Romantic rain in memory in Marathi Love Stories by Suraj Kamble books and stories PDF | आठवणीतला रोमँटिक पाऊस

Featured Books
Categories
Share

आठवणीतला रोमँटिक पाऊस

मुसळधार पाऊस,
खिडकीत उभी राहून पहा,
बघ माझी आठवण येते का????
नाही जाणवलं काही तर बाहेर पड,
समुद्रावर ये,तो उधानलेला असेल,
पाण्यात पाय बुडवून उभी रहा,
वाळू सरकेल पायाखालून,
आता तशीच परत घरी ये,
केस पुसू नकोस,साडी बदलू नकोस,
पुन्हा त्या खिडकीत येऊन उभी राहा,
बघ माझी आठवण येते का????




पावसाचे दिवस आणि प्रथमेश याच पावसाचा आनंद घेत पावसाच्या या ओळी मोबाईल वर कानात इअरफोन घालून ऐकत होता,आणि झोपी जाण्याचा प्रयत्न करत होता.बाहेर गावी इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षाला प्रथमेश शिकत होता..एक छोटुशी खोली करून प्रथमेश आपलं कॉलेज आणि ट्युशन्स व आपला अभ्यास असं नियमित चालल होतं.रोज झोपायच्या पूर्वी हिंदी ,मराठी गाणे लावून निवांतपणे झोपण्याचा त्याचा रोजचाच नित्यनियम .तेवढ्यात मोबाईल च्या स्क्रीन वर एक मॅसेज आला.मोबाईल ची स्क्रीन उघडतो तोच प्रिया चा हाय म्हणून मॅसेज आला होता.....


प्रिया अगदी साधी, सरळ मुलगी,रूपाने थोडी सावळी,पण कुणाच्याही नजरेत भरावी अशीच ती,सडपातळ आणि उंची जेमतेम पाच फूट वैगरे असावी,डोळे टपोरे,नाजूक, इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षाला प्रथमेश सोबत शिकत होती..दोघेही बाहेरगावचे असल्याने जिल्याच्या ठिकाणी दोघेही खोली करून राहत होते..अभ्यासात सुद्धा हुशार असल्याने सर्व मित्र,मैत्रिणी,सर तिच्या नेहमी जवळच असायचे. कॉलेज मध्ये कोणताही प्रोग्रॅम असो वा काही प्रॅक्टिकल असो वा सांस्कृतिक कार्यक्रम तर प्रिया नेहमी समोरचं असायची. फार काही प्रिया ने मित्र बनवले नव्हते पण मोजकेचं होते ज्यात प्रथमेश आणि प्रिया च बॉंडिंग ज्यांच्याशी चांगलं जमायचं असे ते सारिका,मनीषा,अजून एक दोन ...तेवढ्यात तिचा मॅसेज आला...

प्रिया - हाय....

प्रथमेश - हॅलो....

(हल्ली मित्रांना आणि काही मैत्रिणींना मॅसेज चा रिप्लाय देण्यास टाळाटाळ करणारा प्रथमेश कितीही कामात असला तरी प्रिया च्या मॅसेज ला रिप्लाय देत असायचा...)

प्रिया - " काय करतो आहे प्रथमेश " ???

प्रथमेश -
"काही नाही गं प्रिया, पाऊस बाहेर पडतो आहे आणि माझा झोपायचा वेळ झाला म्हणून आपला गाणे ऐकत झोपी जाण्याचा प्रयत्न करतो आहे, तेवढ्यात तुझा मॅसेज आला!!'"

प्रिया -
"अरे हो, "तुझी ती सवयच जणू " !!! झोपी जाण्याच्या पूर्वी गाणे ऐकत ऐकत झोपायची!!!
"पण यार तू जॅम बोरिंग आहेस ?????

प्रथमेश -
"अगं असं का म्हणत आहेस ???" आणि मी काय केलं??? ' तुझा मॅसेज आला आणि रिप्लाय तर दिला!!!मग यांत बोरिंग सारख काय झालं????
असा नाराजीचा सूर काढत प्रथमेश ने प्रिया ला मॅसेज पाठवला...

प्रिया -
"' अरे तसं काही खास नाही रे !!! ' पण बघ ना, इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षाला दोघेही आहोत,पण ना तू कधी मित्रांसोबत फिरायला जात,ना कधी काही आगाऊचे लफडे करत ना कधी कोणत्या भानगडीत पडत ना कधी कोणत्या मुलीच्या चक्कर मध्ये !!म्हणून तू बोरिंग आहे म्हणाले!!!!"

प्रथमेश -
अच्छा!!!!!! तसं काही केलं तरच व्यक्ती इंटरेस्टिंग असतो असं म्हणायचं आहे का तुला???बाकीच्यां सारख वागलं तरच चांगला राहील मी असं काही म्हणणं आहे तुझं????

प्रिया -
"अरे नाही प्रथमेश" ... बरं सोड ते...मी चेष्टा केलीय तुझी.. मी काय म्हणतोय, " आपण कुठे फिरायला जायचं काय????"

प्रथेमश -
'आपण म्हणजे कोण ????' " तुझें मित्र- मैत्रिण,माझे मित्र वैगरे काय ?????"

प्रिया -
'अरे नाही' !!!! "फक्त तू आणि मी जायचं???"

( प्रिया ला तसा प्रथमेश आधीपासूनच आवडायचा आणि प्रथमेश ला प्रिया सुद्धा आवडायची,पण दोघेही एकमेकांना सांगत नव्हते,वा कधी बोलून दाखवत नव्हते...)

प्रथमेश -
बरं ठीक आहे??? "पण कुणाला खबर लागली तर!!! आपल्याला चिडवतील???आणि आपण जायचं तरी कुठे????"

प्रिया -
जायचं कुठे ??? हा नंतरचा प्रश्न आहे,पण आपण जाऊयात...
चल आता झोप,मी पण झोपते???

उद्याला कॉलेजमध्ये आल्यावर बघू, कुठे जायचं ते?? गुड नाईट म्हणत प्रिया मॅसेज करून झोपी गेली...

प्रथमेश - गुड नाईट म्हणत त्याने ही रिप्लाय केला...नेमकं जायचं कुठे आणि अचानक प्रिया ने असा फिरायला जाण्याचा बेत कसा काय आखला असेल,?????याचं विचारात कधी झोप लागली ते त्याला ही कळले नाही...

दुसऱ्या दिवशी प्रिया आणि प्रथमेश कॉलेज च्या कॅन्टीन मध्ये जाऊन भेटलेत...आणि जिल्ह्यात असणाऱ्या धरणावर पर्यटन स्थळ असल्याने तिथे जायचं असं ठरलं...बाहेर मात्र पावसाने हजेरी लावली होती...पावसाचे दिवस असल्याने तो आपलं नियमितपणे बरसण्याचं काम करत होता..कॉलेज चे क्लास सुरू झाले आणि दोघेही एकमेकांच्या क्लास मध्ये जाऊन क्लास करू लागले....

प्रथमेश च्या मनात मात्र रात्री ऐकलेल्या ओळी अजूनही घुमतच होत्या,


केस पुसू नकोस,साडी बदलू नकोस,
परत येऊन त्या खिडकीत उभी रहा,
बघ माझी आठवण येते का????
आता नवरा येण्याची वाट बघ,
दाराची बेल वाजेल ,
तू त्याच्या हातातली बॅग घे,
रेनकोट तो स्वतःच काढून ठेवेल,
तो विचारेल तुला भिजण्याचं कारणं,
तू म्हणं घर गळतंय,
बघ माझी आठवण येते का????


शेवटी सुट्टीचा दिवस रविवार धरणावर जायचा ठरला...कुणाला खबर लागू नये याची दोघांनी ही खबरदारी घेतली होती..प्रिया कडे स्कुटी असल्याने तिच्या स्कुटीवर जाण्याचा बेत ठरला..
रविवार उजाडला आणि प्रिया , प्रथमेश च्या खोली शेजारी येऊन हॉर्न वाजवत उभी राहिली,

आज प्रियाने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता, त्यावर काही नक्षीकाम केलेले होते सोबतच ओढणी, आणि ओठांवर लाल लिपस्टिक,डोळ्यात काजळ,हातावर घडी,आणि नखांना नेलपॉलिश लावून आज इतर दिवसापेक्षा थोडी हटके दिसत होती,
प्रथमेश दिसताच तिने स्मित हास्य केले....

प्रथमेश ने आज काळा जीन्स आणि व्हाईट शर्ट घातलं होतं...
इतर दिवसापेक्षा आज त्याने ही तयारी चांगलीच केली होती,आणि स्प्रे बाजूच्या खोली वाल्याचा अंगावर मारून तो बाहेर निघाला होता...बाहेर पावसाचा रंग काही येईल असा सध्या तरी दिसत नव्हता,म्हणून लगेच जायचं आणि परत जे बघायचं ते बघणं झालं की परत आप आपल्या खोलीवर यायचं असं ठरलं होतं...प्रथमेश ला गाडी चालवता येत नसल्याने तसं प्रियाला माहिती होतं,म्हणून प्रिया च्या पाठीमागे थोडं अंतर करून प्रथमेश बसला होता...
बसताना मात्र त्याला संकुचित वाटत होतं...
शेवटी दोघेही जाण्यासाठी शहराच्या बाहेर निघाले...........

" मग काय प्रथमेश, आज तुम्ही तर भलतीच तयारी केली दिसतंय गड्या??????
स्प्रे वैगरे मारून आलात तुम्ही???असा चेष्टेनी प्रश्न करून प्रियाने बोलायला सुरुवात केली....

" छे ????? तसं काही नाही प्रिया....नेहमीच घालतो हे... एवढे कुठे शर्ट पॅन्ट माझ्याकडे नाही,
आणि राहिला स्प्रे चा विषय तर बाजूच्या खोलीत राहणाऱ्या मुलाचा थोडा अंगावर मारून आलो,
अशी प्रामाणिक कबुली प्रथमेश ने प्रिया ला दिली....

" हाच तर तुझा स्वभाव मला आवडतो रे प्रथमेश!!!!अगदी साधं खोटं ही तुला बोलता येत नाही,कसा काय रे तू एवढा प्रामाणिक आहेस????"
प्रियाने असा प्रेमळ प्रश्न प्रथमेश ला विचारला...

" अगं तसं काही नाही प्रिया!!!"
यांत कसला आला प्रामाणिक पणा???जे खरं होतं तेच तर मी तुला सांगितलं...

" बरं ते सोड, पण तू ही तर जरा जास्तच मटकून आलेली आहे...इतर दिवसांत जशी राहते त्यापेक्षा तू वेगळीच बनून आली न आज????
काही स्पेशल आहे आज ???असा खोचक प्रश्न प्रथमेश ने प्रिया ला विचारला...""

आता मात्र प्रिया लाजेने विरक्त झाली होती,क्षणभर काय बोलावे हेच तिला सुचेनासे झाले,
म्हणून तिने उत्तर देण्यास टाळाटाळ केली...


काही वेळ दोघांचाही शांततेत गेला,ती आपली गाडी चालवण्यात गुंग झाली, आणि प्रथमेश ने आपला मोबाईल काढून गाणे सुरू केलं...


महफ़िल में कैसे कह दे किसी से
दिल बंध रहा है किसी अजनबी से
हाय करे अब क्या जतन,
सुलग सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में,
लगी कैसी ये अगन
रिमझिम गिरे सावन...सुलग सुलग जाए मन.....


दोघेही ठरल्या ठिकाणी पोहीचले होते..शहराच्या ठिकाणापासून जवळपास ३० कमी हे धरण होत,त्यामुळे प्रिया पूर्णतः थकून गेली तरी तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह काही केल्या कमी झाला नव्हता...धरणाच्या आजूबाजूला झाडेच झाडे होती,ज्यात सागवान,काटेरी वृक्ष, मातीने आणि सिमेंट काँक्रीट ने बांधलेले हे धरण,धरणाच्या काठावर त्रिकोणी आकाराचे मोठे मोठे दगड ठेवले होते..त्या धरणावरील एक रस्ता जंगलाकडे जात होता आणि दुसरा धरणाच्या पाण्याकडे....दोघेही धरण पाहण्यात व्यस्त झाले होते , तिथे आलेल्या पर्यटकांनी सुद्धा गर्दी केली होती,काही फोटो काढण्यात व्यस्त होते,तर काही जोडपी आपल्या प्रियकर ,प्रेयसीच्या गप्पा मध्ये गुंग झालेले होते..प्रिया आणि प्रथमेश हे फक्त मित्र आणि मैत्रीण असल्याने आजूबाजूच्या नजरा त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघत होत्या,त्यामुळे दोघांनाही थोडं संकोचल्या सारख झालं होतं..त्याच धरणाच्या जागेवर पर्यटकांची नेहमी वर्दळ असल्याने काही दोन- चार दुकाने पाल टाकून बसली होती.. त्यातील काही कच्चा चिवड्याची दुकाने,तर काही चहाची दुकाने लागली होती, तर काही थंड पाण्याची.... दोघांना सुद्धा भूक लागली होती म्हणून प्रथमेश ने कच्चा चिवडा बनवून घेतला होता, चिवड्याचे पैसे मात्र आता प्रथमेश ने दिले होते, आणि प्रिया ने खोलीवरून काही तरी बनवून आणले होते,दोघेही धरणाच्या बाजूला जिथे बसता येईल तिथे जाऊन बसून दोघांनी चिवडा खाल्ला...


शेवटी प्रियाने , प्रथमेश सोबत बोलायला सुरुवात केली.....

प्रिया -
" तुला आठवते प्रथमेश, जेव्हा आपण पहिल्यांदा कॉलेज ला भेटलो होतो,
आणि तू अगदी साधा पॅन्ट शर्ट घालून ऍडमिशन साठी आला होता,
मी ही माझ्या बाबासोबत आलेली होती..."

प्रथमेश -
नाही प्रिया , "मला काही तेवढं आठवत नाही,आणि मुलींकडे मी नजरा फिरवून बघेल असा तरी मी नव्हतोच..."

प्रिया -
" माहिती आहे रे प्रथमेश मला!!!!!तू अगदी तेव्हाही साधा होता,आणि आताही तसाच आहे,
म्हणून एक मुलगी तुला गाडीवर पाठीमागे बसवून इथे फिरायला घेऊन आली आहे,
नाही तर मुलं असतात,राक्षसी प्रवृत्ती ची,पण तू तसा नाही..."

प्रथमेश -
बस.... बस... प्रिया ," एवढीपण स्तुती नको करू,एवढाही मी काही चांगला नाही,त्यामुळे एवढ्या दूर पर्यन्त काही मला चढवू नको..."

प्रिया -
"बरं जाऊ दे ते, खरं सांगते इथे आपण का आलोत ते????
कॉलेजमध्ये आपल्या दोघांना काही वेळ मिळत नाही,
आणि मिळाला तरी पोरांच्या नजरेत आपण येऊ नये,
काही वेळ निवांत आपल्याला इथे मिळावा
म्हणून मी तुला इथे येण्यासाठी आग्रह केला...."!!

अजून दुसरं स्पेशल असं म्हणजे??????

(आता मात्र प्रिया लाजून खाली मान टाकून बोलू लागली होती...)

प्रथमेश -
" दुसरं स्पेशल म्हणजे काय गं प्रिया????""

(आता प्रथमेश चे सुद्धा कान ऐकण्यास उत्सुक झाले होते..)

प्रिया -
अरे प्रथमेश, "तू मला आवडतोस!!!!"

किती दिवस झाले मनातलं बोलावं ,बोलावं म्हणून ठरवलं पण काही केल्या हिंमत होत नव्हती,
आणि आज जर हे बोलली नसती तर कदाचित पुढे कधीही बोलली नसती...

आय लव्ह यू ,प्रथमेश !!!!

आता मात्र प्रथमेश पुरता गोंधळला होता,काय बोलावे म्हणून त्याला काही सुचत नव्हते,पण मनोमन सुखावला होता..त्यालाही प्रिया आवडत होती,पण प्रेमाचा प्रस्ताव ठेवण्याची त्याची काही हिंमत होत नव्हती,म्हणून तो असा टांगणीला जात होता...
पण आज प्रियाने स्वतःहून आपल्या प्रेमाची कबुली दिली असल्याने तिला नकार देण्याचा प्रश्नच निर्माण होत नव्हता..,
आणि प्रियाला नकार देणे म्हणजे आपल्या मनात असलेल्या प्रियाविषयीच्या प्रेमाचा अपमान करणे होईल
म्हणून काहीही विचार न करता प्रथमेश ने,

" आय लव्ह यू,प्रिया !!!!"

म्हणून आपल्या प्रेमाची कबुली दिली..." माझं ही प्रेम तुझ्यावर होत गं प्रिया, पण हिंमत होत नसल्याने माझ्याकडून ते काही जमलं नाही,
त्यासाठी सॉरी!!!!!""

प्रिया - सॉरी वैगरे काही नको मला......
तू हवा होता म्हणून मला माझ्या प्रेमाची कबुली तुझ्यासमोर द्यावी लागली....

प्रियाच्या चेहऱ्यावर आपल्या प्रेमाचा रंग ओसंडून वाहत होता,आणि दोघेही आपल्या प्रेमाच्या भावविश्वात गुंतले गेले...
प्रथमेश च्या नजरेला नजर भिडवीत त्याच्यात कधी बुडाले हे प्रियाला कळले नाही,
फक्त तिच्या ओठांवर गीत ती मनातल्या मनात गुणगुणत होती....


कहाँ से तू आया, कहाँ जाएगा तू
के दिल की अगन से पिघल जाएगा तू
धुआं बन गयी है खयालों की महफ़िल
मेरे प्यार की जाने कहाँ होगी मंज़िल
मेघा रे मेघा रे, मेघा रे मेघा रे,
मेरे गम की तू दवा रे दवा रे
आज तू प्रेम का संदेस बरसा रे
मेघा रे मेघा रे, मेघा रे मेघा रे.......


दोघांनीही खूप साऱ्या गोष्टी केल्यात,जसं की बरेच दिवस मनात साठवलेल्या सर्व आठवणी आज दोघेही एकमेकांना सांगत सुटले होते, एकमेकांसोबत फोटो काढले,फोटो काढतांना दोघेही मात्र लाजत होता,कारण त्याचा दोघांचाही पहिलाच हा अनुभव होता...

शेवटी दोघांनी दिवसभर फिरल्यावर,घरी परतण्याचा निर्णय घेतला,
तिकडून येतांना मात्र नातं मैत्रीचं होतं,आणि जातांना मात्र त्या नात्यात बदल होऊन प्रेमाचं नातं तयार झालं होतं.....आता गाडीवर बसताना प्रथमेश ने न लाजता प्रिया च्या पाठीवर हात ठेवला होता,
दोघेही आपल्या ठिकाणी पाहोचण्यास निघाले होते,एक वेगळाच आनंद घेऊन.....

निघतांना सायंकाळ झाली होती,दिवसभर पावसाने साथ दिली होती, म्हणजे दिवसभर काही पाऊस आला नव्हता,पण कधी ही येईल याची दाट शक्यता नाकारता ही येत नव्हती.. आता मात्र वातावरण बदलायला लागलं. ढग च्या ढग धावायला लागले होते,रस्त्यामध्ये असणारी झाडे,झाडांच्या फांद्या,पाने सुद्धा हलायला लागली होती,वाऱ्याचा वेग वाढला होता,आणि दोघेही आपली खोली जवळ करण्याचा प्रयत्न करत होते,पण जे नाही वायचं ते झालं....

पावसाने आपली जोरदार हजेरी लावली,
त्यामुळे भिजण्यापेक्षा गाडी थांबवून दोघांनी झाडाचा आश्रय घ्यायचं ठरवलं..पाऊस मात्र धो - धो पडत होता,जणू आज त्याला दोन प्रेमी मिलनाचा खूपच आनंद झाला असावा म्हणून तो अजून अजून बरसत होता..झाडात किती वेळ टिकणार,आणि किती वेळ कोरडे राहणार,म्हणून पाण्याचे थेंब अंगावर पडत होते,सगळीकडे अंधार पसरला होता,रस्त्यावर कुणी एक दिसत नव्हतं आणि दोघेही मात्र आता पुरतेच फसले होते..

गाव ही जवळपास काही दिसत नव्हतं,मध्येच एखादा पक्षी किर्रर्रर्रर्रर्र असा वेडावाकडा आवाज करून जात होता.... आता मात्र प्रिया घाबरली,काय होईल याची तिला चिंता लागली होती...दोघांनी ही पहिल्यांदा एकमेकांचे हात पकडले होते,आणि पाऊस कमी होते का याची वाट पाहत ताटकळत उभे होते...

पाऊस आणि अंगावर येणारा थंड शहारा अंगात धडकी भरवत होता,मधेच विजेचा कडकडाट होऊन वीज आपली हजेरी लावत होती,
त्याच्या आवाजाने घाबरून प्रिया आता प्रथमेश ला नकळतपणे घट्ट चिपकली होती,कधी चिपकली हे तिला ही कळल नव्हतं,
त्या छातीला घट्ट चिपकल्यामुळे न कळत प्रियाचे आणि प्रथमेश चे ओठ एकमेकांना कधी चिपकले दोघांनाही कळले नाही,
आणि दोघांनीही आपल्या प्रेमाचा चुंबन ओठांवर ओठ ठेवून पावसाच्या सरीत,झाडाच्या खाली,आणि कुणी नसलेल्या ठिकाणी घेतला होता,
चुंबन झाल्यावर प्रिया ने परत आपली मान वर उचलली नाही...

पाऊस काही केल्या थांबत नव्हता आणि अंधार झाल्याने,वरून कपडे ही भिजल्याने तिथून हलण्याशिवाय पर्याय नव्हता,म्हणून दोघांनी परत आपली गाडी सुरू केली आणि कुठे चांगल्या जागी,जिथे सुरक्षित राहू अश्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू लागले...पाऊस एवढा जोराचा सुरू होता की गाडी ही नीट व्यवस्थित चालवली जात नव्हती,आणि वाऱ्याचा वेग ही जास्त असल्याने अंगात थंडी भरली होती,दोघांचे ही कपडे पुर्णतः भिजून गेले होते...
शेवटी थोड्या दूर अंतरावर गेले तर एका रस्त्यावर असणाऱ्या शेतात ,जंगलात असणाऱ्या त्या शेतात उंच जागेवर एक छोटुशी झोपडी दिसली,
आता पर्याय नसल्याने तिथे दोघांनीही जाण्याचा प्रयत्न केला,...

प्रथमेश -
प्रिया , "आता काही हा पाऊस उघडणार नाही,आणि असं ही पावसात गेलो असतो पण मला काही गाडी चालवता येत नसल्याने इथेच आपल्याला काही वेळ थांबावं लागेल...तुला जास्त थंडी भरली आहे....", असा प्रथमेश म्हणाला

प्रिया -
सॉरी प्रथमेश, " माझीच चूक होती तुला फिरायला आणण्याची आणि मग तुझ्यासोबत कसा वेळ निघून गेला ते कळले नाही,आणि आता कळले तर चारही बाजूला धो- धो पाऊस पडतो आहे,
अशी आपली चूक कबूल करत प्रिया म्हणाली...

प्रथमेश -
" अरे तसं काही नाही ग????" पावसाचे दिवस तो पडणारचं!!! " उलट सॉरी मला म्हणायला पाहिजे,
कारण मुलगा असून धड मला गाडी चालवता येत नाही,आणि तुझा बचाव ही करता येत नाही...

प्रिया -
इट्स ओके प्रथमेश...जाऊयात आपण,तिथे थोडा वेळ थांबून परत निघुया...

एक बरं आहे की दोघेही खोली करून राहत असल्याने एकमेकांना सध्या तरी विचारणारं कुणी नाही???नाही तर दोघांची वाट लागली असती,

असं मनात पुटपुटत स्मित हास्य करत प्रियाने झोपडीपर्यंत चालण्यास सुरुवात केली,
गाडी रस्त्याच्या बाजूला लावून दोघेही झोपडी पर्यन्त पोहोचले...

प्रियाचे कपडे पूर्ण ओलेचिंब झाले होते,आणि तिला थंडी भरली होती.. तिचे कपडे अंगाला चिपकले होते, त्यातून तिचे सौंदर्य अजूनही खुलून दिसत होते...तिच्या शरीराच्या अंगा अंगाचा आकार त्यातून दिसत होता,आणि म्हणून ती लाजेने स्वतःला लपवून बसली होती...प्रथमेश सुद्धा तिच्या अंगाकडे पाहून पुरताच ओलाचिंब झाला होता,पण पाऊस काही केल्या थांबत नव्हता,त्या झोपडीत पावसापासून बचाव तर नक्की होत होता पण अंगात भरलेली थंडी काही केल्या जात नव्हती...
नकळत प्रियाचा हातात हात प्रथमेश ने घेतला,
आता प्रिया लाजली आणि लाजून तिने घट्ट प्रथम ला मिठी मारली, दोघांत वाऱ्याला ही जागा नसावी एवढी घट्ट मिठी प्रियाने प्रथमेश ला मारली,
व परत दोघांनी ओठांवर ओठ ठेवून चुंबन घेण्यास सुरुवात केली,
कुणी बघेल,कुणी येईल याची भीती न बाळगता एकमेकांना घट्ट आलिंगन देऊन दोघे नवप्रेमी चुंबन करत आपल्या प्रेमाचा आनंद घेत होते....

नकळत प्रथमेश चा हात तिच्या छातीवर गेला,आणि एका पाठोपाठ तो प्रिया चे सर्व कपडे काढत गेला,ही वासना नव्हती तर प्रेमाच्या भावना होत्या,चार वर्षे सोबत राहून एकमेकांना आवडत असून देखील कधी न बोलून दाखविलेल्या त्या भावनेचा तो संगम होता,मैत्रीच्या पुढे जाऊन प्रेमाला आपलं केलेल्या दोन प्रेमीयुगलांच्या आत्मा मिलनाचा तो प्रसंग होता,नकळतपणे घडत असलेल्या भावनेचा तो महापूर होता.....

प्रिया ने ही त्याला आता विरोध केला नाही,
आणि नकळतपणे,अवेळी,त्या झोपडीत दोघांचा ही प्रणय रंगला होता, दोघेही आपल्या प्रणयाचा बेभान होऊन आनंद घेत होते,कधी एकमेकांच्या आत ते बुडाले त्यांना ही कळलं नाही
दोघांच्या ही अंगावरील कपडे बाजूला पडले होते,दोघेही शांत झाल्यावर एकेमकांच्या मिठीत सैल होऊन निपचित पडले होते....
पडणारा धो - धो पाऊस,वाऱ्याचा थंडगार स्पर्श आणि ती झोपडी आज प्रिया आणि प्रथमेश च्या प्रणयाची,दोघांच्या प्रेमाची साक्ष देत होते...

तब्बल तीन - चार तासांनी पावसाने आपली काही वेळासाठी रजा घेतली होती,
व परत प्रिया आणि प्रथमेश नी आपली खोली जवळ करून झालेल्या प्रकारावर मौन ठेवून आपल्या खोलीवर झोपी जाण्याचा प्रयत्न करत होते.....


अजुनी सुगंध येई,दुलईस मोगऱ्याचा,
गजरा कसा फुलांचा ,विसरून रात गेली,
आताच अमृताची ,बरसून रात गेली.....


कॉलेज संपल्यानंतर दोघांनीही घरच्यांच्या संमतीने सुखदुःखात साथ देऊ म्हणून लग्न केले,आणि सुखरूप आयुष्य जगू लागले...पण जेव्हाही पाऊस येतो प्रथमेश आणि प्रियाच्या आठवणीत येतो,
हा आठवणीतला रोमांचकारी पाऊस.......


तो उठून पंकज उदास लावेल,
तो तू बंद कर आणि किशोरीच सैला रे लाव,
तो तुला मिठीत घेईल,
आणि म्हणेल तू मला आवडतेस,
त्यालाही तू तसाच प्रतिसाद दे,
आता झोपी जाण्याचा प्रयत्न कर,
त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघून,
येणाऱ्या पावसाळ्याच्या एका तरी दिवसांत,
बघ माझी आठवण येते का????


💐💐💐 समाप्त 💐💐💐

लेखक -
सुरज मुकिंदराव कांबळे

टीप -
सदर कथा ही काल्पनिक असून त्याचा जिवंत व्यक्तीशी काही संबंध नाही,असा संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.लेखकाने आपल्या मनात असलेल्या काल्पनिक पात्र प्रिया आणि प्रथमेश ला कथेत उतरविण्याचा प्रयत्न केला आहे....कथेतील काही ओळी या गाण्याच्या आहेत,काही संकलित आहेत...कथेतील सर्व गाणी ही पावसावर चित्रित ,पावसाचे वर्णन करणारी असल्याने ती इथे घेण्यात आली आहे...
धन्यवाद.....🙏🙏🙏