#तू_ही_रे_माझा_मितवा...
#भाग_३७
#सेकंड_लास्ट- अ किस इज स्टील अ किस इन कॅसाब्लॅंका...!
-a kiss is still a kiss in Casablanca
{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}
“रिमा ही जरा वेडीय का? वेदसोबत ब्रेकअप झालं म्हणजे आयुष्यात कमिटमेंट देऊच शकणार नाही असं काही असतं का? ही का सगळी सिच्युएशन कॉम्प्लेक्स करतेय !”
अभय रुमच्या गॅलेरीत येऊन बोलत होता. बोलून झाल्यावर तो रूममध्ये आला,डोळे बंद करून जरा शांत बसला.
“अभ्या आता इतक्या दिवसांनी आमच्या ब्रेकअपचा काय विषय?सॉरी तू मोठ्याने बोलत होतास म्हणून ऐकू आलं.” वेद तिथे काम करत बसला होता,तो सहजपणे म्हणाला.
“ अरे सॉरी तुला डिस्टर्ब झालं का?”
“नाही पण काळजी वाटली,काय झालंय खूप वैतागून बोलत होतास, ऋतुजाचा काही प्रॉब्लेम झालाय का?” त्याने काळजीने विचारलं.
“अरे तुला मागे म्हटलं होतं ना कबीर आणि तिची पुन्हा एकदा भेट घालून द्यायचीय म्हणून.”
“हो,तापोळ्याला की कुठे ...मग आता काय झालं?”
“आता तो समोर आहे ,त्याचं प्रेम एक्स्प्रेस करतोय तर मॅडम कमिटमेंटला घाबरताय.मी प्रेमाच्या लायकच नाही म्हणताय.” अभय चिंतेने म्हणाला.
“मला वाटलच होतं ही मूर्ख मुलगी असाच काहीतरी विचार करेन...अभ्या मला तिला भेटायला हवं.ती त्याला तिच्या मनातलं कळूच देणार नाही आणि त्याला कळलं तरी अजिबात मान्य करणार नाही.मला माहितीय तिच्या मनात काय चालू आहे आणि तिला कसं समजावून सांगायचं..मी जाऊ का?”
“अरे बाबा जाऊ दे भलतच काही होऊन बसायचं.सगळं डिस्टर्ब व्हायचं”
“अभ्या,ती नाही डिस्टर्ब होणार आता.” तो आत्मविश्वासाने म्हणाला.
“मी फक्त तिच्याबद्दल नाही बोलत, मी तुझीही गोष्ट करतोय.”
“अभय रीलाक्स,मी खूप पुढे निघून आलोय आणि काहीही झालं तरी आता रेवाला दुखावणार नाही.डोंट वरी.”
“पण तू कसं जाणार? ऋतूला जर कळलं की आम्ही तिला समजवायला म्हणून तुला पाठवलं आहे तर पुन्हा डोक्यात काही खूळ घालून घेईन.”
“हो ते आहे,काहीतरी काम काढून जावं लागेल. थांब आरुषला पटवतो.”
त्याने आरुषला फोन लावला.
“ बोल वेद.”
“सर, सरळ मुद्यावर येतो, मला मुंबईब्रांचच्या प्रोजेक्ट साईटवर जायचंय उद्याच.”
“मग जा ना काय प्रॉब्लेम आहे.?”
“सर ऑफिशियली जायचंय”
“ऑफिशियली? मी कसं तुला पाठवणार?”
“सर तुमच्या एका इलीट क्लायंटला स्क्रिप्ट हवीय त्यावर डिस्कस करायला म्हणून तिथल्या एखाद्या सिनियर कॉपीरायटरला भेटायचं रिकमेंडशन द्या ना.”
“हो पण मी का करायचं हे?”
“सर माझ्यासाठी नाही ऋतुजासाठी तर कराल?
“का? काय झालं?” ऋतुजाबद्दल त्याला नेहमीच सॉफ्टकॉर्नर होता.
“आल्यावर सगळं सांगेन आता प्लीज हेल्प करा ना.”
“ओके सकाळपर्यंत डीटेल्स पाठवतो.”
“थँक्स सर.” त्याने आनंदाने फोन ठेवला.
“अभ्या उद्या सकाळीच निघतो. ती इमोशन लपवण्यात एकदम माहीर आहे,मला लवकर जायला हवं.”
“अरे पण रेवाला काय सांगशील?”
“हेच जे आहे ते.अभ्या मी एक गोष्ट शिकलोय रिलेशनशिपमध्ये ते म्हणजे ‘नो लपवाछपवी’.ती समजून घेईन.” तो हसत म्हणाला.
अभयने रिमाला देखील कल्पना दिली,तीसुद्धा आता हतबल झाली होती.झोपलेल्याला जागं करता येतं झोपेचं सोंग घेणाऱ्याला कसं जागं करणार?
अभयला आपण जे करतोय ते बरोबर की चूक हे कळत नव्हतं पण ऋतुजाला वेदच ह्या डायलेमामधून बाहेर काढू शकेल एवढं मात्र त्याला पक्क ठावूक होतं.
*************
सकाळी चहा घेतांना तिने एकदा पार्किंगमध्ये डोकावून बघितलं.
त्याची गाडी नव्हती.तो सकाळीच सर्वेसाठी निघून गेला होता.
तिने नाराजीने ब्रेकफास्ट संपवला.
आज क्लायंटटीमसोबत पूर्ण शुटींग अटेंड करायचं असल्याने ती ही निघून गेली.आताही चार वाजले तरी त्याची गाडी पार्किंगला दिसली नाही तेव्हा-‘तो काल चिडलेला होता,निघून तर गेला नाही?’ तिच्या मनात काहीबाही विचार येऊ लागले.
काही दिवस का असेना तो समोर आहे हेच तिला हवं होतं.
ती विचारात गर्क असतांना काजल आणि मोनाही आल्या.
“आज खूप काम होतं यार.वैताग आला.”
मोना धापा टाकत म्हणाली.
“हो ना.” काजल ही थकल्यासारखी होती.
“रिशी अजूनही कामात आहे?” ऋतूने आश्चर्याने विचारलं.मोनाला वेद येणार हे माहित होतं,तिने तसं दाखवलं नाही.
“अरे सांगायचंच विसरली तुला,तुमच्या पुणेब्रांचचा कुणी क्रियेटीव्ह रायटर आला आहे त्याची अपॉइंटमेंट होती, काहीतरी स्क्रिप्टवर काम चालूये.उशीर होईल म्हटला.” काजल चहा घेत म्हणाली.
“कोण?” ऋतुजाने आश्चर्याने विचारलं.
“वेद इनामदार.. असंच काहीतरी...आठवत नाहीये व्यवस्थित.”
काजल सहजपणे म्हणाली.
ऋतूने चमकून मोनाकडे बघितलं,मोनाने ही चेहऱ्यावर निरागस आणि आश्चर्याचेच भाव दाखवले.
“मला आता हे सगळं विचित्र आणि स्क्रिप्ट केलेलं वाटतंय.” ऋतू वैतागली.
“काय झालं?” काजल विचारात पडली.
मोनाने तिला वेदबद्दल सांगितल्यावर तिनेही डोक्याला हात मारून घेतला.तोपर्यंत रिशी वेदसोबत तिथे आला.
“Hello ladies…meet Ved."
रिशी हसून म्हणाला.त्याला सोडून सगळ्यांना वेद कोण आहे ते माहित झालं होतं.
“ऋतुजाला तर मी ओळखतो बाकी दोन गॉर्जीअस लेडीजशी ओळख करून घ्यायला नक्की आवडेल.” तो हसत म्हणाला.
रीशीने त्याला बसायला सांगितलं.ऋतूला त्याचं इथे येणं अजूनही संशयास्पद वाटत होतं.
“यार,ह्याच्या ट्वीन डिम्पल प्रत्यक्षात काय किलर दिसतात.”
मोना त्याच्याकडे बघत ऋतूच्या कानांत खुसफुसत म्हणाली तसं तिने डोक्याला हात मारून घेतला.
त्यांच्याशी ओळख झाल्यावर त्याने ऋतूकडे बघितलं.तिच्या चेहऱ्यावर हैराणी,परेशानी,लक्ष सतत पार्किंगच्या त्या विशिष्ट जागेकडेच.
“हाय ऋतुजा,how are you?”तो सहजपणे म्हणाला.
“फाईन..तू कसा आहेस?ऑफिस काय म्हणतंय?”
“मी मजेत आणि ऑफिसला तर तू पुढच्या वीकमध्ये येणार आहेस ना” तो हसत म्हणाला.
“नाही,ब्रेक घेतलाय एक आठवडा.त्याच्या पुढल्या वीकमध्ये जॉईन करेन.” ती जमेल तसे उत्तरं देत होती.
जरावेळातच काजल,रिशी आणि वेद यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या.मोना आणि ऋतू प्रतिसाद फक्त देत होते.
काही वेळ असाच गेला,तेवढ्यात मोनाला कबीर दिसताच तिने त्याला जरा ओरडूनच आवाज दिला.
तो तिथे आला.ऋतूच्या डोळ्यातले बदललेले भाव वेदने लगेच टिपले.
कबीर त्यांच्या टेबलाजवळ आला,वेद पाठमोरा होता.
कबीर नाव ऐकताच नाही म्हटलं तरी त्याला आतून कुठतरी काहीतरी दुखल्यासारखं झालं.
“हॅलो गाईज.” तो हसत म्हणाला.
जरा एक नजर ऋतूकडे ही बघितलं तेव्हा ती अस्वस्थ वाटली.
“बाय द वे मिट वेद..मला वाटतं तू मागे याच्याचबद्दल विचारलं होतंस ना?”
रिशी नॉर्मल बोलत होता,काजल आणि मोना एकमेकांकडे हवालदिल नजरेने बघत होत्या.
वेद उठून उभा राहिला.
“हाय, वेद इनामदार..”
त्याने हँडशेक करायला हात पुढे केला.त्याच्या चेहऱ्यावरची ओळ न ओळ वाचण्याचा तो प्रयत्न करत होता.
“ कबीर सरदेसाई..”
तेवढ्याच दमदारपणे हँडशेक करून तो बोलला.
त्याला पाहून कबीरच्या मनात संमिश्र भावना,त्याने ऋतुकडे एक नजर टाकली, वेद ऋतूला मनवायला आला असेल त्याने मनानेच ठरवलं ..तर कबीरलापाहून वेद्च्या मनात एकच विचार..
”Man she is made for you…you people are just made for each other”
जरावेळ ते एकमेकांना फक्त बघत राहिले.
इकडे ऋतूच्या मनात शंकांचं काहूर,विचारांचं थैमान.
दोघांना समोरसमोर बघून नेमकं काय फील होतंय हे ही तिला कळत नव्हतं.कबीरच्या मनात काय चालू असेल हा पण विचार तिच्या मनात चमकून गेला.
“You people carry on..डिनरला भेटूया.” त्याने कसंबसं वाक्य पूर्ण केलं.
ऋतूकडे बघितलं तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी दिसणारं प्रेम तसच असलं तरी त्याला उगाच वाटून गेलं की हातातून हात निसटतोय... कबीर निघून गेला.वेदला ही त्यांची डोळ्यांची भाषा समजायला अजिबात वेळ लागला नाही.
तिचं मन ‘त्याला थांबव,त्याच्यासोबत जा’ असं काही सुचवत असतांनाही ती शांत बसून राहिली.
ह्या शांततेच्या मागे किती वादळं ती थोपवून धरते हे वेद्ला पक्क ठावूक होतं.
**************
कबीरने रुममध्येच डिनर घेणं योग्य समजलं.
"कदाचित ती आपल्याला पाहून वेदशी बोलायला कम्फर्टेबल राहणार नाही" हाच विचार त्याने केला.
डिनरनंतर ती नेहमीच्या बेंचवर जाऊन बसली होती.
कबीर दिसला नाही तर हे असं बैचेन होणं आपण कितीकाळ सहन करणार आहोत,आता दोन तीन दिवसांनी पुन्हा वेगळं व्हायचंय,आता सावरणं शक्य होईल का? ती स्वतःशीच बोलत होती.
“हे selenophile ..”
तिच्या कानावर ओळखीचा आवाज.
समोर वेद होता.मजेत हसत उभा होता,त्याच गोड खळ्या मिरवत.
तिच्या चेहऱ्यावर त्याच्या ओळखीचं असणारं हसू.
“हाय..” ती पण हसून म्हणाली,चेहऱ्यावर उदासी होतीच.
“बोलू शकतो ना?” तो अगदी फॉर्मल होत म्हणाला.
“वेद...का फॉर्मल होतोय,नाटक बंद कर.”
तिने जरासं सरकून त्याला बसायला जागा दिली.तो हसला.
“Thank god मला वाटलं आल्यापावली परत पाठवते की काय.”
“बस्स किती खेचशील..रेवा मजेत? तिला माहितीय तू इकडे आलाय ते.?” तिच्या मनात हजारो प्रश्न होते.
“ती मजेत आहे, मी इकडे येणार म्हणून जरा नाराज होती तसं पण दाखवलं नाही.”
“खूप पझेसिव्ह आहे तुझ्यासाठी.” ती समाधानाने म्हणाली.
“हो,जरा जास्तच.दोन आठवड्यापूर्वी घरी सांगितलं आमच्याबद्दल.” तो शांतपणे म्हणाला.
“मग?” तिने उत्सुकतेने विचारलं.
“आईला समजवायला एक दोन दिवस लागले नंतर घरी घेऊन गेलो होतो तिला,मॅडम तर स्वयंपाक,होम मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट घेतात आईला अजून काय हवं.आई बाबा दोन्ही खुश.खोटं नाही बोलणार,आर्यला मात्र तू हवी होती.पण एक दोन दिवसांपासून जरा फोनवर मस्त गप्पा चालूये दोघींच्या.”
तो अगदी मनापासून शेयर करत होता.
“व्हेरी हॅपी फोर यु वेद.” ती मनापासून खुश झाली.
“खोटं सांगणार नाही सुरवातीचे काही दिवस आपल्यातले बरेच मोमेंट्स,गप्पा आठवायच्या,तुझी आठवण यायची पण हळूहळू रेवाचं प्रेम अंगवळणी पडलं,तिचं काळजी घेणं,घरातल्यांची काळजी,विचारपूस...तिचं आयुष्यच माझ्यापासून सुरु होऊन माझ्यापर्यंत येऊन थांबतं.तिचं प्रेम मिळवायचा मार्ग चुकीचा होता पण प्रेम चुकीचं नव्हतं हे जेव्हा डोक्यात फिट्ट बसलं तेव्हा म्हटलं उशीर नको..त्याच त्याच चुका पुन्हा नको,म्हणून घरी सांगितलं.जरा सेटल झाल्यावर पुढचा विचार करेन.”
“हे सगळं ऐकून रेवाला घट्ट मिठी मारावी वाटतेय.” ती मनापासून खुश होती.
“मला मारू शकते,तिच्यापर्यंत पोहचेल.” तो मोठ्याने हसत म्हणाला.
“नालायक,मार हवा तुला.”
तिने हसत त्याच्या पाठीवर एक दोन रपटे दिले.
दोघेही बराच वेळ मनमुराद हसले.ती शांत झाल्यावर पुन्हा तिच्या डोळ्यात उदासी होती.
“माझं सोड तू कशी आहेस ऋतू?” तिच्याकडे बघत तो म्हणाला.
“सांगितलं ना दुपारी वेद, मजेत आहे,अजून काय.”
“ऋतु...मजेत असतांनाचे आणि नाराज असतांनाचे तुझे हे डोळे मला माहित नाही का?”
तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला.
“वेद..”
“का त्रास देतेय ऋतू स्वतःला आणि त्यालासुद्धा?”
तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं.
“एक मिनिट,तुला अभय किंवा रिमाताईने पाठवलंय,हो ना?”
तिचा मूड क्षणांत बदलला.तिने चिडून विचारलं.
“ऋतुजा ते महत्वाचं नाहीये,का तू सिच्युएशन कॉम्प्लेक्स करतेय.”
“मला आता कळतंय,कबीरला इथे पाठवणं,तुझं इथे येणं हे सगळं सगळं...कळतंय.नक्की काहीतरी ठरवून वागताय तुम्ही लोकं.तुझ्याप्रमाणे सगळेच माझ्याभोवती काही कथा तर लिहित नाहीये ना?” तिच्या डोळ्यात पाणी दाटलं.
“ऋतू...ऐक ना,तू समजतेय तसं नाहीये,तू फक्त खुश रहावी एवढीच सगळ्यांची इच्छा आहे आणि तुझा आनंद,तुझी ख़ुशी तू नाकारतेय ते बघवत नाहीये.” तो तिचा हात हातात घेऊन मायेने थोपटत म्हणाला.
“वेद मी मुद्दाम नाही करतेय का? त्याच्यासाठीच जीव तुटतोय.आपली रिलेशनशिपसुद्धा टिकवता आली नाही मला. हे सगळं जाणून सवरून त्याला कसं गुंतवू.”
तिने भरून आलेले डोळे पुसले.
“ये वेडाबाई..आपली रिलेशनशिप तुटायचं कारण न तू आहे ना मी...त्याचं कारण ह्या दोन वेड्या लोकांचं आपल्यावर असणारं जीवापाड प्रेम होतं असं नाही वाटत तुला? आणि आपल्या दोघांच्या चुका होत्या.तू एकटी नाही जबाबदार त्याला आणि कमिटमेंटच्या बाबतीत म्हणशील तर त्याच्यासोबतच्या एका संध्याकाळसाठी तू स्वतःला वाहून घेतलंय..कमिटमेंट अजून वेगळी ती काय असते पिल्या...तू त्याच क्षणी त्याची झाली होती जेव्हा तू पहिल्यांदा त्याला बघितलं, कळतंय का ? तुला फक्त ते उशिरा समजलं आणि नंतर मी जे काही बोललो बाळा तो एका उद्विग्न हार्टब्रेक आशिकचा मूर्खपणा समज. ती क्षणिक प्रतिक्रिया होती,खूप कॉमन अशी पण आपण दोघेही सावरलोच ना?
ब्रेकअप झाल्यावरही का इतके पॉझिटिव्ह ट्रकवर राहिलो आपण? कारण ते योग्य कारणासाठी असेल.प्लीज ऋतू आता उशीर नको करो.तुझा कबीरच्या प्रेमावर आणि त्याचा तुझ्यावर पूर्ण हक्क आहे.त्याचा हक्क त्याला दे ऋतू.तू पूर्ण त्याच्यात उतरली आहेस,ऋतू नाकारू नको,त्याच्या फक्त आठवणींशी कमिटेड असणारी तू त्याला कसं दुखावणार आहेस? तू तर फक्त प्रेम देऊ शकते तू कधीच दुःख देणार नाहीस कुणाला.मला तू आयुष्यात प्रेम करायला शिकवलं ऋतू,प्रेम जगायला शिकवलं,माफ करायला शिकवलं.आपल्या रिलेशनशिपमधले सुंदर क्षण तसेच राहणार आहे,कारण ते तेव्हा आपण भरभरून जगलो आहोत आणि त्यामुळे ते आता पिसासारखे हलके,तरल झाले आहे.त्याचं ओझं आजच्या क्षणांवर नको टाकू.
आयुष्यभर ज्या अश्वस्थ,स्थिर प्रेमाच्या शोधात होतीस तो कबीर आहे पिल्ल्या.जा सांग त्याला किती प्रेम करतेस ते.”
तिला हुंदका दाटून आला.त्याचेही डोळे पाणावले.
“come here…”
त्याने तिला मिठीत घेतलं,तिने लहान मुलासारखं मनसोक्त रडून घेतलं.आज त्या मिठीत सांजवातीच्या प्रकाशासारखी नितळ. समजूतदार उब होती,मध्यरात्रीने हलकेच हात सोडवून पहाटेला बंधनमुक्त करावं अशी जाणीव त्या मिठीत होती.
तिकडे समोर ,कबीर तिला शोधत आलेला.वेदने तिला मिठीत घेण्याची आणि याची येण्याची वेळ एकच...दुरून त्याला ह्या मिठीचा अर्थ खरतर कळणार नव्हताच.
तो तिथूनच माघारी फिरला.हृदयावर मणामणाचं ओझं.मोना त्यालाच शोधत होती.
“कबीर तुलाच शोधत होते,चल ना आज रिशी स्वतः गिटार प्ले करणार आहे.तो केव्हापासून तुला शोधतोय चल ना.”
“ओके पण फक्त जरावेळच,मला पॅकिंग करायचंय.”
“का ?
“संपल सगळं,finished.”
तो कापणाऱ्या आवाजावर शक्य होईल तेवढं नियंत्रण ठेवून बोलत होता.
“what?”
तो कदाचित वेदला पाहून इनसेक्युर झाला असावा तिने कयास केला.
“I mean माझं काम, ते झालंय.finished आणि बंगलोरला ही बरीच कामं खोळंबली आहेत, सो आय मस्ट गो.”
काहीतरी नक्की झालंय तिने हेरलं.
“ऋतू दिसली का तुला कुठे,तिलाही शोधत होते.”
“नाही...माहित नाही.”
एवढं बोलून तो कॅम्पफायरकडे निघून गेला.
************
“Hello” कबीरच्या शेजारी खुर्ची घेत वेद म्हणाला.
“ओह्ह हाय.” कबीर चेहऱ्यावर हसू ठेवत म्हणाला.
“मी संध्याकाळपासून शोधत होतो तुला.” वेद त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता.
“हो अक्च्युली खूप बिझी डे होता,थकलो होतो.”
“अच्छा.”
“वेद मलाही बोलायचं होतं तुझ्याशी म्हणजे आताच नाही तर अगदी सहा महिन्यांपूर्वीच.खरतर माफी मागायची होती.”
“मी विसरलोय सगळं..” वेद जरा स्मित हास्य ठेवत म्हटला.
“राईट,सगळं विसरून पुन्हा नव्याने नात्यांचे अर्थ उलगडणं केव्हाही चांगलं.its never too late.” तो पडलेल्या आवाजात म्हणाला.
“राईट..” वेद्ला मात्र त्याचा संदर्भ जाणवला नाही.
“आणि एक, यात ऋजाची..ऋतुजाची काहीच चूक नव्हती जे काही झालंय ते फक्त माझ्यामुळे.”
कबीर जमेल तसं त्याला ऋतूची बाजू क्लियर करत होता.
“कबीर leave it..”
“नाही,फक्त तिला कधी दोष देऊ नको,तुला तर माहितीय ना किती नादान आहे ती.थोडी वेडीय...नाही,जरा जरा जास्त वेडीय.तिचं कसं होतं होतं ना खोटं काही बोलताच येत नाही तिला,ओठांनी बोलायला गेली तर डोळे खरं बोलतात.अल्लड आहे अजून.फक्त तिच्यातला बालीशपणा समजून घे..वाहत्या वाऱ्यासारखी आहे. तिने न केलेल्या चुकीसाठी कधी तिला जबाबदार धरू नकोस, तिच्या डोळ्यात मी पाणी नाही बघू शकत,I mean तिच्याजवळ असलेले सगळेच,कुणीच तिच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत ना. तिचे डोळे मस्तीखोरच छान वाटतात.तो निरागसपणा तसाच जपला गेला पाहिजे.हो ना?”
तो जडावलेल्या आवाजात बोलत होता.त्याची पूर्ण खात्री झाली होती की ते दोघं पुन्हा एकत्र आलेय.
“हो..” वेद शांतपणे म्हणाला.
“Thanks bro..”
एव्हाना रिशी समोर आला होता.रिशी सगळ्यांचा लाडका होता.तो गिटार घेऊन समोर आल्यावरच जमलेल्या सर्वांनी त्याला चीयर अप केलं.
काजल मोना ऋतू त्याच्या उजव्या बाजूला बसल्या होत्या तर वेद,कबीर समोर होते.त्याने ऋतुकडे पाहिलं,आज तिच्या डोळ्यात उचंबळून आलेलं प्रेम दिसत होतं, 'ते वेद आल्यामुळे असावं' हे त्यानेच मनाने ठरवलं.
रिशीने गाणं सुरु करण्याअगोदर काजलला एक फ्लायिंग कीस दिलं तसं हुटिंगच्या आवाजाने परिसर दणाणून गेला.
“गाईज..मी जे गाणार आहे ..this is the story of first kiss...”
तो एवढं बोलल्यावर ऋतू आणि कबीरने चमकून एकमेकांकडे पाहिलं..ती लाजल्यासारखी झाली.गाल ब्लश झाले.तो ही क्षणभर सगळं विसरला आणि दोघं जणू त्या संध्याकाळी जाऊन पोहचले.
“मोराक्कोमधलं एक शहर कॅसाब्लांका..आणि ओल्ड क्लासिक मुव्ही कॅसाब्लांका..त्यातलं त्याचं फर्स्ट किस आणि मुव्हीच्या कितीतरी नंतर गायलं गेलेलं हे गाणं.. कॅसाब्लांका!! हे प्रत्येकाला त्याच्या आयुष्यातलं फर्स्ट किस आठवायला जगायला भाग पाडेल.here it goes..!
त्याची बोटं सराईतपणे गिटारवरून फिरू लागली.
I fell in love with you watching Casablanca.
Back road the drive in shaw in the flickerin' light.......
a kiss is still a kiss in Casablanca.
A kiss is not a kiss without your sigh.
Please come back to me in Casablanca.
I love you more and more each day as time goes by
“अ कीस इस स्टील किस इन कॅसाब्लांका
..बट किस इज नॉट अ कीस विदाऊट युर साय.
प्लीज कमबक टू मी इन कॅसाब्लांका,
आय लव्ह यु मोर अंड मोर इच डे अज टाइम गॉज बाय”
कबीरला तिच्या डोळ्यात हरवायला मजबूर करणारं गाणं रिशीने मुद्दाम सिलेक्ट केलं होतं.
तसा तो हरवला देखील--तो कीस अजूनही ओठांवर आहे आणि तुझ्यामाझ्या फिलिंग्ज एक झाल्या होत्या त्या क्षणांत. मला तो मोमेंट आयुष्यभर जपून ठेवायचाय...मी प्रत्येक क्षणाला मागच्या क्षणापेक्षा जास्त प्रेम करेन...शेवटपर्यंत करेन.... आय लव्ह यु मोर अँड मोर इच डे एज टाइम गोज बाय”
इकडे तिच्या मनातलं सारं सारं मळभ हटलं होतं,त्या प्रत्येक ओळीसोबत ती त्याच्यात जास्त जरा जास्तच विरघळत होती. त्याची नजर तिच्यावर खिळली आहे हे जाणवून अगदी पहिल्या प्रेमाची पहिली गोड हुरहूर,धडधड तिला जाणवत होती.
तिने लाजून नजर चोरली,खाली झुकलेली नजर वर उठली तेव्हा तो रुममध्ये निघून गेलेला होता. गाणं संपलं.
काजलने रीशीला मिठी मारली.मोना आणि ऋतूपण त्याच्या कौतुकात सामील झाल्या. ऋतूचे पाणावलेले पण हसरे डोळे पाहून त्याला समाधान वाटलं आता काही दिवसांतच ही सोबत सुटणार म्हणून चौघांना भरून आलं होतं.वेद ही निरोप घ्यायला आला.
“चलो,उद्या पहाटेच निघतो,काम अर्धवट सोडून आलो होतो.”
“Thanks Ved.मला निघतांना फोन कर,मी येते सी ऑफ करायला.”
“ओके,भेटूया.” तिच्या डोक्यावर टपली मारत तो म्हणाला.
रिशी,काजल ,मोना यांना भेटून तो निघून गेला.
गेल्या सहा महिन्यांच्या गोड आठवणी उजळवत ते चौघे खूप वेळ लॉनवर बसून होते.
©क्रमशः
पहील्या कमेंटमध्ये गाण्याची लिंक आहे,प्लिज ऐका.
शेवटचा भाग उद्या सकाळी की रात्री पोस्ट करू?
Copyright©2019 हर्षदा
All rights reserved. No part of this story may be reproduced or used in any manner without the prior written permission of the copyright owner, except for the use of brief quotations in a review.