Karni, a terrible experience... in Marathi Horror Stories by डॉ . प्रदीप फड books and stories PDF | करणी , एक भयानक अनुभव ...

Featured Books
  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

Categories
Share

करणी , एक भयानक अनुभव ...

नमस्कार मंडळी ,
हा विषय समाजात सगळ्यात जास्त अंधश्रद्धेचा मानतात ...
कुणी ही वास्तविकता पण समजतात ....

पण खऱ्या अर्थाने ,हे अनुभव लोकांना येत राहतात ...
आजही कुणावर काळी जादू करायची असल्यास ,करणी करतात ........

किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी करणी करतात ....

आज मी एक सत्य घटना तुमच्या समोर मांडत आहे ....
ही खरी की खोटी ,
याबद्दल शंका न घेता ,वाचकांनी कथेकडे लक्ष केंद्रित करावे ........

ही कथा एका खेड्यागावातील आहे ....

सागर नेहमी प्रमाणे जेवण आटोपून गच्चीवर गेला ,
कारण रात्रीच्या वेळी तो झोपायला गच्चीवर जायचा ....
उन्हाळ्याच्या सुट्या लागलेल्याच होत्या ...

त्यामुळे गर्मी असल्या कारणाने ,तो एकटाच गच्चीवर झोपायचा .....
त्याने गच्चीवर मस्त खाट टाकली होती ,तीवर मुलायम अशी गोधडी अंथरलेली होती .......

तो गच्चीवर आला तेव्हा , वातावरणात जरा जास्तच गारवा वाटत होता .....
एक तर अकरा वाजे पर्यंत आयपीएल ची मैच बघितली , त्यामुळे त्याला बराच उशीर झाला होता ...

तो मस्त खाटेवर पडला होता .....
त्याचे लक्ष त्या आकाशात चमकणाऱ्या चांदण्या कडे होते ...

लुकलूकणारी एक एक चांदणी तो त्याच्या डोळ्यांनी टिपत होता ,
सागर म्हणजे एक महत्वकांक्षी आणि जिज्ञासू वृत्तीचा होता .....

त्यामुळे त्याच्या डोक्यात त्या चांदण्या विषयी बरेच प्रश्न निर्माण व्हायचे ....
तो नेहमीच त्यांचे निरीक्षण करायचा ....

त्याला आज काही झोप लागत नव्हती .......

तो मोबाइल बाजूला ठेवून ,
त्या अंधारलेल्या आकाशात ठेवलेल्या चांदण्या मोजत होता ......
की काय असे त्याला स्वतः ला वाटत होते ....

जवळपास साडे बारा वाजता हवा अचानक शांत झाली ,
वातावरणात स्तब्धता जाणवू लागली ....

रातकिड्यांची किर्रकिर्र जरा जास्तच भयानक वाटत होती ,
कुठेतरी कुत्रे भुंकण्याचे आवाज येत होते .....

सागर चे घर दोन मजली असल्या कारणाने ,
गावातील जवळपास नजारा त्याला दिसत होता ....

तो वातावरणात असा अचानक झालेला बदल अनुभवत होता , त्याला जागीच कळत नव्हते ....

क्षणार्धात त्याने उठून गच्चीच्या खाली बघितले .......

गावातील सगळी लाईट गेली होती ....

त्याने मोबाइल ची टॉर्च लावली आणि पुन्हा आपल्या खाटेवर लोटांगण घेतले .....

आणि पुन्हा रात्रीच्या त्या रम्य वाटणाऱ्या आकाशाकडे बघितले .......

त्याचे डोके एकदम चक्रावूनच गेले ........

कारण वरचे आकाश जणू एखादा काळा समुद्र बनून गेले होते ,
थोड्याच वेळा पाहिलेल्या चांदण्या , चंद्र , तारे जणू त्या काळ्या काळोखात डुंबून गेले होते .......

एवढा बदल अवघ्या एका क्षणात कसा झाला होता , हेच त्याला समजत नव्हते .....????

ही सर्व लक्षणे पावसाच्या येण्याची होती , तर दहा मिनिटे उलटून गेली पण मात्र पाऊस आला नाही .....

अचानक गावच्या बाहेरच्या दिशेने सागरच्या कानावर डफडे जसे वाजते तसे आवाज आणि किंचाल्या ऐकू येत होत्या .....

त्या अघोरी आणि कानाला अतिशय विचित्र वाटणाऱ्या किंचाल्या अगदी त्याच्या जवळ जवळ येत होत्या ......

पण पूर्ण गाव काळोखात डुंबलेला असल्या कारणाने , त्याला काहीच दिसत नव्हते ...
येत होता फक्त तो भयानक आवाज ......
निरनिराळ्या वाद्यांचा .......

जणू कुणाची नरकयात्रा निघावी असा तो आवाज होता .....

एवढ्या रात्री कोण असली वाद्ये वाजवत असावं .....
आणि एवढ्या आरोळ्या का ठोकत असावं ??

आता मात्र सागर चांगलाच पेचात पडला होता ....

तो आवाज मारूतीच्या देवळा जवळ येऊन थांबला .....

भयानक आवाजांनी गजबजलेले वातावरण अचानक शांत झाले...........

आणि मारुतीच्या देवळाजवळ लक्क्ख असा प्रकाश पडला ,त्यांनतर पूर्ण गावात गेलेली लाईट पुन्हा आली ....

सागर मारुतीच्या देवळा कडे बघत होता .....

तो त्या दिशेकडे नुसता बघत होता .......

कारण तो प्रकार त्याच्यासाठी ,
एकदम विचित्र होता .......

न भूतो , न भविष्यती असा विचारही त्याने कधीच केला नसेल ...........

असे कसे होऊ शकते ???????

कारण ते दृश्य पाहून कुणालाही , अनपेक्षित वाटले असते ....

तर त्या सतरा वर्षाच्या सागरची बातच वेगळी होती .......

मारुतीच्या देवळा जवळ ,
दोन स्त्रिया ..….......थांबल्या होत्या ......

एक जवळपास साठ वर्षाची म्हातारी असेल ,
आणि तिच्या सोबत एक नवं विवाहीत युवती होती ......

त्यांना बघून विचित्र वाटण्या सारखा काही प्रकार नव्हता पण खरे दृश्य इथून पुढे चालू झाले होते .......

त्या दोघींनी आपल्या अंगावरील सर्व वस्त्र काढून टाकली ......
त्या दोघींचा चेहरा मात्र स्पष्ट दिसत नव्हता ....

देवळाजवळील लक्ख अशा दिव्याच्या प्रकाशाने , त्यांचे ते नग्न झालेले शरीर चमकत होते ......

सागरला ते पाहून खूप विचित्र वाटत होते ........

त्या दोघी काय करतात ,हे सागर आपल्या डोळ्यांनी निरीक्षण करीत होता .......
त्याला हा प्रश्न पडला होता की आपल्या सोबतच हा प्रकार दुसरे कोणी आणखी पाहत असेल का ????

त्याने सरळ त्याचा मित्र , सचिनला कॉल केला .....

सचिन ऑनलाइन असल्या मुळे ,त्याने लगेच कॉल उचलला ...

सगळं काही कळल्यावर तो सुद्धा त्याच्या घरच्या छतावर आला .......
कारण दोघांचे सुद्धा ....घर जवळ जवळ होते .....

सचिन ने सागरला व्हिडीओ काढायला सांगितला .....कारण सागरच्या घराच्या जवळच ते मारुतीचे देऊळ होते .....

सागर ने व्हिडीओ चालू केला .....

सगळे दृश्य त्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद होत होते .....

सागरने त्या स्त्रियांच्या त्या विचित्र वागण्याचा व्हिडीओ चालू केला खरा ,
पण व्हिडीओ काढताना त्याचे हात लटलत कापत होते ......

अचानक वाद्यांचा आवाज ऐकू येत होता ......
त्या दोन स्त्रियांनी एक थैली हातात घेतली .....

आणि त्या थैलीतून काहीतरी काढले ....

नेमके काय होते , हेच सागरच्या लक्षात येत नव्हते ......

त्यांनी थैलीतून ती काढलेली वस्तू दुसरी तिसरी कोणती नसून , एक कोंबडा होता .....

त्या साठ वर्षाच्या वयस्कर वाटणाऱ्या स्त्रीने ,
त्या कोंबड्याच्या मानेचा चावा घेतला .....

त्या स्त्रीच्या छातीवरून त्या कोंबड्याच रक्त ओघळत होते ....

तो कोंबडा जीवाच्या आकांताने ओरडत होता .......

तिच्या झाल्यावर दुसऱ्या तरुण स्त्रीने सुद्धा ........
त्या कोंबड्याच्या नरडीचा घोट घेतला ......

कोंबडा शांत झाला होता ........
आपली मान तशीच खाली टाकून निपचित पडला होता ...

दोन्ही स्त्रियांची तोंडापासून तर छातीपर्यंत ,
रक्ताने माखलेले होते .....

मग काही वेळाने ....
तो कोंबडा थैलीत घालून ......
त्यांनी पाच ते सहा प्रदक्षिणा त्या मारुतीच्या देवळाला घातल्या होत्या .........

अशी कोणती देवपूजा असते का ????

याच विचारात सागर तल्लीन झाला होता ......

त्या स्त्रिया एवढ्यावरच थांबल्या नव्हत्या ......

त्या कोंबड्या च्या थैलीतून पिठासारखे काहीतरी काढले ......
आणि मारुतीच्या मंदिराजवळून ते स्मशान भूमी पर्यन्त , टाकते नेले .......

अजूनही त्या स्त्रिया निर्वस्त्रच होत्या .......

जेव्हा त्या स्त्रिया समशान भूमी कडे जात होत्या , तेव्हा त्यांच्या सोबत निरनिराळ्या वाद्यांचे आवाज आणि जोरदार किंचाल्या घुमत होत्या ........
आणि अंधारात पेटून उठणाऱ्या मशाली जणू नाचत होत्या ....

एखाद्या सैतानाच्या प्रेताची यात्रा निघावी ,
असा आवाज त्या वातावरणाला आणखीनच गंभीर करत होता .....

तो अघोरी असा प्रकार नेमका काय आहे ?
हेच सागरच्या लक्षात येत नव्हते ....

त्या दोन्ही स्त्रिया जोपर्यंत परत येत नाही ,
तोपर्यंत सागर त्यांची वाट बघत होता ......

त्या स्त्रिया परत येऊन , त्यांनी आपले वस्त्र पुन्हा परिधान केले आणि गावच्या दूर जाऊन .....
त्या जणू अंधारात विलीन झाल्या होत्या ..........

त्यांचा चेहरा मात्र सागर पाहू शकला नाही .....

म्हणून तो जीवाला खात होता .........

त्याने आपला मोबाइल हातात घेतला .............

तो पालटून खाटेवर बसणारच होता , तेवढ्यात कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला ......
त्याला वाटले आई असेल ?????

म्हणून तो मागे वळला ..........

सागरची दातखिळीच बसली ..........
कारण त्याच्या समोर ,
त्या दोन स्त्रिया नग्न अशा अवस्थेत उभ्या होत्या .......
आणि सागर कडे पाहून खिदी खिदी हसत होत्या......

रक्ताचा लोट ,त्यांच्या फुगलेल्या छातीवरन ओघळत होता .....

सागरच्या पॅन्ट मधून ,
पाण्याचा पाट वाहत होता ..........

त्याने डोळे पांढरे केले , आणि त्या काळ्याभोर आकाशाकडे पाहत स्वतःला ....….
त्या काळोखाच्या स्वाधीन केले ..........

दोन दिवसानंतर जेव्हा सागर ला जाग आली ,तेव्हा त्याच्या घरची मंडळी त्याची शुद्धीवर येण्याची वाट बघत होती .....

सागरला अजूनही त्या स्त्रियांची भीती वाटत होती .....
त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता ...........

सागर ने त्या मोबाईलमधला व्हिडीओ त्याच्या घरच्यांना दाखवला ..........

सर्व मंडळी तो व्हिडीओ बघून आ वासून सागर कडे बघत राहिले .........

कारण

त्या व्हिडीओ मध्ये फक्त आणि फक्त मारुतीचे मंदिरच दिसत होते ...................

त्यात कोणतीही स्त्री किंवा व्यक्ती नव्हती ............

सागरला सुद्धा तो व्हिडीओ दाखवण्यात आला ........

सागर काहीही न बोलता , कावरा बावरा होऊन इकडे तिकडे बघत होता ........
घराच्या एका कोपऱ्यात सचिन उभा होता ......

जणू काहीच झाले नव्हते , असा भाव सचिन आपल्या चेहऱ्यावर आणत होता ...........

सागरची नजर सचिनच्या नजरेशी मिळताच .........
पुन्हा सागरच्या डोळ्यासमोर अंधार दाटला ...............

सागरची सवारी दवाखान्याच्या दिशेने रवाना झाली होती ..........................

..........................................धन्यवाद...............