Danveer Karna in Marathi Motivational Stories by Suraj Kamble books and stories PDF | दानवीर कर्ण

Featured Books
Categories
Share

दानवीर कर्ण

अलीकडे काही दिवसआगोदर माझ्या वाचनात आलेल्या शिवाजी सावंत लिखित,"मृत्युंजय"या कादंबरीत कर्ण कोण होता, महाभारतात झालेल्या युद्धामध्ये त्याची भूमिका काय होती, कर्ण मित्रप्रेम, यावर प्रकाश टाकण्यात आला आणि त्यावर आधारित कर्ण सर्वश्रेष्ठ दानवीर कसा??असे काही प्रसंग यात मांडण्यात आले आहे...
सारथीपुत्र म्हणून वाढलेला अधिरथ बाबा आणि आई राधामातेचा कर्ण (वसू)हाच खरा सारथीपुत्र होता.महाभारतात घडलेल्या घटनेमध्ये अंगराज कर्ण हाच एकमेव सर्वश्रेष्ठ नर व धनुर्धारी मनुष्य होता.
जन्मजात कवच कुंडल लाभलेला आकर्षक असा दिसणारा कर्ण सर्वश्रेष्ठ धनुर्धारी नर होता..या महाभारतात अर्जुन जरी सर्वश्रेष्ठ धनुर्धारी योद्धा म्हणून मान्यता मिळवलेला असला तरी अर्जुन हा कर्णाच्या निमपट होता..
महाभारतात जर जास्त अपमानास्पद मनुष्य ठरला असेल तर तो म्हणजे दानवीर कर्ण.. कधी सुतपुत्र म्हणून,कधी द्रोपदी कडून,तर कधी पितामह भीष्म कडून अश्या अपमानास्पद जीवन जगत असताना कर्ण अतिशय निर्मल पाण्यासारखा शांत राहिला..श्रेष्ठ धनुर्धर, योद्धा असून अहंकार कधी केला नाही,एव्हढेच नव्हे तर सुतपुत्र असल्याने सारथ्याने सारथ्य करावे,शस्त्रविद्या शिकू नये,असे द्रोणाचार्य कडून लाथाडलेला कर्ण तरी त्याचे व्यक्तिमत्त्व उठून दिसते...
गुरुचे काम विद्या देण्याचे असते परंतु द्रोणानी त्याला शस्त्रविद्या शिकविले नाही,यात गुरूचा कोणता गुण द्रोणाचार्यांजवळ होता???असे कित्येक प्रश्न जवळ घेऊन कर्ण जीवनाचे कोडे उलगडत राहिला,आणि तो तेवढाच शांत पण राहिला,अगदी या ओळीप्रमाणे,

कोई मेरा बुरा करे वो उसका कर्म,
और मै किसीं का बुरा ना करू वो मेरा धर्म है।"

कर्ण एक योद्धाचं नव्हता तर एक महान दानवीर सुद्धा होता, त्याने जरी अमाप संपत्ती जिंकून गोळा केली ती त्याने याचकाना दान करत होता...एवढंच नाही तर त्याला जन्मजात मिळालेली कवच कुंडल साक्षात याचक म्हणून दारात आलेल्या इंद्राला,तो इंद्र आहे हे माहिती असून सुद्धा त्याने हसत हसत ती दान केली...
एकच सांगायचं आहे की आपल्याजवळ जे काही आहे ,ते दुसऱ्यासाठी असण्याचा प्रयत्न केला पाहीजे, कपटी नीतीने मनुष्याचे अधःपतन होत असते..
अंगराज कर्ण मग श्रेष्ठ दानवीर कसा??असा प्रश्न येतोच त्याच उत्तर असं की,जेव्हा युद्ध चालू असते,कर्नाला बाण लागलेला असतो, तेंव्हा एक वृद्ध याचक म्हणतो,की,इथे कुणी दानवीर आहे का???माझ्या मुलाचा अंत्यसंस्कार करायचा आहे आहे आणि माझ्याकडे तो करण्यासाठी पैसे नाही,मी वृद्ध आहे!!! हे शब्द या दानवीर कर्ण याच्या कानी पडतात,त्या याचकाचे शब्द कर्ण याला घायाळ करून टाकतात,तो याचकाला जवळ बोलावतो व आपल्या मुलाला म्हणतो की,एक धारदार खडग/ दगड घेऊन ये मला आज या याचकाला दान करायचे आहे,आणि माझ्याजवळ आता फक्त हे सोन्याचे दात आहे,ते मी त्याला दान करणार आहे!!!
कर्ण आपल्या मुलाला हे सांगतो परंतु मुलगा हे काम करू शकत नाही,कारण कोणताही पुत्र आपल्या जन्मदात्याला मरणाच्या शय्येवर असताना हे काम करू शकत नाही,शेवटी कर्ण आपल्याच हाताने ते सोन्याचे दात काढून टाकतो,रक्ताच्या थारोळ्या उडतात...तो याचक रक्ताने माखलेले दात कसे घेणार म्हणून ते दात कर्णाचे अश्रूथेम्ब ,घामाश्रु स्वच्छ धुवून काढतात,
असा तो महान,अद्वितीय कर्णचं😢
वाचकानो,मला एवढंच सांगायचे आहे की,त्या दानवीर कर्णाचा दानवीर हा गुणधर्म प्रत्येकाने बाळगायला पाहिजे,जे आपल्याजवळ आहे,दुसऱ्यासाठी जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे,नाही तर म्हटल्या जाते,
as you saw, as you reap, अर्थात,जसे पेराल तसे उगवेल...
दुसऱ्यासाठी जगणे हीच मानव धर्माची खरी व्याख्या आहे,नाहीतर आपण आज कुणाला देण्याचा प्रयत्न करत नाही,निव्वल लुबाडणूक करत असतो,आणि आपल्याच नावाचा गाजावाजा करण्याचा प्रयत्न करतो ते खालील सुंदर ओळीनुसार
कभी प्यासे को पाणी पिलाया नही,
बात अमृत पिलाने से क्या फायदा।।
कभी गिरते हुए को उठाया नही,
बाद आंसू बहाने से क्या फायदा।।।”

अश्या प्रकारे आजच्या मनुष्याची गोष्ट आहे,कर्ण याचा हाच दानवीर धर्म त्याला सर्वश्रेष्ठ, सर्वश्रुत, असा महान बनवतो...
शिवाजी सावंत यांनी ज्या प्रकारे दानशूर वर्णन मांडले आहे त्याचा अर्थ आपल्या जीवनात बाळगला पाहिजे,व एकदा तरी मृत्युंजयं या कादंबरीचे वाचन केले पाहिजे,मृत्यूंजय याचाच अर्थ साक्षात मृत्यू वर विजय मिळविणारा,असा एकच कर्ण...
कर्ण यांच्या दानवीर पणाला माझा दंडवत प्रणाम💐

✍️सूरज