morpankh part - 2 in Marathi Short Stories by Suraj Suryawanshi books and stories PDF | मोरपंख भाग - 2

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

मोरपंख भाग - 2

(ती आता फार संतापली होती त्याच्यावर तशी तडक हातातली file खाली ठेवली आणि त्याच्यावर बरसू लागली )
ओह...मिस्टर ! तुम्ही अजून माझा पाठलाग करताय ?? लाज नाही वाटत इथपर्यंत येऊन पोचलात ? (त्याच्या कपद्याकडे पाहत ) कपड्यावरून तर सभ्य दिसता..तिचा एवढा रागाचा पारा पाहून निखिल तिला समजवायचा प्रयत्न करू लागला..मॅम तस काही नाही. मी इथे assistant ऑफिसर पदावर आज रुजू झालोय आणि आता..( त्याच बोलणं पूर्ण होतंय न होतेय तोच ती त्याच्या वर शाब्दिक भांडणात तुटून पडली ) असिस्टंट ऑफिसर ..! Accha म्हणजे अगोदर पासून ठरवून चाललंय हे सगळं..तुम्ही तर हद्दच पार केली की..शर्वरी मॅम खर खोट सतत्या काय आहे याची विचारपूस न करता बोलत होती. अहो पण मॅम मी इथे केबिन मधला कॉम्पुटर नंबर तीनचा पासवर्ड नेल्या साठी आलो बाकी तसा माझा काही हेतू नाही आणि तसही मी तुमची माफी मागणार होतो पण तुम्ही गरबडीत निघून गेला.राघव उत्तरला. राहुद्या तुमच्या सारख्या लोकांना चांगलंच ओळखून आहे .पासवर्ड हवाय ना...देते शिपाई काकांकडे पाहिलं माझ्या केबिन मधून चालते व्हा..मला तुमचा चेहरा पाहण्याची पण इच्छा नाहीये..निघा इथून ( शर्वरी मॅम चा रागाचा पारा तप्त ज्वाला रस बाहेर पडावा तसा बाहेर पडत होता.निखिलने रागाचा पारा आवरत दात घट दाबून धरत स्वतःच्या हाताच्या मुठी आवळल्या.शर्वरी मॅम सिनिअर असल्याने तो जास्त फार बोलू शकत न्हवता.तसा लालबुंद झालेला निखिल रागात बाहेर येऊन केबिन मधल्या खुर्चीवर गेल्या मध्ये असणारा टाय एका हाताने सोडत विचार करत बसला.ज्या गोष्टीत आपली काहीही चूक नाहीये ..अश्या चुकीत केवढा हा अपमान..? गुन्हा काय तर एक सीट बळकावली म्हणून ? जॉबचा पहिला दिवस इतका खराब असेल त्याला अजिबात वाटलं न्हवत.आणि त्यात एका सम वईन मुलीकडून अपमान हे निखिलला सहन होणार न्हवत.खरतर चूक नसताना पण माफी मागणार होता तो...तरीपण एवढी शिक्षा...?बास झालं आता ..नोकरी सोडुन दयायची नाहीतर ही कटकट सहन करावी लागेल.पुढ्यात असणारा एक पेन व कागद घेतला..नको नको त्यापेक्षा कॉम्पुटर वर type करणं सोपं जाईल.खटा खटा त्याने टायपिंग ला सुरुवात केली.प्रिंट बटण वर क्लिक करून प्रिंटर वर एक प्रिंट काढली व खाली सही केली.कागदाची घडी करून एका हाताने बाह्या मागे सारत तो letter देण्यास निघाला.मॅनेजर कडे लेटर द्यायचं होत.जाताना पुन्हा तिची केबिन जवळच होती तो तिच्या केबिन जवळून कासव गतीने चालत होता.पुन्हा तिरका कटाक्ष त्याने तिच्या केबिन मध्ये टाकला आणि पुढे निघाला.थोडं पुन्हा मागे येऊन डोळे बारीक करत डोकावलं. आणि तो पुरता मिनिटभर जागेवरच उभा राहिला.केसांनमधून हात फिरवत पुन्हा कमरेवर ठेवला.आणि स्मितहास्य गालावर पुन्हा झळकू लागलं आणि हातातला कागद चुरगळू लागला.थोड्या वेळापूर्वी लालबुंद अंगारी डोळे केलेला निखिल मात्र आनंदाने पुन्हा भरला होता.थोडं पाणावलेले डोळे साफ स्पष्ट दिसत होते...

थोडं पुन्हा मागे येऊन डोळे बारीक करत डोकावलं. आणि तो पुरता मिनिटभर जागेवरच उभा राहिला.केसांनमधून हात फिरवत पुन्हा कमरेवर ठेवला.आणि स्मितहास्य गालावर पुन्हा झळकू लागलं आणि हातातला कागद चुरगळू लागला.थोड्या वेळापूर्वी लालबुंद अंगारी डोळे केलेला निखिल मात्र आनंदाने पुन्हा भरला होता.थोडं पाणावलेले डोळे साफ स्पष्ट दिसत होते...
!
कारण ती तीच होती हो तीच ..बालपणीची मैत्रीण शर्वरी जाधव केबिनच्या आत मध्ये तिरका कटाक्ष टाकताना तिच् नाव असलेली आयताकृती पाटी त्याला तिच्या टेबल वर दिसली होती. निखिलचा आनंद गगनात मावत न्हवता. जिचा फोटो पाहण्यासाठी चातक जसा आतुरतेने पावसाची वाट पाहतो तसा तो पण रोजन रोज तरसत होता. तसा त्याने खिशा मधला मोबाईल फोन काढत कॅमेरा ओपन करत आपल्याला कोणी पाहत नाहीये ना हे अगोदर पाहिलं आणि तिची एक छान सी छबी काढली.पुढे अजून काय घडू नये म्हणून तो पुन्हा केबिनच्या परतीच्या प्रवासकडे वळला.हात मध्ये चुरगलेलं असलेलं resign लेटर घेऊन तो पुन्हा त्याच्या केबिन मध्ये येऊन बसला. आनंदान चेअर बसल्या जागेवर गोल फिरवली तशी दोन चार file चा गठ्ठा धाड दिशी आदळला..( शेजारचे एक दोघे नाराजीच्या सुरात त्याकडे पाहत होते ) त्याने त्यांना सॉरी ..! कानाला एक हात लावत म्हटलं.पुन्हा मोबाईल on केला .नेट चालु होतच त्याच बरोबर फेसबुक मेससेंजर ओपन केलं ..स्क्रीन वर बोटाने तीच नाव चालत होता.तस शर्वरी जाधव नावावर क्लिक केलं.दुर्दैव त्याच 5 मिनिटापूर्वीच ती ऑफलाईन गेली होती.,च्या मायला आपलं नशीबच फूटक अस मनातल्या मनात पुटपुटला.तरीपण पण त्याने तिला messege पाठवायचं ठरवलं जेणेकरून ऑनलाईन आल्यावर messege पाठवता येईल आणि लगेच भुनुक लागेल..

निखिल : hi...!

ती ऑफलाईन असल्या कारणाने त्याने मोबाइल फोन sitela ठेऊन दिला. व एक अपूर्ण असलेली file पूर्ण करायचं त्याने ठरवलं .तेवढयात मोबाईल vibrate झाला. नक्की तिचाच messege असणार म्हणुन त्यानं पॅटर्न टाकत मोबाइल फोन ओपन केला.शर्वरीचाच messege होता तो ...

शर्वरी : hi

निखिल : he tu job joining kuthe kel ahes ...Konti company ahes sangitl nahis ....

( तो type केलेला messege सेंड करणार तोच तिचा messege मेससेंजरच्या इनबॉक्स मध्ये येऊन धडकला. )

शर्वरी : are aikna ...Ek mulga ahe re majhya company madhey s.t bus madhey thod shabdik bhandan jhal ...tsa to majhya magech ahe re ...Jam tension alay bagh..

( निखिलने type केलेला messege पुन्हा खोडुन टाकला.कारण ती अजूनही त्याच्या विषयी बोलत होती. निखिल ला आता पूर्ण खात्री पटली की हीच ती बालपणीची मैत्रीण आहे.पण आता मात्र तो मोठ्या पेचात पडला होता..शर्वरी त्याला बदमाश समजत होती पण तिला ठाऊक न्हवत की तोच बालपणीचा मित्र निखील आहे.निखिल मात्र विचारात पुरता गुंफला होता काय करावं हे त्याला कळता कळत न्हवत डोक्याला हात लावून तो हताश बसला होता.तेवढयात पुन्हा मोबाइल वाजला.पुन्हा शर्वरीच होती.

शर्वरी : are aiktoys na...? Tu dupari 4 vajta coffee var bhetshil ?

तिने फर्स्ट time त्याला भेटायला बोलवलं होत.इच्छा असून सुद्धा निखिलला हो म्हणावसं वाटत न्हवत.कारण तिथे पुन्हा पाहिल्यावर पब्लिक प्लेस भांडण होईल की काय असं त्याला वाटत होतं..त्याला यातून मार्ग काय काढावा हे सुचत न्हवतं.

क्रमशः

- सुरज सुर्यवंशी


!