Janu - 2 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | जानू - 2

Featured Books
Categories
Share

जानू - 2

अभय ला जानू च नाव समजलं होत ..तिला पाहिल्या पासूनच तो तिला माझी जानू समजून बसला होता ..आपली कधी ओळख होईल ..कधी तिच्याशी बोलू अस झालं होत त्याला ..उन्हाळी सुट्टी मध्येच तर जानू तिथे राहायला आली होती ..सुट्टी संपून आता शाळा सुरू झाली होती..९वी ला तर होते ते आताशी ...दोघे ही एकच शाळेत ..पण ..शाळेला ..अ,ब,क अशा तुकड्या असल्यामुळे ते एकाच वर्गात नव्हते ..याच भलतच दुःख अभयला झालं होत ...पण जानू मात्र अजून ही या सर्व गोष्टी पासून अनभिज्ञ होती..तिला अभय च्या भावना ..त्याची ओढ याबद्दल जराशीही कल्पना नव्हती....
जानू आताशी सर्वांना ओळखू लागली होती ... मिहुं आणि तिचं मात्र छान जमायचं...तो नेहमी तिच्या घरी असायचा ..आता अभय दादा प्रमाणे ..जानू दीदी ही त्याची फेवरेट झाली होती...जानू ही संजू. अजु ..बिट्टू .. व आपल्या अभय ला ओळखू लागली होती..ते आपले शेजारी आहेत ..आपण एकाच शाळेत आहोत ..बस इतकीच काय ती ओळख..
इकडे अभय ची वेगळीच हालत...अभय च्या बरोबर घरासमोर ..जानुच घर पण मध्ये बरच अंतर ..पण अभय घराबाहेर आला की ...समोर लगेच ..जानूच घर ..जानू घरा बाहेर आली की ..लगेच अभय ला दिसे...जानुच्या घरा शेजारी उजव्या बाजूला संजुच घर..आणि डाव्या बाजूला ..एक वहिनी राहायच्या ..बाबा घरी नसले की जानू वहिनी कडे जाऊन बसत असे..तिचं आणि वाहिनीच छान जमायचं...खूप गप्पा मारायच्या दोघी मिळून...चाळीच्या एका टोकाला एक सार्वजनिक नळ होता ..जेव्हा कधी ..पाण्याचा प्रॉब्लेम होई ..सर्वजण तिथून पाणी आणत..
अभय उठला की पहिलं घरा बाहेर येई ..जानू कुठे दिसते की पाही..ती दिसली की ..चला ..आजचा दिवस झाला फ्रेश आणि गूड..हलकीशी स्माइल करी ..फक्त जानू ला पाहणंच त्याला खूप सुखावून जाई ..पण जेव्हा जानू सकाळी सकाळी दिसत नसे...मग झालं अभय च मन उदास ...खरंच कधी कधी आपल्या आवडत्या व्यक्तीला फक्त पाहणं ..यात ही खूप मोठं सुख दडलेले असत ..ते ..छोटंसं सुख ही आभाळ एवढं मोठं वाटू लागत ..

सायकल वरून फेऱ्या मारण हा अभय चा आवडता छंद....जेव्हा जानू दिसायची नाही तेव्हा तो दिवस भर चाळीत सायकल ची फेरी मारी...एकदम स्पीड मध्ये सायकल चालवत यायचं ... व जस जानू च घर येईल तस एकदम स्पीड कमी कमी करत जाणं ..ही त्याची आगळी वेगळी ट्रिक ... ह्म्म्म..एवढ्या फेऱ्यात एकदा का होईना .. जानूच दर्शन होतच असे ..झालं ..अभय जणू गड जिंकल्या च्या आनंदाने घर गाठायचा...तिच्याशी बोलन होत नसले तरी ..तिला पाहण्यातच ..त्याला सर्व काही मिळाल्याचा आनंद असायचा ....कुठे असत इतकं निस्वार्थ आणि निखळ प्रेम..आज काल..तर ..मुलीचं सर्वस्व जरी मिळालं ..तरी ..प्रेमाची परिभाषा ..कळलेली नसते ..एव्हाना ..शरीर सुख ..इतकच ..काय प्रेम..अशी या व्यवहारिक जगाची ..रित झाली आहे ..त्यात अभय सारखा एखादाच ..जन्म घेतो ..सर्वांना प्रेमाची खरी ओळख करून देण्यासाठी..

बरेच दिवस झाले होते ..जानू शाळेत ही हुशार ..त्यात बऱ्याच तिच्या मैत्रिणी झाल्या होत्या ..मुल मात्र .. जानू ची मुद्दाम खोड काढत ...तिला चिडवत ....बऱ्याच जणांना ती त्यांचं पहिलं प्रेम वाटू लागली होती ..पण ..जानू या सर्वांन कडे दुर्लक्ष करी..तिला तिच्या बाबांचा स्वभाव माहित होता..आणि तिला त्यांची भीती ही होती..शाळेत आता सर्वांना चांगलच कळलं होत की जानू बरीच हुशार आहे ..त्यामुळे शिक्षकांचं तिच्यावर लक्ष होत ....विज्ञान चे माने सर .. म्हटलं की .. जानूच्या तोंडच पाणी पळायचं..जानू च काय शाळेत सर्वजण त्यांना नेहमी घाबरत...... सरांचं एक विशेष म्हणजे ..ते ..शिकवत असताना ..त्यांच्या तोंडून ..खूप थुंकी उडे ..आणि मुलांच्या तोंडावर .. पडे .पण सरांचं त्याकडे लक्ष नसे ..पण ..जेव्हा सर वर्गात येत ..सर्वजण आपला चेहरा लपवून घेत ....जानू ही तेच करायची...सर आले म्हंटले की लागले सर्वजण ..डेस्क मध्ये तोंड खुपसायला ....सर्वांनी मिळून त्यांचं नाव ..फवारा सर अस ठेवलं होत ..सर गेले की सर्वजण खूप हसायचे ....सर खूपच कडक..त्यांचा अभ्यास पूर्ण नसला की ..डोळ्यातून पाणी येऊन हात सूजू पर्यंत बदडून काढायचे.....गणित शिकवत होते ..गावित सर ..फार छान शिकवायचे..पण..त्यांची ही एक वाईट सवय ..ते ..कमी हुशार मुलांना ..खूप टोमणे मारायचे ...की कित्येक जणांच्या ते जिव्हारी लागायचे ..पण सरांचं चालूच असायचं.....भोसले सर होते भूगोल विषयाला..पण त्यांचं त्यांनाच कळत नसावं बहुतेक ..ते शिकवतात की ..अर्ध्या झोपेत आहेत ..हे समजू पर्यंत त्याचं शिकवण झालं असायचं.....हे तिघे गुरुवर्य सोडले तर बाकी सर्वजण ..फारच ..छान ....होते.
क्रमशः