Stubborn Kanchana and her palace - a secret .. in Marathi Mythological Stories by डॉ . प्रदीप फड books and stories PDF | हट्टी कंचना आणि तिचा महाल -एक रहस्य ..

Featured Books
Categories
Share

हट्टी कंचना आणि तिचा महाल -एक रहस्य ..

नमस्कार मंडळी , मी प्रदीप फड एक भयकथा लेखक ....

मी पहिल्यांदा च इथे या अँप वर लिहीत आहे ...


एक सत्य ऐतिहासिक कथा

बुलडाणा जिल्ह्यातील एक परिचित आणि नावजलेला तालुका म्हणजेच मेहकर .....
तसे गाव खुप मोठे पण इतके नशीबवान कारण या
गावाला ऐतिहासिक वारसा खुप मोठा आहे ...

तसे मेहकर खुप विकसित झाले पण बालाजी मंदिराकड़े व त्या पालिकड़ची वस्ती थोड़ी जुनिच आहे , आणि विशेष म्हणजे तशीच आहे ...

खरच पण घराचा वारसा या लोकांनी जपून मात्र ठेवला याबद्दल शंका नाही .
खुप वर्षे झाली या गावातील लोकांना बालाजीची मूर्ति सापडली तिही पूर्ण काळ्या पाषाणाची , पण तेही एक आश्चर्यच आहे कारण एक रेशही त्यावर नाही किंवा निसर्गाचा एकही उपद्रव तिच्यावर झाला नव्हता ...
आणि मूर्ती जेव्हा सापडली तेव्हा खरच असे वाटत होते की साक्षात् बालाजी ने दिलेली भेट आहे जणू .....

तुम्ही आजही जा आणि आणि मूर्तिकड़े बघा क्षणभर आपण मंत्रमुग्ध होऊन त्या मूर्तिकड़े पाहत राहतो .
स्थापना झाल्या नंतर पुढे शारंगधर् बालाजी म्हणून प्रचलित झाले ......

चला तर आपण कथे कड़े वळू यात ........
अगदी गावच्या बाहेर एक अतिशय सुन्दर महाल होता ,
तसा महाल गावच्या बाहेरच का होता ?
हे पण एक गुढ़च आहे ......

तिचे सौंदर्य इतके मोहक होते ..... की हजारो मैलावरचे राजे महाराजे घोड्यावर बसून तिच्यासाठी यायचे .....
खर तर तिच्या पायातील पैंजन कितीतरी दुरपर्यंत असणाऱ्या
गावांना साद घालायचे .......
लोक फक्त रात्र होण्याची वाट बघायचे .....
अप्रतिम तीचा आवाज .......
तेवढाच मनमोहक आणि दर्जेदार तिचा नाच ....

खर तर तिला नर्तकी म्हणून जास्त प्रसिद्धि मिळाली होती
पण ती एक अष्टपैलू होती ........
काय जमत नव्हते तिला ......

जूने लोक भाकड कथा जेव्हा सांगतात तेव्हा ख़रच ती अक्षरशः डोळ्यासमोर येते ......
कंचनेचा अगोदरचा इतिहास मात्र कोणी सांगत नाही हे
मात्र एक रहस्यच आहे ......

ती जेव्हा समोर यायची डोळे तिचे इतके पानीदार आणि
तेजवान की त्यामधे निल रत्ने त्या जागी ठेवले आहे
जणू .......
ओठ तर गुलाबाच्या पाकल्यालाही लाजवेल ...इतके लाल आणि मनमोहक .....
फुला वाणी फुललेले तिचे यौवन ......

एका चित्रकाराने एक आपली पूर्ण कलेची पराकाष्ठा करून
एका सर्वसुखसम्पन्न , सुंदर स्त्रीचे चित्र काढावे त्यापेक्षाही ती सुंदर होती .....

खरच तिचे सौंदर्य मी लिहून कैसे काढु लिहिता लिहिता माझी लेखनी खुडुंन जाईल ......

खरच ति इतकी सुंदर असेल म्हणूनच तर राजे महाराजे त्यांच्या महाला तील नर्तकिचा नाच सोडून
तिच्या नृत्याला आपलया नेत्रानी टिपन्यासाठी इतक्या दूर येत होते .........

साऱ्या राजा महाराजांनाही भूरळ पाडनारी ती आपल्या सामान्य माणसाला कैसे बरे सोडेल .........

अफाट संपत्ति आणि अप्रतिम कला , आणि मनमोहक असे सौंदर्य असणारी कंचना मात्र भलत्याच विचारात होती ....

सुख , दासिया , संपत्ति ,कला यांचा उपभोग घ्यायचा सोडून तिला वेगळेच विचार चक्रवुंन सोडत होते .....

लोणार चे सरोवर तेव्हापासून होते , आणि काठावर कमळ जा मातेचे मंदिर .....
माहीत नाही कस पण त्या मंदिरातील दिवा तिला साद घालत होता ...काय माहित तिचे ते पुर्व जन्माचे संबध होते की काय ?

तो दिवा तिला स्वतः च्या महालातून बघायचा होता....
किती नवलाची गोस्ट ? काय हे शक्य होते ?

कारण उल्कापतामुळे झालेले सरोवर जमिनीच्या स्तराच्या कितीतरी खोल ....आणि त्यामधे मंदिर ...आणि मंदिरात दिवा ....

पण मंदिर उघडेच होते , आताच्या काळात त्याचे बांधकाम झाले ....
पानी , वाऱा , थंडी याचा त्या दिव्यावर काहीच फरक पड़त नव्हता तो दिवा विझतच नव्हता हे एक रहस्य होते ....

कंचनेने हट्ट धरला ....तसा तिचे कलेकड़े दुर्लक्ष्य होत होते ..
स्वतःच्या शरीरा कड़े तिचे लक्ष नव्हते ..
तिची समजूत घालन्याचा कितीतरी जनानी प्रयत्न केला ,
पण काहीही उपयोग झाला नाही ....

तिच्या महालकड़े येणारे घोड्यान्च्या टापाचे आवाज आता कमी होत होते .......
संगीताचे सुर आता गावकरायन्या येत नव्हते ....
तिच्या यौवनाचा सुंगध आता दरवळत नव्हता ....
पायातिल पैंजनांचा ठेक्यावर झोपणाऱ्याना आता झोप लागत नव्हती ....

एक कलावंत आपली कला लोप पावत होता......
म्हणूनच की काय तिची इतिहासाने नोंद घेतली नसावी ...

बिचारि कंचना आणि तिचे ते काहीही तथ्य नसलेले विचार करत होती ?
अजूनही वेळ गेलेली नव्हती ......
कितीतरी तिच्या हितचिंतकानी समजूत घातली तर काही
चुगल्या करणारे तिच्या कल्पनेला दुजोरा देत होते .....

कंचनेने तर असा हट्ट धरला की"""" जोवर मला दिवा दिसत नाही """ ..... तोवर अन्नाला शिवनार नाही ..

काय माहित तिचा हट्ट तिला कुठे पोचवनार ....??????

एक एक दिवस जात होता, तिचे सौंदर्य लोप पावत होते ...
यौवन तिचे आता गुलाबाच्या फुलावानी सुकत होते ....

सुरुवात झाली कामाला ....
मजूर आले , काम सूरू झाले ....
पहिला माळा बांधल्या गेला ....
तीने इतका हट्ट धरला ....की लवकरात लवकर वरचे माले बंधावे.....

कंचनेची प्रकृति खालावत होती , तिच्या प्रकृति पोटी मजुरानी दिवस रात्र एक केलि ....
कारण दिवा पहिल्याशिवाय अन्नाला शिवनार नव्हती अशो शपथ घेतली होती तिने .....

काम जोरात सूरू होते .....प्रयत्नाची सीमा आता संपली होती ...कच्चे का होईना एका आठवड्यात सात मजले
बांधून झाले .....

आठव्याच्या तयारित होतेच पण
"" कंचना सातव्या माल्यावर चढली ""...................

काहीतरी कोसळन्याचा आवाज झाला ........कच्चे बांध काम होते ते ...कंचना तर चढलीच पण तिच्या मागोमाग सर्व मजुरहि चढ़ले ....

एकपाठोपाठ एक मजला कोसळला ...सारे मजूर कंचनासाहित गत प्राण झाले ....

पुन्हा एकदा या भारत वर्षाने एक कलावंत गमावला होता ...

सगळे मजुरांचे सांगडे सापडले पण कंचना कुठेही नव्हती ?????

काही लोक म्हणतात की कंचनाच्या उंची एवढी दगडाची
शिळा मात्र होती ......

एक दगड फोड़नारा कामगार नंतर तिथे गेला ती शिळा फोडण्यासाठी , पण काही परत आलाच नाही ....

पण तो दिवा कंचनेला का बघायचा होता ?
कुठे गेली कंचना की महाला तच विलीन झाली की
आणखी कुठे ?
आणि तो दिवा ?
हे एक रहस्यच आहे ....

तो महाल आजही त्यांच् पहिला मजला अर्धवट तूटलेल्या स्थिती मधे आढळतो ......

लोक सांगतात तिथे कधी कधी पैंजन , गाणे आणि घोड्यांचा टापांचा आवाज येतो ?

हे कितपत खरे आहे त्यांनाही माहित नाही ......

पण तो महाल आजही कंचनेची असन्याची साक्ष देतो ....

आणि एका हरवलेल्या कालवंताच्या शोकामधे आपले
अश्रु ढाळत असतो ...................................
........................................................समाप्त .......

मी प्रदीप फड़ .............. , कशी वाटली ही ऐतिहासिक सत्य घटना सर्व वाचकांना विनंती एकदा तरी मेहकरला जाउंन बालाजी मंदिर आणि "" कंचनेचा महाल "" बघायला यावें ....
काही सांगायचे असल्यास
माझा व्हाट्सअप नंबर
8411908606

धन्यवाद .......................