं उद्या पांडुरंगाने त्या अस्थी स्वतःजवळ घेतल्या आणि मुख्य दरवाज्यापाशी त्यांना समाधी दिली. संत चोखोबा आणि सर्वांना शिकवले माणुसकी हीच खरी जात आहे.

चोखामेळांची रचना पुढीलप्रमाणे आहे...

वैकुंठ पंढरी भिवरेच्या तीरी
उभा साक्षात हरी तेथे ।। १ ।।
रूप सावळे हे गोजिरे
धणी न पाहता पुरे जया ।। २ ।।
कासे सोनसळा नेसला पिवळा
वैंजतीची माळ गळा शोभे।।३।।
चोखा म्हणे सगुण हे ज्ञान
विठे समचरण ठेवियेले

संत शिरोमणी नामदेव महाराजांनी भगवंत विठ्ठलाला जेवायला भाग पडले होते. विठ्ठल जेवल्याशिवाय मी जेवणार नाही असा त्यांनी हट्ट धरला त्यांचा बाल हट्ट कंविठ्ठलाने तेव्हा पुरवला होता... संत नामदेव महान विठ्ठलभक्त होते. शिंपी समाजाचे दामा शेठ यांचे नामदेव पुत्र होते. पंढरपूर मध्ये नामदेवांची मोठी कीर्ती झाली होती ज्ञानेश्‍वर आणि नामदेव दोघे उत्तर हिंदू सणांमध्ये तीर्थयात्रेला गेले त्यांनी काशी गया प्रयाग ठिकाणी तीर्थयात्रा केली औंढा नागनाथ आला आले औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे महाराज स्थान आहे नामदेव कीर्तन केलेले खूप गर्दी झाली मात्र तिथल्या पंडितांनी विरोध केला त्यांना सांगितले कीर्तन इकडे नाही करायची कीर्तन तिकडे पंढरपुरात जाऊन करा ते पण कीर्तन कुठे करायचे तर कीर्तन देवाचे मागे करायला सांगितले नामदेव महाराज देवळाच्या मागे गेले कीर्तन केले त्यांनी पांडुरंगाचा धावा केला. किर्तन ऐकणाऱ्यांची डोळे पाण्याने भरून आले. नामदेव महाराज विठ्ठलाची पूर्णपणे ग्रुप झाले नामदेवाचे विठ्ठलावर आणि विठ्ठलाचे नाम देवावर खूप प्रेम होते. तिथेच पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायरीवर मग नामदेव महाराजांनी देह ठेवला. पांडुरंगाशी विलीन झाले.

जसं श्री हरी विठ्ठल भक्तावर प्रेम करायचा तसेच त्याचे भक्त सुद्धा श्रीहरी विठ्ठलावर जीवापाड प्रेम करत होते. संत सावतामाळी यांचे प्रेम सुद्धा याच प्रकारच्या आहे. त्यांच्या पोटामध्ये साक्षात विठ्ठल लपला होता. विठ्ठलाची मूर्ती चोरून नेण्यासाठी चोर आले होते. ते बघून विठ्ठल सावता माळी ला बोलला की मला पकडला चोर आले आहेत मला लपवून ठेव...
ते ऐकून संत सावतामाळीने विठ्ठलाच्या मूर्तीला आपल्या पोटात लपवून ठेवले. चोर निघून गेल्यानंतर संत सावतामाळीने आपले पोट चिरून विठ्ठलाची मूर्ती बाहेर काढली . इतके असीम प्रेम भक्तमंडळी विठ्ठलावर करत होती. विठ्ठल फक्त विठ्ठला साठी साध्या सोप्या भक्तीचे व्रत करत होते त्या बदल्यात विठ्ठल त्या भक्तांना मोठ्या प्रमाणात मदत करीत होता.
सावता महाराज शेतामध्ये काम करीत असताना त्यांना त्यांच्या पिकातून विठ्ठलाचे दर्शन घडत होते कांद्या-मुळा मध्ये विठुचा गजर ऐकायला येत होता. लसूण मिरच्या त्यांना हरी सारखे दिसत होती माझ्या शेता मध्ये असणारे विहीर मोठ यात अवघी पंढरी त्यांना दिसत होती. शेतातील मळ्यातील काळा मातीची सेवा करण्यात सावतामाळी मग्न होते त्यांच्यामुळे भाजीपाल्याने फुलले होते. कडू गोड आंबट अशा सर्व झाडांना पिकांना सावतामाळी एकसारखे पाणी देत. एखादे पीक गोड आहे म्हणून त्याला जास्त पाणी असं होत नव्हतं .कारल्याचा कडूपणा फळांचा गोडपणा यासाठी ते त्या त्या प्रमाणात पाणी देत. मुखाने हरिनामाचा जप चालू राहत असे. त्यामुळे त्यांच्या भक्तीचा मळा विठ्ठल नामाने फुलला होता. सावता माळी स्वतः रचलेले अभंग म्हणत . कान्होपात्रा सुद्धा स्वतः रचलेले अभंग म्हणत असे. स्वतः रचलेले अभंग मध्ये खूपच गोडी असते. त्यासाठी प्रतिभा शक्तीची गरज लागते. ते अभंग गाताना अंतकरण मोहरून जाते. मन प्रसन्न होते . मनाला भरपूर आनंद मिळतो.
संत सावतामाळी मत कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी ते पहाटे शेतात जात विठ्ठलाचे भजन करत भजन करताना दंग होत त्यांना लहानपणापासून विठ्ठलभक्तीची गोडी होती पांडुरंगाच्या भजनात ते अतिशय रंगून जात.

संत भानुदास एकनाथ महाराजांचे पणजोबा होते. त्याने विठ्ठलाची खूप भक्ती केली होती. त्यांनी विजयनगरला नेली पांडुरंगाची मूर्ती पुन्हा पंढरी आणली होती. विजयनगरचा राजा कृष्णदेवरायाने पंढरीची मूर्ती विजय नगर ला नेली होती. ती मूर्ती भानुदासांनी प्रयत्न करून पुन्हा पंढरपूरला आणली . कृष्णदेवरायाने त्यासाठी विजयनगरला भव्य मंदिर बांधून त्याची प्रतिष्ठापना केली होती.

संत एकनाथांनी विठ्ठल भक्ती केली होती. संत एकनाथांच्या मुलाने एकनाथांचे शिष्यत्व पत्करले होते त्यांचा मुलगा हरिपंडित झ
होता. एकनाथ महाराजांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या मुलाने हरिपंडितांनी त्यांच्या पादुका दरवर्षी आषाढीला पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली. संत एकनाथांच्या मुलीचा मुलगा म्हणजेच संत एकनाथाचे नातू मुक्तेश्वर हे सुद्धा मोठे विठ्ठल भक्त होते. एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. त्यामध्ये त्याकाळात अनेक कवींनी घुसवले पद्य प्रकरणे एकनाथांनी जुन्या ज्ञानेश्वरी मधून काढून टाकली . त्याची एक शुद्ध प्रत तयार केली. श्रीविठ्ठलाच्या प्रेरणेने एकनाथ आणि जातिभेद दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले.

संत सखुबाईच्या नवऱ्याचे नाव दिगंबर होते. संत सखुबाईच्या घरातील सगळे लोक तिला सकाळपासून रात्रीपर्यंत झोपेपर्यंत कामे करून घेत. तिला मारझोड करीत. पण संत सखू डगमगत नव्हती .
ती मुकाट्याने सगळं सहन करत होती. कारण तिला माहेरचे नाव राखायचे होते. तीला जे काही खायला मिळेल. तेवढ्यावर ती तीची भूक भागवत असे . मुखी विठ्ठलाचे भजन आणि नामस्मरण ती करीत असे .
ती राहणारी करवीर प्रांतामध्ये कृष्णाकाठची. करवीर मध्ये ती भजन-पूजन प्रवचन करी. वारकरी सत्संग करी. तिला वाटायचे आपण पंढरपूरला जायला हवे पंढरपूरच्या गावाला जायला हवे. हरी दर्शन घ्यायला हवे. तिच्या मनाने पक्के ठरवले. ती वारकऱ्यांसोबत पंढरपूरला निघाली ती गोष्ट तीच्या घरच्यांना माहीत झाली. सखुच्या सासूने दिगंबरला सखूला परत आणण्यासाठी पाठवले . सखुच्या नवऱ्याने धावत जाऊन वारकऱ्यांना गाठले . सखूला मारत मारत घरी आणले . तीला पंढरपूरची यात्रा संपेपर्यंत एका खोलीत डांबून ठेवले. तिला जेवण पाणी दिले नाही . संत सखुबाईने पांडुरंगाचा धावा केला.
आता विठ्ठला तूच माझा कैवारी.. तुझ्याशिवाय माझं कोणी नाही.. ती देवाचा अभंग म्हणत झोपी गेली. पांडुरंगाने तीचे गाऱ्हाणे ऐकले . तिला दर्शन दिले. भगवान विठोबा तिला पंढरपूरला घेऊन गेले. सखुबाईने पंढरपूरला श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले.सखुबाई खरोखरच महान संत होती. श्री विठ्ठलांनी भक्तांसाठी अद्भुत कृत्ये केली. अनेक चमत्कार केले त्या करवी त्याने त्याच्या भक्तांची आणि संतांची संकटापासून अनेक वेळा सुटका केली.

विठ्ठल आणि रुक्मिणीची कथा खूप मनोरंजक आहे. द्वारकेचा राजा श्रीकृष्णाला एक दिवस त्याच्या गोप ,गोपिका आठवतात. राधा आठवते. त्या आठवणींनी व्याकुळ होऊन श्रीकृष्ण त्यांना जिवंत करतो. स्वतःजवळ बसवतो. श्रीकृष्णाला राधेची सुद्धा खुप आठवण येते. राधा मृत झालेली असते. परंतु तो राधेला जिवंत करतो आणि स्वतःजवळ बसवतो. त्याच वेळी रुक्मिणी श्रीकृष्णाच्या महालात प्रवेश करते. श्रीकृष्णा जवळ राधेला बसलेली बघून रुक्मिणी रागावते . राधेने उभे राहून तिचा आदर न केल्यामुळे रुक्मिणी तत्क्षणी तिथून रागाने बाहेर निघून जाते. श्रीकृष्णाच्या लक्षात तो प्रकार आल्यानंतर श्रीकृष्ण मायेने निर्माण केलेल्या गोपगोपीका आणि राधा यांना नष्ट करतो आणि रुक्मिणीच्या मागे धावत पळत येतो. तोपर्यंत रुक्मिणी त्यांच्या नजरेआड झालेली असते.

रुक्मिणीने द्वारका सोडली . ती दिंडीरवनात अज्ञातवासात निघून गेली. तिच्या शोधासाठी श्रीकृष्ण मथुरेला गेले .गोकुळात गेले परंतु तिकडे त्यांना रुक्मिणी दिसली नाही .सापडली नाही. श्रीकृष्ण मनातून घाबरले. त्यांनी गोवर्धन पर्वतावर जाऊन गोपाळांच्या मार्फत तिच्या शोध घेतला. परंतु तिथेही रुक्मिणी नव्हती.
शेवटी ते चंद्रभागेच्या( भिमानदी )तीरी गोपाळपूरला आले. त्या ठिकाणी सोबत असलेल्या जंगलात गोपाळांना रुक्मिणीचा शोध घेण्यास पाठवले आणि स्वतः दिंडीरवनात आले. दिंडीर वनांमध्ये त्यांना रुक्मिणी सापडली. तिचा राग त्यांनी शांत केला .तिची क्षमा मागितली. रुक्मिणी शांत झाली. श्रीकृष्ण रुक्मिणी सहीत पुंडलिकाच्या आश्रमाजवळ आले. आश्रमाजवळून त्यांनी पुंडलिकाला हाक मारली. पुंडलिका मी विठ्ठल. तुझ्या दरवाजा आलोय बाहेर ये...
मात्र त्यावेळी पुंडलिक त्याच्या आई-वडिलांची सेवा करत होता. त्यामुळे त्याने त्याच्या शेजारी असलेली विट पुंडलिकाने बाहेर फेकली आणि म्हणाला . श्री कृष्णा तुम्ही थोडावेळ
या वीटेवर उभे राहावे. आई वडिलांची सेवा करून मी मी आलोच. श्रीकृष्ण आणि रुक्माई कमरेवर हात ठेवून स्वतःचा तोल सावरत त्या विटेवर उभे राहिले. परंतु पुंडलिकाची मातृ-पितृ सेवा काही संपलेली नव्हती. आपण बाहेर कुणालातरी उभे करून ठेवले आहे. ही सुद्धा तो गोष्ट विसरला . त्यामुळे निघाले योगी श्रीकृष्ण त्या विटेवर उभे राहिले. रुक्मिणी माते सहित...
त्या घटनेची एक आठवण म्हणून श्रीकृष्ण रुक्मिणी दोघे उभे विटेवरी अशी ती कथा आहे. भक्त पुंडलिक विठ्ठलाचा आवडता होता .त्याची वाट बघत श्रीकृष्ण आणि रुक्मिणी युगे अठ्ठावीस उभे आहेत. आईवडिलांची सेवा संपल्यावर पुंडलिक बाहेर आला आणि त्याने पाहिले तर दोघे विठ्ठल रुक्माई इथे उभे आहेत. त्याने त्यांची क्षमा मागितली . त्यांना विनवणी केली की तुम्ही इथेच या भूमीवर माझ्यासोबत कायम रहा.